ऑनलाईन कोर्स च्या माध्यमातून कमावू शकता २ लाख रुपये महिना

तुम्हाला जर एखाद्या टॉपिक चे ज्ञान असेल, अनुभव असेल तर तुम्ही तुमचा ऑनलाईन कोर्स बनवू शकता आणि तो ऑनलाईन विकू शकता.

तुम्ही जर इंटरनेट चा वापर करत असाल तर तुम्हाला अशा अनेक जाहिराती इंटरनेट वर तुम्ही पाहिल्या असतील. ऑनलाईन कोर्स विकून अनेक लोक करोडो रुपये कमावत आहे. 

ऑनलाईन कोर्स बनवणे अतिशय सोपं आहे. इंटरनेट वर असे अनेक प्लॅटफॉर्म आहे ज्यावर तुम्ही कोणत्याही अगदी सहज तुमचा ऑनलाईन कोर्स बनवू शकता.

👉 हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ?

तुम्हाला ऑनलाईन व्हिडिओ कोर्स तयार करून विकायचा आहे. यात तुम्ही तुमचा अनुभव, ज्ञान किंवा कौशल्याचा वापर करून लोकांना शिकवू शकता.

आजकाल ऑनलाईन शिक्षणाला मोठी मागणी आहे, त्यामुळे या व्यवसायात तुम्हाला चांगली संधी आहे.

👉 व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागेल ?

  • कोर्स ची माहिती: सर्वप्रथम, एक विषयाची निवड तुम्हाला करायची आहि आणि त्या विषयावर चांगला अभ्यास करून एक कोर्स तयार करायचा आहे. ( लिखित स्वरूपात )
  • कोर्स बनण्यासाठी काय लागलं: मोबाईल, इंटरनेट कनेक्शन, व्हिडिओ एडिटिंग अँप, एखादा माईक ( आवाज रेकॉर्ड करण्यासाठी )
  • ऑनलाईन प्लॅटफॉर्म: तुमचा कोर्स विकण्यासाठी प्लॅटफॉर्म निवडा. तुम्ही तुमची स्वतःची वेबसाइट देखील बनवू शकता किंवा Udemy, Coursera सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता.
  • प्रमाणपत्र: कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणं महत्वाचं आहे, त्यामुळे त्यांना तुमचा कोर्स पूर्ण करण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळेल.

👉 मार्केट रिसर्च कसा करावा ?

  • तुमची ज्या विषयाचा कोर्स बनवणार आहे त्या विषयाची ऑनलाईन मागणी आहे का हे शोधा.
  • कोणत्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना तुमचा कोर्स उपयोगी ठरू शकेल याचा रिसर्च करा.
  • तुमचे स्पर्धक कोण आहेत आणि ते कोणत्या किमतीत कोर्स विकतात हे पाहा.

👉 किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल ?

सुरुवातीला फक्त १० हजार च्या आत तुम्ही याची सुरुवात करा. जे ऑनलाईन Free 

👉 मार्केटिंग आणि विक्री कशी करता येईल ?

  • सोशल मीडिया प्रमोशन: फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर कोर्सची जाहिरात करू शकता.
  • ब्लॉग – एखादा Blog देखील बनवू शकता ज्याचा वापर तुम्ही तुमचे Online Courses विकण्यासाठी करू शकता. 
  • ई-मेल मार्केटिंग: तुमच्या टार्गेट कस्टमरच्या इमेल लिस्ट बनवा आणि त्यांना ऑफर्स, डेमो व्हिडिओ किंवा कोर्सबद्दल माहिती पाठवा.
  • फ्री वेबिनार: लोकांना कोर्सबद्दल माहिती मिळावी यासाठी फ्री वेबिनार्स घ्या, ज्यामुळे त्यांना कोर्स खरेदी करायला प्रोत्साहन मिळेल.
  • संपर्क नेटवर्क: तुमच्या व्यवसायाशी संबंधित लोकांसोबत नेटवर्किंग करा. त्यांना तुमच्या कोर्सची माहिती द्या आणि त्यांना त्यांच्या  फॉलोअर्स सोबत course ची माहिती शेअर करायला सांगा.
  • डिस्काउंट ऑफर्स: सुरुवातीला डिस्काउंट देऊन विक्री वाढवा. पहिल्या काही विद्यार्थ्यांना स्पेशल ऑफर दिली तर ते तुमच्या कोर्सला चांगले Review देऊ शकतात.

👉 या व्यवसायातून किती नफा होईल ?

तुम्ही किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकता त्यावर नफा अवलंबून आहे. साधारणपणे, एका कोर्समधून ५० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत वार्षिक नफा मिळवू शकता, आणि हा नफा वेळोवेळी वाढवू शकता.

👉 व्यवसायातील आव्हाने

  • सुरुवातीला विद्यार्थी मिळवणं थोडं अवघड असू शकतं, त्यामुळे मार्केटिंगवर चांगलं लक्ष द्या.
  • कोर्स कंटेंट नियमितपणे अपडेट करणं आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना नवीन माहिती मिळेल.
  • स्पर्धकांमुळे किंमत कमी ठेवावी लागू शकते, पण तुमचं कंटेंट वेगळं आणि अधिक उपयुक्त असेल तर किमतीचा प्रश्न नसेल.

👉 महत्वाच्या टिप्स

  • विद्यार्थ्यांना फक्त माहितीच न देता, प्रॅक्टिकल उदाहरणं आणि केस स्टडी सह शिकवा.
  • कोर्स विकताना भरपूर रिव्ह्यूज आणि फीडबॅक मिळवण्याचं प्रयत्न करा, ज्यामुळे तुमचा कोर्स विश्वसनीय ठरेल.
  • लोकांना शिकण्यात रुची निर्माण होईल असा कंटेंट डिझाईन करा, आणि त्यांना इंटरॅक्टिव्ह स्वरूपात शिकवा.