Dropshipping हा Ecommerce चा एक प्रकार आहे.
Ecommerce म्हणजे Online Products किंवा Services विकणे जसे कि Amazon आणि Flipkart करत आहे.
आता जर तुम्हाला स्वतःचा E Commerce व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला विविध गोष्टी कराव्या लागतात ज्यासाठी मोठी इन्व्हेस्टमेंट लागते.
परंतु इथे तुम्हाला प्रॉडक्ट Wholesale ने विकत घेण्याची गरज नाही, त्याचं Storage करण्याची गरज नाही, त्याची Shipping करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त त्या प्रॉडक्ट ची मार्केटिंग किंवा विक्री करायची आहे बाकी सर्व काम तुमचा Supplier करतो.
![घरबसल्या करू शकता हा करोडोंचा व्यवसाय ! सुवर्ण संधी [ 50,000 + / महिना ] | Big Business Idea In Marathi](https://www.bigmastery.com/wp-content/uploads/2026/07/22-768x432.jpg)
हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ? :
Dropshipping मध्ये तुम्हाला कोणतेही Products विकत घेण्याची गरज नसते तुम्हाला फक्त त्या Products च्या Images आणि त्याची माहिती तुमच्या Website वर Upload करायची आहे आणि ज्यावेळेस कोणताही व्यक्ती त्या प्रॉडक्ट ची online ऑर्डर देतो तेव्हा ती ऑर्डर तुमच्याकडे येते.
आता तुम्हाला फक्त ती ऑर्डर तुमच्या Dropshipping Supplier कडे पाठवायची असते आणि मग तो Supplier ऑर्डर केलेला प्रॉडक्ट तुमच्या कस्टमर पर्यंत पोहोचवतो.
इथं तो Product तुम्ही हव्या त्या किमतीला विकू शकता. त्या Product च्या Supplier ला त्या प्रॉडक्ट ची Wholesale Price द्यायची असते. तुम्हाला हवं तेवढं Margin तुम्ही ठेऊ शकता.
मार्केट रिसर्च करा
- कोणत्या प्रकारची प्रोडक्ट्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत ते शोधा.
- फेसबुक ads लायब्ररी चा वापर करू शकता.
- Amazon, Flipkart, Shopify अशा प्लॅटफॉर्म्सवर कोणती प्रोडक्ट्स चांगली विकली जात आहेत याचा अभ्यास करा.
- ग्राहकांना काय हवं आहे, कोणते प्रोडक्ट्स जास्त विकले जात आहेत, हे जाणून घेण्यासाठी इ-कॉमर्स मार्केटवर रिसर्च करा.
व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागलं ?
- ऑनलाइन स्टोअर: Shopify किंवा WooCommerce सारख्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्टोअर सुरू करा.
- सप्लायर: IndiaMart किंवा इतर ड्रॉप शिपिंग सप्लायर्स शोधा.
- Payment Gateway: कस्टमर कडून पेमेंट घेण्यासाठी एक चांगलं पेमेंट गेटवे निवडा.
किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल ?
- Starting Investment – 10 ते 20 हजारात Domain, Hosting किंवा WordPress किंवा Shopify Subscription, Payment Gateway आणि इतर आवश्यक गोष्टींसह हा व्यवसाय सुरू करू शकता.
- 1 Year Working Capital – 1 Lakh ते 1.5 Lakh अतिरिक्त रक्कम हि जाहिरात, मार्केटिंग, विविध ऑनलाइन टूल्स आणि इतर व्यवसायिक खर्चासाठी ठेवावी.
- जर तुम्ही फ्री मार्केटिंग चा वापर केला तर कमी गुंतवणुकीत हे काम केलं जाऊ शकत.
टीप: वरील गुंतवणूक ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष गुंतवणूक ही तुमचे शहर, व्यवसायाची पद्धत, साहित्य, उपकरणे आणि इतर खर्चांवर अवलंबून कमी किंवा जास्त असू शकते.
मार्केटिंग आणि विक्री कशी करता येईल ?
- सोशल मीडियाचा फ्री वापर करा: इंस्टाग्राम, फेसबुकवर तुमचं स्टोअर प्रमोट करा. Products चे आकर्षक फोटो आणि व्हिडिओ शेअर करा.
- YouTube चॅनेल: या ठिकाणी जर तुमचं एकद YouTube चॅनेल असेल तर त्यावर तुम्ही हे प्रॉडक्ट विकू शकता
- Influencer मार्केटिंग: काही छोटे इंस्टाग्राम किंवा यूट्यूब Influencers ना तुमचं प्रोडक्ट वापरायला द्या आणि ते प्रमोट करून घ्या.
- फेसबुक ग्रुप्स: जो प्रॉडक्ट तुम्ही विकत आहे त्या प्रोडक्ट शी संबंधित ग्रुप्स आहेत, त्यात तुमचे प्रोडक्ट्स शेअर करा.
- ब्लॉगिंग: तुमच्याकडे जर एखादा ब्लॉग असेल आणि त्यावर चांगले Views येत असतील तर त्यावर देखील प्रॉडक्ट विकू शकता.
- वर्ड ऑफ माउथ: जे ग्राहक तुमच्याकडून प्रोडक्ट्स विकत घेतात, त्यांना इतरांना सांगायला प्रोत्साहित करा.
- जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग जसे की फेसबुक आणि इंस्टग्राम Ads ची चांगली माहिती असेल तर तुम्ही Paid मार्केटिंग देखील करू शकता. ( optional )
या व्यवसायातून किती नफा होईल ?
सुरुवातीला: 5 ते 20 हजार प्रति महिना कमाई शक्य.
सरासरी: 30 ते 80 हजार प्रति महिना कमाई शक्य.
चांगले यश मिळाल्यास: 1 लाख ते 5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त प्रति महिना कमाई शक्य.
टीप: वरील कमाई ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष कमाई ही तुम्ही निवडलेले प्रॉडक्ट, मार्केटिंग, वेबसाइटवरील ट्रॅफिक, जाहिरात खर्च, कन्वर्जन रेट, प्रॉफिट मार्जिन, सप्लायरची गुणवत्ता, ग्राहकांची संख्या, स्पर्धा आणि व्यवसाय चालवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. हा व्यवसाय असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीची कमाई वेगळी असू शकते.
व्यवसायातील आव्हाने
- सप्लायर वर अवलंबून राहावं लागतं, त्यामुळे वेळेवर डिलिव्हरी होणे आणि प्रोडक्टची गुणवत्ता याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
या बिझनेस साठी महत्वाच्या टिप्स
- सुरुवातीला एकाच प्रकारच्या प्रोडक्ट्सवर फोकस करा आणि नंतर हळूहळू विस्तार करा.
- फ्री मार्केटिंग स्ट्रॅटेजी वर भर द्या, जसं की सोशल मीडियावर consistent पोस्ट करा.
- शक्य असल्यास, तुमच्या ब्रँडसाठी एक विश्वासार्ह सप्लायर निवडा.

