प्रत्येक घरामध्ये बेडशीट, चादर, तसेच ब्लॅंकेट चा वापर केला जातो.
अस एकही घर तुम्हाला सापडणार नाही ज्या घरात या गोष्टींची गरज नसते.
तुम्ही एखाद्या होलसेलर कडून स्वस्तामध्ये या गोष्टी विकत घेऊ शकता आणि वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून याची विक्री करू शकतात.
हे प्रॉडक्ट तुम्ही शहरांबरोबरच खेडेगावांमध्ये देखील विकू शकता.
अतिशय कमी गुंतवणुकीत तुम्ही याची सुरुवात करू शकता.
हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ? :
या व्यवसायात तुम्हाला होलसेलने हे प्रॉडक्ट विकत घ्यायचे आहे आणि वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून त्यांची विक्री करायची आहे.
मार्केट रिसर्च करा
आमच्या भागातील लोक कशा प्रकारचे बेडशीट, चादर किंवा ब्लॅंकेट वापरतात ते शोधून काढा.
आसपासच्या दुकानात जाऊन निरीक्षण करा.
होलसेल ने प्रॉडक्ट कुठून घ्यायचे ?
- Google वर तुम्हाला अनेक होलसेल सप्लायर किंवा Manufacturer सापडतील.
- Indiamart.com या वेबसाईटवर देखील तुम्हाला अनेक सप्लायर सापडतील.
- मोठ्या शहरांमध्ये देखील याचे अनेक सप्लायर असतात.
व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागलं ?
- बेडशीट, चादर किंवा ब्लँकेट
- एखादी टू व्हीलर किंवा सायकल ( Optional )
- एखादा भोंगा किंवा स्पीकर
किती इन्व्हेस्टमेंट करावी लागलं ?
Starting Investment – 10 ते 40 हजारात सुरुवातीचा बेडशीट, चादर, ब्लॅंकेट यांचा स्टॉक घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता.
6 Months Working Capital – 10 ते 20 हजार अतिरिक्त रक्कम पेट्रोल, वाहतूक, मोबाईल रिचार्ज आणि इतर छोट्या खर्चासाठी ठेवावी.
टीप: वरील गुंतवणूक ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष गुंतवणूक ही तुमचे शहर, व्यवसायाची पद्धत, साहित्य, उपकरणे आणि इतर खर्चांवर अवलंबून कमी किंवा जास्त असू शकते.
मार्केटिंग आणि विक्री कशी करायची ?
- वेगवेगळ्या भागांमध्ये फिरून याची विक्री करू शकता.
- वेगवेगळ्या ऑफर देऊ शकता जसे की एकावर एक बेडशीट फ्री.
- स्वस्त दरात विक्री करू शकता ज्याने नवीन कस्टमर आकर्षित होतील.
- भोंगा किंवा स्पीकर चा वापर करून लोकांचं लक्ष वेधून घेऊ शकता.
व्यवसायातून किती नफा होईल ?
सुरुवातीला: 5 ते 15 हजार प्रति महिना कमाई शक्य.
सरासरी: 25 ते 70 हजार प्रति महिना कमाई शक्य.
चांगले यश मिळाल्यास: 1 लाख ते 3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त प्रति महिना कमाई शक्य.
टीप: वरील कमाई ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष कमाई ही तुमची विक्री, प्रॉफिट मार्जिन, ग्राहकांची संख्या, प्रॉडक्टची गुणवत्ता, होलसेल खरेदीचा दर, मार्केटिंग, स्पर्धा, फिरून विक्री करण्याचे क्षेत्र आणि व्यवसाय चालवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. हा व्यवसाय असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीची कमाई वेगळी असू शकते.
व्यवसायातील आव्हाने
- वेगवेगळ्या भागांमध्ये फिरावं लागेल
- सुरुवातीला लगेच कस्टमर मिळणार नाही
या बिजनेस महत्वाच्या टिप्स
- बेडशीट च्या आणि इतर प्रॉडक्टच्या डिझाईन आणि कलर आकर्षक निवडा.
- विकत घेतलेले प्रॉडक्ट किंमत कमी जास्त करून विकण्यावर भर द्या.

