भविष्यात तुफान चालणार हा व्यवसाय | Future Business Idea In Marathi

Future Business Idea In Marathi

आजकाल बाजारात मिळणारी फळे आणि भाज्या या केमिकल युक्त असतात. आजकाल पिकांसाठी जी खते आणि कीटकनाशके वापर जातात ती आपल्या आरोग्यासाठी खूप घातक असतात 

फळे आणि भाज्यांना विविध प्रकारची इंजेक्शन्स देखील दिली जातात त्यामुळे लोकांना अनेक मोठं मोठे आजार होत आहे. 

हळूहळू लोक याबद्दल जागृत होत आहेत आणि सेंद्रिय खतांचा वापर केलेला भाजीपाला आणि फळे लोक मोठ्याप्रमाणावर विकत घेत आहे. 

तुम्ही सेंद्रिय फळे आणि भाज्या विकण्याचे काम करू शकता आणि चांगले पैसे कमावू शकता. 

हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ? :  

या व्यवसायात तुम्हाला फक्त होलसेल दरात भाज्या विकत घ्यायचा असतात आणि मार्जिन Add करून ग्राहकांना विकायच्या असतात. 

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली काही माहिती खालीलप्रमाणे – 

मार्केट रिसर्च करा

  • तुमच्या भागात फिरून इतर लोक कोणकोणत्या भाज्या विकतात ते शोधून काढा.
  • भाज्या कोणत्या किमतीला विकल्या जातात ते शोधून काढा.
  • तुमच्या शहरातील काही चांगली वर्दळीची ठिकाणं शोधून काढा. 

होलसेल ने भाजीपाला कुठून घ्यायचा ?  

तुम्ही ऑरगॅनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून भाज्या विकत घेऊ शकता आणि मार्केटमध्ये विकू शकता.

यासाठी तुम्हाला थोडं फिरावं लागेल आणि अशा शेतकऱ्यांचा शोध घ्यावा लागेल. 

व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागलं ?

  • भाजीपाला 
  • बाईक किंवा सायकल ( फिरून विक्री करणार असाल तर )
  • वजन करायचे मशीन
  • कॅरी बॅग किंवा इतर इको फ्रेंडली पिशव्या
  • बास्केट, छत्री, टेबल ( Optional )
  • Price लिहिण्यासाठी एखादं पोस्टर ( Optional )
  • बसण्यासाठी पोत किंवा इतर काही.

किती इन्व्हेस्टमेंट करावी लागलं ?

Starting Investment – 5,000 ते 10,000 मध्ये सुरुवातीचा भाजीपाल्याचा स्टॉक, वजन काटा, कॅरी बॅग आणि इतर आवश्यक साहित्य घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता. जर तुमच्याकडे सायकल किंवा बाईक असेल तर सुरुवातीचा खर्च आणखी कमी होऊ शकतो.

1 Month Working Capital – 30,000 ते 50,000 अतिरिक्त रक्कम नवीन भाजीपाला खरेदी, खराब झालेल्या मालाचे नुकसान आणि इतर दैनंदिन खर्चासाठी ठेवावी. Two Wheeler वापरणार असाल तर petrol चा खर्च.

टीप: वरील गुंतवणूक ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष गुंतवणूक ही तुमचे शहर, व्यवसायाची पद्धत, साहित्य, उपकरणे आणि इतर खर्चांवर अवलंबून कमी किंवा जास्त असू शकते.

कस्टमर कसे मिळतील ?

  • तुम्ही घरोघरी जाऊन विक्री करू शकता
  • एखादया गर्दीच्या ठिकाणी थांबून देखील विक्री करू शकता.
  • तुम्ही Social मीडिया चा वापर कस्टमर मिळवण्यासाठी करू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम चा वापर करू शकता.
  • या व्यवसायात भाजीपाला विकण्याचे ठिकाण खूप महत्वाचे असते.

मार्केटिंग कशी करता येईल ?

  • ऑरगॅनिक भाजीपाला या गोष्टीचा पुरेपूर वापर करायचा. लोकांना हे सांगायचे
  • वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना सोबत एक स्पीकर ठेऊ शकता ज्यावर काही आकर्षक गाणे किंवा ऑडिओ लावू शकता ज्यामुळे लोकांचे तुमच्याकडे लक्ष जाईल. 
  • भाज्यांचे फायदे सांगत फिरू शकता किंवा ऑडिओ लावू शकता.
  • भाज्यांची नाव वापरून एखाद चांगलं गाणं तयार करू शकता किंवा इंटरनेट वर शोधू शकता.
  • ग्राहकाने थोडा जास्त भाजीपाला विकत घेतला तर त्याला कोथिंबीर किंवा काही दुसरी भाजी थोडीशी फ्री देऊ शकता ज्यांच्या ग्राहक पुन्हा पुन्हा येईल. 

व्यवसायातून किती नफा होईल ?

सुरुवातीला: 10 ते 15 हजार प्रति महिना कमाई शक्य.

सरासरी: 20 हजार ते 50 हजार प्रति महिना कमाई शक्य.

चांगले यश मिळाल्यास: 80 हजार किंवा त्यापेक्षा जास्त प्रति महिना कमाई शक्य.

टीप: वरील कमाई ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष कमाई ही तुमच्या विक्रीचे प्रमाण, भाज्यांची गुणवत्ता, ग्राहकांची संख्या, होलसेल खरेदीचा दर, प्रॉफिट मार्जिन, मार्केटिंग, स्पर्धा, घरपोच सेवा, नियमित ग्राहक आणि व्यवसाय चालवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. हा व्यवसाय असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीची कमाई वेगळी असू शकते.

व्यवसायातील आव्हाने 

भाजीपाला हा एक नाशवंत पदार्थ आहे. जर जास्त दिवस ठेवले तर खराब होतात त्यामुळे त्यांची लगेच विक्री करून टाकणे योग्य. 

या बिजनेस महत्वाच्या टिप्स 

  • शहरातील अशा भागात भाजीपाला विकू शकता जिथं लोक तर राहतात पण आसपास जास्त दुकान नाही सोयी सुविधा नाही.
  • भाव कमी जास्त करू भाजीपाला विकून टाकायचा. सुरुवातीला कमाई थोडी कमी झाली तरी चालेल. 
< < Click Here To Get 100+ Small Business Ideas