तुम्ही जुन्या वस्तू विकण्याचा काम देखील करू शकता.
आजकाल असे अनेक लोक आहे ज्यांना त्यांचे जुने प्रॉडक्ट आणि वस्तू विकायच्या असतात परंतु कुठे विकावे हे त्यांना माहीत नसतं.
तुम्ही या जुन्या वस्तूंचे फोटो काढू शकता आणि सोशल मीडियाचा वापर करून त्यासाठी कस्टमर शोधू शकता.
हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ? :
या ठिकाणी तुम्हाला जुन्या वस्तू विकणारे आणि खरेदी करणारे यांच्यातील मध्यस्थ म्हणून काम करायचा आहे.
समजा एखादी जुनी वस्तू पाचशे रुपयाला मिळत असेल तर ती तुम्ही तुमचं मार्जिन लावून विकू शकता.
जुने फर्निचर, टेबल, खुर्च्या, कपाट, पलंग, इलेक्ट्रॉनिक वस्तू, भांडे अशा अनेक वस्तू तुम्ही विकू शकता.
मार्केट रिसर्च करा
तुमच्या भागातील लोक कोणकोणत्या प्रकारच्या जुन्या वस्तू खरेदी करतात याचा शोध घ्या त्यासाठी तुम्ही olx सारख्या वेबसाईट वर रिसर्च करू शकता.
या वेबसाईटवर कोण कोणत्या प्रकारचे प्रॉडक्ट हे जास्त विकले जातात ते बघा.
व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागलं ?
- मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन.
- डिजिटल मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करता आली पाहिजे.
- सोशल मीडियाचा योग्य वापर करता आला पाहिजे.
किती इन्व्हेस्टमेंट करावी लागलं ?
Starting Investment – जर तुमच्याकडे मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन असेल तर 10 ते 15 हजारात हा व्यवसाय सुरू करू शकता. सुरुवातीला स्वतः वस्तू खरेदी करण्याची गरज नसते.
1 Year Working Capital – 20 ते 30 हजार अतिरिक्त रक्कम इंटरनेट, ग्राहकांना भेटण्यासाठी प्रवास, ऑनलाइन मार्केटिंग आणि इतर छोट्या खर्चासाठी ठेवावी.
टीप: वरील गुंतवणूक ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष गुंतवणूक ही तुमचे शहर, व्यवसायाची पद्धत, साहित्य, उपकरणे आणि इतर खर्चांवर अवलंबून कमी किंवा जास्त असू शकते.
कस्टमर कसे मिळतील ?
- फेसबुक आणि इंस्टाग्राम वर जाहिरात करू शकता.
- लोकल फेसबुक ग्रुप जॉईन करू शकता आणि त्यात तुमच्या जाहिराती पोस्ट करू शकता.
- माऊथ पब्लिसिटी ने तुम्हाला चांगले कस्टमर मिळू शकतील.
- काही प्रॉडक्ट साठी तुम्ही गॅरंटी किंवा वॉरंटी देऊ शकता.
व्यवसायातून किती नफा होईल ?
सुरुवातीला: 5 ते 15 हजार प्रति महिना कमाई शक्य.
सरासरी: 30 ते 75 हजार प्रति महिना कमाई शक्य.
चांगले यश मिळाल्यास: 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त प्रति महिना कमाई शक्य.
टीप: वरील कमाई ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष कमाई ही तुम्ही विकणाऱ्या वस्तूंचा प्रकार, प्रॉफिट मार्जिन, ग्राहकांची संख्या, मार्केटिंग, सोशल मीडियावरील पोहोच, स्पर्धा, व्यवहारांची संख्या आणि व्यवसाय चालवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. हा व्यवसाय असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीची कमाई वेगळी असू शकते.
व्यवसायातील आव्हाने
- तुम्हाला डिजिटल माध्यमांवर मार्केटिंग करता आली पाहिजे.
- इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट विकताना काळजी घ्या कारण अनेक वेळेस प्रॉडक्ट खराब असतात.
या बिजनेस महत्वाच्या टिप्स
- हा व्यवसाय तुम्ही पार्ट टाइम मध्ये सुरू करू शकता.
- ज्यांना जुने प्रॉडक्ट विकायचे आहे त्यांच्याकडून फक्त प्रोडक्टच्या इमेजेस घ्या.
- आधीच प्रॉडक्ट विकत घेऊन बसू नका.

