मोबाईल वरून करू शकता हा भन्नाट व्यवसाय ! | Work On Mobile Business Idea In Marathi

Work On Mobile Business Idea In Marathi

Print on demand हा Business चा प्रकार Dropshipping सारखाच आहे. Dropshipping प्रमाणे यात देखील तुम्हाला Product Wholesale ने विकत घेण्याची,Storage करण्याची, Shipping करण्याची गरज नाही.

सध्या मार्केट मध्ये Printed टी-शर्ट ला खूप चांगली मागणी आहे. 

तुम्ही फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण जगभरात अशे Products विकू शकता 

हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ?

Print On Demand मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या Product वर वेगवेगळ्या Designs, Text , किंवा Images, Graphics Add करायचे आहे. आणि तुमच्या Website वर त्या products च्या images आणि माहिती Upload करायची आहे. 

ज्यावेळेस कोणताही व्यक्ती तुमच्या Website वरून तो प्रॉडक्ट खरेदी करतो त्यावेळेस Print on डिमांड ची service देणारी कंपनी त्या प्रॉडक्ट वर print करते आणि तो प्रॉडक्ट तुमच्या कस्टमर ला ship करते. 

या कंपन्यांकडे असे अनेक Products असतात ज्यासाठी तुम्ही Design तयार करू शकता जसे कि T-shirt, Mugs, Bags, Hoodies, Notebook, Posters.

मार्केट रिसर्च करा

  • कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट्स सध्या ट्रेंडमध्ये आहे हे शोधा (टी-शर्ट, मग्स, hoodies इ.).
  • कोणत्या प्रकारचे डिझाईन लोकांना आवडतात ते शोधण्यासाठी Etsy, Redbubble किंवा Amazon सारख्या साईट्सवर रिसर्च करा.
  • फेसबुक Ads लायब्ररी वर रिसर्च करा.

व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागलं ?

  • ऑनलाइन स्टोअर: Shopify किंवा WooCommerce सारख्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्टोअर तयार करू शकता.
  • डिझाईन: तुम्हाला डिझाईन तयार करता यायला पाहिजे किंवा तुम्ही फ्रीलान्स डिझायनर्सची मदत घेऊ शकता.
  • सप्लायर: YouTube आणि google वर याचे अनेक Print On Demand सप्लायर तुम्हाला सापडतील. 

किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल ?

Starting Investment – 10 ते 50 हजारात Domain, Hosting किंवा WordPress किंवा Shopify Subscription, Payment Gateway आणि इतर आवश्यक गोष्टींसह हा व्यवसाय सुरू करू शकता.

1 Year Working Capital – 1 Lakh ते 1.5 Lakh अतिरिक्त रक्कम हि जाहिरात, मार्केटिंग, विविध ऑनलाइन टूल्स आणि इतर व्यवसायिक खर्चासाठी ठेवावी.

जर तुम्ही फ्री मार्केटिंग चा वापर केला तर कमी गुंतवणुकीत हे काम केलं जाऊ शकत.  Paid मार्केटिंग करायची असेल तर मग 1 Lakh ते 1.5 Lakh पर्यंत इन्व्हेस्टमेंट करावी लागेल.

टीप: वरील गुंतवणूक ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष गुंतवणूक ही तुमचे शहर, व्यवसायाची पद्धत, साहित्य, उपकरणे आणि इतर खर्चांवर अवलंबून कमी किंवा जास्त असू शकते.

मार्केटिंग आणि विक्री कशी करता येईल ?

  • सोशल मीडिया वापरा: इंस्टाग्राम, फेसबुक आणि Pinterest वर Product चे फोटो, व्हिडिओ शेअर करा.
  • Influencer मार्केटिंग: काही छोट्या Influencers ला तुमचे डिझाईन वापरायला द्या आणि त्यांच्याकडून प्रमोशन करून घ्या.
  • फ्री प्लॅटफॉर्म्सवर प्रमोशन: Etsy, Redbubble सारख्या प्लॅटफॉर्म्सवर फ्री शॉप उघडा आणि तुमचे प्रॉडक्ट विक्रीसाठी लिस्ट करा.
  • फेसबुक ग्रुप्स: जो प्रॉडक्ट तुम्ही विकत आहे त्या प्रोडक्ट शी संबंधित ग्रुप्स आहेत, त्यात तुमचे प्रोडक्ट्स शेअर करा.
  • ब्लॉगिंग आणि व्हिडिओ मार्केटिंग: तुमच्या डिझाईनबद्दल ब्लॉग पोस्ट लिहा किंवा YouTube वर व्हिडिओ तयार करा.
  • YouTube चॅनेल : तुमचं एखाद युट्युब चॅनेल आले तर त्यावर देखील तुम्ही फ्री मध्ये मार्केटिंग करू शकाल.

Paid मार्केटिंग करायची असेल तर मग जास्त इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. 

या व्यवसायातून किती नफा होईल ?

सुरुवातीला: 5 ते 15 हजार प्रति महिना कमाई शक्य.

सरासरी: 30 ते 70 हजार प्रति महिना कमाई शक्य.

चांगले यश मिळाल्यास: 1 लाख ते 3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त प्रति महिना कमाई शक्य.

टीप: वरील कमाई ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष कमाई ही तुम्ही निवडलेले प्रॉडक्ट, डिझाइनची गुणवत्ता, मार्केटिंग, वेबसाइटवरील ट्रॅफिक, जाहिरात खर्च, प्रॉडक्टची मागणी, स्पर्धा, कन्वर्जन रेट आणि व्यवसाय चालवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. हा व्यवसाय असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीची कमाई वेगळी असू शकते.

व्यवसायातील आव्हाने

  • डिझाईन आकर्षक असणं खूप महत्त्वाचं आहे. जर डिझाईन लोकांच्या आवडीचं नसेल, तर विक्री कमी होऊ शकते.
  • वेळेवर डिलिव्हरी आणि प्रोडक्ट क्वालिटी तपासणं गरजेचं आहे, कारण थेट प्रोडक्ट्स ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातात.

या बिझनेस साठी महत्वाच्या टिप्स

  • सुरुवातीला एकाच प्रकारच्या प्रोडक्ट्सवर लक्ष केंद्रित करा आणि नंतर व्यवसाय वाढवा.
  • सोशल मीडियावर नियमितपणे प्रमोशन करा आणि ग्राहकांच्या फीडबॅकवर काम करा.
  • काही प्रोडक्ट्सवर लिमिटेड एडिशन डिझाईन बनवून विक्री वाढवण्याचा प्रयत्न करा.
< < Click Here To Get 100+ Small Business Ideas