१०५ नवीन बिजनेस आयडिया मराठी [ कमाई ५० हजार ते ५ कोटी ] । १०५ नवीन उद्योग व्यवसायांची यादी मराठी । 105 New Small Business Ideas In Marathi

जर तुम्हाला स्वतःचा बिजनेस सुरु करायचा असेल तर हि पोस्ट तुमच्यासाठी. या पोस्ट मध्ये मी तुम्हाला १०५ नवीन बिजनेस आयडिया मराठी ( 105 New Small Business Ideas In Marathi ) मध्ये सांगणार आहे आणि नुसती बिजनेस आयडिया ची नावंच नाही तर त्याची काही महत्वाची माहिती देखील देणार आहे. 

जर तुम्हाला कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असेल तर हि पोस्ट नक्की वाचा कारण यात मी अशा अनेक बिजनेस आयडिया सांगितल्या आहे ज्या तुम्ही अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरु करू शकता.

या व्यवसायांमधून तुम्ही ५० हजार ते ५ कोटी पर्यंत कमाई करू शकता 

तर चला जाणून घेऊ या १०५ नवीन बिजनेस आयडिया नेमक्या काय आहे ? 

Contents show

१०५ नवीन बिजनेस आयडिया ची यादी मराठी ( List of 105 New Small Business Ideas In Marathi )

१०५ नवीन बिजनेस आयडिया मराठी [ कमाई ५० हजार ते ५ कोटी ] । १०५ नवीन उद्योग व्यवसायांची यादी मराठी । 105 New Small Business Ideas In Marathi

१. ड्रॉप शिपिंग स्टोअर सुरु करणे

अनेक लोक ड्रॉप शिपिंग च्या बिजनेस मधून करोडो रुपये कमावत आहे आणि तुमच्यासाठी देखील इथं एक खूप मोठी संधी आहे.

हा ईकॉमर्स बिजनेस चा एक प्रकार आहे जिथं तुम्हाला प्रॉडक्ट ची ऑनलाईन विक्री करून पैसे कमवायचे असतात पण यात थोडासा फरक आहे. 

ड्रॉप शिपिंग च्या बिजनेस मध्ये तुम्हाला फक्त प्रॉडक्ट च्या इमेजेस किंवा व्हिडिओस चा वापर करून त्याची जाहिरात करायची असते आणि ज्यावेळी एखादा व्यक्ती प्रॉडक्ट ची ऑर्डर देतो तेव्हा तुम्हाला त्या कस्टमर चा पत्ता तुमच्या ड्रॉप शिपिंग सप्लायर कडे पाठवायचा असतो. मग तो सप्लायर तो प्रॉडक्ट तुमच्या कस्टमर ला डिलिव्हर करतो. 

इथं तुम्हाला ना प्रॉडक्ट विकत घेण्याची चिंता , ना तो स्टोअर करण्याची चिंता ना त्याच्या शिपिंग ची चिंता, हि सर्व कामे तुमचा सप्लायर करतो, तुम्हाला फक्त जाहिरात किंवा मार्केटिंग करून त्या प्रॉडक्ट ची विक्री करायची असते. 

२. ऑरगॅनिक पेंट चा बिजनेस 

घर सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक घराला रंग दिला जातो आणि नुसता घरालाच नाही तर कमर्शिअल सेक्टर जसे की ऑफिस, दुकाने, कंपन्या, फॅक्टरी यांना देखील रंग दिला जातो. 

पेंट इंडस्ट्री खूप मोठी आहे पण यात एक मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे पेंट मध्ये जे केमिकल वापरले जातात ते हेल्थ साठी चांगले नसतात आणि इथंच एक मोठी संधी निर्माण होते. 

तुम्ही ऑरगॅनिक आणि हेल्थी पेंट बनवण्याचा व्यवसाय सुरु करू शकता. हा बिजनेस सुरु करण्यासाठी तुम्हाला या क्षेत्रच चांगलं ज्ञान असणे गरजेचे आहे 

3. महिलांच्या अंडरगारमेंट चे दुकान

पुरुषांच्या कपड्यांप्रमाणेच महिलांच्या कपड्यांचे मार्केट देखील खूप वेगाने वाढत आहे आणि यात तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे.

महिलांचे अनेक प्रकारचे कपडे तुम्ही विकू शकता परंतु तुम्ही जर एका ठराविक मार्केट ला टार्गेट केलं तर तुम्हाला सुरुवातीच्या काळात खूप फायदा होऊ शकतो. 

तुम्ही फक्त महिलांच्या अंडरगारमेंट चे किंवा इनरवेअर चे दुकान सुरु करून चांगला प्रॉफिट कमावू शकता. 

अंडरगारमेंट हि एक अशी गोष्ट आहे ज्याची गरज नेहमी वर्षभर असते आणि म्हणूनच त्याची डिमांड देखील चांगली असते. 

या बिजनेस ची सुरुवात तुम्ही तुमच्या घरातून देखील करू शकता. 

४. कन्टेन्ट क्रिएटर ला व्हिडिओ एडिटिंग ची सर्विस देणे

आजकाल प्रत्येक जण काहींना काही कन्टेन्ट बनवतात जसे की युट्युब व्हिडीओ, युट्युब शॉर्ट, इंस्टाग्राम रील किंवा जाहिरातीचे व्हिडिओ असतील. 

जगभरात असे करोडो क्रिएटर आहे जे अशाप्रकारची कामे करतात आणि त्यातूनच त्यांची कमाई होते. या लोकांना वेगवेगळ्या सर्विसेस ची आवश्यकता असते आणि इथंच तुमच्यासाठी संधी निर्माण होते. 

तुम्ही या लोकांची व्हिडिओ एडिट करून देऊ शकता आणि त्यातून चांगले पैसे कमावू शकता. तुमच्या स्किल नुसार तुम्ही पैसे चार्ज करू शकता. 

५. मॉडर्न बांगड्यांचे दुकान 

बांगड्या हा भारतातील एक प्रसिद्ध पारंपारिक अलंकार आहेत. भारतीय स्त्रियांना बांगड्या प्रचंड आवडतात. भारतीय संस्कृतीत बांगड्या फार महत्वाच्या मानल्या जातात. हे सौभाग्याचे अलंकार मानले जाते आणि म्हणूनच याची मार्केट मध्ये चांगली डिमांड आहे. 

बांगड्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. बांगड्या त्यांचे वेगवेगळे रंग आणि डिझाईन्समुळे पसंत केल्या जातात.

तुम्ही बांगड्यांचे दुकान सुरू करू शकता आणि यातून चांगले पैसे कमवू शकता. नवीन पिढीला आकर्षित करण्यासाठी तुम्ही मॉडर्न स्टाईल च्या बांगड्या देखील विकू शकता.

६. स्मार्टफोन चे दुकान

भारतात जवळपास ७९ करोड लोकं स्मार्टफोन वापरत आहे आणि असा अंदाज आहे कि २०४० पर्यंत हि संख्या १५० करोड इतकी होईल. 

आजकाल प्रत्येकजण स्मार्टफोन वापरत आहे आणि म्हणूनच मार्केट मध्ये यांची खूप मागणी आहे. 

हा एक असा व्यवसाय आहे ज्याचं भविष्य एकदम उज्वल आहे. रोज नवनवीन प्रकारचे स्मार्टफोन बाजारात येत आहे आणि लोक उत्साहाने त्यांची खरेदी करत आहे.  

तुम्ही स्मार्टफोन विक्रेता बनू शकता आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टफोन तुम्ही तुमच्या दुकानात विकू शकता.

जर तुम्ही चांगली कस्टमर सर्व्हिस दिली तर तुम्हाला भरपूर ग्राहक मिळतील आणि ते दरवेळेस तुमच्याच दुकानात खरेदीसाठी येतील. 

७. चॅटबॉट बनवणे 

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ने जगात काही मोठे बदल घडवायला सुरुवात केली आहे Chatgpt आणि Google च्या Gemeni ने जगात नुसता धुमाकूळ घातला आहे. जवळपास प्रत्येक क्षेत्रात याचा प्रभाव दिसत आहे. 

अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे AI Chatbot बनवून लाखो करोडो रुपये कमावत आहे. 

अशा प्रकारचा बिजनेस सुरु करण्यासाठी तुम्हाला काही टेक्निकल ज्ञान असणे गरजेचे आहे आणि या सर्व गोष्टी तुम्ही ऑनलाईन शिकू शकता. 

भविष्यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ची डिमांड अजून खूप वाढणार आहे आणि जर तुम्ही वेळीच या क्षेत्रात उडी घेतली तर तुम्ही खूप मोठ्या लेवल ला जाऊ शकता. 

८. ड्राय फ्रूट्स चे दुकान

ड्राय फ्रूट्स हे सर्वांनाच आवडतात आणि ड्राय फ्रूट्स चा वापर हा अनेक पदार्थांमध्ये केला जातो त्यामुळे भारतात ड्राय फ्रूट्स ला खूप मागणी आहे. 

तुम्ही तुमच्या शहरात एखाद्या वर्दळीच्या ठिकाणी ड्राय फ्रूट्स चे दुकान सुरु करू शकता आणि चांगले पैसे कमावू शकता. 

तुम्हाला मोठमोठ्या शहरांमध्ये ड्राय फ्रूट्स चे अनेक होलसेलर सापडतील. त्यांच्याकडून तुम्ही अतिशय स्वस्तात ड्राय फ्रूट्स खरेदी करू शकता आणि तुमच्या शहरात विकू शकता. 

तुम्ही तुमच्या दुकानात विविध प्रकारचे ड्राय फ्रूट्स विकू शकता जसे की बदाम, काजू, खजूर, अक्रोड, मनुके.

९. घरगुती वस्तूंचे दुकान 

प्रत्येक घरात अशा अनेक वस्तू आणि उपयोगी सामान असते ज्यांचा आपण रोजच्या जीवनात वापर करतो. बर्‍याच छोट्या मोठ्या वस्तू , उपकरणे, टूल्स असतात जे आपल्याला खूप उपयोगी ठरतात.

तुम्ही कमी गुंतवणुकीत घरगुती वस्तूंचे चे दुकान सुरू करू शकता आणि यातून  चांगला नफा कमवू शकता.

तुम्ही तुमच्या दुकानात घरात लागणाऱ्या सर्व लहान मोठ्या वस्तू आणि उपकरणे जसे की बादल्या, क्लीनर, होम क्लीनिंग टूल्स, डस्टबिन, स्टोरेज बॉक्स यांची विक्री करू शकता.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला होलसेल दरात प्रॉडक्ट्स खरेदी करावे लागतील. तुम्हाला मोठ्या शहरांमध्ये अनेक होलसेलर सापडतील. तुम्हाला Online देखील अनेक  होलसेल सप्लायर सापडतील.

हा एक असा व्यवसाय आहे ज्यातील प्रॉडक्ट्स ची लोकांना नेहमी गरज असते त्यामुळे या बिजनेस मध्ये तुम्हाला चांगली संधी आहे.

१०. किराणा होम डिलिव्हरी बिजनेस

किराणा दुकान एक अतिशय लोकप्रिय व्यवसाय आहे. प्रत्येकाला किराणा मालाची आवश्यकता असते.

आता या व्यवसायात नावीन्य निर्माण करण्यासाठी तुम्ही लोकांना घरपोहोच  किराणा देण्याचा व्यवसाय  सुरु करू शकता. 

एक किराणा दुकान सुरु करण्यासाठी तुम्हाला थोडीफार इन्व्हेस्टमेंट करावी लागते परंतु हा व्यवसाय तुम्ही अगदी तुमच्या घरातून देखील सुरु करू शकता. 

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला फक्त काही व्हिसीटींग कार्ड बनवून घ्यावे लागतील आणि काही चांगले किराणा मालाचे होलसेलर शोधून काढावे लागतील. 

होलसेल ने माल विकत घेऊन रिटेल दराने तो तुम्ही विकू शकता आणि चांगला नफा यातून कमवू शकता. 

११. वेबसाईट बनवून देणे

आजकाल प्रत्येक बिजनेस ला स्वतःची एक वेबसाईट असावी असे वाटत असते आणि म्हणूनच याची मार्केट मध्ये खूप चांगली मागणी आहे. 

सुरुवातीला तुम्ही छोट्या व्यवसायांना टार्गेट करू शकता आणि त्यांच्या बिजनेस साठी वेबसाईट बनवून देऊ शकता. 

वेबसाईट कशी बनवायची हे तुम्ही ऑनलाईन शिकू शकता आणि या बिजनेस ची सुरुवात करू शकता. असे अनेक प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही अगदी सहज वेबसाईट बनवू शकता जसे कि WordPress किंवा Wix

१२. सोलर पॅनल सप्लायर

आपल्या घरात अनेक उपकरणे असतात जी इलेक्ट्रिसिटी वर अवलंबून असतात आणि फक्त घरातच नाही तर  इलेक्ट्रिसिटी चा वापर प्रत्येक क्षेत्रात केला जातो जसे कि शेती , बिजनेस, उत्पादन, शैक्षणिक, हेल्थकेअर 

इलेक्ट्रिसिटी चा वापर तर लोक मोठ्याप्रमाणावर करू इच्छिता पण त्यासाठी येणार खर्च लोकांना परवडत नाही आणि आजला जर इलेक्टिसिटी चे रेट खूप जास्त वाढले आहे आणि म्हणनूच मग लोक सोलर पॉवर चा वापर करतात. 

मार्केटमध्ये पर्यायी पॉवर सोल्युशन्स ला चांगली डिमांड असते आणि म्हणूनच तुम्ही सोलर पॅनल सप्लायर बनू शकता आणि चांगले पैसे कमावू शकता. 

१३. टायर चे दुकान

ऑटोमोबाईल च्या क्षेत्रात अनेक बदल होत आहे जसे की पेट्रोल च्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहने मार्केट मध्ये येत आहे परंतु अजूनतरी टायर ला पर्याय नाही. 

आजकाल जवळपास प्रत्येकाकडे स्वतःची गाडी आहे आणि म्हणूनच गाड्यांच्या वेगवेगळ्या पार्ट ला देखील मार्केट मध्ये चांगली मागणी आहे. 

हा व्यवसाय तुम्ही दोन  प्रकारे करू शकता. एकतर तुम्ही मोठ्या कंपनीची डिलरशिप घेऊ शकता किंवा  टायर चे रिटेल स्टोअर सुरू करू शकता.

इथे तुम्ही MRF Tyres, CEAT Tyres, Apollo Tyres, TVS Tyres अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे टायर विकू शकता.

१४. गॅस स्टोव्ह आणि ऍक्सेसरीज चे दुकान

गॅस स्टोव्ह हे स्वयंपाकघरातील सर्वात महत्वाचे उपकरण आहे. तुमच्या स्वयंपाकघरात सर्व काही असेल परंतु जर गॅस स्टोव्ह नसेल तर तुम्ही अन्न शिजवू शकत नाही.

तुम्ही गॅस स्टोव्ह आणि त्याच्या ऍक्सेसरीज चे दुकान सुरु करू शकता तसेच गॅस स्टोव्ह दुरुस्ती सेवा देखील देऊ शकता. तुम्ही लोकांना होम सर्विस देखील देऊ शकता.

गॅस स्टोव्हच च मार्केट खूप मोठी आहे आणि ते अजून मोठं होणार आहे. तुम्ही  या संधीचा फायदा घेऊ शकता आणि एक चांगला व्यवसाय सुरू करू शकता.

१५. बेडरूम प्रॉडक्ट्स चे दुकान

बेडरुममध्ये अनेक प्रॉडक्ट्स असतात जसे कि गादी, उशा, ब्लँकेट्स, बेडशीट्स, पडदे, उशांचे कव्हर, चादर, बेडरूमचे दिवे, रजाई,  तसेच डेकोरेटिव्ह उशा 

मार्केट मध्ये या उत्पादनांना खूप मागणी आहे. तुम्ही बेडरूम मधील प्रॉडक्ट्स चे दुकान सुरू करू शकता आणि अतिशय चांगली कमाई यातून करू शकता. 

तुम्ही काही चांगल्या ब्रॅण्ड्स ची डिलरशिप देखील घेऊ शकता किंवा एक जनरल रिटेल स्टोअर सुरू करू शकता.

१६. बॅग चे दुकान

बॅग ही एक अतिशय गरजेची वस्तू आहे. शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील बॅग लागतातच. प्रवास करायचा असला किंवा कुठं बाहेरगावी जायचं असेल बॅग लागतातच.

तुम्ही बॅगचे दुकान सुरू करू शकता. बॅगचे बरेच प्रकार आहेत जसे स्कूल बॅग, ट्रॅव्हल बॅग, बॅकपॅक, क्रॉस बॉडी बॅग्स, हॅन्डबॅग, लगेज, शॉपिंग बॅग. 

सुरुवातीला, तुम्हाला वाटल्यास तुम्ही फक्त काही ठराविक प्रकारच्या बॅग विकू शकता आणि तुमचा बिजनेस वाढल्यावर इतर प्रकारच्या बॅग विकायला सुरुवात करू शकता. 

प्रॉफिट मार्जिन उत्तम असल्याने या बिजनेस मधून तुम्ही चांगले पैसे कमावू शकता. 

१७. किचन मधील वस्तू आणि भांड्यांचे दुकान

प्रत्येक घरात एक स्वयंपाकघर असते आणि स्वयंपाकघरात अशा अनेक वस्तू, भांडी, साधने, उपकरणे आणि वस्तू असतात ज्याशिवाय स्वयंपाकघर अपूर्ण असते.

स्वयंपाक करण्यासाठी, अन्न आणि वस्तू साठवण्यासाठी, अन्न खाण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी वेगवेगळी भांडी आणि वस्तू आवश्यक असतात.

महिला स्वयंपाकघरातील वस्तू खरेदी करण्यास नेहमीच उत्सुक असतात आणि म्हणूनच मार्केट मध्ये यांची चांगली मागणी आहे. 

तुम्ही स्वयंपाकघरातील प्रॉडक्ट्स चे दुकान सुरू करू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता. 

जोपर्यंत स्वयंपाकघर आहे तोपर्यंत हा व्यवसाय चालूच राहील.

१८. रोबोटिक्स आणि ऑटोमेशन सर्विसेस

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स प्रमाणे रोबोटिक्स आणि ऑटोमेशन सर्विसेस ची देखील डिमांड अगदी तुफान वाढणार आणि त्यामुळे तयारीला लागा. 

तुम्ही जर थोडं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येतील कि रोबोटिक्स आणि ऑटोमेशन चा वापर अगदी सर्व क्षेत्रात केला जात आहे. 

मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात तर याचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी इथं एक मोठी संधी निर्माण होऊ शकते.

तुम्ही वेगवेगळ्या सेक्टर ला रोबोटिक्स आणि ऑटोमेशन सर्विस देऊ शकता आणि त्यातून करोडो रुपये कमावू शकता. हा बिजनेस सुरु करण्यासाठी या क्षेत्राचे तांत्रिक ज्ञान तुम्हाला असणे गरजेचे आहे. आजकाल तुम्ही अनेक गोष्टी ऑनलाईन देखील शिकू शकता.

१९. पुरुषांच्या विशिष्ट कपड्यांचे दुकान

भारतात पुरुषांच्या कपड्यांचं मार्केट हे खूप वेगाने वाढत आहे. तुम्ही या सुवर्ण संधीचा फायदा घेऊ शकता आणि तुमच्या भागात एखादं पुरुषांच्या कपड्याचं दुकान सुरू करून भरपूर पैसे कमवू शकता.

परंतु तुमच्या डोक्यात असा प्रश्न येत असेल कि आजकाल प्रत्येक गल्लीबोळात कपड्याची दुकाने झाली आहे मग आमच्याकडे कोण येईल ?  तर मी सांगतो –

तुम्ही जनरल पुरुषांच्या कपड्याच दुकान सुरु न करता फक्त विशिष्ट कपड्यांचं दुकानं सुरु करू शकता जसे कि पुरुषांच्या शर्ट आणि जीन्स चे दुकान किंवा फक्त शर्ट चे दुकान किंवा फक्त टीशर्ट चे दुकान किंवा फक्त कॉटन च्या शर्ट चे दुकान. 

कमी गुंतवणुकीत कपड्यांचा व्यवसाय कसा सुरु करायचा हे जाणून घ्यायचं असेल तर खालील पोस्ट वर क्लिक करा   

२०. पर्सनालाईस गिफ्ट स्टोअर

आजकाल प्रत्येकजण एकमेकांना गिफ्ट देतो. वाढदिवस, विवाह, सेलेब्रेशन, सक्सेस पार्टी, कॉर्पोरेट आणि असे बरेच कार्यक्रम आहेत ज्यात लोक एकमेकांना भेटवस्तू किंवा गिफ्ट देतात.

रिलेशनशिपमध्ये देखील एकमेकांना गिफ्ट देण्यात येतात. नाती सुधारण्यासाठी देखील लोक एकमेकांना गिफ्ट देतात. 

मार्केट मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक भेटवस्तूंना चांगली मागणी आहे. या ठिकाणी तुम्ही थोडं वेगळेपण निर्माण करण्यासाठी पर्सनालाईस गिफ्ट स्टोअर सुरु करू शकता आणि चांगली कमाई करू शकता. 

पर्सनालाईस गिफ्ट स्टोअर म्हणजे एखाद्या ठराविक व्यक्ती साठी गिफ्ट तयार करणे जसे कि ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे त्या व्यक्तीच नाव किंवा फोटो वापरून गिफ्ट बनवून देणे. 

२१. फॅशन ज्वेलरी चा व्यवसाय

जुन्या काळात जर कोणाला दागिने खरेदी करायचे असतील, तर त्यांना खूप मोठी रक्कम खर्च करावी लागत असे पण आजकाल लोकांना स्वस्तात दागिने खरेदी करता येतात.

आजकाल लोक सोन्या, चांदीच्या दागिन्या ऐवजी कृत्रिम दागिने वापरतात कारण त्याचे बरेच फायदे आहेत. कृत्रिम दागिन्यांना इमिटेशन ज्वेलरी असेही म्हणतात.

कृत्रिम दागिने अत्यंत स्वस्त किंमतीत खरेदी करता येतात. सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या तुलनेत ते सुरक्षित पण असतात.  लोक वेगवेगळ्या प्रकारचे दागिने स्वस्तात खरेदी करू शकतात त्यामुळे त्यांना वेगवेगळे दागिने वापरता येतात.

तुम्ही असे फॅशन ज्वेलरीचे चे  दुकान सुरू करू शकता आणि त्यातून चांगले पैसे कमवू शकता.

२२. ​​जुन्या बाइक आणि कार चा व्यवसाय

प्रत्येकाची इच्छा असते कि एखादी स्वतःची गाडी असावी परंतु प्रत्येक जण नवीन बाइक किंवा नवीन कार खरेदी करू शकत नाहीत.

या लोकांना सेकंडहँड बाईक अथवा कार खरेदी करायची असते कारण सेकंडहँड बाईक किंवा कार अगदी स्वस्तात खरेदी करता येते.

तुम्ही जुन्या बाइक्स आणि कार विक्रीचा व्यवसाय करू शकता. गाडी विकणारा आणि खरेदी करणारा यांच्यामधील मध्यस्थ म्हणून तुम्ही काम करू शकता आणि यातून लाखो रुपये कमवू शकता. 

येथे तुम्ही कमिशन कमवू शकता किंवा ती बाइक किंवा कार पूर्णपणे एका नवीन किमतीला विकून मार्जिन कमवू शकता. 

२३. अमेझॉन सोबत डिलिवरी चा व्यवसाय

अमेझॉन हि जगातील सर्वात मोठी ई कॉमर्स वेबसाईट आहे. गेल्या काही वर्षात अमेझॉन भारतातही खूप वेगाने वाढत आहे.

आजकाल प्रत्येक माणूस ऑनलाईन खरेदी करत आहे. घरबसल्या कोणताही व्यक्ती त्याच्या स्मार्टफोन वरून ऑनलाईन खरेदी करू शकतो.

अमेझॉन च्या यशाचे मुख्य कारण म्हणजे त्यांची फास्ट शिपिंग. अमेझॉन वर ऑर्डर केलेला प्रॉडक्ट दोन ते तीन दिवसात तुमच्या घरापर्यंत पोहचतो. 

अमेझॉन ला त्यांची शिपिंग अजून वेगवान आणि चांगली करायची आहे.  येथे अमेझॉन तुम्हाला एक उत्तम संधी देत ​​आहे. तुम्ही अमेझॉन चे डिलिवरी पार्टनर होऊ शकता.

तुम्हाला अ‍ॅमेझॉनकडून सॉफ्टवेअर, टूल्स आणि गरजेची टेक्नॉलॉजी अशा सर्व गोष्टी मिळतात. 

तुम्हाला या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती logistics.amazon.in.वर मिळेल. तुम्ही त्यांच्या कस्टमर केअर शी देखील बोलू शकता आणि तुमचे प्रश्न आणि शंका विचारू शकता.

२४. गेम डेव्हलप करणे

भारतामध्ये गेमिंग इंडस्ट्री खूप वेगाने मोठी होत आहे. मागील काही वर्षांपासून तर या इंडस्ट्री ने नुसता धुमाकूळ घातला आहे. 

या क्षेत्रात तुम्ही दोन पद्धतीने बिजनेस करू शकता जर तुम्हाला गेम खेळण्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही ऑनलाईन गेमिंग करून पैसे कमावू शकता ज्यात तुम्हाला जर चांगले बोलता येत असेल तर तुम्हाला अजूनच फायदा होईल. 

जर तुम्हाला मोठ्या लेव्हल वर काही करायचं असेल तर तुम्ही एखादी चांगली गेम डेव्हलप करू शकता. यासाठी तुम्हाला या क्षेत्राचं टेक्निकल ज्ञान असणे गरजेचे आहे. आजकाल तुम्ही ऑनलाईन देखील अशा गोष्टी शिकू शकता. 

२५. घर साफ ​​करण्याचा व्यवसाय

प्रत्येकाला स्वतः चे घर स्वच्छ ठेवायला आवडते परंतु या कामासाठी प्रत्येकाकडे वेळ नसतो. 

शहरांमध्ये नवरा- बायको दोघेही नोकरी करत असतात त्यामुळे त्यांना घर स्वच्छ करण्यासाठी वेळ मिळत नाही. भारता मध्ये वेगवेगळ्या सणांला देखील घरे स्वच्छ केली जातात. जसे आपल्याकडे, महाराष्ट्रात दिवाळी ला घरे एकदम साफ करायची पद्धत आहे. 

तुम्ही  घर साफ करून देण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय करून बरेच लोक चांगले पैसे कमवत आहे. हाऊस क्लीनिंग द्वारे तुम्ही कोट्यावधींचा व्यवसाय देखील उभा करू शकता.

२६. कॉर्पोरेट सफाई चा बिझिनेस

तुम्ही कॉर्पोरेट क्लीनिंग चा व्यवसाय देखील सुरू करू शकता.

मोठ्या कंपन्यांसह, तुम्ही अनेक छोट्या कंपन्या आणि छोट्या मॅनुफॅक्चरिंग  च्या साफसफाईचे काम करू शकता.

प्रत्येक कंपनीमध्ये अशी अनेक दैनंदिन कामे केली जातात ज्यामुळे कंपनी अस्वच्छ होते अशा वेळेस तुमची सर्व्हिस  त्यांना उपयोगी ठरते.

तुम्ही छोट्या कंपन्यांपासून सुरुवात करू शकता आणि जेव्हा तुम्हाला अनुभव येईल तेव्हा तुम्ही मोठ्या कंपन्यांचे क्लीनिंग चे कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता.

२७. वेडिंग फोटोग्राफी

भारतामध्ये लग्नावर खूप खर्च केला जातो आणि फोटोग्राफी वर लाखो रुपये खर्च केले जातात

लग्नामध्ये ५० हजारापासून ५ लाखांपर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त खर्च लोक करतात आणि इथंच तुमच्यासाठी एक मोठी संधी निर्माण होते. 

तुम्ही वेडिंग फोटोग्राफी चा बिजनेस करू शकता आणि तुफान पैसे कमावू शकता. मार्केट मध्ये फोटोग्राफी चे अनेक कोर्सेस तुम्हाला मिळतील. 

२८. जॉब रिक्रुटमेंट सर्व्हिस 

बेरोजगारी ही भारतातील एक मोठी समस्या बनली आहे. आजकाल,  कितीही चांगले शिक्षण असले तरी लोकांना नोकर्‍या मिळत नाहीत.

तुम्ही जॉब रिक्रुटमेंट सर्व्हिस सुरु करू शकता. ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे ते तुमच्याशी  संपर्क साधू शकतात आणि जर एखाद्या कंपनीत कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल तर ती कंपनी देखील तुमच्याशी संपर्क साधेल.

तुम्ही एकदम कमी गुंतवणुकी मध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता आणि चांगली कमाई यातून करू शकता. 

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला कंपन्यांमध्ये ओळख वाढवावी लागेल. तुम्हाला कंपनीच्या HR डिपार्टमेंट च्या लोकांशी संपर्क साधावा लागेल. तुम्ही अनुभवासाठी एखाद्या कंपनीच्या HR डिपार्टमेंट मध्ये काम देखील करू शकता.

तुम्हाला सर्वच सेक्टर मध्ये काम करण्याची आवश्यकता नाही.  तुम्ही ही सर्व्हिस कोणत्याही एका क्षेत्रात देऊ शकता जसे कि IT, मेडिकल.

२९. कामगार आणि मनुष्यबळ सप्लायर

प्रत्येक क्षेत्रात काम करण्यासाठी मजूर आणि मनुष्यबळ आवश्यक असते.

अनेक मोठे व्यवसाय आणि उद्योग चांगले कामगार न मिळाल्यामुळे बंद झाले आहे. खाजगी क्षेत्रात, शासकीय आणि निमशासकीय क्षेत्रात नेहमीच कामगारांची गरज असते.

तुम्ही लेबर आणि मॅनपॉवर सप्लायर बनू शकता. लोकांनाही काम देखील  मिळेल आणि तुम्ही देखील या बिजनेस मधून चांगली कमाई करू शकता.

या व्यवसायासाठी काही लायसन्स आणि कायदेशीर कागदपत्र आवश्यक असतात त्यांची माहिती तुम्ही Google किंवा YouTube वर शोधू शकता. जिल्हा उद्योग केंद्राला भेट देऊनही याबाबत माहिती मिळू शकेल.

३०. फ्रैंचाइज़ी व्यवसाय

तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीची किंवा ब्रँड ची फ्रैंचाइज़ी घेऊ शकता. बर्‍याच मोठ्या कंपन्या त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी  फ्रैंचाइज़ी मॉडेलचा वापर करतात.

तुमच्यासाठी इथं एक मोठी संधी असू शकते. इथे तुम्हाला रेडिमेड व्यवसाय मिळतो. व्यवसाय ऑपरेट करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान देखील तुम्हाला कंपनी कडून मिळते.

बरेच ब्रँड मार्केटमध्ये खूप लोकप्रिय आहेत आणि त्यांच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिस ला आधीपासूनच भरपूर डिमांड आहेत. चांगल्या ब्रँड चे मार्केट  मध्ये आधीपासूनच भरपूर कस्टमर असतात. 

कोणतीही फ्रैंचाइज़ी घेण्यापूर्वी लागणारी इन्व्हेस्टमेंट, मार्केट साईज, स्पर्धा, टार्गेट्स, पॉलिसि यांचा चांगला रिसर्च करा.

३१. सिक्युरिटी सर्विसेस

आजकाल सुरक्षा ही खूप महत्त्वाची झालेली आहे. बिज़नेस, कंपनी, हॉस्पिटल, स्कूल, कॉलेज, बैंक आणि इतरही अनेक  ठिकाणी सिक्युरिटी ची आवश्यकता असते.

तुम्ही सिक्युरिटी सर्विसेस देण्याचा चा व्यवसाय सुरू करू शकता आणि लाखों रुपये कमवू शकता. 

हा व्यवसाय करण्यासाठी काही लायसन्स आवश्यक आहेत. तुम्हाला इंटरनेट वर या सर्व गोष्टींची माहिती मिळेल. 

तुम्ही ज्या राज्यात रहाता तिथे काही संस्था असतील ज्या नवीन व्यवसायाला मदत करतात. तुम्ही त्यांच्याकडून देखील ही माहिती मिळवू शकता. महाराष्ट्रात देखील अशा अनेक संस्था आहे. कोणत्याही संस्थेला भेट देण्यापूर्वी, त्याची सत्यता नक्की तपासून पहा.

जिल्हा उद्योग केंद्राला भेट देऊन देखील तुम्ही याची माहिती मिळवू शकता. 

३२. कंत्राटदार किंवा ठेकेदार 

कॉन्ट्रॅक्टर होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष शिक्षणाची आवश्यकता नाही. हा व्यवसाय कोणीही सुरू करू शकतो. कॉन्ट्रॅक्टर होण्यासाठी तुम्हाला फक्त त्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

तुम्ही गव्हर्नमेंट क्षेत्रातही काम करू शकता आणि खाजगी क्षेत्रातही काम करू शकता.

गव्हर्नमेंट च्या प्रत्येक डिपार्मेंट  मध्ये , प्रत्येक सेक्टर मध्ये कॉन्ट्रॅक्टर ची आवश्यकता असते. गव्हर्नमेंट ची अशी हजारो कामें असतात जिथे कॉन्ट्रॅक्टर ची आवश्यकता असते.

यामध्ये तुम्ही अनेक प्रकारची वेगवेगळी कामे करू शकता जसे की रस्ते बांधणे, स्ट्रीट लाईट बसवणे, IT Services, CCTV बसवणे, बांधकाम व्यवसाय.

तुम्हाला याबद्दल Google वर देखील माहिती मिळेल किंवा जिल्हा उद्योग केंद्रावर देखील माहिती मिळू शकेल.

३३. डी. एम. एल. टी लॅब सुरु करणे 

आजकाल हेल्थ च्या समस्या खूप मोठ्याप्रमाणावर वाढत आहे आणि म्हणूनच याच्याशी संबंधित सेवांची देखील मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण होत आहे. 

तुम्हाला जर कमी गुंतवणुकीत एकदाचा चांगला व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही स्वतःची एक डी. एम. एल. टी लॅब सुरु करू शकता. 

या ठिकाणी लोकांच्या रक्ताच्या तसेच लघवीच्या वेगवेगळ्या टेस्ट करून देण्याचे काम तुम्हाला करायचे असते. 

तुमच्या भागातील एखाद्या चांगल्या डॉक्टर शी तुम्ही टाय अप करू शकता आणि हा बिजनेस सुरु करू शकता. याचे अनेक कोर्सेस मार्केट मध्ये उपलब्ध आहे.

३४. सेंद्रिय फळे आणि भाजी विकणे

आजकाल बाजारात मिळणारी फळे आणि भाज्या या केमिकल युक्त असतात. आजकाल पिकांसाठी जी खते आणि कीटकनाशके वापर जातात ती आपल्या आरोग्यासाठी खूप घातक असतात 

फळे आणि भाज्यांना विविध प्रकारची इंजेक्शन्स देखील दिली जातात त्यामुळे लोकांना अनेक मोठं मोठे आजार होत आहे. 

हळूहळू लोक याबद्दल जागृत होत आहेत आणि सेंद्रिय खतांचा वापर केलेला भाजीपाला आणि फळे लोक मोठ्याप्रमाणावर विकत घेत आहे. 

तुम्ही सेंद्रिय फळे आणि भाज्या विकण्याचे काम करू शकता आणि चांगले पैसे कमावू शकता. 

तुम्हाला ऑरगॅनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून फळे आणि भाज्या विकत घेऊ शकता आणि  मार्केटमध्ये विकू शकता.

तुम्ही घरोघरी जाऊन विक्री करू शकता किंवा भाड्याने एक लहान गाळा घेऊन त्यामार्फत देखील विक्री करू शकता.

३५. सेंद्रिय शेती

शेती हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा घटक आहे. आपले सर्वांचे जीवन पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते. 

आजकाल शेतीत जी खते आणि कीटकनाशके वापरली जातात ती आपल्या आरोग्यास हानिकारक आहेत. अनेक लोकांना त्यामुळे वेगवेगळे आजार होत आहे आणि म्हणूनच सेंद्रिय शेतीची गरज निर्माण झालेली आहे. 

भविष्यात सेंद्रिय शेतीला खूप महत्त्व प्राप्त होणार आहे. तुमच्याकडे  जर स्वतःची शेती असेल तर तुम्ही सेंद्रिय शेती करू शकता.

सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या पिकांना तुम्ही जास्त किमतीने देखील विकू शकता. 

३६. ब्लॉकचेन डेव्हलपमेंट 

या दशकातील एक मोठा शोध किंवा इनोवेशन म्हणजे ब्लॉकचेन तंत्रज्ञान. क्रिप्टोकरन्सी मुळे लोकांना माहित झालेलं हे तंत्रज्ञान अतिशय उपयोगी ठरणार आहे. 

हेल्थकेअर, बँकिंग, फायनान्स, बिजनेस, सप्लाय चेन मॅनेजमेंट, एजुकेशन अशा जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये याचा उपयोग केला जाऊ शकता

ब्लॉकचेन डेव्हलोपमेंट चा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या सेक्टर ला मदत करू शकता आणि यातून चांगले पैसे कमवू शकता. या क्षेत्रात काम करण्यासाठी तुम्हाला याचे चांगले ज्ञान असणे गरजेचे आहे. आजकाल तुम्ही अशा गोष्टी ऑनलाईन देखील शिकू शकता.

३७. खाद्यपदार्थ बनवणे

जर तुम्हाला काही चांगल्या फूड रेसिपी बनवता येत असतील किंवा तुम्हाला कूकिंग ची आवड असेल तर तुम्ही हा व्यवसाय करू शकता.

तुम्ही हा व्यवसाय तुमच्या घरातून देखील सुरू करू शकता आणि चांगले पैसे कमावू शकता. 

भारतात अनेक संस्कृतींचे लोक एकत्र राहतात जसे कि मराठी, पंजाबी, गुजराती, बंगाली. प्रत्येक संस्कृतीत  निरनिराळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात. प्रत्येक प्रदेशात काही विशिष्ट पदार्थ प्रसिद्ध असतात. असेच अनेक पदार्थ तुमच्याही घरात बनवले जात असतील.

तुम्हाला ही जर असे काही पदार्थ बनवता येत असतील तर तुम्ही लोकांच्या खाद्य पदार्थांच्या ऑर्डर घेऊ शकता. ग्राहकांना हवे असलेले पदार्थ तुम्ही बनवून देऊ शकता.

३८. फूड ट्रक चालू करणे 

तुम्ही स्वत: चा फूड ट्रक सुरू करू शकता. हा बिजनेस इतर देशांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

फूड ट्रक बिजनेस  चे अनेक फायदे आहेत. तुम्ही अगदी कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता. इतर हॉटेल व्यवसायांच्या तुलनेत या बिजनेस चा  खर्च खूप कमी आहे.

हॉटेल व्यवसायाच्या तुलनेत ही एक नवीन बिजनेस आयडिया आहे आणि म्हणूनच या बिजनेस मध्ये स्पर्धा फारच कमी आहे.

हा व्यवसाय थोडासा वेगळा  असल्याने ग्राहकही या व्यवसायाकडे आकर्षित होतात.

तुम्हाला कोणतीही जागा विकत घेण्याची आवश्यकता नाही, तुम्ही तुमचे हॉटेल सोबत घेऊन फिरू शकता आणि एका ठिकाणी ग्राहक न मिळाल्यास दुसर्‍या ठिकाणी जाऊन ग्राहक मिळवू शकता.

३९. नैसर्गिक ब्युटी पार्लर

ब्यूटी पार्लर व्यवसाय हा एक अतिशय सोपा व्यवसाय आहे. महिलांना नेहमीच ब्युटी पार्लरची आवश्यकता असते आणि महिला  त्यावर चांगला खर्च देखील करतात.

तुम्ही ब्युटी पार्लर चा कोर्स करू शकता आणि हा व्यवसाय सुरू करू शकता.

कंपेटीटीव्ह ऍडवांटेज साठी तुम्ही तुमच्या व्यवसायात काही वेगळेपण निर्माण करू  शकता. जसे की तुम्ही ऑरगॅनिक ब्युटी पार्लर सुरू करू शकता जिथं तुम्ही केमिकल चा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने सर्व्हिस देऊ शकता. 

या व्यवसायाबरोबर, तुम्ही महिलांचे  अनेक प्रॉडक्ट्स देखील विकू शकता.

४०. प्रिंटेड टी शर्ट चा व्यवसाय 

आजकाल लोकांना प्रिंटेड कपडे घालायला आवडतात. लोकांना त्यांच्या T-shirt वर एखादी चांगली Tagline, इमेजेस किंवा Text असणे आवडते.

मोठमोठ्या कंपन्या देखील त्यांच्या ब्रँडची जाहिरात करण्यासाठी त्यांच्या कर्मचार्‍यांना कंपनीची ब्रॅण्डिंग असलेले टी शर्ट देतात. 

भारतात अनेक सण आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतात, तुम्ही त्यांच्या ऑर्डर देखील घेऊ शकता.

इमेजेस, ग्राफिक, टायटल, वाक्य, टॅगलाईन , प्रसिद्ध शब्द, प्रसिद्ध म्हणी  टी शर्ट वर प्रिंट करुन त्यांची विक्री तुम्ही करू शकता.

जर तुम्हाला चांगले डिझाईन बनवता येत नसेल तर अनेक ऑनलाईन टूल्स , सॉफ्टवेअर, आणि ऑनलाईन सर्विसेस आहेत यांचा वापर करून तुम्ही चांगले डिझाईन बनवू शकतात.

४१.  कृषी पर्यटन केंद्र 

आजकाल लोकांना निसर्गाचा सहवास मिळत नाही. लोक शहरात राहतात आणि त्यांना ग्रामीण जीवनाचे आणि निसर्गाचे खूप आकर्षण असते.

जर तुमच्याकडे चांगली जागा असेल तर तुम्ही लोकांना एक चांगला व्हिलेज एक्सपेरियन्स देऊ शकता, जसे की बैलगाडीतून फिरणे,गावाकडचं जीवन, गावाकडचं पारंपरिक भोजन, भारतीय खाद्यपदार्थ, पारंपरिक शेती.

तुम्ही जर एखाद्या खेड्यात राहात असल्यास किंवा तुमची गावाकडं शेती, जमीन किंवा घर असेल तर तुम्ही हा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे करू शकता. बरेच लोक हा व्यवसाय करीत आहेत आणि चांगले पैसे कमावत आहे. परदेशातूनही अनेक लोक भारतात या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी येत आहे. 

तुम्ही एक संपूर्ण पॅकेज तयार करू शकता ज्यात या सर्व गोष्टी येतील. तुम्ही त्यात अजूनही अनेक गोष्टी ऍड करू शकता.

ग्राहकांसाठी, तुम्ही ट्रॅव्हल एजन्ट सोबत टाय अप करू शकता. परदेशातल्या ग्राहकांसाठी तुम्ही परदेशातल्या ट्रॅव्हल एजन्ट सोबत देखील टाय अप  करू शकता.

तुम्ही तुमचा व्यवसाय tripadviser.com सारख्या वेबसाइटवर लिस्ट करू शकता, ज्याद्वारे तुम्हाला भरपूर ग्राहक मिळू शकतील.

४२. वैकल्पिक चिकित्सा केंद्र

आजकाल, लोकांची जीवनशैली आणि काम करण्याची पद्धत अशी झाली आहे कि ज्यामुळे लोकांना वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत.

लोक मोबाइलचा अधिक वापर करतात, संगणकावर बर्‍याच काळ काम करतात, बसून टीव्ही पाहतात त्यामुळे लोकांची शारीरिक एक्टिविटी एकदम कमी झाली आहे. 

पाठदुखी, मानदुखी, डोकेदुखी, पोटाशी संबंधित आजार आणि अनेक वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या लोकांना होत आहेत. तुम्ही हि अशा प्रकारच्या समस्यांचा सामना कधी ना कधी केला असेल.

तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता आणि लोकांना अल्टरनेटीव्ह थेरपी देऊन त्यांच्या या आरोग्याच्या समस्या दूर करू शकता.

अल्टरनेटीव्ह थेरपी  मध्ये अनेक वेगवेगळ्या थेरपी असतात जसे कि Acupressure, Magnet Therapy, Colour Therapy, Aromatherapy, Naturopathy, Sujok.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे या थेरपी  चे ज्ञान,शिक्षण आणि अनुभव असणे आवश्यक आहे.  मार्केट मध्ये याचे अनेक कोर्सेस उपलब्ध आहे.

४३. फळांच्या ज्यूस चे दुकान

फळांचे ज्यूस लोक अतिशय आवडीने पितात आणि ज्यूस हे लोकांच्या आरोग्यासाठी देखील खूप चांगले असते.

तुम्ही फळांच्या जूस चे दुकान सुरू करू शकता आणि त्यातून चांगले पैसे कमावू शकता.  

हा व्यवसाय अतिशय सोपा आहे. ज्यूस बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू तुम्हाला अगदी सहज मार्केट मध्ये मिळून जातील 

तुम्ही हा व्यवसाय अतिशय कमी गुंतवणुकीत सुरू करू शकता.  भविष्यात तुम्ही तुमचा ब्रँड बनवू शकता आणि वेगवेगळ्या शाखा देखील उघडू शकता तसेच तुम्ही इतरांना फ्रॅंचाईस देखील देऊ शकता.

४४. घरगुती खानावळ

जगातल्या प्रत्येक माणसाला जिवंत राहण्यासाठी जेवणाची आवश्यकता असते. अन्नाशिवाय कोणताही  माणूस जगू शकत नाही.

तुम्ही स्वतःची खानावळ सुरू करू शकता. या व्यवसायातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

हा एक असा व्यवसाय आहे ज्याची नेहमीच आवश्यकता होती आणि भविष्यात देखील याची आवश्यकता राहणार आहे.

हा एक असा व्यवसाय आहे जो कधीही थांबणार नाही कारण जोपर्यंत या जगात माणूस आहे तोपर्यंत नेहमीच जेवणाची गरज भासणार आहे.

जर तुम्ही उत्कृष्ट क्वालिटी चे घरगुती जेवण योग्य किमतीत लोकांना दिले तर अनेक लोक तुमच्या खानावळीत नियमितपणे येतील आणि तुमचे लॉयल कस्टमर बनतील.

४५.  हेल्दी ब्रेकफास्ट कॉर्नर

निरोगी राहण्यासाठी सकाळचा नाष्टा खूप महत्त्वाचा मानला जातो. लोकांना नेहमीच चांगला ब्रेकफास्ट हवा असतो परंतु काही कारणास्तव किंवा वेळेमुळे त्यांना ब्रेकफास्ट घेता येत नाही.

घरीसुद्धा लोक ब्रेकफास्टला जेवढे महत्त्व दिले पाहिजे तेवढे महत्त्व देत नाही आणि थेट दुपारचे जेवण जेवतात.

तुम्ही राहत असलेल्या शहरात बरीच हॉटेल्स आणि ब्रेकफास्ट कॉर्नर पाहिले असतील, परंतु हेल्दी ब्रेकफास्ट देणारी हॉटेल्स खूपच कमी असतात.

तुम्ही हेल्दी ब्रेकफास्ट कॉर्नर सुरू करू शकता आणि चांगले पैसे कमवू शकतात.

तुम्हाला तुमच्या दुकानात फक्त हेल्दी ब्रेकफास्ट द्यायचा आहे. प्रत्येकाच्या गरजेनुसार तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे नाष्टा किंवा फूड मेनू  तुम्ही तुमच्या दुकानात देऊ शकता.

४६. फूड स्टॉल

जर तुम्हाला खाण्याशी संबंधित व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा सर्वात चांगला पर्याय आहे, तुम्ही हा व्यवसाय अगदी कमी गुंतवणूकीत सुरू करू शकता.

एका संशोधनानुसार, फूड स्टॉल चालवणारे बरेच व्यावसायिक दरमहा 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे कमवतात.

हा व्यवसाय पहायला अगदी लहान वाटतो परंतु तुम्ही या व्यवसायातून लाखो रुपये कमवू शकता.

जर तुम्हाला एक ते दोन चांगले पदार्थ बनवता येत असतील तर तुम्ही हा व्यवसाय अगदी सहजपणे सुरू करू शकता. हे पदार्थ कसे बनवायचे ते तुम्ही शिकू देखील शकता.

४७. टिफिन सर्व्हिस देणे

नोकरीमुळे किंवा शिक्षणामुळे बरेच लोक आपल्या घरापासून दूर राहतात.

मोठ्या शहरात शेकडो बॅचलर लोक राहतात आणि त्या सर्वांना नेहमीच चांगल्या जेवणाची आवश्यकता असते.

याव्यतिरिक्त, जे विवाहित आहेत त्यांना देखील अनेक वेळेस टिफिन ची आवश्यकता असते.

आजकाल पती-पत्नी दोघेही घराबाहेर जाऊन काम करतात, त्यामुळे त्यांना जेवण बनवायला वेळ मिळत नाही, म्हणून विवाहित जोडपे देखील तुमचे चांगले ग्राहक होऊ शकतात.

तुम्ही तुमच्या घरातूनच टिफिन सर्व्हिस सुरू करू शकता. हा व्यवसाय तुम्ही अगदी कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरु करू शकता.

चांगले जेवण आणि उत्तम मार्केटिंग करून तुम्ही हा व्यवसाय यशस्वी करू शकता.

४८. योगा क्लासेस 

आजकाल प्रत्येक जण स्वतःच्या आरोग्याबद्दल जागृत होत आहे. आजकाल लोकांची जीवनशैली अशी बनली आहे कि ज्यामुळे त्यामुळे त्यांना अनेक  आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत आहेत.

लोक दिवसभर बसून काम करतात, ज्यामुळे पाठदुखी, कंबर दुखी अशा अशा प्रकारचे आजार होत आहे. योगा करण्याने अनेक शारीरिक समस्यांमध्ये फ़ायदा होतो. 

तुम्ही योगा क्लासेस  सुरू करू शकता आणि चांगले पैसे कमावू शकता. 

हा बिजनेस सुरु करण्यासाठी तुम्हाला स्वतःला योगा येणे गरजेचे आहे. तुम्हाला योगाबद्दल सर्व काही व्यवस्थित माहित असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला योगा येत नसेल तर तुम्ही  ते शिकू शकता.

४९. डान्स क्लासेस

तुम्ही डान्स क्लासेस सुरू करू शकता. तुम्ही मुलांसोबत मोठ्यांना देखील डान्स शिकवण्याचे काम करू शकता.

डान्स हा एक चांगला व्यायाम मानला जातो, म्हणून बरेच लोक व्यायाम म्हणून देखील हे डान्स  करू शकतात.

डान्स क्लासेस चे अनेक प्रकार आहेत. तुम्हाला ज्या प्रकारचा डान्स येत असेल तो तुम्ही इतरांना शिकवू शकता.

तुम्ही झुम्बा क्लासेस घेऊ शकता. झुम्बा क्लासेस बर्‍याच शहरांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत. जर तुम्हाला  झुम्बा येत नसेल तर तुम्ही तो शिकू देखील शकता

शहरांमध्ये, स्रिया या झुम्बा क्लासेस ला अतिशय चांगला रिस्पॉन्स देत आहे. तुम्ही जर महिला असाल तर तुम्ही झुम्बा क्लासेस सुरु करू  शकता.

तुम्ही तुमच्या घरातूनच हा बिजनेस सुरू करू शकता आणि यासाठी कोणत्याही मोठ्या गुंतवणूकीची आवश्यकता नाही.

५०. ट्युशन सेंटर सुरु करणे

आजकाल शहर असो की गाव, सर्व लोक शिक्षणाबद्दल जागरूक होत आहेत. लोकांना आपल्या मुलांना शिकवायचे आहे आणि म्हणूनच ते मुलांना शाळांमध्ये आणि महाविद्यालयात दाखल करतात.

परंतु बर्‍याच शाळा आणि महाविद्यालया मध्ये चांगलं शिकवलं जात नाहीत. मोठी फी भरून देखील  शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता चांगली नाही.

तुम्ही  शिकवणी घेण्यास सुरूवात केली तर  त्यामुळे मुलांना देखील फायदा होईल आणि तुम्ही देखील चांगली कमाई करू शकाल .

तुम्ही हा व्यवसाय तुमच्या घरातूनच सुरू करू शकता. या व्यवसायासाठी कोणत्याही मोठ्या गुंतवणूकीची आवश्यकता नाही.

५१. इंग्लिश स्पीकिंग क्लासेस

इंग्रजी भाषा जगभरात बोलली जाते. जर एखाद्याला इंग्रजी बोलता येत नसेल तर त्या व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. इंग्रजी बोलता येणे हे अत्यंत गरजेचे आहे.

अनेक मोठं मोठ्या कंपन्यांमध्ये केवळ इंग्रजी बोलली जाते. इंटरव्हिव्ह साठी देखील इंग्लिश बोलता येणे गरजेचे आहे.

तुम्ही इंग्लिश स्पीकिंग क्लासेस सुरू करु शकता. या स्किल ची मार्केट  मध्ये खूप मोठी मागणी आहे.

सुरुवातीला, तुम्ही तुमच्या घरातून देखील हा बिजनेस सुरू करू शकता.

५२. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चे क्लासेस

प्रत्येकाला एक चांगली पर्सनॅलिटी हवी असते. चांगले व्यक्तिमत्त्व केवळ वैयक्तिक जीवनातच नव्हे तर व्यावसायिक जीवनातही खूप फायदेशीर ठरते.

नोकरी असो किंवा बिजनेस, प्रत्येक ठिकाणी चांगल्या पर्सनॅलिटी चा फायदा होतो.

तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चे क्लासेस सुरू करू शकता. या ठिकाणी तुम्ही कम्युनिकेशन चे स्किल , पब्लिक स्पिकिंग , स्टेज डेअरिंग यासारखे अनेक स्किल तुम्ही  शिकवू शकता.

अशा क्लासेस ला मार्केट मध्ये खूप मागणी आहे. तुमच्या या  क्लासेस चा फायदा सर्वच क्षेत्रातील लोकांना होऊ शकतो 

हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला प्रथम तुमच्या पर्सन्यालिटी वर काम करावे लागेल. तुम्हाला या  विषयाचा बारकाईने अभ्यास करावा लागेल.

५३. कुकिंग क्लासेस

जर तुम्हाला चांगला स्वयंपाक बनवता येत असेल तर तुम्ही कुकिंग क्लासेस सुरु करू शकता

बर्‍याच स्त्रिया आणि नवविवाहित महिलांना स्वयंपाक करता येत  नाही. महिलांबरोबरच, पुष्कळ पुरुष देखील कुकिंग  शिकण्यात इंटरेस्टेड असतात .

कुकिंग क्लासेस चे अनेक प्रकार असतात जसे की तुम्ही विशिष्ट पदार्थ बनविणे शिकवू शकता किंवा सर्व सामान्य स्वयंपाक देखील शिकवू शकता.

तुम्ही हा व्यवसाय अतिशय कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये  सुरू करू शकता. तुम्ही हा व्यवसाय तुमच्या घरापासून देखील सुरू करू शकता.

५४. घरगुती मिठाई चे दुकान 

बाजारात उपलब्ध असलेल्या मिठाईंमध्ये बर्‍याच धोकादायक गोष्टी मिसळल्या जातात त्यामुळे अनेक मोठं मोठे आजार देखील होऊ शकतात.

तुम्ही घरगुती मिठाईचे दुकान सुरू करू शकता. सुरुवातीला तुम्ही हा व्यवसाय तुमच्या घरातून देखील करू शकता.

आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक गोड पदार्थ बनवले जातात. अनेक पदार्थ तुमच्या  घरात देखील बनवले जात असतील. तुम्ही त्यातीलच काही पदार्थ तुमच्या दुकानात विकू शकता.

तुम्हाला तुमच्या दुकानात फक्त घरगुती ताजी आणि हेल्थी मिठाई विकायचीआहे. इतर कोणतीही अनहेल्थी मिठाई विकायची नाही याने तुमच्या व्यवसायात एक वेगळेपण निर्माण होईल. 

यामुळे लोकांना मिठाई पण खाता येईल, त्यांचे आरोग्य देखील चांगले राहील आणि तुमची देखील चांगली कमाई होईल. 

५५. टेलरिंग सर्व्हिस देणे

सर्वच लोक इतके श्रीमंत नाहीत की कपडे थोडंसं फाटल्यावर ते फेकून देऊ शकतील. वेळोवेळी या कपड्यांना शिवण्याची गरज भासते.

बरेच लोक रेडीमेड कपडे परिधान करत नाहीत, त्यांना फक्त कस्टमाइझ फिटिंग चे कपडे आवडतात.

महिला त्यांचे ब्लाउज टेलर कडून शिवून घेतात. मुली त्यांचे ड्रेस टेलर कडून शिवून घेतात.

टेलरिंगची अनेक कामे तुम्ही करू शकता जसे की कपडे फिटिंग करणे, बटन लावून देणे, चेन बसवून देणे, फाटलेले कपडे शिवून देणे.

तुमच्या कडे जर टेलरिंग हे चे स्किल असेल तर तुम्ही देखील हा व्यवसाय अगदी सहज सुरू करू शकता.

५६. मोटिवेशनल स्पिकिंग

जर तुम्हाला उत्तम प्रकारे बोलता येत असेल तर तर तुम्ही मोटिवेशनल स्पीकर बनू शकता.

हा व्यवसाय खूप लोकप्रिय झाला आहे. तुम्ही देखील कधीतरी एखाद मोटिवेशनल भाषण ऐकलं असेल .

हा व्यवसाय युट्युब  वर देखील खूप प्रसिद्ध झाला आहे. युट्युब वर अनेक लोक मोटिवेशनल भाषण देतात आणि चांगले पैसे कमावतात. 

तुम्हाला वाटल्यास सुरुवातीला तुम्ही स्वतःचे युट्युब  चॅनेल सुरू करुन हा व्यवसाय सुरू करू शकता.

एकदा तुम्ही लोकप्रिय झाला कि त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मोटिवेशनल स्पीच साठी  आमंत्रित केले जाईल.

इथे तुम्ही युट्युब  वरून पण पैसे कमवू शकता आणि वेगवेगळ्या ठिकाणी मोटिवेशनल स्पीच देऊन देखील पैसे कमवू शकता.

५७. मेन्स हेअर सलून आणि पार्लर

आपण चार दिवस उपाशी जरी राहिलो तरी देखील आपल्या डोक्याचे केस हे वाढतातच. माणसाच्या मृत्यूनंतरही त्याचे केस आणि नखे काही दिवस वाढतात.

तुम्ही तुमचे  स्वतःचे हेअर सलून किंवा मेन्स पार्लर सुरू करू शकता आणि चांगले पैसे कमावू शकता. 

या बिजनेस च मार्केट खूप मोठं आहे. जवळपास सर्व पुरुष आणि मुलांना त्यांचे  केस कापण्यासाठी सलून मध्ये जावे लागते.

जा भागात सलून ची दुकाने नाही किंवा ज्या ठिकाणी सलूनची दुकाने कमी आहेत अशा ठिकाणी तुम्ही तुमचे सलून सुरू करू शकता.

५८. कार / बाइक वॉशिंग आणि डिटेलिंग सेंटर 

वाहन उद्योग खूप वेगाने वाढत आहे. भारताचं ऑटोमोबाईल मार्केट जगातील काही सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मार्केट पैकी एक आहे.

या वाढीचे एक सर्वात मोठे कारण म्हणजे भारताची लोकसंख्या. भारताची लोकसंख्या खूप वेगाने वाढत आहे आणि त्यामुळे वाहने वापरणारे लोकही वाढत आहेत.

वाहन उद्योगाबरोबरच संबंधित व्यवसाय देखील वाढत आहेत. या व्यवसायांपैकी एक म्हणजे कार वॉशिंग आणि डिटेलिंग सेवा

हा व्यवसाय बघायला खूपच लहान वाटतो पण या व्यवसायातून लोक खूप पैसे कमावत आहे. अनेक  लोकांनी एका दुकानापासून सुरुवात करून आज शेकडो युनिट्स सुरू केल्या आहे.

तुम्ही देखील अगदी कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये हा बिजनेस सुरु करू शकता.

५९. एक्स्पोर्ट व्यवसाय

भारत जगातील काही मोठ्या एक्सपोर्टर पैकी एक आहे. आजच्या काळात भारतात एक्स्पोर्ट  बिजनेस मध्ये एक मोठी संधी निर्माण झाली आहे.

भारत सर्वाधिक अमेरिका, संयुक्त अरब इमायरेट, चीन, हाँगकाँग, सिंगापूर,युनायटेड किंग्डम, जर्मनी, नेदरलँड, नेपाळ येथे निर्यात करतो.

जगभरातील अनेक देश चिनी उत्पादने आणि सेवांवर बंदी घालत आहे त्यामुळे भारतातील लोकांसाठी ही एक मोठी संधी आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जर तुम्ही ती मागणी पूर्ण करू शकत असाल तर तुम्ही एक्स्पोर्ट बिजनेस मार्फत कोट्यावधी रुपये कमवू शकता.

एक्स्पोर्ट व्यवसायासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट कडून देखील मदत मिळते कारण तुम्ही या व्यवसायाद्वारे देशाला मदत करत आहात.

६०. लॉन्ड्री, ड्राई क्लीनिंग आणि प्रेसिंग

लाँड्री, ड्राय क्लीनिंग आणि प्रेसिंग या तीन वेगवेगळ्या सेवा एकाच दुकानात दिल्या जाऊ शकतात.

या दररोज आवश्यक असलेल्या सेवा आहेत. आजकाल प्रत्येकजण त्याच्या कामामध्ये व्यस्त आहे म्हणूनच हि कामे ते इतर कोणाकडून करून घेतात.

तुम्ही अतिशय कमी गुंतवणूकीमध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता.

बरेच लोक ऑनलाईन वेबसाइट किंवा ऍप मार्फत देखील हा व्यवसाय करीत आहेत, यावरून तुम्हाला या व्यवसायात किती संधी आहे हे लक्षात येईल.

हा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी तुम्हाला  योग्य ठिकाणी तुमचं दुकान सुरू कराव लागेल, दर्जेदार सेवा द्यावी लागेल आणि योग्य ग्राहकांना लक्ष्य करावे लागेल.

६१. सणांच्या काळातील व सीझनल व्यवसाय

भारत हा सणांचा देश आहे. अगदी संपूर्ण जगातही नाही एवढे सण आपल्या देशात आहे. तुम्ही जर तुमच्या घरातील कॅलेंडरचा अभ्यास केलात तर हे तुमच्या लक्षात येतील.

प्रत्येक सणाला भरपूर वस्तू आणि सेवा आवश्यक असतात. यापैकी बरेच व्यवसाय असे आहे जे तुम्ही अगदी सहज सुरू करू शकता.

प्रत्येक उत्सवात शेकडो व्यवसाय असतात त्यापैकी कोणतेही व्यवसाय तुम्ही करू शकता आणि चांगले पैसे कमावू शकता  

त्याचबरोबर तुम्ही सीझनल व्यवसाय देखील करू शकता. जसे की तुम्ही मौसमी फळांचा व्यवसाय करू शकता त्याचबरोबर  Seasonal कपड्यांचा व्यवसाय देखील करू शकता.

शाळा आणि महाविद्यालयाचा देखील एक सीजन असतो. त्यावेळी तुम्ही स्टेशनरी चा व्यवसाय करू शकता. 

६२. फायनान्शिअल कन्सल्टन्ट 

जर तुम्हाला फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट चे ज्ञान असेल तर तुम्ही फायनान्शिअल कन्सल्टन्ट बनू शकता.

लोकांना फायनान्स आणि इन्व्हेस्टमेंट यासारख्या गोष्टींबद्दल माहिती नसते, लोकांना हे माहित नसत कि कुठं इन्व्हेस्टमेंट करावी आणि कुठं नाही. यासाठी तुम्ही लोकांना मदत करू शकता.

बर्‍याच वेळा लोकांना फायनान्शिअल प्लानिंग करण्याची देखील इच्छा असते. लोकांना त्यांचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवायचे असतात किंवा लोकांना पैशाचे भविष्याचे नियोजन करायचे असते.यात पण तुम्ही लोकांना मदत करू शकता.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, तुम्ही अनुभवासाठी साठी एखाद्या एक्स्पर्ट च्या हाताखाली काम करू शकता.या बद्दल पूर्णपणे शिकल्यानंतर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

६३. बेबी सीटर सर्विस 

आजकाल पती-पत्नी दोघेही कामाच्या संदर्भात घराबाहेर असतात. त्यामुळे त्यांना स्वतः च्या मुलांची काळजी घेता येत नाही.

तुम्ही लहान मुलांना सांभाळण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. या कामासाठी तुम्ही इतर लोकांना कामावर ठेऊ शकता करू शकता. या बिजनेस  मुळे तुम्ही इतरांना हि काम देऊ शकता आणि तुम्ही देखील चांगली कमाई करू शकता.

हा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी तुम्हाला योग्य ग्राहकांना लक्ष्य करावे लागेल. ज्या लोकांना या सेवेची आवश्यकता असलेल्या त्या लोकांपर्यंत तुम्हाला पोहचावे लागेल..

लोकांना कामावर घेताना, त्यांचा स्वभाव, त्यांचं बॅकग्राऊंड याची कसून चौकशी करावी लागेल. हे काम खूप जबाबदारीच काम आहे. 

६४. वेडिंग प्लॅनर

भारतात विवाह मोठ्या उत्सवाप्रमाणे साजरे केले जातात. भारतात दरवर्षी सुमारे एक कोटी लग्न होतात आणि बहुतेक लग्न हे मोठ्या थाटात केले जातात.

लग्न ही छोटी गोष्ट नाही. त्यात डान्स, म्युसिक, डेकोरेशन, कलर्स, फूड अशा बर्‍याच गोष्टी हाताळाव्या लागतात.

लोकांना या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे हाताळता येत नाही त्यामुळे लग्नात अनेक प्रॉब्लेम येतात. येथे तुमच्या साठी चांगली संधी निर्माण होते.

बहुतेक लोक आयुष्यात फक्त एकदाच लग्न करतात आणि प्रत्येकाची इच्छा असते की त्यांचे किंवा त्यांच्या मुलांचे लग्न थाटात व्हावे.

तुम्ही वेडिंग प्लॅनर बनू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता.

६५. मंडप आणि सजावट व्यवसाय

वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी डेकोरेशन आणि मंडप ची आवश्यकता असते. भारतात वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी मंडप आवश्यक असतात.

कार्यक्रम  मनोरंजक बनविण्यासाठी चांगली सजावट असणे आवश्यक असते. प्रत्येकाला डेकोरेशन चे ज्ञान नसते आणि इथंच तुमच्यासाठी संधी निर्माण होते. 

तुम्ही डेकोरेशन चा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे डेकोरेशनचे ज्ञान असणे आवश्यक आहे.  हा व्यवसाय तुम्ही अगदी कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू करू शकता.

कार्यक्रमांमध्ये खूप पैसा खर्च केला जातो आणि जर तुम्ही चांगली सजावट केली तर तुम्ही देखील त्यातून चांगले पैसे कमवू शकता.

६६. लहान मुलांच्या कपड्यांचे दुकान 

भारतामध्ये मुलांच्या कपड्यांचं मार्केट अतिशय वेगाने वाढत आहे. तुम्हाला हे माहीतच असेल कि कपड्यांचे मार्केट किती मोठ आहे आणि त्या संपूर्ण मार्केटचा एक मोठा भाग मुलांच्या कपड्यांच्या मार्केट ने व्यापलेला आहे.

असा अंदाज आहे की २०२८ पर्यंत भारतातील मुलांच्या कपड्यांच मार्केट २ लाख करोड पेक्षा मोठं होणार आहे. या व्यवसायामध्ये किती संधी आहे हे आपण येथे समजू शकता.

१ ते १४ वर्षापर्यंतच्या मुलांना लहान मानलं जात. तुम्ही एखाद्या वर्दळीच्या भागात लहान मुलांच्या कपड्यांचे दुकान सुरू करू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता.

हा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी मुलांना आवडतील असे कपडे तुम्हाला तुमच्या दुकानात विक्रीसाठी ठेवावे लागतील.

६७. गव्हाचे बिस्किट बनवण्याचा व्यवसाय 

वय कोणताही असो बिस्कीट प्रत्येकाला आवडतात. मार्केट मध्ये अनेक प्रकारचे बिस्किट मिळतात.

बाजारात अनेक वेगवेगळे ब्रँड आहेत आणि हे ब्रँड मोठ्या प्रमाणावर बिजनेस करत आहे.

बिस्किट मुलांसह मोठेही खातात, परंतु ते बिस्किट आपल्या पोटासाठी योग्य नसतात बिस्किट खाल्ल्यामुळे अनेक पोटाच्या समस्या उद्भवतात.

बिस्किट मुळे अनेक लोकांचे पोट खराब होत. बर्‍याच लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या देखील होते. बाजारातील बिस्कीट मध्ये मैदा असतो आणि तो तुमच्या आरोग्यासाठी चांगला नसतो.

तुम्ही गव्हाची बिस्किटे बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. लोकांचे आरोग्य देखील चांगले राहील आणि तुम्ही देखील त्यातून चांगले पैसे कमवू शकाल.

६८. महिलांच्या प्रॉडक्ट चे दुकान

महिलांना नवनवीन वस्तू खरेदी करण्याची खूप आवड आहे. महिला त्यांच्या दैनंदिन आयुष्यात अनेक प्रॉडक्ट वापरत असतात.

महिलांच्या प्रॉडक्ट आणि ऍक्सेसरीज चे मार्केट खूप मोठं आहे आणि यात तुमच्यासाठी चांगली संधी आहे. 

तुम्हाला जर कमी गुंतवणुकीत एखादा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही नक्कीच या बिजनेस आयडिया चा विचार करू शकता कारण हा एक उत्तम व्यवसाय आहे. 

तुम्ही तुमच्या भागात महिलांच्या प्रॉडक्ट आणि ऍक्सेसरीज चे  दुकान सुरू करू शकता आणि उत्तम पैसे कमावू शकता. 

तुम्ही तुमच्या दुकानात महिलांचे अनेक प्रॉडक्ट आणि ऍक्सेसरीज  विकू शकता जसे की  मेकअप चे प्रॉडक्ट, केसांच्या क्लिप्स, केसांचे बँड, केसांचे प्रॉडक्ट, महिलांच्या बॅग, महिलांचे स्कार्फ आणि  सौंदर्य प्रसाधने. 

६९. चिक्की बनवण्याचा व्यवसाय

चिक्की हा एक प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. हि चिक्की सर्वच लोकांना आवडते.

चिक्की प्रामुख्याने गुळ आणि शेंगदाण्यापासून बनविली जाते, आजकाल लोक वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्की बनवतात जसे कि मुरमुरा चिक्की, ड्राय फ्रूट्स चिक्की, तिळाची चिक्की, खोबऱ्याची चिक्की. 

तुम्ही  चिक्की बनवण्याचा व्यवसाय करू शकता आणि चांगले पैसे यातून कमावू शकता. हा उद्योग तुम्ही घरबसल्या देखील करू शकता.

तुम्ही  चिक्की बनवण्याची प्रक्रिया अगदी सहजपणे शिकू शकता.

तुम्ही तुमचा एक चिक्की ब्रँड उभा  शकता. तुम्ही तुमची  चिक्की इतर देशांमध्ये देखील निर्यात करू शकता.

७०. सेंद्रिय गूळ बनविणे

सेंद्रिय खाद्य पदार्थांची बाजारात खूप मागणी आहे . लोक हळूहळू जागृत होत आहेत आणि सेंद्रिय खाद्य पदार्थांचे महत्त्व त्यांना समजत आहे.

तुम्ही सेंद्रिय गुळ बनवण्याचा व्यवसाय सुरु करु शकता. लोकांना केमिकल फ्री गुळ विकून त्यातून चांगले पैसे कमवू शकता.

बरेच लोक हा व्यवसाय करीत आहेत आणि यात ते यशस्वी पण झाले आहेत.

तुम्हाला जिल्हा उद्योग केंद्रात या व्यवसायाबद्दल अधिक माहिती मिळेल तसेच तुम्ही इंटरनेटवर देखील या व्यवसायाबद्दल संशोधन करू शकता.

सेंद्रिय गूळ बनवण्याची प्रक्रिया तुम्ही अगदी सहज शिकू शकता. भविष्यात सेंद्रिय खाद्य पदार्थांची मागणी खूप वाढणार आहे. तुम्ही परदेशात देखील सेंद्रिय गुळाची निर्यात करु शकता.

७१. कुरिअर सेवा

कुरिअर सेवा ही एक अत्यावश्यक सेवा आहे. एखाद्याला एखाद्या शहरातून दुसर्‍या शहरात काही पाठवायचे असेल तर त्यांनी कुरिअर सेवा वापरावी लागते .

उद्योग – व्यवसायांना देखील नेहमीच कुरिअर सर्व्हिस ची गरज पडत असते.

आता इथं तुम्हाला खूप मोठी कंपनी सुरू करण्याची गरज नाही. तुम्ही हा व्यवसाय अगदी लहान स्तरापासून सुरू करू शकता. 

सुरुवातीला तुम्ही तुमचा सर्व्हिस एरिया छोटा ठेऊ शकता, म्हणजे, सुरुवातीला तुम्ही फक्त  तुमच्या आसपासच्या शहरांमध्येच हे पार्सल वितरीत करण्याचे काम करू शकता. हळूहळू तुम्ही तुमचा सर्व्हिस एरिया आणि तुमचा व्यवसाय, दोन्ही ही वाढवू शकता.

७२. हॉटेल

कोणताही माणूस अन्नाशिवाय जगू शकत नाही आणि म्हणूनच या व्यवसायाची मार्केट मध्ये कायम चांगली डिमांड आहे. 

तुम्हाला एकदम फाईव्हस्टार हॉटेल सुरु करायची गरज नाहीये. तुम्ही एकदम छोटं हॉटेल सुरु करू शकता.

आजकाल एक विशिष्ट पदार्थ देणारे हॉटेल खूप चालत आहे म्हणजे हे हॉटेल सर्वच पदार्थ विकत बसत नाही ते केवळ एकाच पदार्था मध्ये एक्स्पर्ट असतात.

७३. ऑटो स्पेअर पार्ट्स चे दुकान

जो पर्यंत लोक मोटारसायकल तसेच कार  वापरतील तोपर्यंत त्यांच्या स्पेअर पार्ट्स ची  देखील गरज राहणार आहे   

ज्यावेळेस दुचाकी किंवा कार खराब होते किंवा त्यामध्ये काही प्रॉब्लेम येतो तेव्हा नवीन स्पेयर पार्ट्स ची आवश्यकता पडते.

Brake Parts & Rubber Components, Transmission Parts, Nuts, Bolts, Auto Electrical Parts असे वेगवेगळे ऑटो स्पेअर पार्ट्स तुम्हाला दुकानात विकावे लागतात.

तुम्ही या व्यवसाया सोबतच इतर सेवा देखील देऊ शकता जसे कि रिपेरिंग सर्विस, वॉशिंग सर्विस 

७४. ड्रायव्हिंग स्कूल बिझनेस

कार ड्रायव्हिंग हे एक गरजेचं स्किल आहे आणि हे स्किल आपण  शिकले पाहिजे. जर कोणी न शिकता गाडी चालवण्याचा प्रयत्न केला तर अपघात होण्याची शक्यता असते आणि अपघातात मृत्यू पण होऊ शकतो.

कार चालविण्याआधी, कार ड्रायविंग शिकणे गरजेचे आहे भलेही त्यासाठी थोडासा खर्च करावा लागला तरीही काही हरकत नाही.

तुम्ही  ड्रायव्हिंग स्कूल सुरू करू शकता आणि लोकांना कार ड्रायव्हिंग शिकवू शकता. यासाठी तुम्ही एक ठराविक किंमत निश्चित करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला स्वतःला ड्रायव्हिंग करता येणे  गरजेचे आहे.

ग्राहक मिळवण्यासाठी तुम्ही ऑनलाईन जाहिरात करू शकता.

तुम्ही अतिशय कमी गुंतवणूकीमध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता.

७५.  फर्निचर व्यवसाय

भारतामध्ये फर्निचर व्यवसायाची बाजारपेठ खूप मोठी आहे. तुम्ही देखील हा व्यवसाय सुरू करू शकता आणि या संधीचा फायदा घेऊ शकता.

तुम्ही  स्वत: चे दुकान देखील सुरू करू शकता किंवा एखादी वेबसाइट बनवून देखील ग्राहकांना आकर्षित करू शकता. हवं तर तुम्ही दोन्ही पद्धतींचा वापर करू शकता.

तुम्ही लोकांना कस्टमाइज फर्निचर देखील बनवून देऊ शकता.

सोफा, खुर्च्या, बेंच, ड्रेसर, केसेस, स्टोरेज कॅबिनेट्स, टेबल्स, होम डेकोरेटिव्ह फर्निचर आणि अजूनही अनेक प्रकारचे वेगवेगळे फर्निचर तुम्ही बनवून देऊ शकता.

जर तुम्ही चांगले काम केले तर तुमच्या व्यवसायाची माऊथ पब्लिसिटी होईल आणि तुम्हाला भरपूर ग्राहक मिळतील.

७६. इन्व्हर्टर आणि बॅटरी

आजकाल प्रत्येक घरात इनव्हर्टर आणि बॅटरी असतात. गाड्यांमध्ये देखील Batteries वापरल्या जातात.

तुम्ही इन्व्हर्टर आणि बॅटरी चे दुकान सुरु करू शकता. मार्केट मध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्यांच्या बॅटरीज विकल्या जातात.

कोट्यवधी लोक दुचाकी आणि चारचाकी वापरत आहेत, त्यामुळे गाड्यांच्या बॅटरीज ला देखील खूपच मागणी आहे.

तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनी चे डीलर होऊ शकता किंवा रिटेल स्टोअर सुरू करू शकता.

हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी, थोडासा रिसर्च करा आणि कोणत्या प्रकारच्या आणि कंपनी च्या बॅटरीला तुमच्या भागात जास्त मागणी आहे हे बघा. 

७७. इलेक्ट्रीशियन

तुम्ही इलेक्ट्रीशियन बनू शकता. ही एक अत्यावश्यक सेवा आहे आणि ज्याची गरज प्रत्येकाला कधी ना कधी पडते.

हा व्यवसाय अतिशय कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरू केला जाऊ शकतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक ते शिक्षण, तांत्रिक ज्ञान, स्किल आणि अनुभव असणे आवश्यक आहे.

काम मिळवण्यासाठी, तुम्ही इलेक्ट्रिकल दुकान असलेल्या लोकांच्या संपर्कात राहू शकता, तुम्हाला वेगवेगळ्या लोकांना भेटावे लागेल आणि तुमचे कॉन्टॅक्ट वाढवावे लागतील.

७८. टैक्स कंसलटेंट किंवा अकाऊंटिंग चा व्यवसाय 

प्रत्येक व्यवसायाला टैक्स कंसलटेंट किंवा अकाउंटंट ची आवश्यकता असते. 

प्रोफेशनल लोकांना देखील CA  ची गरज पडते. इंजिनीअर, वकील, डॉक्टर, अशा लोकांना देखील कर भरावा लागतो आणि म्हणूनच त्यांनाही या सर्व्हिस ची गरज पडते.

तुम्ही देखील हा व्यवसाय सुरू करू शकता, हे एक उच्च प्रोफेशन मानलं जात.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक ते शिक्षण आणि अनुभव असणे गरजेचे आहे. दोन्हीही तुम्हाला सहज मिळू शकते.

७९. इव्हेंट मॅनेजमेंट चा व्यवसाय

इव्हेंट मॅनेजमेंट च्या व्यवसायात देखील मोठी संधी आहे. नुसती संधी च नाही तर त्यातील नफा देखील खूप जास्त आहे.

या व्यवसायाचं च मार्केट देखील खूप मोठं आहे कारण आजकाल जवळपास प्रत्येक ठिकाणी इव्हेंट  होतात. आजकाल प्रत्येक लहान मोठी  गोष्ट एक इव्हेंट  बनते. 

तुमच्या साठी इथे एक मोठी संधी निर्माण होते. तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंट चा व्यवसाय सुरु करू शकता आणि लोकांच्या इव्हेंट मॅनेज करून उत्तम पैसे कमावू शकता. 

यात तुम्ही लग्न, वाढदिवस, कॉर्पोरेट मीटिंग, फेस्टिवल, कॉन्फरेन्स, सेरेमोनी , फॉर्मल पार्टी, कॉन्सर्ट यासारखे बरेचसे कार्यक्रम मॅनेज करू शकता.

विशेष गोष्ट अशी आहे की लोक अशा कार्यक्रमांमध्ये खूप खर्च करतात, त्यामुळे तुम्ही यातून चांगले पैसे कमवू शकता.

८०. केटरिंग व्यवसाय

असा अंदाज आहे की भारतात केटरिंग इंडस्ट्री हि हजारो कोटींची आहे. यावरून केटरिंग व्यवसायामध्ये  किती मोठी संधी आहे हे तुम्ही समजू शकता.

तुम्ही कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये देखील हा व्यवसाय सुरू करू शकता.

सुरुवातीला तुम्ही लहान ऑर्डर घेऊ शकता आणि जसजसा तुमचा व्यवसाय  वाढत जाईल तसे तुम्ही मोठ्या ऑर्डर घेणे सुरू करू शकता.

केटरिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी काही लायसेन्स आणि परमिट ची आवश्यकता देखील असते. तुम्हाला त्याची माहिती इंटरनेटवर देखील मिळेल.

लग्न, पार्ट्या, वाढदिवस, कॉरपोरेट इव्हेंट, सामाजिक कार्यक्रम, आरोग्य सेवा, रेल्वे, विमान कंपन्या आणि इतर अनेक ठिकाणी केटरिंग सेवा लागते आणि म्हणूनच हा बिजनेस सुरु करून तुम्ही चांगले पैसे कमाऊ शकता.

८१. रिअल इस्टेट एजंट

तुम्ही रिअल इस्टेट एजंट बनू शकता आणि उत्तम पैसे कमावू शकता. 

 जेव्हा एखाद्याला मालमत्ता खरेदी करायची असेल तेव्हा तो तुमच्याशी संपर्क साधू शकतो आणि जेव्हा एखाद्याला मालमत्ता विकायची असेल तेव्हा तो ही तुमच्याशी संपर्क साधू शकतो.

येथे तुम्ही एक मध्यस्थ म्हणून काम करायचे असते.

जेव्हा एखादी संपत्ती विकली किंवा खरेदी केली जाते तेव्हा तुम्ही प्रत्येक विक्री किंवा खरेदी वर तुम्ही कंमिशन कमवू शकता

रिअल इस्टेट एजंट होण्यासाठी लायसन्स ची देखील आवश्यक असते. तुम्हाला त्याची सर्व माहिती इंटरनेटवर मिळेल.

८२. बिल्डिंग मटेरियल सप्लाय करणे 

बांधकामासाठी वेगवेगळ्या मटेरियल  ची आवश्यकता असते. तुम्ही बिल्डिंग मटेरियल सप्लाय करण्याचे काम करू शकता.

जर कोणाला कन्स्ट्रक्शन करायचे असेल तर तुम्ही त्यांना मटेरियल सप्लाय करू शकता.

सिमेंट, वाळू, लाकूड, रेडी मिक्स काँक्रेट, विटा, ब्लॉक, धातू आणि जे पण इतर मटेरियल बांधकाम करण्यासाठी आवश्यक असेल ते तुम्ही सप्लाय करू शकता.

सुरुवातीला तुम्हाला सर्व मटेरियल पुरवण्याची आवश्यकता नाही, तुम्ही यापैकी काहीच  मटेरियल विकू शकता आणि जसजसा तुमचा व्यवसाय वाढत जाईल तसे तुम्ही इतर मटेरियल सप्लाय करायला सुरुवात करू शकता.

८३. पाईप आणि प्लंबिंग मटेरियल चे दुकान

पाणी आपल्या जीवनाचा एक अनमोल घटक आहे आणि प्लंबिंग त्याच्याशी संबंधित महत्वाची आणि आवश्यक सेवा आहे.

पाईप्स आणि प्लंबिंग मटेरियल ची बांधकाम क्षेत्रात नेहमीच आवश्यकता असते.

तुम्ही पाईप आणि प्लंबिंग मटेरियल चे दुकान सुरू करू शकता. 

तुम्हाला तुमच्या दुकानात वेगवेगळ्या प्रकारचे पाईप विकायचे असतात जसे कि PVC, CPVC, UPVC.

तसेच तुमच्या दुकानात Elbow, Socket, Cross, Plug, Union, End Plug, Reducer, Tee, Adapter, Trap या सारखे Plumbing Material देखील विकायचे असते.

हा एक अतिशय प्रसिद्ध व्यवसाय आहे जो तुम्ही देखील करू शकत आणि यातून चांगले पैसे कमवू शकता. 

८४. भाड्याने खोली देणे 

लोक बाहेरच्या गावा वरून व्यवसायासाठी, नोकरी साठी तसेच शिक्षणासाठी मोठ्या शहरांमध्ये येतात तेव्हा त्यांना राहण्यासाठी रूम ची गरज पडते.

तुम्ही खोली भाड्याने देण्याचा व्यवसाय देखील सुरू करू शकता. या व्यवसायातून तुम्ही खूप चांगला पॅसिव्ह इनकम जनरेट करू शकता.

या व्यवसायातून तुम्हाला नियमितपणे उत्पन्न मिळू शकते.

तुम्ही बॅचलर लोकांना खोली देऊ शकता किंवा जोडप्यांना देखील भाड्याने खोली देखील देऊ शकता.

८५. इलेक्ट्रिकल शॉप

इलेक्ट्रिसिटी मानवी जीवनाचा एक महत्वाचा घटक आहे.घरात वीज नसल्यास आपले आयुष्य खूप कठीण बनते आणि नुसते घरातच नव्हे तर सर्वत्र वीज आवश्यक झाली आहे.

व्यवसाय, आरोग्य सेवा, कृषी, सामाजिक, इंटरनेट, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र सर्वच सेक्टर मध्ये वीज आवश्यक असते.

तुम्ही इलेक्ट्रिकल शॉप सुरू करू शकता जिथे तुम्ही संबंधित Equipment, Tools, Items विकू शकता जसे की Cables, Wires, Switchgear & Accessories, Switches, Sockets, Plugs.

इलेक्ट्रिकल शॉप मध्ये असणारे सर्व Items तुमच्या दुकानात तुम्ही विकू शकता.

८६. पत्रा व्यवसाय

तुम्ही पत्रा व्यवसाय करू शकता. कंस्ट्रक्शन साठी ही एक अत्यंत महत्त्वाची वस्तू आहे. बांधकाम उद्योगात नेहमीच पत्रांची आवश्यकता असते.

इंडस्ट्रीयल रूफ, घरा मागील अंगण, घराचे छप्पर, गॅरेज, कारखाने आणि इतर अनेक ठिकाणी पत्रे वापरले जातात.

डोमेस्टिक, कमर्शिअल, इंडस्ट्रीयल अशा जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात यांची आवश्यकता असते. आजकाल Corrugated, Polycarbonate, Metal अशी  विविध प्रकारची पत्रे वापरली जातात.

तुम्ही पत्रा व्यवसायामध्ये चांगले पैसे कमवू शकता. तुम्ही या क्षेत्रात डिस्ट्रिब्युटर किंवा डीलर देखील बनू शकता.

८७. ग्राहक सेवा केंद्र

भारतात अनेक बँका कार्यरत आहेत आणि  बँकिंग शी संबंधित व्यवसाय देखील वाढत आहे.

तुम्ही ग्राहक सेवा केंद्र सुरू करू शकता, ज्याला  मिनी बँक देखील म्हटले जाते.

या ठिकाणी बॅंकेशी संबंधित विविध सेवा दिल्या जातात जसे की पैसे भरणे, पैसे काढणे, नवीन बँक खाते उघडणे. या ठिकाणी अनेक प्रकारच्या बँकिंग सेवा लहान स्तरावर दिल्या जातात.

या बिजनेस  मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे कमिशन मिळते.

बँक ही एक अत्यंत महत्वाची सेवा आहे आणि प्रत्येकाला या सेवेची आवश्यकता आहे, जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला तर त्यातून  तुम्ही  चांगले उत्पन्न मिळवू शकता.

८८. डिजिटल मार्केटिंग

जग आता डिजिटल होत आहे. एका ताजा संशोधनानुसार एक सामान्य माणूस रोज चार ते पाच तास इंटरनेटचा वापर करतो आणि हा नंबर खूप वेगाने वाढत आहे.

डिजिटल मार्केटींगच मार्केट अतिशय वेगाने वाढत आहे, आजकाल प्रत्येक व्यवसायात डिजिटल मार्केटिंगची गरज आहे. डिजिटल मार्केटिंग ही काळाची गरज बनली आहे.

तुम्ही डिजिटल मार्केटिंग करून तुमचा व्यवसाय वाढवू शकता किंवा तुम्ही इतरांना डिजिटल मार्केटिंग ची सर्व्हिस देऊ शकता.

आजकाल प्रत्येक व्यवसायिक त्याच्या उत्पादनांची आणि सेवांचे विक्री करण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा वापर करू इच्छित आहे.

फक्त समस्या अशी आहे की त्यांना डिजिटल मार्केटिंग कशी करावी हे माहित नाही, परंतु तुम्ही त्यांना डिजिटल मार्केटिंग ची सर्विस देऊ शकता आणि त्याद्वारे चांगले पैसे कमवू शकता.

८९. यूट्यूब चॅनेल सुरु करणे

आजच्या काळात, इंटरनेटवर इतर कोणत्याही प्रकारच्या कन्टेन्ट च्या तुलनेत व्हिडिओ सर्वात जास्त पाहिले जातात. करोडो लोक नियमितपणे युट्युब चा वापर करतात आणि ही संख्या खूप वेगाने वाढत आहे.

यूट्यूब हे गूगल नंतरचे दुसरे सर्वात मोठे सर्च इंजिन आहे.

यूट्यूब वर तुम्ही तुमचे स्वतःचे YouTube चॅनेल बनवू शकता आणि त्यातुन चांगले पैसे कमवू शकता.

यूट्यूब ही एक अतिशय प्रसिद्ध ऑनलाईन बिजनेस आयडिया आहे. यूट्यूब वर तुम्ही कोणत्याही विषयावर यूट्यूब चॅनेल बनवू शकता.

तुमच्या कडे जर एखाद्या टॉपिक चे चांगले ज्ञान असेल आणि लोकांना देखील त्या टॉपिक  बद्दल जाणून घेण्यात इंटरेस्ट असेल, तर तुम्ही त्या टॉपिक वर यूट्यूब चॅनेल सुरू करू शकता.

हेल्थ, फिटनेस, ब्युटी, बिजनेस, कॉमेडी, मनोरंजन, शैक्षणिक हे यूट्यूब वरील काही प्रसिद्ध टॉपिक आहे.

९०. ब्लॉगिंग

इंटरनेट वर पैसे कमावण्याची ब्लॉगिंग हि एक अतिशय लोकप्रिय पद्धत आहे. तुम्ही ही ब्लॉगिंग द्वारे चांगले पैसे कमवू शकता. असे अनेक ब्लॉगर्स आहेत जे दर महिन्याला $ ५०,००० US डॉलरपेक्षा जास्त पैसे कमावत आहेत.

जेव्हा तुम्ही गुगल वर काही सर्च करता तेव्हा तुम्हाला अनेक वेबसाईट ची लिस्ट एका खाली एक पहायला मिळते आणि तुम्ही तुम्हला हवी असलेली माहिती त्या वेबसाईट किंवा ब्लॉग ला भेट देऊन मिळवू शकता.

वेबसाईट आणि ब्लॉग  हे जवळपास एकच असतात. ब्लॉग वर आपल्याला वेगवेगळी माहिती, व्हिडिओ, शैक्षणिक आणि इन्फॉरमेशनल कन्टेन्ट मिळतो.

तुम्हाला हि जर एखाद्या विषयाचे चांगले ज्ञान असेल आणि त्यामध्ये इतर लोकांना ही इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्या टॉपिक वर ब्लॉग  सुरु करू शकता.

९१. वस्तूंची ऑनलाईन विक्री करणे

आजकाल लोक सर्व काही ऑनलाईन खरेदी करतात. ई कॉमर्स ने  व्यवसाय करण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे.  

तुम्हाला अमेझॉन नावाची ई कॉमर्स वेबसाइट माहित असेल. या अमेझॉन वर विकल्या जाणाऱ्या बहुतेक वस्तू अमेझॉन च्या स्वतःच्या नसतात तर इतर सर्वसामान्य लोक त्या वस्तू विकत असतात. तुम्ही देखील अमेझॉन वर वस्तू विकून चांगले पैसे कमावू शकता. 

जर तुम्हाला भारतात एखादे उत्पादन विकायचे असेल तर तुम्ही  services.amazon.in वर जाऊन संपूर्ण माहिती मिळवू शकता आणि रेजिस्ट्रेशन करून ऑनलाईन विक्री सुरू करू शकता.

अमेझॉन प्रमाणे इतरही अनेक प्लॅटफॉर्म आहेत ज्यांच्यावर तुम्ही तुमचे प्रॉडक्ट विकू शकता.

तुम्ही तुमची स्वतःची ई कॉमर्स वेबसाईट देखील सुरू करू शकता आणि त्यावर तुमचे प्रॉडक्ट विकू शकता. 

९२. फ्रीलान्सर म्हणून काम करणे

फ्रीलान्सर हे असे लोक असतात जे स्वतंत्र पणे काम करतात. हे लोक वेगवेगळ्या कंपन्यांचे काम घेतात आणि कंपन्या त्यांना त्यांच्या कामानुसार किंवा तासाच्या आधारे पैसे देतात.

फ्रीलान्सर हे  कंपनीचे कर्मचारी नसतात तर ते स्वतंत्रपणे काम करतात. फ्रीलांसिंग  हा एक स्वतंत्र व्यवसाय आहे.

सुरुवातीला तुम्ही स्वतः काम करू शकता आणि जेव्हा काम वाढेल तेव्हा तुम्ही इतर लोकांना कामावर ठेवू शकता.

आजकाल कंपन्या  फ्रीलान्सर कडून काम करून घेतात कारण त्याचे अनेक फायदे त्यांना होतात. 

अशा बर्‍याच वेबसाईट आहेत ज्यावर तुम्ही काम मिळवू शकता जसे कि  fiverr.com, upwork.com 

९३. मार्केटिंग एजन्सी सुरु करणे 

कोणताही व्यवसाय यशस्वी करण्यासाठी मार्केटिंग सर्वात आवश्यक असते.

तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्विस कितीही चांगली असती पण जर तुम्हाला मार्केटिंग करता येत नसेल तर तुमचा व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही.

मार्केटिंग महत्वाची तर आहे परंतु प्रत्येकाला मार्केटिंग करता येत नाही. तुमच्यासाठी इथे एक मोठी संधी निर्माण होते.

तुम्ही तुमची स्वतःची मार्केटिंग एजन्सी सुरू करू शकता आणि इतरांच्या व्यवसायाची मार्केटिंग करून देऊ शकता. 

हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला स्वतः मार्केटिंग तसेच जाहिरात करता येणे गरजेचे आहे. तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग  तसेच ऑफलाईन मार्केटिंग देखील करून देऊ शकता.

९४. सोशल मीडिया मॅनेजमेन्ट

आजकाल प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर करतो. सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे.

सोशल मीडिया केवळ वैयक्तिक जीवनातच नव्हे तर व्यावसायिक जीवनातही खूप महत्त्वपूर्ण झाल आहे.

अनेक मोठे बिजनेसमन, सेलिब्रिटी, राजकारणी आणि  प्रोफेशनल लोक स्वत: चे सोशल मीडिया स्वतःच हाताळत नाहीत कारण त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो.

त्यांची सोशल मीडियाची उपस्थिती खूप महत्वाची आहे म्हणूनच ते त्यांचे अकाउंट मॅनेज करण्यासाठी दुसऱ्या व्यक्ती ची नेमणूक करतात.

तुम्ही सोशल मीडिया मॅनेजमेन्ट चा व्यवसाय सुरू करू शकता.

नियमित पोस्ट करणे, चालू घडामोडींवर विविध इमेजेस, पोस्ट आणि वेगवेगळ्या प्रकारचा कन्टेन्ट अपलोड करणे अशा प्रकारची कामे तुम्हाला करावी लागतात.

९५. कॉमन सर्विस सेंटर सुरु करणे

गव्हर्नमेंट अनेक वेगवेगळ्या सर्विसेस लोकांना देत असते. यापैकी बर्‍याच सर्विसेस या आजकाल ऑनलाईन दिल्या जातात किंवा त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते. 

आजकाल जवळपास सर्व कामे ऑनलाईन केली जातात. मग ते सरकारी असो की खाजगी आणि म्हणूनच तुम्ही स्वतःचे कॉमन सर्विस सेंटर ( CSC सेंटर ) सुरु करू  शकता. 

इथं  तुम्ही लोकांना वेगवेगळ्या ऑनलाईन सर्विसेस देऊ शकता जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, ट्रेन तिकीट बुकिंग, वीज बिल भरणे, गव्हर्नमेंट स्कीम ची नोंदणी करणे, वेगवेगळे दाखले काढणे, तसेच लायसेन्स काढून देणे

CSC सेंटर सुरू करण्यासाठी तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती csc.gov.in वर मिळेल. या वेबसाईट वर तुम्ही त्यांच्याशी संपर्क देखील करू शकता. 

CSC रेजिस्ट्रेशन  करण्यासाठी तुम्ही register.csc.gov.in वर जाऊन अप्लाय करू शकता.

९६. टायपिंग सर्व्हिस

कोर्ट कचेरी च्या बाहेर टायपिंग सर्व्हिस ची आवश्यक असते. वकिलांना आणि लोक कोर्ट कचेरी शी संबंधित लोकांना नेहमी टायपिंग सर्व्हिस ची आवश्यकता असते.

तुम्हाला जर इंग्रजी टायपिंग किंवा स्थानिक भाषांमध्ये टायपिंग येत असेल तर तुम्ही हि कोर्ट कचेरी च्या आसपास टायपिंग चा व्यवसाय सुरू करू शकता.

या ठिकाणी तुम्ही इतरही सर्विसेस  देऊ शकता जसे की  झेरॉक्स आणि प्रिंटिंग. हा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी, तुम्हाला तुमचे दुकान योग्य ठिकाणी सुरू करावे लागेल.

वकील आणि कोर्ट कचेरी शी संबंधित लोकांशी संपर्क वाढवावे लागतील त्यामुळे तुम्हाला नियमित ग्राहक मिळतील.

९७. इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे दुकान

भारतीय मार्केट मध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांना तुफान मागणी आहे. असा अंदाज आहे  की हे मार्केट २०३२ पर्यंत ८ लाख करोड पेक्षा मोठं होणार आहे. 

घर असो किंवा ऑफिस इलेक्ट्रॉनिक उपकरणे सगळीकडेच वापरली जातात आणि त्यांच्याशिवाय आपण जीवनाची कल्पना देखील करू शकत नाही.

जवळपास प्रत्येकाचे घर हे इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी भरलेले असते. तुम्ही प्रत्येक उपकरणाचे १ ते २ युनिट घेऊन तुमच्या दुकानाची सुरुवात करू शकता. या व्यवसायात उत्तम प्रॉफिट मार्जिन आहे आणि म्हणूनच यातून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

तुम्ही तुमच्या दुकानात वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक उपकरण विकू शकता जसे की वॉशिंग मशीन, मिक्सर, फ्रीज, टीव्ही, तसेच कूलर

९८. कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर सुरु करणे

संपूर्ण जग तंत्रज्ञानावर चालत आहे. तंत्रज्ञान हे  प्रत्येक क्षेत्रात गरजेचे  झाले आहे. व्यवसाय असो की नोकरी, तंत्रज्ञान शिकल्याशिवाय काम होत  नाही. विशेषत: तुम्हाला कॉम्पुटर चालवता येणे अत्यंत गरजेचे आहे.

तुम्ही कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर सुरू करू शकता. तुम्ही बेसिक कॉम्पुटर ट्रेनिंग सोबतच इतरही अनेक कोर्सस देऊ शकता.

तुम्ही तुमच्या सेंटर मध्ये वेब डिझायनिंग, वेब डेव्हलोपमेंट, फोटोशॉप, ऍनिमेशन, ग्राफिक डिझाईन, प्रॉम्प्ट इंजिनीअरिंग, टॅली,प्रोग्रामिंग यासारखे इतर कोर्सेस देखील देऊ शकता.

९९. ग्राफिक डिझाइन

प्रत्येकजण चांगली  डिझाइन आणि रंगीबेरंगी वस्तूंकडे आकर्षित होतो आणि म्हणूनच  प्रत्येक क्षेत्रात ग्राफिक डिझाइन चा वापर केला जातो.

ग्राफिक डिझाइन ही बिजनेस, गव्हर्नमेंट, सोसिअल, हेल्थकेअर अशा जवळपास सर्वच क्षेत्रांसाठी एक महत्वाची सर्विस आहे.

तुम्ही लोगो डिझाइन, पॅम्प्लेट डिझाइन, वेब डिझाइन, पॅकेजिंग डिझाइन, जाहिरात डिझाइन, इव्हेंट डिझाइन, ब्रॅण्डिंग , बॅनर डिझाइन यासारख्या अनेक वेगवेगळ्या सर्विस देऊ शकता.

तुम्ही अतिशय कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये हा बिजनेस सुरु करू शकता. 

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्या कडे ग्राफिक डिझाइन चे स्किल असणे गरजेचे आहे.

१००. मोबाइल दुरुस्ती व अ‍ॅक्सेसरीजचे दुकान

आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल किंवा स्मार्टफोन असतो. मोबाईल आणि स्मार्टफोन यांना वेळोवेळी दुरुस्त देखील करावं लागत.

तुम्ही मोबाईल रिपेरिंग चा छोटासा कोर्स करू शकता आणि स्वतःचे मोबाईल रिपेअरिंग चे दुकान सुरू करू शकता.

मोबाइल आणि स्मार्टफोन्स च मार्केट हे एक खूप मोठं मार्केट आहे. दिवसेंदिवस मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. 

तुम्हाला या व्यवसायात खूप मोठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही अतिशय कमी गुंतवणूकीमध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता.

१०१. मिनी ट्रॅव्हल एजन्सी सुरु करणे

अनेकांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला खूप आवडतं. परंतु जर लोकांनी स्वत: हून फिरण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो. लोकांना नवीन ठिकाणाची माहिती नसते.

नवीन शहरात कुठे राहायचं ? कोणत्या हॉटेलमध्ये जेवायचं ? तसेच त्या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी कोण कोणते चांगले स्पॉट आहे ? अशा प्रकारचे अनेक प्रश्न लोकांना असतात.

तुम्ही स्वतःची एक छोटीसी ट्रॅव्हल एजन्सी सुरू करू शकता. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी टूर्स आयोजित करू शकता आणि लोकांना ट्रॅव्हल एजन्सीच्या सर्व सेवा देऊ शकता.

छोट्या लेव्हल पासून सुरुवात करून तुम्ही भविष्यात एक मोठी ट्रॅव्हल एजन्सी देखील उभी करू शकता.

१०२. डिस्ट्रिब्युटर किंवा डीलरशिप

आजकाल प्रत्येक उत्पादक त्यांची उत्पादने विकण्यासाठी डिस्ट्रिब्युटर किंवा डीलर चा वापर करतात कारण याचे अनेक फायदे त्यांना होतात जसे की ते त्यांचे प्रॉडक्ट्स एका झटक्यात पूर्ण देशभरात आणि देशाबाहेरही पोहोचवू शकता.

अनुभवी डिस्ट्रिब्युटर कडे आधीपासूनच मोठे नेटवर्क असते आणि त्याचा ही फायदा उत्पादकाला होतो.

प्रत्येक Manufacturer ला वाटत असते कि त्याचे डिस्ट्रिब्युटर असावे आणि म्हणूनच ते डिस्ट्रिब्युटर ला भरपूर ऑफर आणि फायदे देतात त्यामुळे तुम्ही देखील हे फायदे मिळवू शकता.

तुम्ही एखाद्या चांगल्या ब्रँड चे डिस्ट्रिब्युटर किंवा डीलर बनू शकता आणि लाखों रुपये कमवू शकता. चांगल्या Distributors ची मार्केट मध्ये नेहमी गरज असते. तुम्ही देखील या संधीचा फायदा घेऊ शकता.

१०३. इको फ्रेंडली बॅग बनविण्याचा व्यवसाय

आजकाल प्रत्येक जण निसर्गाप्रती जागृत होत आहे. भारतात देखील सिंगल-युज प्लास्टिक बॅग वर बंदी घालण्यात आली आहे.. 

तुम्ही इको फ्रेंडली बॅग बनवून वातावरणाची ची मदत करू शकता आणि त्यापासून चांगले पैसे देखील कमवू शकता.

जर तुम्ही योग्य  किंमतीत चांगल्या इको फ्रेंडली पिशव्या देऊ शकत असाल तर तुम्हाला भरपूर कस्टमर मिळतील. प्रत्येकजण बाजारात काहीतरी खरेदी करतो आणि जवळजवळ प्रत्येक वेळी त्यांना बॅगची गरज पडते.

तुम्ही  वेगवेगळ्या डिझाइनच्या, वेगवेगळ्या रंगाच्या  बॅग बनवू शकता.

१०४. फॅब्रिकेशन व्यवसाय

फॅब्रिकेशन व्यवसायात अतिशय चांगल प्रॉफिट मार्जिन आहे. हा व्यवसाय तुम्ही छोट्या स्तरावर देखील सुरु करू शकता.

फॅब्रिकेशन बिजनेस मध्ये  दरवाजे, खिडक्या, पायर्‍या, Railings, कपाट या  गोष्टी बनविणे तसेच वेल्डिंग , कटिंग, पंचिंग, मशीनिंग, ड्रिलिंग या सारखी अनेक कामे असतात.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही टेक्निकल स्किल असणे आवश्यक आहे. तुम्ही स्वतः हे स्किल शिकू शकता आणि बिजनेस ची सुरुवात करू शकता.

हा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी तुम्हाला या व्यवसायाचे योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे. 

१०५. छोटं गॅरेज

ऑटोमोबाईल इंडस्ट्री खूप वेगाने वाढत आहे. आजकाल, प्रत्येकाकडे स्वतःची गाडी असते.

जर एखाद्याजवळ स्वत: ची टु व्हीलर किंवा कार असेल तर त्याला कधी ना काही या सर्व्हिस ची गरज पडतेच.

तुम्ही एक छोटं गॅरेज सुरू करू शकता आणि लोकांच्या गाड्या दुरुस्त करून देऊ शकता.

दुचाकी आणि कार वापरणारे लोक रोज वाढत आहेत, त्याचबरोबर संबंधित सेवा देखील वाढत आहेत.

हा व्यवसाय यशस्वी करण्यासाठी तुमचे गॅरेज योग्य ठिकाणी असणे आवश्यक आहे, म्हणून गॅरेज सुरु करण्यापूर्वी एक चांगले स्थान निवडा.

नवीन उद्योग व्यवसायांची यादी

1. कमी गुंतवणुकीत कपड्यांचा व्यवसाय कसा सुरु करावा ?
2. Agri-Tourism व्यवसाय कसा सुरु करावा ? 
3. ९ ऑनलाइन बिझनेस आयडिया
4. दिवाळीसाठी कमी गुंतवणुकीत जास्त फायदा देणारे ९ व्यवसाय 
5. ६० पेक्षा जास्त बिनभांडवली व्यवसाय यादी
6. महिलांसाठी ३१ बिझनेस आयडिया
7. पुरुषांसाठी १५ घरगुती व्यवसाय
8. 27 फिरते व्यवसाय यादी

Conclusion : –

निष्कर्ष – मला खात्री आहे या बिजनेस आयडिया तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील परंतु नुसती बिजनेस आयडिया असून काम होत नाही तर तुम्हाला तो बिजनेस  सुरु करण्यासाठी एक चांगला बिजनेस प्लान देखील बनवावा लागतो आणि बिजनेस प्लॅन कसा बनवायचा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर बिझनेस प्लान कसा बनवायचा ? ( ९ स्टेप ) हि पोस्ट तुम्ही वाचू शकता.

जर अजून नवनवीन बिजनेस आयडिया जाणून घ्यायच्या असतील तर खाली तुमचा ई-मेल सबमिट करा

आमच्या नवनवीन पोस्ट मिळवण्यासाठी खाली तुमचा Email Id सबमिट करा 

Loading

हे देखील वाचा

< < मराठी Home Page वर जाण्यासाठी
< < मुख्य Home Page वर जा जाण्यासाठी ( Big Mastery.com)

Swapnil Shinde

Big Mastery चे Founder आणि CEO. स्वप्निल शिंदे हे Ecommerce, Business Education, Content Creation, Hosting अशा अनेक व्यवसायांमध्ये कार्यरत आहे.

Leave a Reply

This Post Has 15 Comments

  1. Swapnil Shinde

   Thanks for Comment. कपड्यांच्या Business मध्ये खूप संधी आहे. तुम्ही Specialized दुकान देखील सुरु करू शकता. कपड्यांच्या Business वर आम्ही अनेक Videos आणि Article Upload करणार आहे. तुम्हाला ते या आमच्या Website वर मिळून जातील.

  2. Kiran kamble

   I want start a namkeen and chips business ,so pls suggest,how to extend Expiry life of products as soon as possible

   1. Swapnil Shinde

    Search On Google & Youtube, and You will get all the details. You will also get some information at Jilha Udyog Kendra.

 1. Sunil Jadhav

  Sirji I want small scale industrial business ideas please

  1. Manisha sudhir manurkar

   Mala Amazon var khadya padarth amcha business karaycha aahe please margdarshan kara

 2. RAVI SAPKAL

  I WANT START PAPER BAG BUSINESS.PLEASE SIR GUIDE ME

  1. RAVI SAPKAL

   I WANT START PAPER BAG BUSINESS.PLEASE SIR GUIDE ME

 3. Ankush Balaso Shinde

  Dear sir. Mala 1-Amazon products cha online bussiness karayacha ahe.or.2-online selling-Buying cha bussiness or 3-comman service center cha bussiness karaycha ahe.tari please Mala margdarshan kara.

 4. यतीन पाटील

  सर मला घर साफ सफाई करण्यासाठी लागणारी सामुग्री (झाडू,मॉप, लादी सफाई साठी लागणारे वायपर) इत्यादी साहित्य बनवण्याचा व्यवसाय सुरु करायचा आहे त्यावर मला मार्गदर्शन करा.

 5. Rachana Yadav

  Sir plz plz YouTube channel vishyi aankhin mahiti milel Ka Karan 2 varsh zale mi न्यूज आणि सबस्क्राईब वर वाढण्यासाठी काय करावे लागेल हे याची ठोस माहिती मला सापडत नाही

 6. Manoj Dusane

  I Want start a paper bag business, so please suggest me