९ ऑनलाइन बिझनेस आयडिया | 9 Online Business Ideas In Marathi

जर तुम्हाला स्वतःचा Online Business सुरु करायचा असेल तर या Post मध्ये मी तुम्हाला 9 Online Business Ideas Marathi मध्ये सांगणार आहे. यापैकी अनेक Online business तुम्ही अगदी तुमच्या Smartphone वरून देखील सुरु करू शकता. 

हे Online Business सुरु करण्यासाठी तुम्हाला कोणताही Technical Knowlege असण्याची गरज नाही. तुम्हाला जर फक्त एक Smartphone वापरता येत असेल तर तुम्ही हे सर्व Online Business करू शकता. 

हे व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मोठ्या Investment ची गरज नाही. यातील अनेक Business तुम्ही अगदी Zero Investment मध्ये सुरु करू शकता तर बाकीचे अगदी Low Investment मध्ये सुरु करू शकता. 

Online Business Ideas In Marathi List

1. YouTube Channel ( युट्युब चॅनल )

स्वतःच Youtube चॅनल सुरु करणे हि सगळ्यात प्रसिद्ध Online Business Idea आहे. तुम्ही जर youtube वापरात असाल तर तुमच्या लक्षात येईल कि youtube वर करोडो Youtuber आहे जे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे videos बनवता आणि Youtube वर Upload करता. 

तुम्ही देखील तुमचं स्वतःच Youtube चॅनल बनवू शकता आणि महिन्याला लाखों रुपये कमाऊ शकता.  Youtube चॅनेल सुरु करण्यासाठी तुम्हाला कोणतीही Investment करण्याची गरज नाही. तुमच्याकडे जर एक Smartphone आणि त्यामध्ये Internet असेल तर तुम्ही अगदी सहजपणे तुमचं youtube चॅनेल सुरु करू शकता आणि स्वतःचा Online Business करू शकता. 

Youtube चॅनेल कसं सुरु करायचं हे जाणून घ्यायचं असेल तर खालील video बघा.

2. Blogging ( ब्लॉगिंग )

Blogging हि देखील एक अतिशय प्रसिद्ध Online Business Idea आहे. Blogging च्या माध्यमातून अनेक लोक महिन्याला लाखों – करोडो रुपये कमावत आहे. 

Blogging म्हणजे ज्यावेळेस तुम्ही Google वर काही Information search करता त्यावेळेस तुमच्या समोर काही Websites येतात या Website म्हणजेच Blog होय.  Website वर अनेक गोष्टी असतात जसे कि Articles असतात, Videos असतात, Ecommerce Website वर products असतात जे तुम्ही खरेदी करू शकता. अनेक प्रकारच्या website असतात. 

Blog म्हणजे हा Website चाच एक प्रकार आहे ज्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या Post किंवा Articles  लिहलेले असतात ज्यांना Blog Post असं म्हणतात. म्हणजे एका ठराविक विषयाची किंवा Topic ची माहिती असते, Information असते.

For  Example – तुम्ही Small Business Ideas In Marathi हा शब्द  Google वर Search केला तर तुम्हाला अनेक Website दिसतील त्यात आमची Bigmastery.com हि website देखील तुम्हाला दिसेल. तुम्ही यापॆकी कोणत्याही website वर click केले तर तुम्हाला एक Article किंवा Post दिसेल ज्यात वेगवेगळ्या Business Ideas आणि त्यांच्याबद्दल ची माहिती तुम्हाला दिसेल. 

तुम्ही देखील तुमचा स्वतःचा Blog तयार करू शकता. तुम्ही Blogger किंवा WordPress यांसारख्या Platform चा वापर Blog तयार करण्यासाठी करू शकता. जवळपास कोणत्याही विषयावर तुम्ही तुमचा Blog तयार करू शकता जसे कि Finance, Technology, Fashion, Health, Fitness, सरकारी योजना.  तुमच्याकडे जर एक स्मार्टफोन आणि इंटरनेट असेल तर तुम्ही सहज ब्लॉगिंग करू शकता आणि लाखो- करोडो रुपये कमाऊ शकता. 

3. Dropshipping ( ड्रॉपशिपिंग )

Dropshipping हा Ecommerce चा एक प्रकार आहे, Ecommerce म्हणजे Online Products आणि Services विकणे. 

Ecommerce म्हणजे Online Products किंवा Services विकणे जसे कि Amazon आणि Flipkart करत आहे. 

आता जर तुम्हाला स्वतःचा Ecommerce व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला विविध गोष्टी कराव्या लागतात. 

For Example – जर तुम्हाला Online T-shirt विकायचे असतील तर सर्वात आधी तुम्हाला एखाद्या wholesaler कडून wholesale ने T-shirt विकत घ्यावे लागतात त्यानंतर त्यांचं तुम्हाला Storage करावं लागत आणि जेव्हा Customer कडून ऑर्डर येईल तेव्हा तो T-Shirt तुमच्या कस्टमर कडे पाठवावा लागतो म्हणजेच त्याची Shipping करावी लागते.

या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला एक मोठी Investment करावी लागते आणि जर तुम्ही एक छोटे व्यावसायिक असाल तर या सर्व गोष्टी manage करायला अनेक अडचणी येतात. 

आणि म्हणूनच एका लहानातील लहान व्यावसायिकाला देखील त्याचा Ecommerce चा व्यवसाय सुरु करता यावा म्हणून काही वर्षांपूर्वी एक नवीन व्यवसायाचा प्रकार अस्तित्वात आला ज्याला Dropshipping असं म्हटलं जात. 

Dropshipping मध्ये तुम्हाला कोणतेही Products विकत घेण्याची गरज नसते तुम्हाला फक्त त्या products च्या Images आणि त्याची माहिती तुमच्या website वर किंवा इतर Ecommerce Platform वर upload करायची आहे आणि ज्यावेळेस कोणताही व्यक्ती त्या प्रॉडक्ट ची online ऑर्डर देतो तेव्हा ती ऑर्डर तुमच्याकडे येते आता तुम्हाला फक्त ती ऑर्डर तुमच्या dropshipping supplier कडे पाठवायची असते आणि मग तो supplier ऑर्डर केलेला प्रॉडक्ट तुमच्या कस्टमर पर्यंत पोहोचवतो. 

इथे तुम्हाला प्रॉडक्ट wholesale ने विकत घेण्याची गरज नाही, त्याचं Storage करण्याची गरज नाही, त्याची shipping करण्याची गरज नाही.   तुम्हाला फक्त त्या प्रॉडक्ट ची मार्केटिंग किंवा जाहिरात करायची आहे बाकी सर्व काम तुमचा supplier करतो. 

इथं तुम्ही तो product तुम्हाला हव्या त्या किमतीला विकू शकता आणि तुम्हाला त्या product च्या supplier ला त्या प्रॉडक्ट ची wholesale price द्यायची असते. तुम्हाला हवं तेव्हडं margin तुम्ही ठेऊ शकता. 

अनेक लोक या Dropshipping च्या व्यवसायातून महिन्याला करोडो रुपये कमावत आहे. तुम्ही देखील तुमचा dropshipping चा Online business सुरु करू शकता.

4. Amazon Seller

Amazon हि जगातील सगळ्यात मोठी Ecommerce कंपनी आहे. करोडो लोक नियमितपणे या Amazon वरून वस्तू खरेदी करतात. Amazon वरून तुम्ही जवळपास कोणतीही वस्तू विकत घेऊ शकता.

अनेकांना असं वाटत असेल कि amazon स्वतः या सर्व वस्तू विकत तर तस अजिबात नाही amazon वरील maximum वस्तू या Amazon स्वतः विकत नाही. तुमच्या-माझ्या सारखे सर्वसामान्य लोकच यावर वेगवेगळे Products विकत असतात आणि आपल्यासारखे सर्वसामान्य लोकच ते products खरेदी करत असतात.

तुम्ही अगदी सहज एक Amazon Seller म्हणून Registration करू शकता आणि तुमचे स्वतःचे Online Store Amazon वर सुरु करू शकता. कपडे, पुस्तके, Electronics, Home Improvement Toos अशा प्रकारच्या अनेक Category मधील Products तुम्ही Amazon वर विकू शकता. 

Amazon वर आधीपासूनच करोडो कस्टमर येतात आणि खरेदी करतात त्यामुळे त्या प्रचंड मोठ्या Customer base चा तुम्ही फायदा घेऊ शकता. 

5. Affiliate Marketing

तुम्ही Affiliate Marketing करू शकता. Affiliate Marketing म्हणजे तुम्हाला इतर कंपन्यांचे Products किंवा Services तुमच्या Website किंवा Social Media च्या माध्यमातून विकायचे आहे. यामध्ये तुम्हाला एक Special Affiliate link मिळते आणि ज्यावेळेस कोणताही व्यक्ती या Link वर Click करून काही काही खरेदी करतो तेव्हा तुम्हाला त्याच Commission मिळत. 

For Example : तुमच्या Affiliate link वर click करून एखाद्याने 2000 रुपयाचा product विकत घेतला आणि जर Affiliate Commission 15% असेल तर तुम्हाला 300 रुपये कमिशन मिळेल. 

भारतामध्ये, अनेक लोक Affiliate Marketing च्या माध्यमातून महिन्याला करोडो रुपये देखील कमावत आहे. 

जर तुम्ही Website किंवा Blog असेल तर त्यावर तुम्ही या Affiliate links Share करू शकता त्याचबरोबर जर तुम्ही Youtube , Facebook किंवा Instagram अशा Platform वर Active असाल तर तुम्ही तिथे देखील अशा Affiliate Links share करून Affiliate marketing करू शकता आणि लाखो रुपये कमाऊ शकता. 

6. Freelancing

जग हे Digital बनत चाललं आहे. भारत जगातील २ नंबर च Freelance Market बनलं आहे. भारतात १.५ करोड पेक्षा जास्त Freelancers काम करत आहे. 

Freelancers म्हणजे हे अशे लोक असतात जे वेगवेगळ्या कंपन्यांचे किंवा व्यवसायाचे कामे स्वतंत्रपणे करतात आणि कामानुसार किंवा तासानुसार पैशे घेतात. 

Freelancers हे कंपनीचे कर्मचारी नसतात तर ते स्वतंत्रपणे कामाचा Contract घेतात. 

For Example : एक कंपनी आहे जिला एक Video edit करून हवा आहे आता एक तर ती कंपनी video edit करण्यासाठी एखाद्याला कामाला ठेऊ शकते किंवा ती Online अशा Freelancer कडून हे काम करून घेतु शकते. 

Freelancers त्यांच्या Velepramane काम करू शकता ते कोणत्याही कंपनीचे आणि कितीही कामे घेऊ शकता. तुम्हाला एक Freelancer म्हणून काम करू शकता आणि लाखो रुपये कमाऊ शकता. 

fiverr.com, upwork.com, toptal.com, peopleperhour.com या काही Popular Websites आहेत आणि इथून तुम्ही कामे मिळवू शकता. तुम्ही Offline देखील कामे मिळवू शकता. 

7. Online Course Selling

तुम्हाला जर एखाद्या टॉपिक चे Knowlege असेल, Experience असेल तर तुम्ही तुमचा Online Course बनवू शकता आणि तो Online विकू शकता.

तुम्ही जर इंटरनेट चा वापर करत असाल तर तुम्हाला अनेक जाहिराती इंटरनेट वर दिसल्या असतील. Online Course विकून अनेक लोक करोडो रुपये कमावत आहे. 

Online Course बनवणे अतिशय सोपं आहे. तुम्हाला कोणत्याही Technical Knowlege ची आवश्यकता नाही. इंटरनेट वर असे अनेक platform आहे ज्यावर तुम्ही कोणत्याही Technical knowlege शिवाय तुमचा Online Course बनवू शकता आणि विकी शकता. 

Course च्या मार्केटिंग साठी तुम्ही Facebook Ads तसेच Google Ads चा वापर करू शकता. त्याचबरोबर तुम्ही एखाद Youtube चॅनल आणि Blog देखील बनवू शकता ज्याचा वापर तुम्ही तुमचे Online Courses विकण्यासाठी करू शकता. 

8. Self-Publish Your Book On Amazon

तुम्हाला जर एखाद्या Topic च knowlege असेल किंवा जर पुस्तक लिहिण्यात तुम्हाला Interest असेल तर तुम्ही तुमचं पुस्तक लिहू शकता. 

आता तुम्हाला असं वाटत असेल कि पुस्तक लिहिणं तर सोपं आहे पण ते Publish करायचं म्हटलं तर खूप खर्च करावा लागेल. 

परंतु तस अजिबात नाही. 

तुम्ही तुमचं पुस्तक Amazon वर Self Publish करू शकता. त्यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही. तुम्हाला तुमचं पुस्तक amazon वर अपलोड करायचं आहे. पुस्तकाचं Front Cover आणि Details देखील तुम्हाला Upload करायचे आहे. कोणताही व्यक्ती तुमचं पुस्तक Amazon वरून Online विकत घेऊ शकतो. 

Amazon च्या या Service च नाव आहे Kindle Direct Publishing. तुम्ही जर Google वर Kindle Direct Publishing असं Search केले तर तुम्हाला Amazon ची हि Website मिळून जाईल किंवा तुम्ही https://kdp.amazon.com/ या लिंक वर Click करू शकता. 

Amazon तुमच्या पुस्तकाचे Ebook आणि Paper back Book तयार करत. ज्यावेळेस तुमचं पुस्तक कोणताही व्यक्ती Amazon वरून खरेदी करतो त्यावेळी amazon ते पुस्तक Direclty त्याला Ship करत. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीच चिंता करण्याची गरज नाही ना तुम्हाला पुस्तक प्रिंट करावे लागते, ना पुस्तक Publish करण्यासाठी खर्च करावा लागतो. 

तुम्हाला फक्त तुमचं पुस्तक लिहायचं आहे आणि ते Amazon वर Upload करायचं आहे बाकी सर्व काम Amazon करेल.

मार्केटिंग साठी तुम्ही Facebook Ads तसेच Google Ads चा वापर करू शकता. त्याचबरोबर तुम्ही एखाद Youtube चॅनल आणि Blog देखील बनवू शकता ज्याचा वापर तुम्ही तुमचं पुस्तक विकण्यासाठी करू शकता. 

9. Print On Demand Business

Print on demand हा Business चा प्रकार Dropshipping सारखाच आहे. Dropshipping प्रमाणे यात देखील तुम्हाला Product Wholesale ने विकत घेण्याची,Storage करण्याची, Shipping करण्याची गरच नाही.

Print On Demand या Business च्या प्रकारात तुम्हाला वेगवेगळ्या Product वर वेगवेगळ्या Designs, Text , किंवा Images, Graphics Add करायचे आहे. आणि तुमच्या Website वर त्या products च्या images आणि माहिती Upload करायची आहे. 

ज्यावेळेस कोणताही व्यक्ती तुमच्या website वरून तो प्रॉडक्ट खरेदी करतो त्यावेळेस Print on डिमांड ची service देणारी कंपनी त्या प्रॉडक्ट वर print करते आणि तो प्रॉडक्ट तुमच्या कस्टमर ला ship करते. 

या कंपन्यांवर असे अनेक Products असतात ज्यासाठी तुम्ही Design तयार करू शकता जसे कि T-shirt, Mugs, Bags, Hoodies, Mug, Notebook,  Posters. 

अशा प्रकारच्या अनेक कंपन्या तुम्हाला Online सापडतील. तुम्ही पूर्ण जगभरात अशे Products विकू शकता किंवा फक्त भारतात देखील हा व्यवसाय करू शकता

म्हणजे तुम्हाला फक्त design तयार करायची आहे आणि Online पद्धतीने त्या Products च्या Images वर add करायची आहे.  त्यासाठी काही Tools उपलब्ध असतात ज्यांना Mockup Generator असं म्हणतात. 

Design तयार करण्यासाठी तुम्ही Photoshop , Gimp, Canva , Pixellab सारखे Software तसेच App वापरू शकता. 

यासाठी तुम्हाला काही Graphic Design मध्ये Expert असण्याची गरज नाही अनेक लोक T-shirt वर फक्त एखादा प्रसिद्ध, Catchy Text Add करतात आणि त्यांच्या T-shrit ची भरपूर विक्री होते. 

तुम्ही देखील अगदी सहज तुमचा  Print On Demand Business सुरु करू शकता 

Conclusion : 

अशा प्रकारचे काही Online व्यवसाय तुम्ही करू शकता या सर्व प्रकारच्या व्यवसायांवर आम्ही लवकरच Detail मध्ये Articles आणि Video या आमच्या Bigmastery.com या website वर Upload करणार आहोत. 

या Online Business Ideas तुम्हाला कशा वाटल्या ते Comment करून नक्की सांगा 

अशाच नवनवीन पोस्ट नियमितपणे मिळवण्यासाठी खाली तुमचा Email सबमिट करू शकता. 

अशाच नवनवीन Post नियमितपणे मिळवण्यासाठी खाली तुमचा Email Submit करू शकता.

Loading

हे देखील वाचा

Swapnil Shinde

Big Mastery चे Founder आणि CEO. स्वप्निल शिंदे हे Ecommerce, Business Education, Content Creation, Hosting अशा अनेक व्यवसायांमध्ये कार्यरत आहे.

Leave a Reply

This Post Has 6 Comments

  1. Dharmendra Bhakre

    खूप भारी वाटल

  2. Abhi wadkar

    खुप छान

  3. Lalit Meshram

    बहुत ही बढिया ideas आपने दी है!

  4. Pratikauba lokare

    एकदम छान आर्टिकल आहे सर आपली माहिती मला खुप आवडली धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  5. Mrs.Rumde

    अप्रतिम आहे ही web site. Sir खूप खूप धन्यवाद.अतिशय उत्तम आहे.खूप खूप शुभेच्छा.

  6. Mayuri sagar borkar

    nice post