इतर लोक करतील काम, कमवा चांगला पैसा | Small Business Idea In Marathi

Small Business Idea In Marathi

भारतामध्ये फर्निचर व्यवसायाची बाजारपेठ खूप मोठी आहे. तुम्ही देखील हा व्यवसाय सुरू करू शकता आणि या संधीचा फायदा घेऊ शकता.

या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दुकान सुरू करण्याची गरज नाही. तुमच्या भागातील दुकानदारांसोबत किंवा फर्निचर बनवणाऱ्या कारागिरांसोबत तुम्ही पार्टनरशिप मध्ये काम करू शकता. 

या ठिकाणी तुम्हाला फक्त कस्टमर आणायचे आहे आणि बाकीचे सर्व काम हे दुकानदार किंवा कारागिरी करतील. 

तुम्ही दुकानदारांकडून फर्निचर चे फोटोज घेऊ शकता आणि सोशल मीडियाचा वापर करून जाहिरात करू शकता. प्रत्येक विक्री माग तुम्ही कमिशन घेऊ शकता. 

तुम्ही लोकांना कस्टमाइज फर्निचर देखील बनवून देऊ शकता.

सोफा, खुर्च्या, बेंच, ड्रेसर, केसेस, स्टोरेज कॅबिनेट्स, टेबल्स, होम डेकोरेटिव्ह फर्निचर आणि अजूनही अनेक प्रकारचे वेगवेगळे फर्निचर तुम्ही बनवून देऊ शकता.

जर तुम्ही चांगले काम केले तर तुमच्या व्यवसायाची माऊथ पब्लिसिटी होईल आणि तुम्हाला भरपूर ग्राहक मिळतील.

हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ? :  

या व्यवसायात तुम्हाला लोकांकडून फर्निचर बनवायच्या ऑर्डर घ्यायचा आहे आणि इतरांकडून ते फर्निचर बनवून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला एक मध्यस्थ म्हणून काम करायचा आहे.

मार्केट रिसर्च करा 

तुमच्या भागात लोक कोणकोणत्या प्रकारचं फर्निचर घरामध्ये वापरतात याचा निरीक्षण करा. ओळखीच्या लोकांच्या घरी जा तिथे कोण कोणत फर्निचर आहे ते बघा.

फर्निचर बनवणारे कुठे भेटतील ?  

Google वर तुम्हाला अनेक फर्निचर बनवणारे लोक सापडतील. त्यांच्यासोबत तुम्ही पार्टनरशिप मध्ये काम करू शकता.

व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागलं ?

  • डिजिटल मार्केटिंग करण्याचे कौशल्य 
  • फर्निचर व्यवसायाचे ज्ञान
  • बोलण्याचं आणि विक्री करण्याचा कौशल्य.

किती इन्व्हेस्टमेंट करावी लागलं ?

Starting Investment – जर तुमच्याकडे मोबाईल किंवा Laptop असेल तर 10 ते 15 हजारात हा व्यवसाय सुरू करू शकता. यामध्ये इंटरनेट, बेसिक मार्केटिंग आणि इतर आवश्यक खर्चाचा समावेश आहे.

1 Year Working Capital – 10 ते 25 हजार अतिरिक्त रक्कम इंटरनेट, ग्राहकांना भेटण्यासाठी प्रवास, ऑनलाइन मार्केटिंग आणि इतर छोट्या खर्चासाठी ठेवावी.

टीप: वरील गुंतवणूक ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष गुंतवणूक ही तुमचे शहर, व्यवसायाची पद्धत, साहित्य, उपकरणे आणि इतर खर्चांवर अवलंबून कमी किंवा जास्त असू शकते.

कस्टमर कसे मिळतील ?

  • फेसबुक तसेच इंस्टाग्राम वर जाहिरात करू शकता. 
  • वेगवेगळ्या फेसबुक ग्रुप मध्ये फर्निचरच्या जाहिराती पोस्ट करू शकता.
  • एखादी फ्री मधली वेबसाईट बनू शकता ज्यावर फर्निचर च्या वेगवेगळ्या इमेजेस आणि त्याची माहिती अपलोड करू शकता.

व्यवसायातून किती नफा होईल ?

सुरुवातीला: 5 ते 20 हजार प्रति महिना कमाई शक्य.

सरासरी: 30 ते 80 हजार प्रति महिना कमाई शक्य.

चांगले यश मिळाल्यास: 1 लाख ते 3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त प्रति महिना कमाई शक्य.

टीप: वरील कमाई ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष कमाई ही तुम्हाला मिळणाऱ्या ऑर्डर्स, पार्टनर दुकानदार किंवा कारागिरांची गुणवत्ता, कमिशन मार्जिन, ग्राहकांची संख्या, मार्केटिंग, सोशल मीडियावरील पोहोच, स्पर्धा आणि व्यवसाय चालवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. हा व्यवसाय असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीची कमाई वेगळी असू शकते.

व्यवसायातील आव्हाने 

  • ऑनलाइन माध्यमांचा चांगला वापर करता आला पाहिजे. 
  • ऑनलाइन मार्केटिंग करणे शिकावं लागेल.

या बिजनेस महत्वाच्या टिप्स 

  • व्यवसाय सुरू करण्याआधी या क्षेत्राचं चांगलं ज्ञान तुम्हाला असलं पाहिजे. 
  • या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे चांगले कारागीर असले पाहिजे.
< < Click Here To Get 100+ Small Business Ideas