घरबसल्या मोबाईल वर काम करा आणि करा तुफान कमाई | Small Business Idea In Marathi

Small Business Idea In Marathi

आजकाल इंटरनेटवर व्हिडिओ सर्वात जास्त पाहिले जातात.

करोडो लोक नियमितपणे युट्युब चा वापर करतात आणि ही संख्या खूप वेगाने वाढत आहे.

यूट्यूब वर तुम्ही तुमचे स्वतःचे युट्युब चॅनेल बनवू शकता आणि त्यातुन चांगले पैसे कमवू शकता.

यूट्यूब हा एक अतिशय चांगला व्यवसाय आहे. यूट्यूब वर तुम्ही कोणत्याही विषयावर यूट्यूब चॅनेल बनवू शकता.

तुमच्या कडे जर एखाद्या टॉपिक चे चांगले ज्ञान असेल आणि लोकांना देखील त्या टॉपिक बद्दल जाणून घेण्यात इंटरेस्ट असेल, तर तुम्ही त्या टॉपिक वर यूट्यूब चॅनेल सुरू करू शकता.

हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ? :  

या ठिकाणी तुम्हाला एका चांगल्या टॉपिक वर वेगवेगळे व्हिडिओ बनवायचे आहे आणि ते YouTube वर अपलोड करायचे आहे. 

मार्केट रिसर्च करा 

तुम्हाला ज्या टॉपिक वर व्हिडिओ बनवायचे आहे तो टॉपिक YouTube वर सर्च करा आणि जर त्या टॉपिक वरील व्हिडिओस वर चांगले Views येत असतील आणि स्पर्धा कमी असेल तर तुम्ही त्यावर व्हिडिओ बनवू शकता. 

कोणत्या टॉपिक वर तुम्ही व्हिडिओ बनवू शकता ?

हेल्थ, फिटनेस, ब्युटी, बिजनेस, कॉमेडी, मनोरंजन, शैक्षणिक हे यूट्यूब वरील काही प्रसिद्ध टॉपिक आहे.

व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागलं ?

  • तुमच्याकडं जर एक स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन असेल तर तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता. 
  • जर थोडीफार इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ऑडिओ रेकॉर्ड करण्यासाठी एक माइक तुम्ही घेऊ शकता किंवा इअरफोन ने देखील ऑडिओ रेकॉर्ड करू शकता. 

किती इन्व्हेस्टमेंट करावी लागलं ?

Starting Investment – जर तुमच्याकडे मोबाइल असेल तर 5 हजाराच्या आत हे काम तुम्ही सुरु करू शकता. फक्त महिन्याला रिचार्ज करण्यासाठी पैसे लागतील आणि जर तुम्ही Mic घेतला तर त्याचे पैसे.

1 Year Working Capital –  5000 रुपये extra वर्षभर मोबाइल रिचार्ज आणि इतर खर्चा साठी.

टीप: वरील गुंतवणूक ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष गुंतवणूक ही तुमचे शहर, व्यवसायाची पद्धत, साहित्य, उपकरणे आणि इतर खर्चांवर अवलंबून कमी किंवा जास्त असू शकते.

हे काम कसं शिकायचं  ?

हे काम सुरु करण्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टी शिकाव्या लागतात जसे कि चांगले व्हिडिओ कसे बनवायचे, Script कशी बनवायची, व्हिडिओ एडिट कसा करायचा, Thumbnail कस बनवायचं.

या सर्व गोष्टी तुम्ही YouTube वरच शिकू शकता. अनेक लोक त्याचे व्हिडिओ बनवतात. 

या व्यवसायातून कसा आणि किती नफा होईल ?

YouTube Partner Program, Affiliate Marketing, Sponsorship, Product Selling अशा अनेक मार्गांनी तुम्ही यातून पैसे कमावू शकता. 

सुरुवातीला: 0 ते 15 हजार प्रति महिना कमाई शक्य.

सरासरी: 30 हजार ते 50 हजार  प्रति महिना कमाई शक्य.

चांगले यश मिळाल्यास: 1 लाख ते 5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त प्रति महिना कमाई शक्य.

टीप: वरील कमाई ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष कमाई ही तुमच्या व्हिडिओवरील Views, निवडलेला Topic, कंटेंटची गुणवत्ता, YouTube Ads, Sponsorships, Affiliate Marketing, स्वतःची Products किंवा Services, प्रेक्षकांचा सहभाग, मार्केटिंग, सातत्य आणि व्यवसाय चालवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. हा व्यवसाय असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीची कमाई वेगळी असू शकते.

व्यवसायातील आव्हाने 

  • YouTube वर यशस्वी होण्यासाठी Time  लागतो त्यामुळे तुमच्या अंगात पेशन्स असणं सगळ्यात महत्वाचं आहे.
  • नवनवीन गोष्टी शिकाव्या लागतात आणि प्रयोग करून बघावे लागतील. 

या बिजनेस महत्वाच्या टिप्स

  • सुरुवातीला तुम्ही हे काम पार्ट टाइम मध्ये सुरु करू शकता आणि जर चांगला रिस्पॉन्स आला तर मग फुल टाइम करू शकता. 
  • नियमितपणे व्हिडिओ टाकणं आणि प्रत्येक व्हिडिओ मध्ये थोडी थोडी सुधारणा करणं गरजेचं आहे. 
< < Click Here To Get 100+ Small Business Ideas