कमी गुंतवणुकीत कपड्यांचा व्यवसाय कसा सुरु करावा ? | Clothing Business In Marathi | Garment Business In Marathi

जर तुम्हाला स्वतःचा कपड्याचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी.

कमीत कमी Investment मध्ये रेडिमेड कपड्याचा व्यवसाय कसा सूरू करायचा हेच आज आपण या पोस्ट  बघणार आहोत.

कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी आपल्याला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तपासून बघायची आहे ती म्हणजे तुमच्याकडे असलेलं भांडवल.

दहा हजार , वीस हजार, पन्नास हजार, एक लाख, दहा लाख. 

किती आहे नेमक. ते आधी चेक करा. तुमच्याकडे भांडवल किती आहे किंवा किती भांडवल तुम्ही उभा करु शकता हे आधी तुम्हाला check करायच आहे आणि मग पुढची योजना आखायची आहे.

तुमच्या कडे भांडवल आहे 10 हजार आणि तुम्ही योजना आखली 50 लाखाची. काही उपयोग आहे त्याचा.  

आणि या व्हिडिओ साठी आपण असं गृहीत धरणार आहोत की तुमच्याकडे भांडवल हे कमी आहे. ३० ते ३५००० हजार च्या आत तुम्ही तुमचा कपड्याचा व्यवसाय कसा सुरु करू शकता हेच आपण बघणार आहोत.

आता तुमच भांडवल कमी आहे म्हणजे तुम्ही कपड्याची factory लावू शकणार नाही. तुम्ही कपड्यांचं physical दुकान देखील सूरू करु शकणार नाही कारणं पन्नास हजारात कपड्यांचं दुकान सूरू करण म्हणजे मूर्ख पणाच लक्षण आहे.

कारणं कपड्यांचं physical दुकान सूरू करायच म्हटल तर तुम्हाला कमीत कमी 2-3 लाखांचा माल भरावा लागलं त्याचबरोबर गाळ्याच भाड, लाईट बिल असे खर्च देखील येतात. 

आणि म्हणूनच तुम्हाला तुमचा व्यवसाय हा घरगुती पद्धतीनें करायचा आहे. अनेक मोठमोठ्या दुकानदारांनी त्यांचा कपड्याचा व्यवसाय हा त्यांच्या घरातूनच सुरु केलेला आहे. 

कपड्यांचे प्रकार ( Types of Clothes for Clothing Business In Marathi )

आता कपड्यांचा व्यवसाय म्हटलं की अनेक प्रकारचे कपडे येतात जसे की पुरुषांचे कपडे, स्रियांचे कपडे, लहान मुलांचे कपडे.

आता यामध्ये देखील अजून Sub Category येतात. जसे की स्त्रियांच्या कपड्यांमध्ये साड्या येतात, Dress येतात, टॉप येतात, घरात वापरायचे कपडे येतात तसेच पुरुषांच्या कपड्यात टीशर्ट येतात, फॉर्मल शर्ट येतात, जीन्स येतात, फॉर्मल  पँट येतात अनेक प्रकारचे कपडे येतात.

आता तुम्हाला इथे सरसकट सगळेच कपडे विकायचे नाहीये तर आपल्याला फक्त काही ठराविक प्रकारच्या कस्टमर ला टार्गेट करायच आहे. जसे की समजा तुम्हाला फक्तं पुरुषांचे shirt विकायचे आहे, किंवा फक्त महिलांच्या साड्या विकायचा आहे.  

या पोस्टमध्ये आपण शर्ट चे उदाहरण बघणार आहोत. समजा तुम्हाला पुरुषांचे शर्ट विकायचे आहे

मार्केट रिसर्च कसा करावा ? ( Market Research For Clothing Business In Marathi )

सर्वात आधी तुम्हाला थोडासा मार्केट research करायचा आहे. त्यात तुम्हाला तुमच्या भागात कोणकोणते शर्ट चालतात ते शोधायचं आहे, मग त्यासाठी तूम्ही तुमच्या भागातील लोकांचं निरीक्षण करू शकता. एखाद्या tshirt च्या किंवा कपड्याच्या दुकानाला भेट द्यायची आहे आणि shirt घ्यायचे म्हटल्यावर तो दुकानदार कोणकोणते shirt तुम्हाला दाखवतो ते तुम्हाला बघायचं आहे. यावरून latest fashion चा अंदाज येईल. म्हणजे सध्या कोणता trend चालू आहे, सध्याची fashion , style काय आहे यानुसार तुम्ही तुमचा माल खरेदी करु शकता.

होलसेल ने शर्ट कुठून विकत घ्यायचे ? ( How to purchase shirts at wholesale price )

त्यानंतर तुम्हाला wholesale ने शर्ट खरेदी करायचे आहे. त्यासाठी तुम्ही सुरत, बँगलोर, मुंबई, दिल्ली, लुधियाना, तिरुपूर या ठिकाणाहून wholesale ने कपडे विकत घेऊ शकता. 

तुम्ही ज्या ठिकाणी राहता तेथून जे ठिकाण जवळ आहे किंवा तुम्हाला योग्य वाटत असेल  तिथून तुम्ही wholesale ने माल भरू शकता. जर तुम्ही महाराष्ट्रात राहात असाल तर मुंबई आणि सुरत आपल्याला इथून जवळ आहे. 

Maximum लोक हे सुरत वरून कपडे विकत घेणे पसंद करतात आणि तुम्हाला अतिशय स्वस्तात इथून wholesale ने कपडे मिळतील. सुरत ला रेल्वे स्टेशन वर उतरल्यावर फक्त १० रुपये रिक्षावाल्याला देऊन तुम्ही सहारा दरवाजा इथे जाऊ शकता इथून पुढे सरळ रोड आहे ज्याला रिंग रोड असाही म्हणत. याच रोडवर आणि याच भागात तुम्हाला जवळपास सगळे Textile मार्केट मिळतील. इथून पुढं पाउलापाऊलवार तुम्हाला  textile मार्केट दिसतील. 

इथून कपडे खरेदी करायचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे इथे अनेक factory आउटलेट आहे म्हणजे जे लोक cloth manufacture करतात त्यांचीच दुकान आहे म्हणजे wholesale दुकानदार ज्यांच्याकडून कपडे खरेदी करतात तुम्ही directly त्यांच्याकडून फॅक्टरी rate ने  कपडे खरेदी करू शकता म्हणजे तुम्हाला wholesale पेक्षाही कमी किमतीत इथे कपडे मिळतील. महिलांचे कपडे, पुरुषांचे कपडे, लहान मुलांचे कपडे अशे सर्व प्रकारचे कपडे इथे तुम्हाला wholesale ने मिळतील.

भारतातील काही प्रसिद्ध होलसेल मार्केट ( Popular Garment Wholesale Markets In India )

सुरत –  सर्व प्रकारच्या कपड्यांसाठी प्रसिद्ध. सुरत मध्ये तुम्हाला जवळपास सर्व प्रकारचे कपडे फॅक्टरी Rate तसेच wholesale rate मध्ये मिळतील 

Famous Cloth Wholesale Markets In Surat – Surat textile Market, Jash market, resan wala market, jj ac Market, Arihant Market, Abhinandan textile market, tt Market, Radhe market, Swadeshi textile Market, Shri Mahavir textile market, Adarsh 2 Market, mg Market, millennium textile market, raghukul textile market, silk heritage, universal textile market

दिल्ली – स्वस्त आणि टिकाऊ कपडे तुम्हाला दिल्ली मध्ये मिळतील. दिल्ली मध्ये तुम्हाला अनेक cloth manufacturer आणि wholesaler मिळतील 

Cloth Wholesale Markets In Delhi – Karol bagh, tank road, Guffer market, Gandhi Nagar, Central Market, Nehru place, meherchand market, mohan singh place, Shanti mohalla, Sarojini Nagar Market, Chandni chowk, Shankar Market

बेंगलोर – सगळ्यात Best Quality चे कपडे तुम्हाला बँगलोर मध्ये मिळतील. Bangalore मध्ये ब्रँडेड कपडे manufactur केले जातात. जर तुम्हाला Branded कपडे विकायचे असतील तर तुम्ही Bangalore च्या मार्केट ला एकदा भेट देऊ शकता. 

Famous Cloth Wholesale Markets In Bangalore – Chickpet, hosur road, Jaynagar, jp nagar

मुंबई – मुंबई मध्ये डिझायनर कपडे मिळतात. Funky आणि Stylish कपडे तुम्हाला मुंबई मध्ये मिळतील.  इथे कपड्यांची Cost थोडीशी जास्त असते परंतु मग Quality देखील अतीशय चांगली असते. 

Famous Cloth Wholesale Markets In Mumbai – Colaba Causeway or Colaba Market, Ulhasnagar Market, Old khar 

चेन्नई – इथे तुम्हाला ब्रँडेड कपडे wholesale दरात मिळतील.

Famous Cloth Wholesale Markets In Chennai – T Nagar, Godown Street

लुधियाना – इथे शर्ट तसेच t-shirt manufacturing केली जाते. हे देखील अतिशय चांगले Wholesale Market आहे. हे ठिकाण Pullover साठी प्रसिद्ध आहे जे थंडीच्या दिवसात वापरले जाते. 

Famous Cloth Wholesale Markets In Ludhiana – Gandhi Nagar, Chaura bazar, Miss & Mam, Mgr Apparels, Rosy Fashions, H S Amarjeet Hosiery, Woollen Market

तिरुपूर – T-shirt साठी हे मार्केट अतीशय प्रसिद्ध आहे. इथे मोठ्या प्रमाणावर T-shirt manufacturing केली जाते आणि फक्तं भारतातच नाही तर इतर देशात देखील इथून टीशर्ट export केले जातात. इथे तुम्हाला ब्रँडेड टीशर्ट मिळतील.

Famous Cloth Wholesale Markets In Tirupur – Khaderpet, NSV Colony, Tirupur Clothing, T-square Clothing, Grasp Apparals, Twin Birds Leggings Brand Store, First Step Baby Wear Private Ltd, Dk Wholesale Garments

होलसेल ने शर्ट घेण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल ? ( Investment Needed For Clothing Business In Marathi)

shirt च बोलायचं झालं तर १५० रुपयापासून मग पुढे २००, २५०, ३०० , ते  ५००, ६०० पर्यंत च्या rate मध्ये तुम्हाला शर्ट इथे मिळतील. तुम्ही सुरुवातीला २००, ३०० पर्यंतच्या rate चे  शर्ट घ्या, फार high rate चे शर्ट सुरुवातीलाच घेऊ नका 

for example तुम्ही २५० रुपये  rate चे १०० shirt घेतले तर २५००० रुपये होतात.

तुम्ही online फोन वरून यांच्याशी संपर्क करू शकता किंवा स्वतः सुरत ला जाऊन खरेदी करू शकता परंतु तुम्ही जर नवीन असाल तर मी तुम्हाला recommend करेल कि तुम्ही एकदा स्वतः सुरत ला जाऊन या आणि तेथील वेगवेगळ्या टेक्सटाईल मार्केट ला भेट द्या. तिथे तुमच्या वेगवेगळ्या लोकांशी ओळखी होतील आणि तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. 

आणि इथे तुम्हाला नुसते wholesale ने कपडेच मिळणार नाही तर हे लोक तुम्हाला मार्गदर्शन देखील करतील. कोणता माल ठेवायचा, तो किती किमतीला विकायचा धंदा कसा वाढवायचा. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला उधारीवर देखील माल मिळेल. हे लोक तुम्हाला ९० टक्क्यांपर्यंत उधारीवर माल देतात. परंतु लगेच पहिल्याच वेळेस उधारीवर माल मिळणार नाही. त्त्यासाठी तुम्हाला या suppliers ला दाखवून द्यावं लागेल कि तुम्हाला खरंच कपड्याचा व्यवसाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही प्रामाणिक आहात. तुमच्यात खरंच व्यवसाय करण्याची धमक आहे. सप्लायर चा एकदा का तुमच्यावर विश्वास बसला कि मग तुम्हाला नक्कीच उधारीवर माल मिळेल. 

शर्ट ची विक्री किंमत किती असावी ? ( Selling Price of Shirts for Clothing Business In Marathi )

wholesale ने माल आणला पण आता हे कपडे विकायचे कितीला, margin किती ठेवायचं.

इथे तुम्ही ५० टक्के  ते १०० टक्के प्रॉफिट margin ठेऊ शकता. आता इथं कोणताही hard and fast rule नई अनेक लोक २०० चा शर्ट  ६०० – ७०० ला देखील विकतात. तुम्ही देखील तसे करायचे आहे. तुम्हाला थोडं तुमचं डोकं वापरायचं आहे. शर्ट ची quality कशी आहे यावरून तुम्हाला तुमचं profit margin ठरवायचं आहे. wholesale किमतीच्या तुलनेत शर्ट ची quality फारच चांगली असेल तर तुम्ही जास्त मार्गिन ठेऊ शकता. 

सुरुवातीला कमी profit margin ठेवा आणि एकदा का तुमच्याकडे ग्राहक यायला लागले कि हळू हळू margin वाढवू शकता.

२५० रुपयाचा शर्ट तुम्ही ५०० ते सहाशे रुपयांपर्यंत सहज विकू शकता. 

रेडिमेड कपड्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक लायसेंन्स ( License Needed For Clothing Business In India )

जर तुम्ही घरगुती पद्धतीने कपड्याचा व्यवसाय सुरु करत असाल तर सुरुवातीला तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या License ची आवश्यकता नाही परंतु जर तुमचा Turnover अधिक असेल किंवा भविष्यात मोठ्या प्रमाणावर व्यवसाय वाढवायचा असेल तर काही License तुमच्याकडे असावीत. 

  1. Shop Act License
  2. GST Registration
  3. Udyog Aadhar Registration

कपड्याच्या व्यवसायाची मार्केटिंग कशी करायची ? ( Marketing of Clothing Business In Marathi )

त्यानंतर येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे हे शर्ट विकायचे कसे, Marketing कशी करायची. कारण व्यवसाय चालू केला आणि कस्टमर येण्याची वाट बघत बसलात तर तुमचा व्यवसाय लवकरच बंद होईल. 

तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या ओळखीच्या अशा ३०० ते ४०० लोकांची लिस्ट बनवायची आहे. हि लिस्ट जितकी मोठी होईल तितके फायद्याचे आहे. या सगळ्या लोकांची नावे, त्यांचे मोबाईल नंबर, whatsapp नंबर अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या लिस्ट मध्ये Add करायच्या आहे. 

त्यानंतर तुम्हाला तूमचे visiting Card तयार करायचे आहे.हे तुम्ही स्वतः देखील करु शकता. Canva नावाची website आहे ज्यावर तुम्ही तुमचं visiting Card बनवू शकता. त्यानंतर फक्तं ते कार्ड तुम्हाला प्रिंट करुन घ्यायचं आहे.

त्यानंतर या प्रत्येकाला phone करून किंवा वैयक्तिकरित्या भेटून तुम्ही शर्ट विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे हे त्यांना सांगायचं आहे.

परंतु आता हे लोक एव्हडे सगळे दुकान सोडून तुमच्याकडे का येतील ? फक्त मित्र आहे किंवा ओळखीचे आहे म्हणून – अजिबात नाही, मैत्रीखातर ते एकदा येतील परंतु तुमचे loyal कस्टमर बनणार नाही. 

या लोकांनी तुमच्याकडे का यावं ? यासाठी काहीतरी चांगलं कारण असाल पाहिजे . एकतर तुमच्या कपड्याची quality खूप चांगली आहे, किंवा तुम्ही एखादी ऑफर ठेऊ शकता जसे कि दोन शर्ट घेतले कि एक्सट्रा १० % डिस्काउंट किंवा मार्केट पेक्षा स्वस्त दरात शर्ट मिळतील किवा एकावर एक शर्ट free.

अशा पद्धतीने कस्टमर ला attract करण्यासाठी काहीतरी special offer तुम्ही देऊ शकता. काहीतरी मार्केट पेक्षा extra तुम्हाला देणं गरजेचं आहे.

त्यानंतर तुम्हला  या सगळ्या लोकांना  whatsapp वरून shirt चे फोटो पाठवायचे आहे आणि एकदा शर्ट बघून जा असे सांगायचे आहे.

सुरुवातीला विक्री किमतीवर अडून बसू नका जर एखाद्याला शर्ट आवडला आणि किमतीमुळे अडून बसले असेल तर ५० – १०० रुपये कमी करून शर्ट ची विक्री करू शकता. तुमची business ची cycle सुरु होणं गरजेचं आहे सुरुवातीला लवकरात लवकर माल कसा विकत येईल हे तुम्ही बघा. 

मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही social media चा वापर करू शकता तुम्ही whatsapp चा group बनवू शकता आणि त्यात सगळ्या कस्टमर ला add करू शकता त्याचबरोबर facebook वर तुमच्या शहराचे काही local group असतील त्याला join होऊ शकता आणि त्या ग्रुप वर देखील मार्केटिंग करू शकता. हवं तर तुम्ही तुमचा स्वतःचा facebook ग्रुप देखील बनवू शकता. 

त्यानंतर तुम्ही facebook ads चा देखील वापर करू शकता.  थोडेफार पैसे खर्च करण्याची तुमची तयारी असेल तर facebook ads च्या मध्येमातून तुम्ही तुमच्या शहरातील लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करू शकता.

फेसबुक ads हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे कारण आजकाल प्रत्येकजण फेसबुक चा वापर करतो आणि तुमची जाहिरात direclty या लोकांच्या mobile दिसेल त्यामुळे तुम्हाला भरपूर कस्टमर मिळू शकता. 

त्याचबरोबर तुम्ही amazon, flipkart अशा website वर Seller म्हणून रेजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमचे शर्ट online देखील विकू शकता ते कस करायचं यावर मी लवकरच विडिओ बनवणार आहे आणि तो विडिओ तुम्हाला या youtube चॅनेल वर मिळून जाईल. 

कपड्याच्या व्यवसायातून तुम्ही किती पैसे कमाऊ शकता ? ( Your Profit From Clothing Business In Marathi )

समजा तुम्ही हे २५० रुपयाचा शर्ट ५०० रुपयाला विकला तर प्रत्येक शर्ट मागे २५० रुपये राहातात आणि जर असे १०० शर्ट तुम्ही विकले तर २५००० रुपये होतात त्यातून मार्केटिंग आणि इतर खर्च ५००० रुपये जरी धरला तर २०००० रुपये तुमचा नफा राहतो.

आता हे २०,००० रुपये तुम्हाला कमी वाटत असतील परंतु तुमच्या गुंतवणुकीच्या तुलनेत २०,००० रुपये खूप आहे  आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यानंतर तुम्ही खऱ्या अर्थाने एक व्यावसायिक बनाल आणि कपड्याचा व्यवसाय कसा करायचा हे देखील तुमच्या लक्षात येईल.  

तुम्ही जितका जास्त माल विकू शकता तितके जास्त पैसे तुम्ही कमावू शकता. कपड्याच्या व्यवसायातून तुम्ही फक्त लाखो नाही तर करोडो रुपये कमाऊ शकता.

तुम्हाला जर असा घरगुती माल विकत आला तर पुढे जाऊन तुम्ही स्वतःच दुकान देखील सुरु करू शकता आणि व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढवू शकता. 

अशाच नवनवीन Post मिळवण्यासाठी खाली तुमचा ‘Email’ Submit करा.

Loading
< < मराठी Home Page वर जाण्यासाठी
< < मुख्य Home Page वर जा जाण्यासाठी ( Big Mastery.com)

हे देखील वाचा

Swapnil Shinde

Big Mastery चे Founder आणि CEO. स्वप्निल शिंदे हे Ecommerce, Business Education, Content Creation, Hosting अशा अनेक व्यवसायांमध्ये कार्यरत आहे.

Leave a Reply

This Post Has One Comment

  1. Pooja ingale

    खूपच छान आणि अगदी सोप्या भाषेत माहिती दिलीत काही शंका वाटल्यास call kru शकते का sir