तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुक वर अनेक Short Videos तसेच Reels बघत असाल.
अनेक लोक अशा Videos च्या माध्यमातून चांगले पैसे कमवत असतात.
तुम्ही याच पद्धतीने Reels बनवून ते Instagram वर अपलोड करू शकता आणि त्यातून चांगले पैसे कमवू शकतात.
Advertising, Affiliate Marketing, Sponsorships अशा अनेक मार्गांनी तुम्ही यातून भरपूर पैसे कमवू शकता.
हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ?
या व्यवसायात सुरुवात करताना, तुम्हाला एखादा ठराविक टॉपिक निवडावा लागेल, ज्या विषयावर तुम्हाला खूप माहिती आहे किंवा ज्यामध्ये तुम्हाला रस आहे. त्यानंतर, त्या टॉपिक वर कंटेंट तयार करावा लागतो आणि तो Instagram वर पोस्ट करावा लागतो जसे कि Reels असतील किंवा Images असतील
म्हणजे एकदा का चांगले Views यायला लागले कि तुम्ही वेगवेगळे Products किंवा ब्रँड चे प्रमोशन करून पैसे कमावू शकता.
मार्केट रिसर्च करा
तुमच्या निवडलेल्या टॉपिक वर काम करणारे इतर लोक शोधा. ते कोणत्या प्रकारचे कंटेंट तयार करतात, किती फॉलोअर्स आहेत, आणि त्यांच्या पोस्ट्सवर कसा रिस्पॉन्स येतो याचा अभ्यास करा.
तुम्हाला तुमच्या टॉपिक मध्ये स्पर्धा कमी आहे का किंवा तुम्ही काही वेगळं देऊ शकता का, हे बघा.
व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागलं ?
- स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन हे सर्वात महत्वाचे साधन आहे.
- फोटो एडिट करण्यासाठी ॲप्सची आवश्यकता असेल. ( Free Mobile Apps )
- तसेच, तुम्ही ओळख निर्माण करण्यासाठी एक विशिष्ट शैली आणि नियमितपणे पोस्ट करणं गरजेचं आहे.
किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल ?
Starting Investment – जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर 5 ते 8 हजारात हा व्यवसाय सुरू करू शकता. सुरुवातीला इंटरनेट, एखादा चांगला Mic, Tripod आणि इतर आवश्यक गोष्टींसाठी हा खर्च पुरेसा आहे.
1 Year Working Capital – 5 ते 10 हजार अतिरिक्त इंटरनेट, मोबाईल रिचार्ज, आवश्यक ॲप्स, Mic किंवा इतर छोट्या उपकरणांसाठी ठेवावेत.
टीप: वरील गुंतवणूक ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष गुंतवणूक ही तुमचे शहर, व्यवसायाची पद्धत, साहित्य, उपकरणे आणि इतर खर्चांवर अवलंबून कमी किंवा जास्त असू शकते.
या व्यवसायातून किती नफा होईल ?
सुरुवातीला: 2 ते 10 हजार प्रति महिना कमाई शक्य.
सरासरी: 25 ते 1 लाख प्रति महिना कमाई शक्य.
चांगले यश मिळाल्यास: 2 लाख किंवा त्यापेक्षा जास्त प्रति महिना कमाई शक्य.
टीप: वरील कमाई ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष कमाई ही तुमच्या कंटेंटची गुणवत्ता, Views, Followers, Audience Engagement, निवडलेला Topic, Sponsorships, Affiliate Marketing, ब्रँड डील्स, मार्केटिंग, सातत्य आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या अल्गोरिदमवर अवलंबून असते. हा व्यवसाय असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीची कमाई वेगळी असू शकते.
व्यवसायातील आव्हाने
- टिकून राहण्यासाठी नियमितपणे क्रिएटिव कंटेंट तयार करणे आवश्यक आहे.
- नवनवीन ट्रेंड्स फॉलो करणे, एंगेजमेंट वाढवणे आणि सतत आपल्या ऑडियन्स च्या संपर्कात राहणं हे सगळं कठीण असू शकते.
- स्पर्धा जास्त असल्यामुळे, तुमचं स्वतःचं वेगळेपण दाखवणं महत्त्वाचं आहे.
या बिझनेस महत्वाच्या टिप्स
- तुमच्या ऑडीयन्स ला कोणत्या प्रकारचे रील्स आणि पोस्ट आवडतात यावर लक्ष ठेवा.
- तुमच्या कंटेंटमध्ये Creativity आणि वेगळेपण ठेवा.
- सुरुवातीला ब्रँडशी फ्री मध्ये किंवा कमी रेट मध्ये काम करा, ज्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ तयार होईल.
- नियमितपणे तुमच्या फॉलोअर्स शी संवाद साधा, त्यांना तुमच्या कंटेंट मध्ये गुंतवा

