शेतकऱ्यांकडून शेतीमाल विकत घेऊन त्याची विक्री तुम्ही करू शकता.
नॉर्मली होतं काय की शेतकऱ्यांना उत्पादन घेता येतं पण त्याची विक्री योग्य पद्धतीने करता येत नाही.
तुम्ही शेतीमालाची ब्रॅण्डिंग करू शकता आणि त्याची विक्री मार्केटमध्ये करू शकता.
उदाहरणार्थ तुम्ही बासमती तांदूळ घेऊ शकता, तो साफ करू शकता आणि पॅकेटमध्ये पॅक करून त्याची ब्रॅण्डिंग करून अधिक किमतीला विक्री करू शकता.
हा व्यवसाय काय आहे ?
कृषी उत्पादनाची ब्रॅण्डिंग करून विकणे म्हणजे शेतमालाच्या उत्पादनांना वेगळी ओळख आणि बाजारात किंमत मिळवून देणे.
कृषी उत्पादनांसाठी एखाद आकर्षक नाव, लोगो, पॅकिंग आणि एक प्रॉपर मार्केटिंग स्ट्रॅटेजी तयार करून त्याची विक्री केली जाते. यामध्ये गावरान, ऑरगॅनिक, पेस्टिसाइड-फ्री अशा कृषी उत्पादनांचा ब्रँड तुम्ही तयार करू शकता.
मार्केट रिसर्च करा
ग्राहकांचा अभ्यास: सध्या शहरी ग्राहक शुद्ध, गावरान आणि ऑरगॅनिक उत्पादनांकडे आकर्षित होतात. ते कोणत्या प्रकारचे कृषी उत्पादने जास्त खरेदी करतात
प्रतिस्पर्धांचा अभ्यास: बाजारात कोणत्या प्रकारचे ब्रँडेड कृषी उत्पादन विकले जात आहे, त्यांच्या किंमती आणि वितरण पद्धती जाणून घ्या.
होलसेल ने माल कुठून आणायचा ?
यासाठी तुम्हाला काही चांगले शेतकरी शोधून काढावे लागतील. स्थानिक भागात फिरून अशा शेतकऱण्याचा शोध तुम्ही घेऊ शकता. त्यांच्याकडून उत्पादने घेऊन त्याची ब्रॅण्डिंग करू तुम्ही विकू शकता.
व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागलं ?
प्रॉडक्ट पॅकेजिंग आणि लेबलिंग: ब्रँडचा लोगो, नाव, आणि आकर्षक पॅकेजिंग तयार करणे.
लायसन्स आणि सर्टिफिकेशन: ऑरगॅनिक किंवा पेस्टिसाइड-फ्री असल्यास त्याचे सर्टिफिकेशन आवश्यक आहे.
स्थानिक सप्लायर सोबत नेटवर्किंग: शेतकऱ्यांशी तसेच व्यापाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करून नियमित सप्लाय सुनिश्चित करा.
किती इन्व्हेस्टमेंट करावी लागलं ?
Starting Investment – 20 ते 50 हजार
सुरुवातीला कमी प्रमाणात प्रॉडक्ट घेऊन ब्रँडिंग आणि पॅकिंग करून विक्री सुरू करू शकता.
6 Months Working Capital – 50 हजार ते 1 लाख
स्टॉक, पॅकिंग, मार्केटिंग, वाहतूक आणि इतर खर्चासाठी.
टीप: वरील गुंतवणूक ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष गुंतवणूक ही तुमचे शहर, व्यवसायाची पद्धत, साहित्य, उपकरणे आणि इतर खर्चांवर अवलंबून कमी किंवा जास्त असू शकते.
मार्केटिंग कशी करता येईल ?
सोशल मीडिया प्रमोशन: फेसबुक, इंस्टाग्राम, आणि व्हॉट्सअप ग्रुप्सवर उत्पादने प्रमोट करा.
लोकल मार्केटमध्ये प्रदर्शन: कृषी प्रदर्शन, स्थानिक बाजार, आणि शेतकरी मेळाव्यांत सहभाग घ्या.
ऑनलाईन शॉप्स: फ्लिपकार्ट, अमेझॉन, आणि लोकल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्री करू शकता.
ग्राहकांचे Review: पहिल्या ग्राहकांकडून चांगल्या फीडबॅकची मागणी करून, त्यांचे रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर करा.
व्यवसायातून किती नफा होईल ?
सुरुवातीला: 10 ते 25 हजार प्रति महिना कमाई शक्य.
सरासरी: 30 ते 80 हजार प्रति महिना कमाई शक्य.
चांगले यश मिळाल्यास: 2 लाख किंवा त्यापेक्षा जास्त प्रति महिना कमाई शक्य.
टीप: वरील कमाई ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष कमाई ही उत्पादनाची गुणवत्ता, ब्रँड, विक्री, मार्केटिंग, स्पर्धा, खर्च आणि व्यवसाय चालवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते.
व्यवसायातील आव्हाने
स्पर्धा: कृषी उत्पादनात जास्त स्पर्धा असल्याने ब्रँडला वेगळेपणा देणे आवश्यक आहे.
पुरवठा आणि गुणवत्ता नियंत्रण: उत्पादनाची गुणवत्ता कायम ठेवणे आव्हानात्मक ठरू शकते.
ग्राहकांपर्यंत पोहोच: ग्रामीण उत्पादनांना शहरी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य वितरण ( Distribution ) व्यवस्था आवश्यक आहे.
या बिजनेससाठी महत्वाच्या टिप्स
- युनिक सेलिंग पॉइंट तयार करा: उत्पादनाच्या विशेषतांचा वापर करून युनिक फीचर्स तयार करा, जसे ऑरगॅनिक, पेस्टिसाइड-फ्री.
- ग्राहकांशी संवाद साधा: Social मीडिया व इतर मार्गांद्वारे ग्राहकांशी सतत संपर्क ठेवा.
- गुणवत्तेवर भर द्या: उत्पादनाच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष द्या जेणेकरून ग्राहकांचा विश्वास वाढेल.
- निरंतर मार्केटिंग: वेगवेगळ्या प्रकारे मार्केटिंग करत रहा आणि नवीन ग्राहकांना ऑफर्स द्या.

