बिझनेस प्लान कसा बनवायचा ? ( ९ स्टेप ) | How To Write Business Plan In Marathi ( 9 Steps )

बिझनेस सुरू करण्यासाठी आपण Business Ideas शोधत असतो आणि आपल्याला एक चांगली बिझनेस आयडिया सापडते देखील परंतु नुसत बिझनेस आयडिया ने काम भागत नाही.

जर तुम्हाला तुमच्या बिझनेस आयडिया ला Reality मध्ये उतरवायचं असेल तर तुम्हाला एक बिजनेस प्लान बनवावा लागतो.

नुसतच हवेत गप्पा मारण्यापेक्षा तुमच्याकडे जर एक Business Plan असेल तर तुमची बिझनेस सुरू करण्याची शक्यताही वाढते आणि त्यात यशस्वी होण्याची शक्यताही वाढते.

म्हणूनच तुम्ही सर्वात आधी तुमचा बिजनेस प्लान बनवला पाहिजे.

Business Plan In marathi

What is Business Plan In Marathi ( बिजनेस प्लान म्हणजे काय ? )

बिजनेस प्लान ही एका बिझनेस ची लिखित स्वरूपातील Strategy असते किंवा planning असते ज्यामध्ये बिजनेस चे सर्व डिटेल्स दिलेले असतात.

बिजनेस प्लान मध्ये कंपनीचं काय ध्येय आहे, ते ध्येय कसं पूर्ण करणार आहे, ते ध्येय पूर्ण करताना कोणकोणत्या अडचणी येणार आहे आणि त्या अडचणीतून कसा मार्ग काढायचा अशी सर्व माहिती त्या बिझनेस प्लॅन मध्ये असते.

बिजनेस प्लान मध्ये कंपनीचा संपुर्ण Road-Map लिहिलेला असतो. भविष्यामध्ये जशी परिस्थिती आणि गरज बदलते त्यानुसार बिजनेस प्लान देखील हा बदलत असतो.

बिजनेस प्लान तुम्ही तुम्हाला हवा तसा बनवू शकता परंतु बिजनेस प्लान मध्ये काही ठराविक Elements हे असलेच पाहिजे. ते Elements काय आहे हे तुम्हाला पुढे या पोस्टमध्ये समजेलच.

Benefits of business plan In Marathi ( बिजनेस प्लान बनवण्याचे फायदे )

 • बिजनेस मध्ये गुंतवणूक करण्याआधी इन्वेस्टर तुमचा बिजनेस प्लान बघतात
 • बँकेतून लोन मिळवण्यासाठी देखील बिजनेस प्लान चा उपयोग होतो
 • चांगले Employee मिळवण्यासाठी देखील बिजनेस प्लान चा उपयोग होतो
 • बिजनेस करताना अनेक अडचणी येतात आणि बिजनेस प्लान मुळे तुम्हाला आधीच त्याची तयारी करता येते
 • बिजनेस प्लान मुळे तुम्हाला स्वतःला Clearity येते की बिझनेस च ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करण्याची गरज आहे

How To Make a Business Plan In Marathi ? ( बिझनेस प्लान कसा बनवायचा ? )

बिजनेस प्लान तुम्ही तुम्हाला हवा तसा बनवू शकता परंतु प्रत्येक बिझनेस प्लॅन मध्ये काही ठराविक गोष्टी या असल्याच पाहिजे. त्या गोष्टी काय आहे हे तुम्हाला पुढे या पोस्टमध्ये समजेलच परंतु त्याआधी आपण जाणून घेऊया बिजनेस प्लान चे कोणकोणते प्रकार आहे.

Types Of Business Plans In Marathi ( बिजनेस प्लान चे प्रकार )

बिजनेस प्लान चे मुख्यतः दोन प्रकार आहे पहिला प्रकार आहे Traditional Business Plan ज्याला One Page Business Plan अस देखील म्हटले जात आणि दुसरा प्रकार आहे Simple Business Plan.

Traditional Business Plan

हा बिझनेस प्लान एकदम Detail मध्ये लिहिलेला असतो. हा बिझनेस प्लॅन कधीकधी 25 ते 30 पानांचा देखील असू शकतो.

हा बिजनेस प्लान तुम्हाला भविष्यात अनेक वर्षे मागदर्शन करत राहतो कारण यामध्ये सर्व माहिती एकदम Detail मध्ये लिहिलेली असते. बँका आणि Investor व्यवसायला Loan देण्याआधी किंवा Business मध्ये Investment करण्याआधी या बिजनेस प्लान ची मागणी करतात

1. Executive Summary

हे तुमच्या बिझनेस प्लान च सर्वात महत्त्वाचं Section असतं. हे Section तुम्हाला बिजनेस प्लान च्या सर्वात शेवटी लिहायच असत कारण या ठिकाणी तुम्हाला तुमच्या संपूर्ण बिझनेस प्लॅन ची एक Summary लिहायची असते. ज्या प्रमाणे आपण आपल्या प्रॉडक्ट विकताना जाहिरात करतो त्याच पद्धतीने हि Executive Summary तुम्हाला अशा पद्धतीने घ्यायचे आहे समरी वाचून वाचणाऱ्याला तुमच्या बिजनेस मध्ये इंटरेस्ट निर्माण झाला पाहिजे आणि त्याला हा संपूर्ण प्लान वाचण्याची इच्छा झाली पाहिजे.

तुम्ही जो बिझनेस करत आहात त्यामध्ये नेमकी काय संधी आहे हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. नेमका कोणता असा प्रॉब्लेम आहे आणि तो तुम्ही कशा पदधतीने Solve करणार आहात.

याची Short मध्ये तुम्हाला माहिती द्यायची आहे.

त्याचबरोबर तुम्हाला जर बँकेकडून Loan हवं असेल तर ते किती हवं आहे ते इथ लिहायच आहे.

2. Company Description

ह्या सेक्शन मध्ये तुम्हाला तुमच्या कंपनी ची माहिती द्यायाची आहे. खालील Points नुसार तुम्ही माहिती लिहू शकता. 

 • तुमच्या कंपनीचे नाव काय आहे
 • तुमच्या कंपनी चा किंवा व्यवसायाचा चा प्रकार कोणता आहे.कंपनी चे प्रकार जाणून घ्यायचे असतील तर Types of Business In Marathi हि पोस्ट वाचा. 
 • तुमचं Business Model काय आहे आणि कशा पद्धतीने तुमचा Business काम करतो
 • तुमच्या कंपनीचा इतिहास काय आहे जसे कि कंपनी सुरु कधी झाली, याआधी कंपनी ने काय केले आहे. 
 • कंपनी च ध्येय किंवा Mission Statement, एका Sentence मध्ये सांगायचे आहे
 • व्यवसायाचे ठिकाण आहे, व्यवसाय कोणत्या भागात काम करतो.

3. Products and Services

या भागात तुम्ही नेमके कोणते प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस देणार आहात त्याची माहिती द्यायची आहे. ही माहिती देताना तुम्हाला तुमच्या कस्टमर च्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे. 

तुमचा Product. नेमका कोणता प्रॉब्लेम Solve करतो, कशा पद्धतीने Solve करतो  हे इथं तुम्हाला सांगायचं आहे.

त्याच बरोबर तुमच्या प्रॉडक्ट ची Price काय आहे ते देखील तुम्हाला इथ सांगायचं आहे. तुमचं Pricing Model  काय आहे ते देखील सांगायचं आहे. तुमचं प्रॉफिट Margin किती आहे ते देखील इथं तुम्हाला सांगायचं आहे. 

त्याच बरोबर तो प्रॉडक्ट Manufacture कसा केला जातो म्हणजे तुम्ही स्वतः मॅनिफॅक्चर करता का इतर कोणाकडून Manufacturer करून घेता.

4. Marketing Plan

कोणताही व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जर काही असेल तर ते आहे मार्केटिंग आणि म्हणूनच तुमच्या Business च्या मार्केटिंग ची प्लॅनिंग अत्यंत महत्त्वाची आहे.

मार्केटिंगच्या प्लॅनमध्ये खालील मुद्दे असण अत्यंत गरजेचे आहे.

Market Research – बिझनेस सुरू करण्याआधी तुम्हाला तुमच्या मार्केटचा रिसर्च करणे अत्यंत गरजेचे आहे तुम्ही जो प्रोडक विकत आहात त्या प्रॉडक्ट मार्केट किती मोठा आहे, त्या मार्केट मध्ये किती Competition आहे, त्या मार्केट च भविष्य कस आहे.

याची सर्व आकडेवारी तुम्हाला इथे द्यायची आहे. तुम्हाला ऑनलाईन देखील याची आकडेवारी मिळून जाईल परंतु काही गोष्टींचा रिसर्च हा तुम्हाला स्वतः करावा लागेल.

Target Customer

तुम्हाला तुमचे टार्गेट कस्टमर कोण आहे हे माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे अनेकांना त्यांचे टार्गेट कस्टमर कोण आहे हेच माहीत नसतं त्यांना जर असे विचारले की तुमची टार्गेट कस्टमर कोण आहे तर ते सांगतात की सगळेजण.

सगळेजण हे जवळपास कधीच तुमचे टार्गेट कस्टमर असत नाही. For Example तुम्ही जर महिलांचे कपडे विकत असाल तर तुमचे टार्गेट कस्टमर आहे महिला. 

तुमचे जे कोणी टारगेट कस्टमर आहे त्यांची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे गरजेचे आहे जसे की –

 • Age
 • Gender
 • Location
 • Marital status
 • Income Source
 • Interests
 • Education
 • Buying Habits

Competitive Analysis – बिजनेस करत असताना तुम्हाला तुमच्या Competition ची संपुर्ण माहिती असणे गरजेचे आहे. जसे की –

 • तुमचे स्पर्धक कोण आहेत ?
 • त्यांच्या काय Strength आहे ?
 • त्यांच्या काय Weakness आहे ?
 • त्यांच्या Products च्या काय किमती आहे ?
 • त्यांची Marketing Strategy काय आहे ?
 • तुमच्यात आणि त्यांच्यात काय वेगळेपण आहे ?
 • तुमच्या आणि त्यांच्या Product मध्ये काय सारखं आणि काय वेगळं आहे.
 • त्यांची टीम कशी आहे ?
 • त्यांच्या Customer चे Reviews कसे आहे ?

Competitive Advantage – जवळपास बिजनेस मध्ये Competition हि असतेच आणि जर तुम्हाला तुमच्या कम्पीटीशन ला मात द्यायची असेल तर तुमच्याकडे काही Competitive Advantage असलं पाहिजे. मग तुमच्याकडे नेमक कोणत Competitive Advantage आहे हे तुम्हाला इथं सांगायचं आहे. तुमच्या कस्टमरने तुमच्या Competition ऐवजी तुमच्याकडं का यावं हे तुम्हाला इथं Explain करायचा आहे.

Positioning – या बिजनेस मध्ये तुम्ही नेमकं कोणत्या क्षेत्रात काम करणार आहात, तुमची ओळख काय असेल, तुमची Positioning काय असेल सरसकट सगळेच काम करून चालत नाही तुम्हाला एखाद्या ठराविक क्षेत्रांमध्ये एक्सपर्ट असणे गरजेचे आहे.

जसे की तुम्ही जर हेल्थ चा प्रॉब्लेम Solve करणार असाल तर तुमची Positioning Health Brand अशी होईल किंवा तुमचा प्रॉडक्ट्स हा फक्तं महिलांसाठी Special असेल तर तुमची ओळखं तशी होते.

तुमची Expertise कशात आहे किंवा तुम्ही नेमकं कोणत्या Category चे expert म्हणुन लोकांनीं तुम्हाला ओळखावं हे तुम्हाला इथ सांगायच आहे.

Method of Marketing – तुम्ही तुमच्या प्रॉडक्टची किंवा सर्विसेस ची मार्केटिंग कशी करणार आहात त्याची माहिती तुम्हाला इथे लिहायची आहे जसे की Digital Marketing, Social Media Marketing, Facebook Ads, Google Ads, YouTube Marketing, Mobile Marketing, Website, Trade Shows, Tv, Word Of Mouth, Events, Logo, Branding

Marketing Budget – बिजनेस मध्ये यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जर काही असेल तर ते आहे मार्केटिंग अनेक लोक मार्केटिंग कडे दुर्लक्ष करतात.

बिझनेस करत असताना मार्केटिंग साठी वेगळा बजेट राखून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे आणि म्हणूनच तिचं तुम्हाला तुमचं मार्केटिंग च बजेट काय आहे ते लिहायचं आहे.

5. Operational Plan

Staffing – तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कामगारांची आवश्यकता आहे किती कामगारांची आवश्यकता आहे त्यांना तुम्ही काय सल्ला देणार आहात त्यांना कोणत्या प्रकारची ट्रेनिंग येणार आहात.

Production – तुम्ही जर मॅन्युफॅक्चरिंग करत असाल तर तुमच्या प्रॉडक्शनची प्रोसेस काय आहे ती इथं तुम्हाला सांगायचे आहे त्यासाठी तुम्ही कोणकोणते मशनरी ची तुम्हाला गरज आहे त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे.

Location – तुम्हाला जर तुमच्या बिझनेस साठी फिजिकल लोकेशन ची आवश्यकता असेल त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे, त्याच भाड किती असणार आहे, Maintenance Cost किती असणार आहे.

Legal Environment – तुमच्या बिजनेस साठी जर तुम्हाला काही लायसन्स, ट्रेडमार्क, copyright, insurance ची आवश्यकता असेल तर त्याची माहिती तुम्हाला द्यायचे आहे.

Inventory – या बिजनेस साठी जर तुम्हाला जर काही Raw Material किंवा Inventory ची आवश्यकता भासणार असेल तर त्याची माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे.

Suppliers and Vendors – तुमच्या बिझनेस साठी जर तुम्ही काही सप्लायर्स आणि Vendors चा वापर करणार असाल तर किंवा करत असाल तर त्यांचे Details इथ द्यायचे आहे.

Payment Terms – तुम्ही कस्टमर कडून पेमेंट कशा पद्धतीने घेता याची माहिती तुम्हाला इथ द्यायची आहे. तुम्ही जर उधारीवर Products देत असाल तर त्याची माहिती तुम्हाला इथ द्यायची आहे, मग ती उधारी वसूल कशी करता ते देखील सांगायच आहे.

6. Management Team

इथ तुम्हाला तुमच्या टीम ची माहिती द्यायची आहे. एक मजबूत आणि सॉलिड टीम असल्याशिवाय कोणताही बिझनेस पुढ जाऊ शकत नाही.

तुमच्या टीम मध्ये कोणकोण मेम्बर्स आहे, त्यांची नाव काय आहे, ते कशामध्ये Expert आहे, त्यांच्या Resumes ची Summary तुम्हाला इथ द्यायची आहे.

7. Budgets and Expenses

इथं तुम्हाला तुमच्या बजेटची आणि खर्चाची माहिती द्यायचे आहे जसे की

बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला किती खर्च लागला किंवा लागणार आहे ?

बिझनेस सुरू करताना आपल्याला जेवढं वाटतं असतं त्यापेक्षा जास्त पैशांची गरज पडत असते त्यामुळे हे Extra Funds तुम्ही इथ आधीच हिशोबात धरले पाहिजे.

बिजनेस करताना प्रामुख्याने दोन प्रकारचे खर्च असतात एक म्हणजे Capital Expenses आणि दुसरा म्हणजे Operating Expenses. 

तुम्हाला अगदी सुरुवातीपासून बिझनेस सुरू करण्यासाठी जो खर्च लागतो त्याला Captial Expenses अस म्हणतात जसे की मशिनरी खरेदी केली, गाळा विकत घेतला, Furniture घेतलं

तसेच Business Operate करण्यासाठी जो खर्च येतो त्याला Operating Expenses अस म्हणतात. जसे की day to day transaction, गाळ्याच दर महिन्याचं भाडं, लाईट बिल, कामगारांचा पगार

तसेच जर आधीच तुमच्या बिजनेस मध्ये कोणी इन्वेस्टमेंट केली असेल तर त्याचे डिटेल्स तुम्हाला द्यायचे आहे.

तसेच तुम्ही आधी एखादया बँकेकडून काही Loan घेतलेले असेल तर त्याचे डिटेल्स मला द्यायचे आहे.

त्याच बरोबर जे कोणी बिझनेसचे Owner’s आहे त्यांची किती मालमत्ता आहे किंवा देणे आहे याची देखील माहिती तुम्हाला इथ द्यायची आहे.

तुम्ही जर बँकेमध्ये Loan साठी आपलाय करत असाल तर त्याचे डिटेल द्यायचे आहे आणि त्या पैशाचा वापर कशासाठी करणार आहे कुठे करणार आहे हे इथ सांगायचा आहे.

8. Financial plan

इथे तुम्हाला तुमच्या Financial Planning ची माहिती द्यायची आहे जसे की –

Cash Flow Statement – हा फायनान्शिअल प्लॅनिंग मधील एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. यात तुमचा बिजनेस मध्ये Total किती Cash येत आहे आणि किती Cash बाहेर जात आहे याचे डिटेल्स द्यायचे आहे.

तुमच्याकडे जर केस फ्लो स्टेटमेंट नसेल तर तुम्ही आयुष्यात किती कॅश तुमच्या बिजनेस मध्ये येईल आणि जाईल हे सांगायचं आहे.

Profit and Loss Projection – इथे तुम्हाला तुमच्या बिजनेस मधील Profit आणि Loss बद्दलची माहिती द्यायचे आहे.

भविष्यात तुम्हाला किती प्रॉफिट होईल तो कुठून येईल कसा येईल याची सर्व माहिती याठिकाणी तुम्हाला द्यायची आहे.

Balance Sheet –  तुमच्या व्यवसायाची Assets आणि Liability याबद्दलची माहिती तुम्हाला याठिकाणी द्यायचे आहे. 

Assets जसे की जमीन, मशिनरी, रिअल इस्टेट, फर्निचर 

Liability जसे की bank loan, काही देणं असेल तर त्याची माहिती

तुम्ही किती Revenue Expect करत आहात ?

तुम्ही किती खर्च Expect करत आहात ?

9. Sales Plan

 • तुम्ही मागची आणि आताची Sales किती आहे ?
 • किंवा किती Sale तुम्ही Expect करता ?
 • ती Sale कुठून येइल?
 • कशा पदधतीने येइल ?

याची माहिती इथ तुम्हाला द्यायची आहे.

Simple Or One Page Business Plan In Marathi

या बिजनेस प्लान मध्ये Short मध्ये एका Page मध्ये सर्व माहिती सांगितलेली असते. हा Business प्लॅन देखील लोकांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. खाली तुम्हाला काही पाणी दिले आहे या पॉईंटचा वापर करून तुम्हाला तुमचा वन पेज बिजनेस प्लान लिहायचा आहे. हे Points काय आहे हे मी आधीच वरती सांगितलेल आहे. पाच ते दहा Lines मध्ये, Short मध्ये हे Points तुम्हाला Explain करायचे आहे.

 • Business Opportunity
 • Company Description
 • Team
 • Market Research
 • Target Customer
 • Marketing Plan
 • Competitive Advantage
 • Financial Plan
 • Funding Required

Conclusion

हे दोनीही बिजनेस प्लान तुम्हाला फक्त एक मार्गदर्शन म्हणून दिलेला आहे. हा Business प्लान अगदीं जसाच्या तसा कॉपी करण्याची गरज नाही

वरील Business प्लान मध्ये तुम्ही तुमच्या गरजेनुसार अनेक गोष्टी अजून Add करू शकता किंवा यातील काही गोष्टी कमी देखील करू शकता.

अशाच नवनवीन Post मिळवण्यासाठी खाली तुमचा ‘Email’ Submit करा.

Loading
< < मराठी Home Page वर जाण्यासाठी
< < मुख्य Home Page वर जा जाण्यासाठी ( Big Mastery.com)

हे देखील वाचा

Swapnil Shinde

Big Mastery चे Founder आणि CEO. स्वप्निल शिंदे हे Ecommerce, Business Education, Content Creation, Hosting अशा अनेक व्यवसायांमध्ये कार्यरत आहे.

Leave a Reply

This Post Has 2 Comments

 1. Adhik Rajaram Dighe

  अतिशय छान बिझनेस प्लॅन कसा असावा या विषयी आपण माहिती दिली आहे .तुमचे मनापासून आभार 🙏🙏🙏🙏

 2. Pallavi pawar

  It’s very inspiring information for all new business ideal members thanking for this information!