जग हे Digital बनत चालले आहे. भारत जगातील 2 नंबर च Freelance Market बनलं आहे. भारतात अनेक लोक Freelancers म्हणून काम करत आहे.
Freelancers त्यांच्या वेळेनुसार काम करू शकता ते कोणत्याही कंपनीचे आणि कितीही कामे घेऊ शकता. तुम्ही एक Freelancer म्हणून काम करू शकता आणि लाखो रुपये कमाऊ शकता.
fiverr.com, upwork.com, peopleperhour.com या काही Popular Websites आहेत जिथून तुम्ही कामे मिळवू शकता. तुम्ही डायरेक्ट कंपनी शी संपर्क करून देखील किंवा ऑफलाईन देखील अशी काम मिळवू शकता.
हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ?
Freelancer म्हणजे तुमच्याकडे असलेल्या Skills वर आधारित काम करून त्यातून पैसे कमावणे.
Freelancers म्हणजे हे अशे लोक असतात जे वेगवेगळ्या कंपन्यांचे कामे स्वतंत्रपणे करतात आणि कामानुसार किंवा तासा नुसार पैसे घेतात.
Freelancers हे कंपनीचे कर्मचारी नसतात तर ते स्वतंत्रपणे कामाचा Contract घेतात.
For Example : एक कंपनी आहे जिला एक Video edit करून हवा आहे. आता ती कंपनी video edit करण्यासाठी एखाद्याला कामाला ठेऊ शकते किंवा ती Online अशा Freelancer कडून हे काम करून घेऊ शकते.
वेब डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग, ग्राफिक डिझाईन, सोशल मीडिया मॅनेजमेंट, आणि कंपन्यांचे अनेक वेगवेगळे कामे असतात जे तुम्ही घरबसल्या करू शकता
मार्केट रिसर्च करा
तुम्हाला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्यावर आधी थोडं रिसर्च करा. सध्या मार्केटमध्ये कोणत्या स्किल्सची मागणी आहे? Upwork, Fiverr, Freelancer सारख्या प्लॅटफॉर्म्सवर बघा, कोणते प्रोजेक्ट्स जास्त आहेत आणि त्यातून किती कमाई होते.
Freelancer म्हणून काम सुरु करण्यासाठी काय लागलं ?
- मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन
- काम करण्यासाठी Skills
- फ्रीलान्स प्लॅटफॉर्मवर प्रोफाइल तयार करा (जसे Upwork, Fiverr, Freelancer.com इ.)
किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल ?
Starting Investment – जर तुमच्याकडे Laptop किंवा Computer आणि इंटरनेट कनेक्शन असेल तर10 ते 15 हजारात हा व्यवसाय सुरू करू शकता.
1 Year Working Capital – 10 ते 20 हजार अतिरिक्त इंटरनेट, आवश्यक सॉफ्टवेअर, ऑनलाइन टूल्स आणि इतर छोट्या खर्चासाठी ठेवावेत.
टीप: वरील गुंतवणूक ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष गुंतवणूक ही तुमचे शहर, व्यवसायाची पद्धत, साहित्य, उपकरणे आणि इतर खर्चांवर अवलंबून कमी किंवा जास्त असू शकते.
कस्टमर कसे मिळतील ?
- Freelancing Platforms: Freelancing Platforms वर तुमचं प्रोफाइल तयार करा. यावरून तुम्हाला चांगलं काम मिळेल.
- सोशल मीडिया प्रमोशन: LinkedIn, Twitter, Facebook यासारख्या प्लॅटफॉर्म्सवर तुमच्या Skills चं प्रमोशन करा. इतरांशी नेटवर्किंग करा आणि तुमचा पोर्टफोलिओ शेअर करा.
- Word of Mouth: तुमच्या मित्रमंडळींना आणि ओळखीच्या लोकांना सांगा की तुम्ही अश्या प्रकारचे काम करत आहात.
- ब्लॉग किंवा वेबसाइट: तुमची स्वतःची वेबसाइट किंवा ब्लॉग तयार करा जिथे तुमचं काम आणि पोर्टफोलिओ लोकांना दाखवता येईल. तुमच्या कामाची स्टोरी आणि क्लायंटस च्या अनुभवांची माहिती शेअर करा.
या व्यवसायातून किती नफा होईल?
सुरुवातीला: 5 ते 20 हजार प्रति महिना कमाई शक्य.
सरासरी: 30 ते 80 हजार प्रति महिना कमाई शक्य.
चांगले यश मिळाल्यास: 1 लाख ते 5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त प्रति महिना कमाई शक्य.
टीप: वरील कमाई ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष कमाई ही तुमचे Skills, अनुभव, कामाची गुणवत्ता, क्लायंट्सची संख्या, प्रोजेक्ट्सचा प्रकार, मार्केटिंग, रेफरल्स, स्पर्धा, वेळेवर काम पूर्ण करण्याची क्षमता आणि व्यवसाय चालवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. हा व्यवसाय असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीची कमाई वेगळी असू शकते.
व्यवसायातील आव्हाने
- सुरुवातीला क्लायंट मिळवणं हे आव्हानात्मक असू शकते.
- तुमच्यामध्ये नेटवर्किंग स्किल्स असणे आवश्यक आहेत.
- टाइम मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे कारण अनेकदा एकाच वेळी अनेक प्रोजेक्ट्स तुम्हाला पूर्ण करावे लागतील.
या बिझनेस महत्वाच्या टिप्स
- सुरुवातीला लहान प्रोजेक्ट्स घ्या आणि तुमचा पोर्टफोलिओ तयार करा.
- काम वेळेत आणि Quality सह पूर्ण करा, ज्यामुळे इतर लोक तुम्हाला refer करतील.
- विविध प्रकारच्या Skills शिकत रहा, जेणेकरून तुमचा स्कोप वाढेल.

