तुम्ही Virtual Assistant ची सर्व्हिस देऊ शकता आणि चांगले पैसे कमावू शकता.
Appointment schedule करणे, phone call करणे, email account मॅनेज करणे, meetings schedule आणि manage करणे अशा प्रकारची अनेक कामे virtual assistant करत असतो.
Virtual assistant हा कोणत्याही कंपनीचा employee नसतो. तो स्वतंत्रपणे वेगवेगळ्या कंपन्यांची तसेच छोट्या मोठ्या Businesses ची कामे करत असतो.
हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ? :
या ठिकाणी तुम्ही एखाद्या बिजनेसमॅन, राजकारणी व्यक्ती, प्रसिद्ध व्यक्ती किंवा कंपन्यांचे Virtual Assistant बनू शकता आणि घरबसल्या ऑनलाईन काम करू शकता. फक्त भारतातीलच आणि तर बाहेरच्या देशातील लोकांना देखील हि सर्व्हिस तुम्ही देऊ शकता.
हे काम कसं शिकायचं ?
YouTube तसेच इंटरनेट वर या कामाची अजून माहिती तुम्हाला सहज मिळालं.
व्यवसाय सुरु करण्यासाठी काय लागलं ?
- चांगलं Communication Skill
- कामासाठी आवश्यक असलेले ज्ञान
- Laptop किंवा Computer आणि इंटरनेट कनेक्शन
किती इन्व्हेस्टमेंट करावी लागलं ?
Starting Investment – जर तुमच्याकडे Laptop किंवा Computer आणि इंटरनेट कनेक्शन असेल तर 5 ते 10 हजारात हा व्यवसाय सुरू करू शकता. सुरुवातीला महागडी साधने किंवा ऑफिसची गरज नसते.
1 Year Working Capital – 10 ते 15 हजार अतिरिक्त इंटरनेट, आवश्यक ऑनलाइन टूल्स, सॉफ्टवेअर आणि इतर छोट्या खर्चासाठी ठेवावेत.
टीप: वरील गुंतवणूक ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष गुंतवणूक ही तुमचे शहर, व्यवसायाची पद्धत, साहित्य, उपकरणे आणि इतर खर्चांवर अवलंबून कमी किंवा जास्त असू शकते.
कस्टमर कसे मिळतील ?
- डायरेक्ट या लोकांशी आणि कंपन्यांशी संपर्क करू शकता. संपर्क करण्यासाठी ई-मेल चा वापर करू शकता.
- Linkedin चा वापर करून तुम्हाला कस्टमर मिळू शकतील.
- काही चांगले फेसबुक ग्रुप जॉईन करू शकता जिथं तुम्ही जाहिरात करू शकाल.
- Upwork तसेच Fiverr सारख्या Freelancing वेबसाईट वर देखील तुम्हाला चांगले क्लायंट मिळू शकतील.
व्यवसायातून किती नफा होईल ?
सुरुवातीला: 10 ते 25 हजार प्रति महिना कमाई शक्य.
सरासरी: 40 ते 80 हजार प्रति महिना कमाई शक्य.
चांगले यश मिळाल्यास: 1 लाख ते 3 लाख किंवा त्यापेक्षा जास्त प्रति महिना कमाई शक्य.
टीप: वरील कमाई ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष कमाई ही तुमच्याकडे असलेली Skills, क्लायंटची संख्या, दिल्या जाणाऱ्या Services, कामाचा अनुभव, परदेशी किंवा भारतीय क्लायंट, प्रति तास किंवा प्रति प्रोजेक्ट फी, मार्केटिंग, कम्युनिकेशन स्किल्स आणि व्यवसाय चालवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. हा व्यवसाय असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीची कमाई वेगळी असू शकते.
व्यवसायातील आव्हाने
सुरुवातीला पहिले काही कस्टमर मिळूपर्यंत टाइम लागलं आणि अनेक लोकांशी संपर्क करावे लागतील.
या बिजनेस महत्वाच्या टिप्स
- YouTube वर तसेच गूगल वर याचा रिसर्च करा आणि या सर्व गोष्टी व्यवस्तीत शिका.
- एका कस्टमर ला चांगली सर्व्हिस दिली तर तो देखील इतर लोकांना रेकमेंड करेल.
- Linkedin प्रोफाइल चांगली बनवा आणि त्यावर थोडे Active रहा.

