तुम्हाला जर एखाद्या Topic च knowlege असेल किंवा जर पुस्तक लिहिण्यात तुम्हाला Interest असेल तर तुम्ही तुमचं पुस्तक लिहू शकता.
आता तुम्हाला असं वाटत असेल कि पुस्तक लिहिणं तर सोपं आहे पण ते Publish करायचं म्हटलं तर खूप खर्च करावा लागेल.
परंतु तसे अजिबात नाही.
तुम्ही तुमचं पुस्तक Amazon वर Self Publish करू शकता. त्यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही. तुम्हाला तुमचं पुस्तक amazon वर अपलोड करायचं आहे. पुस्तकाचं Front Cover आणि Details देखील तुम्हाला Upload करायचे आहे. कोणताही व्यक्ती तुमचं पुस्तक Amazon वरून Online विकत घेऊ शकत.
त्याचबरोबर तुम्ही स्वतः असे ईबुक विकू शकता ज्यासाठी तुम्ही Social Media चा वापर करू शकता.
मार्केटिंग साठी तुम्ही Facebook Ads तसेच Google Ads चा वापर करू शकता. त्याचबरोबर तुम्ही एखाद Youtube चॅनल आणि Blog देखील बनवू शकता ज्याचा वापर तुम्ही तुमचं पुस्तक विकण्यासाठी करू शकता.
हा व्यवसाय काय आहे व कसा सुरु करायचा ?
E-Books म्हणजे डिजिटल स्वरूपात लिहिलेली पुस्तके. तुम्हाला ज्या विषयात गती आहे किंवा ज्या विषयावर माहिती आहे, त्यावर पुस्तक लिहून ते PDF किंवा इतर फॉरमॅटमध्ये तयार करायचं आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर विकायचं. उदाहरणार्थ, बिझनेस आयडिया, सेल्फ-हेल्प, टेक्नॉलॉजी, इत्यादी.
मार्केट रिसर्च करा
कोणते विषय ट्रेंडमध्ये आहेत, लोक कोणत्या प्रकारची पुस्तके जास्त खरेदी करतात याचा अभ्यास करा.
Amazon Kindle, Kobo, Google Books यांसारख्या प्लॅटफॉर्मवर जाऊन बघा की कोणत्या विषयांवरची पुस्तके जास्त विकली जात आहेत. कोणत्या पुस्तकांना चांगले Reviews आहे.
E-Book लिहिण्यासाठी काय लागलं?
- मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन
- लेखनासाठी सॉफ्टवेअर जसे की Google Docs ( Free )
- ई-बुक फॉरमॅट करण्यासाठी टूल्स जसे की Canva ( Free )
किती इन्व्हेस्टमेंट करावी लागेल ?
Starting Investment – जर तुमच्याकडे स्मार्टफोन किंवा Laptop आणि इंटरनेट कनेक्शन असेल तर 10 ते 15 हजारात हा व्यवसाय सुरू करू शकता.
1 Year Working Capital – 20 ते 30 हजार अतिरिक्त इंटरनेट, आवश्यक ऑनलाइन टूल्स, मार्केटिंग आणि इतर छोट्या खर्चासाठी ठेवावेत.
टीप: वरील गुंतवणूक ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष गुंतवणूक ही तुमचे शहर, व्यवसायाची पद्धत, साहित्य, उपकरणे आणि इतर खर्चांवर अवलंबून कमी किंवा जास्त असू शकते.
मार्केटिंग आणि विक्री कशी करता येईल ?
- सोशल मीडियाचा वापर: फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमच ई-बुक प्रमोट करा. तुमच्या पुस्तकाचे कव्हर, विषय आणि फायदे सांगणाऱ्या पोस्ट अपलोड करा.
- Amazon Kindle Direct Publishing (KDP): या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमचं ई-बुक सेल करू शकता. इथे प्रचंड मोठं मार्केट आहे.
- ब्लॉग किंवा वेबसाइट तयार करा: तुम्ही स्वतःचा ब्लॉग तयार करून तिथ काही छोटे Article लिहू शकता आणि तिथ तुमच्या ई-बुकची लिंक शेअर करु शकता.
- ईमेल मार्केटिंग: जर तुमच्याकडे ईमेल लिस्ट असेल तर त्यावर ई-बुक प्रमोट करून विक्री वाढवू शकता.
- वर्ड ऑफ माउथ: ज्या लोकांनी तुमचं ई-बुक विकत घेतलं, त्यांना त्यांच्या ओळखीच्या लोकांपर्यंत ते पोचवायला सांगा.
या व्यवसायातून किती नफा होईल?
सुरुवातीला: 2 ते 10 हजार प्रति महिना कमाई शक्य.
सरासरी: 20 ते 75 हजार प्रति महिना कमाई शक्य.
चांगले यश मिळाल्यास: 1 लाख ते 5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त प्रति महिना कमाई शक्य.
टीप: वरील कमाई ही फक्त एक अंदाज आहे. प्रत्यक्ष कमाई ही पुस्तकाचा विषय, त्याची गुणवत्ता, मार्केटिंग, वाचकांची संख्या, Amazon वरील रँकिंग, सोशल मीडिया प्रमोशन, जाहिरात खर्च, किंमत, स्पर्धा आणि व्यवसाय चालवण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. हा व्यवसाय असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीची कमाई वेगळी असू शकते.
व्यवसायातील आव्हाने
- विषयाची निवड महत्त्वाची आहे, कारण मार्केट मध्ये डिमांड असलेल्या विषयांवरच जास्त विक्री होऊ शकते.
- ई-बुक च कव्हर आकर्षक बनव कारण ते वाचूनच लोक पुस्तक खरेदी करतात.
या बिझनेस महत्वाच्या टिप्स
- मार्केट मधील मागणीनुसार Topic निवडा.
- तुमच्या ई-बुक च टायटल आणि कव्हर आकर्षक ठेवा.
- एकदा तयार केलेलं ई-बुक अनेक वेळा विकता येतं, त्यामुळे उत्तम दर्जाचे लिखाण करा.
- ई-बुकच्या छोट्या छोट्या भागांचा ब्लॉग किंवा सोशल मीडिया पोस्टच्या स्वरूपात वापर करा.

