रुपया, डॉलर, पाउंड याचप्रमाणे बिटकॉइन हे देखील एक चलन आहे ज्याचा वापर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने करू शकता.

बिटकॉइन हि एक डिजिटल करन्सी आहे जिला “क्रिप्टो करन्सी” म्हणतात. तिला स्पर्श करता येत नाही आणि ती तुमच्या डिजिटल Wallet मध्ये Store केलेली असते. 

कोणत्याही देशातील करन्सी वर त्या देशातील सरकारचे नियंत्रण असते. तुमच्या सगळ्या व्यवहारावर बँकेचे नियंत्रण असते परंतु Crypto Currency वर कोणाचेही नियंत्रण नसते कारण कोणत्याही देशाचं सरकार किंवा बँक हे चलन छापत नाही किंवा बनवत नाही.  

बिटकॉइन ला Decentralized करन्सी असं देखील म्हटल जात कारण याला कोणताही एक व्यक्ती, कंपनी, सरकार किंवा देश नियंत्रित करत नाही 

"सतोशी नाकामोटो" या व्यक्तीने बिटकॉइन चा शोध लावलेला आहे. हा व्यक्ती कोण आहे हे कोणालाही माहित नाही. Satoshi Nakamoto हे एक टोपणनाव आहे. 

बिटकॉइन मध्ये Blockchain तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. Blockchain तंत्रज्ञानाचा वापर करून Decentralized Currency, App, Website, Smart Contracts अशा अनेक गोष्टी बनवल्या जात आहे.  

Blockchain तंत्रज्ञानाला ला Hack करणे देखील जवळपास अशक्य मानले जाते आणि या तंत्रज्ञानाचे अनेक फायदे आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर भविष्यात केला जाईल.  

बिटकॉइन हे  कोणी आणि कोणाला पाठवले हे कोणालाच माहित होत नाही. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला बिटकॉइन पाठवले तर हा व्यवहार फक्त तुम्हाला आणि त्या व्यक्तीला माहित असतो कोणत्याही Third Party चा यामध्ये समावेश नसतो जसे कि बँक.

बिझनेस आणि पैशाबद्दल नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनेल ला नक्की भेट द्या आणि चॅनेल ला Subscribe करा

Arrow

बिटकॉइन च्या किमतीत मोठ्याप्रमाणात बदल होत असतात. २०१० साली एका बिटकॉइन ची किंमत ७ रुपये इतकी होती आणि २०२१-२२ मध्ये एका बिटकॉइन ची किंमत ४० लाख इतकी आहे.  

अनेक लोकांनी बिटकॉइन मध्ये पैसे गुंतवून करोडो रुपये कमावले आहे परंतु बिटकॉइन मध्ये प्रचंड जास्त Risk आहे. किंमत कधीही कमी होऊ शकते किंवा वाढू शकते. तुम्ही तुमचे सर्व पैसे गमाऊ देखील शकता 

बिटकॉइन ला खूप जास्त Electricity लागते त्यामुळे जागतिक तापमानवाढ होण्यास बिटकॉइन कारणीभूत ठरत आहे आणि म्हणूनच बिटकॉइन च्या तंत्रज्ञानात सुधारणा करणे गरजेचे आहे.

बिटकॉइन सारख्या जवळपास 8000 Cryptocurrency मार्केट मध्ये आहे जसे की Ethereum, Cardano, Solana, Binance Coin, Tether 

NEXT: भारतातील १० सर्वात शक्तिशाली व्यक्ती

Arrow