( उद्योग ) व्यवसाय कोणता करावा? (2023) | Business कोणता करावा ? [2023]

Business सुरु करायचा म्हटलं कि आपण Business Ideas शोधू लागतो. सुरुवातीला आपल्याकडे एकही Business Idea नसते पण शोधू लागल्यावर अनेक Business Ideas सापडतात.

Business Ideas ची अजिबात कमी नाही. Business Idea कशा शोधायच्या ? या Post मध्ये मी Detail मध्ये सांगितलं आहे कि कशा पद्धतीने तुम्ही अगदी सहज भरपूर Business Ideas शोधू शकता आणि याच पद्धतींचा वापर करून मी स्वतः १०१ Business ideas शोधल्या आहे. 

परंतु अनेक Business Ideas असून देखील अनेकांना असा प्रश्न असतो कि यापैकी नेमका कोणता व्यवसाय किंवा उद्योग करावा?

तुम्ही निवडलेला Business चालेल कि नाही असाही विचार आपल्या डोक्यात येतो.

म्हणूनच एक योग्य Business Idea कशी Select करावी किंवा तुमच्या डोक्यात असलेली Business Ideas योग्य आहे कि नाही,  हे कसं Check करायचं किंवा तपासून पाहायचं हेच या Video मध्ये सांगणार आहे.

हि पोस्ट पूर्ण वाचल्यावर, Konta Vyavsay Karava ? या प्रश्नच उत्तर तुम्हाला १००% मिळेल.

कोणता व्यवसाय करावा ? असा प्रश्न जर तुम्हाला असेल तर सर्वात आधी हे करा 

तुमच्या डोक्यात असलेला व्यवसाय तुमच्यासाठी योग्य आहे कि नाही हे तपासून बघण्यासाठी मी तुम्हाला दहा Parameters, मापदंड सांगणार आहे आणि या Parameters वर तुमची business idea तपासल्यानंतर konta vyavsay karava या प्रश्नच उत्तर तुम्हाला १००% मिळेल

या दहा Parameters वर तुम्हाला तुमची Business Idea तपासून बघायची आहे. यावरून तुम्हला तुमच्या Business Ideas चे मूल्यमापन करता येईल. तुमचा Business चालेल कि नाही हे देखील तुम्हाला समजेल.

त्या व्यवसायातून तुम्ही चांगला Profit कमाऊ शकता का ?

तुम्ही जो Business सुरु करणार आहात तुम्ही ज्या व्यवसायात उतरणार आहात तो Business Profitable आहे का ?  

Profitable म्हणजे तुम्ही त्या व्यवसायातून चांगला Profit  कमाऊ शकतात का ?

अनेक वेळेस Business Idea या ऐकायला खुप भारी वाटते. बाहेरून पाहिलं तर असं वाटत कि हा Business खूप Profitable आहे पण शेवटी खिशात काहीच Profit उरत नाही.

एका व्यवसायात पैसा हा Oxygen सारखा आहे. त्या शिवाय तुमचा व्यवसाय जगू शकत नाही.

तुमच्या व्यवसायातून Profit Generate होत नसेल तर तुमचा व्यवसाय जास्त दिवस चालू शकणार नाही.

अनेक वेळेस Business खुप Low Profit Margin वर Operate करावा लागतो. याच एक मुख्य कारण असत Competition. खुप competition असेल तर प्रत्येक जण एकमेकांपेक्षा स्वस्त देण्याचा प्रयन्त करतो.

अनेक वेळेस Product Manufacturing Cost किंवा Wholesale Price च एवढी जास्त असते कि Profit margin प्रचंड कमी राहतो अशा प्रकारचे Business सुरु करू नका.

अनेक वेळेस तुमचा प्रॉडक्ट किंवा सर्विस च अशी असते कि त्याला लोक जास्त Price द्यायला तयार होत नाही.

जर तुम्ही अतिशय Low Profit Margin वर Business Operate करण्याचा प्रयन्त केला तर भविष्यात खुप सारे Problem येतात. Business Sustain करायला खुप सारे Problems येतोत.

एक वेळ अशी येते व्यवसाय बंद करावा लागतो.

तुम्हाला तुमच्या Product किंवा Service मागे चांगल Profit Margin भेटल पाहिजे.

Business सुरु करतानाच हे Parameter व्यवस्तीत तपासून पहा.

तुम्ही जो Product, जी Service विकणार आहेत त्यात तुम्हाला Profit Margin किती आहे ते व्यवस्तीत Calculate करा.

Profit Margin Calculate करताना अनेक व्यावसायिक एक चूक करतात, ते फक्त Product ची Manufacturing Cost किंवा Wholesale Cost होशोबात धरता आणि Margin Calculate करतात.

For Example – मी पाचशे रुपयाला एक Product Wholesale ने विकत घेतला आणि तो हजार रुपयाला विकला. अनेक लोकांना असं वाटत कि इथं पाचशे रुपये चा Profit झाला. पण ते बरोबर नाही.

कारण मला इथं हा प्रॉडक्ट विकण्यासाठी इतरही अनेक खर्च आले जसे कि मला Marketing साठी १०० रुपये खर्च  आला, तो Product Store करण्यासाठी मला ५० रुपये खर्च आला, त्याच्या Transport वर 100 रुपये खर्च आला असा एकूण ७५० रुपये  खर्च आला इथं Profit Margin हे ५०० रुपये नाही तर २५० रुपये आहे.

Profitability Calculate करण्यासाठी एक अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे Cost of Customer Aquisition – तुम्हाला एक Customer मिळवण्यासाठी किती cost येते हे तुम्हाला शोधून काढावं लागलं. 

कोणताही Business सुरु करताना याचा तुम्ही Research करणे गरजेचे आहे. 

काही वेळेस एक Customer मिळवण्यासाठी खूप जास्त खर्च करावा लागतो. 

For Example – तुम्ही तुमच्या एका ग्राहकाला 100 रुपयाचा Product  विकला पण तो  एक ग्राहक  मिळवण्यासाठी तुम्हाला २०० रुपये खर्च आला. 

असं तर नाही ना कि तुम्ही जो Product विकणार आहेत तो Product विकण्यासाठी खूप जास्त खर्च येतो.

Profit Margin Calculate करताना  Product manufacturing  cost , wholesale cost सोबतच त्याची Marketing cost, Storage कॉस्ट, Cost of costumer aquisition, maintenance cost, Texes, मेहनत किती लागते अशे सर्व खर्च होशोबात धरा मगच तुम्हाला perfect  profit  margin  किती आहे ते तुम्हाला समजेल.

तुमच्यापैकी अनेक जण म्हणतील, कि Profit यायला लागला कि मग बघू सुरुवातीलाच याची काय गरज ?

सुरुवातीपासूनच हे खर्च होशोबात धरून मगच product ची price ठरवा आणि एका healthy  profit  margin वर business operate करा.  

कोणताही व्यवसाय सुरु करताना त्या व्यवसायात चांगलं Profit  Margin आहे का नाही ते आधी बघा मगच तो  Business सुरु करण्याबद्दल विचार करा.

Profit Margin नसेल तर असा व्यवसाय चुकूनही सुरु करू नका त्याने फायदा कमी आणि नुकसान जास्त होईल.

व्यवसाय कोणता करावा हे तुमच्याकडं असलेलं भांडवल आणि Resources या वर अवलंबून आहे

तो व्यवसाय सुरु करण्यासाठी जी Investment करावी लागेल ती तुम्ही करू शकता का ? 

त्यासाठी जे इतर Resources लागतात ते तुमच्या कडे आहे का ?  

For example – तुम्ही जो business  करण्याचा विचार करत आहेत तो  सुरु करण्यासाठी ४ लाख  रुपये  खर्च आहे आणि तुमच्या कडे फक्त ५०००० रुपये आहे. मग अशा busienss  idea च्या  मागे  लागून  काय  उपयोग आहे.

एक मार्ग असा आहे कि तुम्ही  तो business  छोट्या लेवल पासून सुरु करू शकता का ? ते तपासून पहा जसे एक  मोठं five स्टार hotel सुरु करण्यापेक्षा एक छोटस cantin, चालू करा , एखादा खाण्याचा  स्टॉल सुरु करा.

जर तुम्ही विचार करत असलेल्या व्यवसायात ते Possible  नसेल आणि त्या व्यवसायासाठी जर एक मोठी Investment करावीच लागत असेल आणि तुमची तेवढी Capacity नसेल तर मग त्या Business Idea चा काही उपयोग नाही.

Business सुरु करताना आधी तुमच्याकडे Available असलेलं भांडवल आणि resources बघा आणि मग कोणता व्यवसाय करायचा ते ठरावा.

कोणताही व्यवसाय सुरु करण्याआधी तुम्ही दोन प्रकारचे खर्च लक्षात घेणे गरजेचं आहे

  • Capital Expenses
  • Operating Expenses

Capital Expenses – तुमचा Business  सुरु करण्यासाठी जो खर्च येतो, त्यासाठी जी Upfront Investment करावी लागते म्हणजे तुम्ही काही Machinary विकत घेतली,  Wholesale ने दुकानात माल भरला, व्यवसायासाठी जमीन विकत घेतली तसेच त्यावर जे Construction केलं, तुम्ही एखादा गाळा विकत घेतला, Infrastructure उभारलं, नवीन Softwares, Vehicals, Office Equipment, Computer Equipment अशा प्रकारचे सर्व खर्च Capital Expenses मध्ये येतात.

Operating Expenses – या खर्चाकडे प्रामुख्याने सर्वजण दुर्लक्ष करतात.  यात तुमचा Maintenance चा खर्च, तुम्ही जर गाळा भाड्याने घेतला असेल तर त्याच दर महिन्याचं भाडं, light बिल, Business मध्ये day to day operations चा खर्च, Advertising, Marketing साठी लागणारा खर्च, तुमच्या Accounting तसेच CA ची फी अशाप्रकारचे तुमचा Business Operate करण्यासाठी जे खर्च लागतात ते Operating Expenses मध्ये येतात.

आणि जर तुम्हला असं वाटत असेल कि पहिली दिवसापासून Customer यायला लागतील नाही आणि पहिल्या दिवसापासून profit यायला लागेल तर तस अजिबात होणार नाही.

तुम्ही लगेच त्या भविष्यात येणाऱ्या Profit च्या भरवशावर व्यवसाय चालू करू नका पुढे लागणाऱ्या खर्चाची आधीच तयारी केली पाहिजे. तुमच्या कडे Available resource आधी बघा आणि मगच कोणता व्यवसाय करायचा हे ठरवा.

व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान आणि Skills तुमच्याकडे आहे का ?

तुम्ही जो business सुरु करणार आहेत त्याचे  तुम्हाला योग्य ते ज्ञान आहे का ? एखाद्याच दुकान / business पहिला आणि तुम्ही पण तोच business चालू केला, किंवा तुमच्या मित्राने किंवा कोणीतरी सांगितलं कि हा business खूप चांगला आहे, हे दुकान सुरु कर यात खूप प्रॉफिट आहे.आणि लगेच तुम्ही तो व्यवसाय चालू केला. 

कोणताही business सुरु करण्याआधी त्या business ची पूर्ण माहिती त्याच पूर्ण knowlege Detail मध्ये मिळवा. त्यासाठी लोकांना भेटा, उद्योगांना भेटी द्या,  internet वर search करा. तुम्हाला जो business सुरु करायचा आहे त्याच तुम्हाला proper knowlege असणं गरजेचं आहे. 

सोबतच तुमच्या business साठी जर काही skills ची आवश्यकता असेल तर ते तुमच्याकडं आहे का ?  for example – तुम्ही स्वतःचा एखाद छोट कॅन्टीन सुरु करणार आहात मग तुम्हाला cooking येते का ?  जेवण कस वाढायचं ते येत का ? जेवण व्यवस्तीत वाढणं हे एक स्किल आहे. लग्नाच्या पंगतीत जेवण वाढणं आणि कॅन्टीन मध्ये वाढणं थोडं वेगळं आहे. तिथे लोक पैसे देतात त्यामुळे तिथे जरा professionally काम करावं लागत.

पुढची अनेक वर्ष तो व्यवसाय तुम्ही करू शकता का ? 

कोणताही बिझनेस सुरु करताना long term vision असणे गरजेचे आहे तुम्ही जर फक्त आत्ताचा विचार करून बिझनेस सुरू केला तर भविष्यात तो बंद पडू शकतो तुम्ही जो बिझनेस सुरु करणार आहात तो बिझनेस तुम्ही पुढचे 20 ते 25 वर्ष न कंटाळता करू शकाल का ? 

तुम्ही जे काम करणार आहात ते तुम्ही न कंटाळता रोज दहा-बारा तास करू शकता का ?  या सर्व गोष्टींचा विचार करा आणि मगच व्यवसायाची निवड करा. 

कोणताही बिझनेस हा एका रात्रीत यशस्वी होत नाही तो यशस्वी होण्यासाठी एक मोठा time जावा लागतो

बिझनेस आयडिया निवडताना तुमच्यामध्ये पेशन्स आहे का ते आधी बघा कारण व्यवसायात यशस्वी होण्यासाठी patience असणे ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे.

अनेक वेळेस लोक जोश मध्ये व्यवसाय चालू करतात आणि वर्षा दोन वर्षांनी त्यांना तो व्यवसाय करण्याचा कंटाळा येतो.  म्हणूनच कोणताही व्यवसाय करण्याआधी तो व्यवसाय तुम्ही long term करू शकाल का याचा विचार करावा.

त्या व्यवसायामध्ये स्पर्धा किती आहे ?

कोणतेही उद्योग / व्यवसाय निवडताना त्या व्यवसायात किती स्पर्धा आहे हे तुम्ही तपासा. 

Business म्हटल कि कमी जास्त प्रमाणात स्पर्धा हि असतेस, जरी ती आता नसली तरी भविष्यात competition निर्माण होतेच 

परंतु बिझनेस सुरू करताना अनेक लोक Competition चा अजिबातच  विचार न करता व्यवसाय सुरु करतात, हे अत्यंत चुकीचे आहे. 

तुम्ही जो व्यवसाय चालू करणार आहात, ज्या ठिकाणी चालू करणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला अजून किती स्पर्धक आहेत हे तुम्हीच बघा. 

 उदाहरणार्थ –  एका लाईनीत दहा हॉटेल आहे आणि तुम्ही तिथ अकरा हॉटेल टाकलं तर तुम्हाला खूप Competition मिळणार आहे, जर तिथे भरपूर ग्राहक असतील तर तुमच्याकडेही त्यातील काही थोडेफार ग्राहक येतील, 

परंतु जर कमी ग्राहक असतील आणि खूप सारे दुकान असतील तर तिथे एकेक ग्राहक मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील.

अनेक व्यवसाय मध्ये तर इतकी Competition आहे की एक एक रुपयासाठी एक एक पैशासाठी प्रचंड स्पर्धा आहे. 

तुम्ही तुमच्या Product च्या किमतीत  थोडा जरी फरक केला तरी खूप सारे Customer  लगेच तुमच्या Competition कडे जातात.

खूप Competition असेल तर अनेक वेळेस कमी किमतीत Product विकावे लागतात त्यामुळे खूप कमी Profit Margin राहते आणि म्हणावा असा Profit प्रॉफिट होत नाही आणि व्यवसाय Loss मध्ये जातो.

तो व्यवसाय करत असताना तुमच्याकडे काही Competitive Advantage आहे का ?

तुमच्या कडे काही competitive advantage आहे  का ? तुमच्या  स्पर्धकांपेक्षा  तुमच्या कडे अजून  काय चांगले आहे ? 

Market मध्ये खूप सारे optiion जर असतील तर तुम्हाला discount द्यावे लागेल, उधारी वाढेल, price पण कमी ठेवावी लागेल त्यामुळे profit margin कमी होईल म्हणूनच तुमच्या व्यवसायात काहीतरी uniqueness निर्माण करा. तुमच्या competition पेक्षा  तुमच्या कडे काहीतरी advantage असल पाहिजे.

म्हणूनच तुमच्या business मध्ये काही uniquness निर्माण करता येईल का ? इतर सगळे करत आहे तेच, तशाच पद्धतीने business केला तर मग तुमच्या कडे customer का येतील ?  कारण त्यांच्याकडे  इतरही option आहे. म्हणूनच तुमच्या business मध्ये competitive advantage निर्माण  करता येईल का ? शिवाय  ते  कस  करता  येईल  ते बघा.

त्या व्यवसायाचं Market किती मोठं आहे ?

तुम्ही जो Business सुरु करणार आहेत त्याची Market size किती आहे ते बघा. तुम्ही जो Business सुरु करणार आहे त्याच मार्केट फार छोटं तर नाही ना ?

म्हणजे तुम्ही जो प्रॉडक्ट विकणार आहेत तो  प्रॉडक्ट  फक्त  १०० लोकांसाठीच  आहे.

मग असा Business सुरु करून  काय उपयोग आहे कारण तुम्ही कितीही मेहनत घेतली तरी तुम्ही या १०० लोकांच्या पुढे जाऊच नाही शकणार.

तुम्ही जो Business सुरु करणार आहे त्याच मार्केट मोठं असलं पाहिजे जसे कि तुम्ही जर जेन्टस T-shirt विकत  असाल तर तुमचं  मार्केट आहे पूर्ण  पुरुष लोक आहे, तुम्ही जर लहान मुलांचे कपडे विकत असाल तर जेवढी  लहान मुलं आहेत तेवढं तुमचं  मार्केट आहे

त्याच  बरोबर जर तुम्ही फक्त उंच लोकांसाठी शर्ट विकत  साल तर तुमचं मार्केट हे त्या तुलनेनं लहान  आहे. 

म्हणूनच Business सुरु  करण्याआधी त्या Business च मार्केट किती मोठं आहे ते तपासा .

तुम्ही जो Product /Service विकणार आहेत त्याची लोकांना गरज आहे का ?

Business  सुरु करण्याआधी जो Product जी Service तुम्ही  विकणार आहेत त्याची मार्केट मध्ये गरज किती आहे ते बघा . तुम्ही असा तर एखादा Product विकण्याच्या तयारीत नाही ना ज्याची मार्केट मध्ये गरजच नाही, ज्याची मार्केट मध्ये डिमांड नाही .

तुम्ही असा तर Product विकत नाही ना जो Product एकदम भारी आहे, अतिशय चांगला आहे, Unique आहे पण त्याची Market मध्ये गरजच नाही.

मनाने काहीतरी कल्पना  बांधून काहीतरी Product विकण्यापेक्षा मार्केटमध्ये  त्या Product ची डिमांड आहे का ?  त्याची गरज आहे का ? त्या प्रॉडक्ट ची पूर्वी काही काळा पहिले गरज  होती  पण  आता आहे  का ?

तुम्ही जो व्यवसाय सुरू करणार आहात जो Product जी Service विकणार आहात त्याची डिमांड आहे का market मध्ये त्याची गरज आहे का

त्याची Urgency सी किती आहे खूप Urgent आहे की कमी Urgent आहे ते पण तपासून बघा.

तुमची Business Idea तुम्हाला Test करून बघता येईल का ?

तुम्ही जो Business सुरु करणार आहात, तुमच्या डोक्यात जी Business Idea आहे ती तुम्हाला  टेस्ट करून बघता येईल का ? 

उदारणार्थ – तुम्ही T-shirt Manufacturing चा Business सुरु करणार आहेत पण Directly T-shirt Manufacturing सुरु करण्यापेक्षा तुम्ही आधी १०० T-shirt Wholesale ने विकत घ्या आणि ते विकून बघा ना.

T-shirt Manufacture कारण काही अवघड  नाही एक ठराविक Procedure असते ती तुम्ही केली कि  t-shirt तयार होतो. पण तुम्हाला तो विकता आला पाहिजे कारण जर विकत आला तरच तो Manufacture करून उपयोग आहे .

अशा प्रकारे तुम्ही जो Product बनवणार आहेत तो जर मार्केट मध्ये Available असेल तर तो Wholesale ने विकत घेऊन विकून बघा. तुम्ही जर छोटे व्यावसायिक असाल तर Manufacturing क्षेत्रात Directly उतारण्यापेक्षा आधी  Service  सेक्टर मध्ये  उतरा  तिथे Investment खूप  कमी लागते आणि  तुम्हला एक चांगले अनुभव पण मिळेल.

तुम्हाला जर तुमचा Product  Market  मध्ये टेस्ट करता येत असेल तर तसे करून बघा तुम्हाला कसा Response  मिळतो त्यावरून त्याच्या मार्केट चा अंदाज येईल. तुमचा व्यवसाय चालेले का नाही हे देखील तुम्हाला समजेल.

Conclusion

Business आयडिया निवडताना घाई करू नका . तुमच्या डोक्यात एखादी चांगली Business  आयडिया आली तरी त्याबद्दल नीट Research करा. मी सांगितलेल्या या काही Parameters वर तुमची Idea तपासून पहा. 

आणि सर्वात महत्वाचं म्हणजे छोट्यापासून सुरुवात करा लगेच खूप मोठी Investment करू नका. छोट्याने सुरुवात करा आणि हळू हळू Business मोठा करा.

Post कशी वाटली ते सा Comment मध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही Comment मध्ये नक्की विचारू शकता. 

जय हिंद जय महाराष्ट्र

हे देखील वाचा

Swapnil Shinde

Big Mastery चे Founder आणि CEO. स्वप्निल शिंदे हे Ecommerce, Business Education, Content Creation, Hosting अशा अनेक व्यवसायांमध्ये कार्यरत आहे.

Leave a Reply