घरबसल्या याची विक्री करा आणि ४० हजार महिना कमवा 

तुम्ही जुन्या वस्तू विकण्याचा काम देखील करू शकता. 

आजकाल असे अनेक लोक आहे ज्यांना त्यांचे जुने प्रॉडक्ट आणि वस्तू विकायच्या असतात परंतु कुठे विकावे हे त्यांना माहीत नसतं. 

तुम्ही या जुन्या वस्तूंचे फोटो काढू शकता आणि सोशल मीडियाचा वापर करून त्यासाठी कस्टमर शोधू शकता. 

👉 हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ? :  

या ठिकाणी तुम्हाला जुन्या वस्तू विकणारे आणि खरेदी करणारे यांच्यातील मध्यस्थ म्हणून काम करायचा आहे. 

समजा एखादी जुनी वस्तू पाचशे रुपयाला मिळत असेल तर ती तुम्ही तुमचं मार्जिन लावून विकू शकता.

जुने फर्निचर, टेबल, खुर्च्या, कपाट, पलंग, इलेक्ट्रॉनिक वस्तू, भांडे अशा अनेक वस्तू तुम्ही विकू शकता.

👉 मार्केट रिसर्च करा 

तुमच्या भागातील लोक कोणकोणत्या प्रकारच्या जुन्या वस्तू खरेदी करतात याचा शोध घ्या त्यासाठी तुम्ही olx सारख्या वेबसाईट वर रिसर्च करू शकता.

या वेबसाईटवर कोण कोणत्या प्रकारचे प्रॉडक्ट हे जास्त विकले जातात ते बघा.  

👉 व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागलं ?

  • मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन.
  • डिजिटल मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करता आली पाहिजे. 
  • सोशल मीडियाचा योग्य वापर करता आला पाहिजे. 

👉 किती इन्व्हेस्टमेंट करावी लागलं ?

5 हजार रुपयांच्या आत या व्यवसायाची सुरुवात तुम्ही करू शकता.

👉 कस्टमर कसे मिळतील ?

  • फेसबुक आणि इंस्टाग्राम वर जाहिरात करू शकता. 
  • लोकल फेसबुक ग्रुप जॉईन करू शकता आणि त्यात तुमच्या जाहिराती पोस्ट करू शकता. 
  • माऊथ पब्लिसिटी ने तुम्हाला चांगले कस्टमर मिळू शकतील.
  • काही प्रॉडक्ट साठी तुम्ही गॅरंटी किंवा वॉरंटी देऊ शकता.

👉 व्यवसायातून किती नफा होईल ?

या बिझनेस मधून तुम्ही महिन्याला 10 हजार ते 40 हजार रुपयापर्यंत कमाई करू शकता. 

👉 व्यवसायातील आव्हाने 

  • तुम्हाला डिजिटल माध्यमांवर मार्केटिंग करता आली पाहिजे.
  • इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट विकताना काळजी घ्या कारण अनेक वेळेस प्रॉडक्ट खराब असतात.

👉 या बिजनेस महत्वाच्या टिप्स 

  • हा व्यवसाय तुम्ही पार्ट टाइम मध्ये सुरू करू शकता. 
  • ज्यांना जुने प्रॉडक्ट विकायचे आहे त्यांच्याकडून फक्त प्रोडक्टच्या इमेजेस घ्या. 
  • आधीच प्रॉडक्ट विकत घेऊन बसू नका.