आमच्याबद्दल...

Everything About Business In Marathi

About Us - मराठी

” नवनवीन गोष्टी शिका तसेच तुमच्या व्यवसायात आणि करिअर मध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले Products आणि Services देखील मिळवा “

What will you get ?

  • Bigmastery.com वर Business आणि Marketing बद्दल संपूर्ण Guidance मिळेल.
  • व्यवसाय, मार्केटिंग, ऑनलाइन व्यवसाय, ऑनलाइन मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, गुंतवणूक, संपत्ती निर्माण करणे आणि इतरही अनेक विषयांवर शिकायला मिळेल.
  • Bigmastery.com वर अनेक नवनवीन आणि उपयोगी Skills ( कौशल्ये ) शिकायला मिळतील.
  • अनेक Free तसेच Premium Courses मिळतील. 
  • तुम्हाला तुमच्या Business आणि करिअर मध्ये  यशस्वी होण्यासाठी अनेक उपयोगी Products आणि Services मिळतील.
  • आम्ही सतत नवीन गोष्टींवर संशोधन आणि प्रयोग करीत आहोत जेणेकरून तुम्हाला सर्वोत्तम Strategies आणि Methods मिळतील.
  • आम्ही आमच्या वेबसाइटवर नियमितपणे नवीन Post, Video, Podcasts आणि इतर प्रकारचा उपयुक्त Content अपलोड करतो.
  • यशस्वी व्यवसाय, यशस्वी व्यावसायिक आणि यशस्वी लोकांवर तुम्हाला बरेच Case Studies मिळतील.
  • अपयशी व्यवसाय तसेच व्यावसायिकांवर देखील अनेक Case Studies मिळतील जेणेकरुन आपण या चुका टाळू शकाल.
  • मी माझा स्वतःचा अनुभव देखील या Website च्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे.
  • तुम्हाला अनेक free e-books, free courses, free products आणि free services देखील मिळतील.

About Swapnil Shinde

नमस्कार, माझं नाव आहे स्वप्निल शिंदे आणि मी Bigmastery.com चा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. 

मी एका मध्यम वर्गीय महाराष्ट्रीयन कुटुंबात जन्मलो आणि वाढलेलो आहे. मी एक उद्योजक आहे आणि  सध्या मी E-commerce, Website Development, Website Design, Digital Marketing अशा अनेक व्यवसायांमध्ये कार्यरत आहे. मी  अनेक वेगवेगळ्या Businesses मध्ये कार्यरत आहे. 

मी अनेक वर्षांपासून Business आणि Marketing च्या Strategies शिकत आहे तसेच अमलात देखील आणत आहे त्यामुळे मला चांगलं माहित आहे कि कोणत्या strategies काम करतात आणि कोणत्या नाही.

मी Bigmastery.com अशा सर्व प्रकारच्या लोकांसाठी बनवली आहे ज्यांना त्यांच्या व्यवसाय आणि कारकीर्दीत यशस्वी व्हायचे आहे

Swapnil Shinde

Turning points of my life

प्रत्येकाच्या आयुष्यात काही Turning Points असतात. या विभागात तुम्हला माझ्या आयुष्यातील काही महत्वाच्या Turning Points बद्दल माहिती मिळेल

जेव्हा मी मृत्यू पहिला...

माझं  आयुष्य अतिशय सामान्य चालेले होते परंतु दहावीत असताना मला अचानक काही गंभीर आरोग्याच्या समस्या जाणवू लागल्या. माझ्या पोटात गंभीर वेदना होऊ लागल्या. 

मी डॉक्टरकडे बर्‍याच वेळा भेट दिली पण डॉक्टरांना माझ्या पोटात कोणताही गंभीर आजार आढळला नाही. मला अधून मधून प्रचंड त्रास व्हायचा तर अचानक बरंही वाटायचं.  

त्यानंतर जवळपास  8 वर्षानंतर, एक दिवस माझा पोटातील आजाराने गंभीर स्वरूप धारण केले.  मी एका Wholesale पुस्तकांच्या आणि स्टेशनरी च्या  दुकानात Computer Operator म्हणून काम करत होतो आणि अचानक मला माझ्या पोटात प्राणघातक वेदना होऊ लागल्या . यापूर्वी अशा वेदना मी कधीही सहन केलेल्या नव्हत्या .

मी नीट उभे ही राहता येत नव्हते . एका वेळी मला वाटले की हा माझा शेवटचा दिवस आहे. मी माझ्या डोळ्यांसमोर मृत्यू पाहत होतो.

जेव्हा मला दवाखान्यात नेण्यात आले आणि तेव्हा समजले की मला पोटात Ulcer झालेला आहे आणि तो शेवटच्या टप्प्यावर आहे. माझ्या पोटावर त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. जवळपास एका पाच रुपयाच्या ठोकळ्याच्या आकाराएवढा छिद्र माझ्या पोटाच्या आत पडलेलं होत 

सुदैवाने माझं Operation यशस्वी झालं आणि म्हणूनच आज Post लिहीत आहे. मला  त्या Operation मधून Recover  होण्यासाठी  सुमारे 3 ते 4 महिने लागले. मला आयुष्यभर खाण्याचे अनेक निर्बंध आहेत. असो , आता मी पूर्णपणे बरा झालेलो आहे. या एका मोठ्या Problem ने मला आयुष्याविषयी खूप काही शिकवलं. मला माझ्या आयुष्यच तसेच जिवंत असण्याचं महत्व समजावलं.

या घटनेनंतर एक सर्वात महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे तुमची Health सर्वात महत्वाची आहे. आजच्या काळात कधीही काही होऊ शकत. अगदी कोणालाही एखादा  मोठा जीवघेणाआजार होऊ शकतो आणि त्यात जीव देखील जाऊ शकतो. 

तुम्ही जर जिवंत असाल तर सर्व काही आहे नाहीतर कसलाच काही उपयोग नाही म्हणून तुम्ही तुमच्या हेअल्थ आणि फिटनेस कडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे आणि हेअल्थ म्हणजे नुसती Physical Health  नाही तर Mental Health कडे देखील तेवढेच लक्ष दिले पाहिजे. 

या घटने विषयी मी Detail मध्ये पुन्हा कधीतरी सांगेल परंतु  हा माझ्या आयुष्यातील एक खूप मोठा Turning Point होता. या काळात माझ्या आयुष्यात अजूनही खूप काही घडलं. माझ्या Business ची सुरुवात देखील याच काळात झाली. 

या काळात मला विचार आणि research  करायला खूप वेळ मिळाला. मला पहिल्यापासून  Business मध्ये Interest होता त्यामुळे मी Business करायचा विचार करू लागलो. मी इंटरनेट वर Business आणि Marketing बद्दल Research करू लागलो तेव्हा माझ्या लक्षात आले कि Online देखील business करता येऊ शकतो.

मला Business, Marketing, Digital Marketing, Blogging, YouTube Channel, Affiliate Marketing, E-commerce, Drop shipping, Website Development, Website Design अशा अनेक गोष्टींची माहिती मिळू लागली. 

मी Digital Marketing अगदी खोलवर जाऊन शिकलो. मी एक Second Hand Computer विकत घेतला आणि E-commerce Store सुरु केलं. Online Products ची सेल करणं सुरु केलं. त्यात अनेक छोटे मोठे Problems आले परंतु खूप काही शिकायला मिळालं. 

नंतर मी Website Development, Website Design आणि Website Hosting चा Business सुरु केला आणि त्यातूनही मीअनेक गोष्टी शिकत आहे. मी Regularly Business आणि Marketing वर Research करत आहे आणि नवनवीन गोष्टी शिकत आहे.

Business आणि Marketing बद्दल सर्वांना शिकायला मिळाव तसेच अनेक उपयोगी Products आणि  Services देऊन लोकांना त्यांचा Business Successful आणि Profitable बनवण्यासाठी मदत करता यावी म्हणूनच या Bigmastery.com ची सुरुवात आम्ही केलेली आहे. Bigmastery.com  तुम्हाला माझ्या बरोबरच अनेक Expert लोकांचं मार्गदर्शन मिळेल.

खऱ्या जगाशी संपर्क आला तेव्हा...

शाळा आणि college मध्ये असताना आपल्याला असं वाटत असत कि शाळा आणि college मधील शिक्षण आपलं आयुष्य घडवते चला आयुष्य नाही परंतु कमीत कमी आपलं घर चाललं एवढा तरी उपयोग नक्कीच होईल आणि मी देखील तशाच विचारात होतो.

मला पहिल्यापासून Business आणि Marketing मध्ये इंटरेस्ट होता आणि मी हे आधीच ठरवलेलं होत मी मला Business च करायचा आहे परंतु कोणता business करावा याचं ठरत नव्हतं. माझ्या डोक्यात अनेक वेगवेगळ्या Business च्या कल्पना होत्या परंतु सुरुवात कुठून करायची हे कळत नव्हतं. 

घरातील प्रत्येकाला असच वाटत होत कि मी competitive Exam जसे कि Mpsc, Upsc किंवा बँकिंग ची तयारी करावी परंतु मला त्यात अजिबात Interest नव्हता. 

Graduation झाल्यावर मी ठरवलं कि पुण्याला जाऊन एखादा जॉब करायचा आणि काही दिवसांनी स्वतःचा Business सुरु करायचा.

स्वप्न तर भरपूर पहिली होती परंतु जेव्हा प्रत्यक्षात पुण्याला गेलो तेव्हा तिथलं lifestyle आणि प्रचंड गर्दी पाहून  ८ दिवसात घरी परत आलो कारण मला घरापासून लांब राहायची सवय नव्हती. मी या आधी कधीच घरापासून लांब राहिलेलो नव्हतो. पुण्यातील माझे ते ८ दिवस मला ८ वर्षांसारखे वाटले. 

परंतु अजूनही मला माझ्या शिक्षणावर माझ्या Graduation वर विश्वास होता मला असं वाटत होतं कि मी Graduate झालेलो आहे मला दहा बारा हजाराची नोकरी सहज मिळालं.

मग मी माझ्या काही नातेवाईकांकडे औरंगाबाद ला गेलो आणि तिथे जॉब शोधायला सुरुवात केली. मी औरंगाबाद मध्ये जवळपास ३० ते ४० Interview दिले.  तीन ते चार  ठिकाणी मला जॉब मिळाला देखील होता परंतु एका कंपनी तुन मला Bike चालवता येत नाही म्हणून काढून टाकलं आणि इतर ठिकाणी मी स्वतःहून Job सोडला.

एक Fresher असल्या कारणाने मला काही फार मोठ्या Payment ची अपेक्षा नव्हती परंतु औरंगाबाद मध्ये Survive करणं देखील अवघड होईल एवढ्या कमी payment चे Job मला मिळत होते.

एक Banking च्या class मध्ये मी १५ ते २० दिवस काम केलं परंतु प्रचंड काम करूनही तिथल्या Class Owner च समाधान होत नव्हतं. याच काळात मला माझ्या पोटाच्या आजाराने हैराण केलं होत. त्या काळात मला प्रचंड त्रास होऊ लागलाआणि मी तो Job सोडून दिला.

५ ते ६ महिन्यानंतर मी माझ्या घरी Shrirampur ला परत आलो. श्रीरामपूरला आल्यानंतर मला एका Wholesale दुकानात Computer Operator चा जॉब  एकदम सहज भेटला म्हणजे औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरात  ३० -४० Interview देऊन जे काम झालं नाही ते माझ्या छोट्याश्या शहरात अगदी सहज झालं. 

मला जॉब भेटण्याचं मुख्य कारण होत माझं Skill. माझी टायपिंग Speed अतिशय चांगली होती तसेच Computer बद्दलचं माझं Knowledge बऱ्यापैकी होत आणि Computer च्या कामांमध्ये मध्ये मला आवड देखील होती.

या काळात एक गोष्ट माझ्या लक्षात येऊ लागली कि तुमच्या Graduation च्या Degree चा काही उपयोग नाही. जर तुमच्या कडे एखाद Skill नसेल तर आयुष्यात आणि करिअर मध्ये यशस्वी होणं जवळपास अशक्यच आहे. Skills चं महत्व माझ्या लक्षात येऊ लागलं.

 तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात तसेच तुमच्या करिअर मध्ये यशस्वी बनायचं असेल तर तुमच्या कडे Skills असं खूप गरजेचं आहे. तुमचा Business असो किंवा Job असो जर तुम्हाला Successful बनायचं असेल तर तुमच्या कडे काही चांगले Skills असणं गरजेचं आहे.

आजकाल शिक्षण व्यवस्था अशी बनलेली आहे कि जिथे फक्त पुस्तकी ज्ञानाला महत्व दिल जात ज्याचा उपयोग फक्त तुमच्या शालेय परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी होतो. मान्य आहे कि त्या ज्ञानाचा देखील थोडाफार उपयोग होतो परंतु शालेय आणि कॉलेज च शिक्षण संपल्यानंतर आयुष्याच्या खऱ्या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी ते शिक्षण खूपच अपुरं पडत. 

तुम्हाला Bigmastery.com वर अनेक उपयोगी तसेच नवनवीन Trending Skills शिकायला मिळतील ज्यांचा वापर करून तुम्ही तुमचा  Business, Job आणि तुमच्या क्षेत्रात नक्कीच  यशस्वी बनू शकाल.

Customer Support

आम्ही जलद Customer Support आणि ग्राहक सेवा देतो.  तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि तुमचे प्रश्न विचारू शकता

Email :  contact@bigmastery.com

तुम्ही आमच्याशी Contact Form भरून देखील संपर्क साधू शकता