इतरांना द्या हि सर्विस, कमवा चांगला पैसा | Service Business Idea In Marathi

Service Business Idea In Marathi

प्रत्येक व्यवसायाला  CA, Tax Consultant किंवा Accountant यांच्या सेवांची गरज पडते. 

प्रोफेशनल लोकांना देखील यांची पडते. इंजिनीअर, वकील, डॉक्टर, अशा लोकांना देखील कर भरावा लागतो आणि म्हणूनच त्यांनाही या सर्व्हिस ची गरज पडते.

तुम्ही देखील हा व्यवसाय सुरू करू शकता, हे एक उच्च प्रोफेशन मानलं जात.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक ते शिक्षण आणि अनुभव असणे गरजेचे आहे.

हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ?

Accounting आणि Tax Consultant म्हणजे लोकांना त्यांच्या बिझनेसचं अकाउंटिंग, बुककीपिंग, आणि टॅक्स रिलेटेड कामांसाठी सल्ला देणं. 

कंपन्या, छोटे व्यावसायिक, आणि Individual लोकांना  त्यांचे Accounts व्यवस्थित ठेवणे, GST, Income Tax Returns, आणि इतर संबंधित गोष्टींचं काम करून देणं यातलं प्रमुख काम असतं.

मार्केट रिसर्च करा

तुमच्या भागातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांशी संपर्क साधा. कोणाला टॅक्स आणि अकाउंटिंगसाठी सल्ला लागतो, त्यांची कोणत्या प्रकारची कामं आहेत याचा अंदाज घ्या.

बऱ्याच लोकांना GST फाइलिंग, इनकम टॅक्स रिटर्न्स यासाठी मदत लागते.

हे काम सुरु करण्यासाठी काय लागलं ?

  • CA किंवा Accounting च ज्ञान
  • लॅपटॉप किंवा डेस्कटॉप ( क्लायंट कडे असेल )
  • इंटरनेट कनेक्शन
  • कस्टमर्स चा फायनान्शियल डेटा मॅनेज करण्यासाठी सॉफ्टवेअर (जसे की Tally, Zoho Books इ.)  ( क्लायंट कडे असेल )
  • GST आणि इतर टॅक्स अपडेटेड ज्ञान

किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल?

या व्यवसायासाठी मोठी इन्व्हेस्टमेंट नाही. जर तुमच्याकडे आधीच अकाउंटिंगचं शिक्षण आणि अनुभव असेल तर तुम्ही याची सहज सुरुवात करू शकता. अनुभव नसेल तर तुम्ही एखाद्या CA कड काही दिवस जॉब करू शकता. 

तर फक्त लॅपटॉप, इंटरनेट आणि आवश्यक सॉफ्टवेअर लागतील. 

आजकाल दुकानदारांकडे स्वतःचे लॅपटॉप किंवा Computer असतेच. तुम्ही तिथं जाऊन काही वेळात त्यांचं अकाउंटिंग च काम करून देऊ शकता.

Starting Investment – जर तुमच्याकडे Laptop किंवा Computer असेल तर 10 ते 20 हजारात हा व्यवसाय सुरू करू शकता. यामध्ये इंटरनेट, आवश्यक सॉफ्टवेअर आणि इतर छोट्या खर्चाचा समावेश आहे.

1 Year Working Capital – 20 ते 30 हजार अतिरिक्त इंटरनेट, अकाउंटिंग सॉफ्टवेअर, प्रवास आणि इतर व्यवसायिक खर्चासाठी ठेवावेत.

टीप: वरील गुंतवणूक ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष गुंतवणूक ही तुमचे शहर, व्यवसायाची पद्धत, साहित्य, उपकरणे आणि इतर खर्चांवर अवलंबून कमी किंवा जास्त असू शकते.

कस्टमर कसे मिळतील येईल?

  • प्रोफेशनल नेटवर्किंग: तुम्ही तुमच्या शहरातील छोटे व्यवसाय, फ्रीलान्सर, स्टार्टअप्स यांच्याशी नेटवर्किंग करून सेवा देऊ शकता.
  • सोशल मीडिया प्रमोशन: LinkedIn सारख्या प्रोफेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचं प्रोफाइल तयार करा. तिथे तुमची सर्व्हिस आणि अनुभव पोस्ट करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता.
  • जाहिराती: तुम्ही लोकल न्यूजपेपर किंवा सोशल मीडिया जाहिरात करून तुमच्या सेवांचं प्रमोशन करू शकता.
  • Word of Mouth: पहिल्या काही क्लायंटसाठी उत्तम सेवा द्या. जेणेकरून ते तुमच्या कामाबद्दल इतरांशी बोलतील आणि तुम्हाला Refer करतील.

या व्यवसायातून किती नफा होईल ?

सुरुवातीला: 5 ते 15 हजार प्रति महिना कमाई शक्य.

सरासरी: 20 ते 50 हजार प्रति महिना कमाई शक्य.

चांगले यश मिळाल्यास: 1 लाख किंवा त्यापेक्षा जास्त प्रति महिना कमाई शक्य.

टीप: वरील कमाई ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष कमाई ही तुमचा अनुभव, कौशल्य, ग्राहकांची संख्या, दिल्या जाणाऱ्या सेवांचा प्रकार, फी, रेफरल्स, मार्केटिंग, स्पर्धा, स्थान आणि व्यवसाय चालवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. हा व्यवसाय असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीची कमाई वेगळी असू शकते.

व्यवसायातील आव्हाने

  • सरकारच्या टॅक्स पॉलिसीमध्ये वारंवार बदल होत असतात, त्यामुळे तुम्हाला सतत अपडेट राहावं लागतं.
  • प्रत्येक कस्टमरची वेगवेगळी आवश्यकता असते. त्या आवश्यकतांनुसार काम करणं आणि सर्व्हिसेस ऑफर करणे आवश्यक आहे.

या बिझनेस महत्वाच्या टिप्स

  • सतत नवीन टॅक्स पॉलिसीज आणि अकाउंटिंग ट्रेंड्स शिकत रहा.
  • सुरुवातीला लहान क्लायंट्स घेऊन अनुभव वाढवा, आणि नंतर मोठ्या क्लायंट्सवर फोकस करा.
  • तुमच्या सेवांमध्ये विश्वासार्हता आणि प्रोफेशनलिझम ठेवा, ज्यामुळे लोकांचा तुमच्यावर विश्वास बसेल.
  • सुरुवातील छोटी आणि सोपी काम घ्या. 
< < Click Here To Get 100+ Small Business Ideas