Agri-Tourism व्यवसाय कसा करावा ? । कृषी पर्यटन व्यवसाय

जर तुम्ही ग्रामीण भागात राहात असाल, शेतकरी असाल आणि तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर आज या हा व्यवसाय नेमका कसा सुरु करायचा, त्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट लागेल, त्याची मार्केटिंग कशी करायची, त्यातून तुम्ही किती Profit कमाऊ शकता, हि सर्व माहिती या Post मध्ये तुम्हाला मिळलं. मी तुम्हाला एक असा व्यवसाय सांगणार आहे जो तुम्ही ग्रामीण भागात अतिशय कमी गुंतवणुकीत सुरु करू शकता आणि महिन्याला लाखो रुपये कमाऊ शकता. 

हा व्यवसाय नेमका कसा सुरु करायचा, त्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट लागेल, त्याची मार्केटिंग कशी करायची, त्यातून तुम्ही किती Profit कमाऊ शकता, हि सर्व माहिती या Post मध्ये तुम्हाला मिळलं.

What Is An Agri-Tourism Business ? ( कृषी पर्यटन म्हणजे काय ? )

कृषी पर्यटन म्हणजे शहरातील पर्यटकांना बोलावून तुमची शेती, गावाकडील जीवन आणि संस्कृती याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना देणे.

जसे कि गावाकडचे लोक कसे राहतात, कोणत्या प्रकारचे पदार्थ खातात, गावाकडे शेती कशी केली जाते, त्या स्थानिक क्षेत्रात कोणकोणती पिके घेतली जातात, त्या क्षेत्रात असलेल्या भाज्यांची आणि फळांची माहिती देणे, बैलगाडी ची सवारी, हुर्डापार्टी, शेणाच्या गौऱ्या बनवणे, चुलीवर जेवण बनवणे अशा प्रकारचे अनेक नवनवीन अनुभव तुम्ही या शहरी लोकांना देऊ शकता आणि त्या बदल्यात त्यांच्या काढून काही पैसे charge करू शकता.

आता अनेकांना वाटेल हेहे..  यात काय विशेष आहे या गोष्टी तर आम्ही रोज करतो अरे आपल्याला या गोष्टी विशेष वाटत नाही पण शहरातील आणि Foreign मधील लोकांसाठी या गोष्टी खूप विशेष आहे.

Agri Tourism व्यवसायात नेमक्या काय संधी आहे ?

तुम्हाला माहित आहे का कि भारतामध्ये Travel आणि Tourism industry हि Service Sector मधील काही सर्वात मोठ्या Industry पैकी एक आहे. २०१८ साली भारतामध्ये Travel आणि Tourism Industry हि २३४ बिलियन डॉलर ची होती. २०१९ मध्ये देशातील टोटल Jobs पैकी ८% Jobs हे या Industry ने देशाला दिले होते.

भारतामध्ये दर वर्षी करोडो लोक फिरायला जातात. इतकंच नाही तर करोडो लोक दर वर्षी बाहेरच्या देशातून भारतामध्ये फिरायला येतात. भारतामध्ये अनेक अशी पर्यटन स्थळे आहे ज्यांना करोडो लोक दर वर्षी भेट देतात.  भारतीय लोक पण भेट देतात आणि Foreigner पण भेट देतात.

आणि लोक कशासाठी फिरतात. त्यांचं स्वतःच शहर सोडून, देश सोडून लोक का जातात फिरायला. तर Enjoy करता यावं, कामातून थोडीशी उसंत मिळावी. सुट्टीचा दिवस आनंदात घालता यावा, एक नवीन अनुभव मिळावा,  एक चांगला Experience मिळवा. भारतामध्ये शहरीकरण अतिशय वेगाने होत आहे. मोठमोठ्या buildings, superfast रस्ते, मोठं मोठे Mall, Film Theaters, दवाखाने, शाळा, Colleges अगदी सर्व सोयी आणि सुविधा शहरामध्ये असतात

परंतु या सर्वामध्ये शहरातील माणसाची निसर्गाची जोडलेली जी नाळ आहे ती तुटत चालली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटलं पण अनेक शहरांमध्ये साधं एक झाड लवकर नजरेस पडत नाही. सगळीकडे असत ते नुसतं काँक्रेट च जंगल. 

मानव हा निसर्गाचा एक घटक आहे. आपलं शरीर हे पंच तत्त्वांपासून बनलेलं आहे. हवा, पाणी, आकाश, जमीन आणि अग्नी.  

शहरातील लोक कितीही मोठ्या आणि सोयीसुविधांनी युक्त शहरामध्ये राहत असेल तर त्यांना नेहमी निसर्गाचं आणि ग्रामीण जीवनाचं आकर्षण असत. निसर्गाच्या सानिध्यात राहायला त्यांना नेहमी आवडत.आणि त्या साठी ते हजारो रुपये मोजायला देखील सहज तयार असतात.

आणि तुम्हाला फक्त भारतातीलच नाही तर परदेशातील Customer देखील मिळतील. कारण दरवर्षी लाखो रुपये खर्च करून हे दुसऱ्या देशातील लोक भारतामध्ये फिरायला येतात. आणि या लोकांकडून तुम्ही डॉलर मध्ये पैसे charge करू शकता. ५० डॉलर, १०० डॉलर Per Person तुम्ही Charge करू शकता. 

आणि दुसऱ्या देशातील लोकांसाठी ५० डॉलर १०० डॉलर काहीच नाहीये. 

तुम्ही जर त्यांना एक जबरदस्त अनुभव देऊ शकलात तर हे लोक आनंदाने तुमच्या कृषी पर्यटन केंद्राला भेट देतील. आणि इतर लोकांना देखील तुमचे कृषी पर्यटन केंद्र Recommend करतील.

Foreign मधले Customer कसे मिळवायचे हे तुम्हाला पुढं Post मध्ये समजेलच.

कृषी पर्यटन व्यवसाय कसा सुरु करायचा ? ( How To Start Agri-Tourism Business In Marathi )

तुम्ही ज्या ठिकाणी राहतात, ज्या गावात राहतात तिथे तुमची किंवा तुमच्या नातेवाईकांची शेती असेल तिथे तुम्ही एक Experience Create करू शकता. ज्याला तुम्ही Agro turism, Village Tourism, कृषी पर्यटन अगदी काहीही म्हणू शकता.

आणि त्याच तुम्ही एक Package बनवू शकता जस कि Per Person 2000 रुपये किंवा 3000 रुपये तुम्ही Charge करू शकता. आणि त्या Package मध्ये मी आधी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे Experiences आणि Activities तुम्ही Add करू शकता.

जसे गावाकडे शेती कशी करायची, स्थानिक भागातील फळांची आणि भाज्यांची माहिती, चुलीवरच जेवण, बैलगाडी ची सवारी, हुर्डापार्टी, शेणाच्या गौऱ्या बनवणे. ग्रामीण भागातील वेगवेगळे खेळ खेळणे   यामध्ये तुम्ही अनेक गोष्टी add करू शकता. गावाकडे तुम्ही ज्या ज्या गोष्टी करतात त्यातील अनेक गोष्टी तुम्ही यात ऍड करू शकता.

तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे packages देखील बनवू शकता जसे पाहिलं Basic Package ज्याची Price आहे 2500 per / person – 

 ज्यामध्ये One Day Tour आणि या पाच Activity , सोबत नाश्ता, दुपारचं जेवण.

दुसरं Package ज्याला आपण म्हणू शकतो कि Overnight Package ज्याची Price 5,००० per/person 

ज्यामध्ये २ दिवस आणि एक रात्र मुक्काम आणि या दहा activity सोबत जेवण, नाश्ता आणि इतर basic गोष्टी. 

त्याचबरोबर तुम्ही Foreigner लोकांसाठी वेगळे Packages बनवू शकता ज्यामध्ये त्यांना अजून extra Activities देऊ शकता. 

तुम्ही काही स्वस्तातली Packages सुद्धा देऊ शकता जेणेकरून जे लोक Price Conscious आहे त्यांना ते परवडतील. 

किंवा अजून काही Extra Experiences आणि Activities Add करून तुम्ही जास्त किमतीचे Packages देखील बनवू शकता. 

 जर कोणी पूर्ण च्या पूर्ण Family येणार असेल तर त्यांच्यासाठी  तुम्ही Family Packages देखील बनवू शकता. अश्या अनेक गोष्टी तुम्ही करू शकता. 

त्याच बरोबर तुम्हाला तुमचे Target कस्टमर नेमके कोण आहे हे ठरवायचं आहे तुम्हाला भारतातील लोकांना देखील Target करायचं आहे का फक्त Foreign मधल्या कस्टमर ला Target करायचं आहे कारण त्यानुसार तुम्ही तुमच्या Packages च्या किमती ठरवू शकता. तुम्ही जर फक्त Foreign च्या Customer ला Target करणार असाल तर तुम्ही तुमच्या Packages च्या किमती जास्त ठेऊ शकता म्हणजे 10,000 – 15,000 / Person चे Packages देखील तुम्ही देऊ शकता. 

आणि हा व्यवसाय करताना असा कोणता नियम नाहीये कि तुम्ही हेच Experience दिले पाहिजे किंवा तुमचा कृषी पर्यटन केंद्र असाच पाहिजे. तुम्हाला जस हवं तसं कृषी पर्यटन केंद्र तुम्ही बनवू शकता. कृषी पर्यटन केंद्र कस बनवायचं हे तुमच्या Creativity वर Depend आहे. 

तुम्ही कोणत्या क्षेत्रात राहता, तेथील वातावरण कसं आहे, तिथं कोणती पीक घेतली जातात, तेथील संस्कृती कशी आहे अश्या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही तुमच्या कृषी पर्यटन केंद्रासाठी एक विशिष्ट Theme निवडू शकता.

कारण वेगवेगळ्या भागातील कृषी पर्यटन केंद्र वेगवेगळे असतात तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर इथली कृषी पर्यटन केंद्रे वेगळी आहेत तुम्ही जर उत्तरप्रदेश, बिहार या राज्यात गेलात तर तेथील कृषी पर्यटन केंद्रे वेगळी आहेत. तुम्ही जर south india मध्ये गेलात तर तेथील कृषी पर्यटन केंद्रे हि वेगळी असतात. कारण प्रत्येक भागातील संस्कृती, खाद्य संस्कृती, भाषा, वातावरण, वेगवेगळ्या भागात घेतली जाणारी पिके  या सर्व गोष्टी वेगवेगळ्या असतात. 

आता महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या भागातील कृषी पर्यटन केंद्रे वेगवेगळी आहे. तुम्ही जर कोंकणात गेलात तर तिकडे Agri-Tourism Center हे वेगळे आहेत तुम्ही वर विदर्भात गेलात तर टीकेचे Agri-Tourism center हे वेगळे आहे.  म्हणूनच तुमच्या भागानुसार तुम्हाला एक Unique Theme तुमच्या Agri-Tourism सेंटर साठी निवडायची आहे. 

For Example – तुमच्या भागात भाताचं पीक घेतलं जात असेल तर तुम्ही भात लावणी कशी करायची हा Experience आणि त्या संदर्भातील Activity तुमच्या package मध्ये add करू शकता. म्हणजे तुम्ही ज्या भागात राहता त्याभागातील वेगवेगळ्या गोष्टीचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता. 

तुम्हाला तुमचं कृषी पर्यटन केंद्र हे जितकं आकर्षक बनावता येईल तितकं आकर्षक बनवायचं आहे. मग त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या फुलांची, फळांची झाडे लावू शकता, वेगवेगळ्या आकर्षक वेली तुम्ही लावू शकता. 

तुम्ही लोकांना जो Experience देणार आहात तो एकदम Top-class असला पाहिजे कारण त्यावरच सर्व काही अवलंबून आहे. 

सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजकल ग्रामीण भागाचे देखील शहरीकरण व्हायला लागलेले आहे. ग्रामीण भागातील लोक देखील शहरी भागातील लोकांसारखे राहायला लागलेले आहे त्यामुळे तुम्हाला तुमचं Agri-Tourism सेंटर अशा पद्धतीने design करायचं आहे कि जेणेकरून ते एकदम Classic वाटलं पाहिजे म्हणजे एकदम रामायणाच्या काळात गेल्यासारखं त्यांना वाटलं पाहिजे. त्यानुसारच तुम्हाला तुमची राहण्याची जागा व इतर सर्व गोष्टी Design करायच्या आहे . 

तुमच्या डोक्यात जर अजून एखादी वेगळी Theme असलं तर तुम्ही त्याचा देखील विचार करू शकता. 

म्हणजे सांगायचा अर्थ एव्हढाच कि लोकांना काहीतरी नवीन अनुभव आला पाहिजे जे लोक शहरात रोजच करतात तसंच सगळं असेल तर मग त्यात काही मजा नाही. लोकांचे Emotions तुम्हाला ट्रिगर करता आले पाहिजे. आणि ते Emotions तेव्हाच Trigger होतील जेव्हा तुमच्या कृषी पर्यटन केंद्रात त्यांना काहीतरी वेगळा अनुभव येईल.

कृषी पर्यटन केंद्र सुरु करायला किती गुंतवणूक करावी लागेल( Investment Needed To Start A Agri-Tourism Center In Marathi)

हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. बरोबर कि नाही कारण बाकी सगळं एका side ला आणि Investment किती लागती ते एका side ला कारण त्यावरच सगळं अवलंबून आहे. 

तर Investment किती लागेल हे तुमच्यावर depend आहे. अशे अनेक कृषी पर्यटन केंद्र आहे जे ५ ते सहा लाखात Invest करून सुरु झालेले आहे,  अशेची अनेक कृषी पर्यटन केंद्र आहे ज्यांनी ५०-५० लाख invest करून त्यांचे कृषी पर्यटन केंद्र सुरु केले आहे आणि अशेही अनेक कृषी पर्यटन केंद्र आहे ज्यांनी एकही रुपया खर्च नं करता कृषी पर्यटन केंद्र सुरु केले आहे.

तुम्ही तुमचं डोकं कसं चालवता यावर सगळं अवलंबून आहे. तुम्ही जर मला विचारलं तर मी देखील तुम्हाला recommend करेल कि तुम्ही हा व्यवसाय एकही रुपया खर्च न करता सुरु करावा. ग्रामीण भागात, तुमच्याकडं आधीपासूनच उपलबध्द असलेल्या गोष्टींचा आणि संसाधनांचा वापर करून तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरु करायचा आहे.

तुमची Creativity वापरूनच आहे त्याच गोष्टी वापरून तुम्हाला तुमचं कृषी पर्यटन केंद्र उभं करायचं आहे.

आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कृषी पर्यटन हा व्यवसाय  तुम्हाला एक जोड-धंदा म्हणून सुरु करायचा आहे. तुम्हाला तुमच्या शेतीतून देखील उत्पन्न येईल आणि या कृषी पर्यटन केंद्रातून देखील उत्त्पन्न येईल अशा पद्धतीने तुम्हाला व्यवसाय करायचा आहे उगाचच सुरुवातीपासून खूप मोठी शेती तुम्हाला अडकवून ठेवायची नाहीये. 

कृषी पर्यटन केंद्राची मार्केटिंग कशी करायची ? ( Marketing Plan For Agritourism Center In Marathi )

या व्यवसायात Successful होण्यासाठी सर्वात महत्वाचं जर काही असेल तर ते आहे marketing. तुम्ही तुमचं कृषी पर्यटन केंद्र एकदम भारी बनवलं पण लोकांना त्याबद्दल माहीतच नाही. 

Marketing करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे. तर तुमचे कोणी शहरामध्ये नातेवाईक असतील, किंवा ओळखीचे लोक असतील अशा सर्व लोकांची तुम्हाला एक List करायची आहे. त्यानंतर या सर्व लोकांशी तुम्हाला contact करायचा आहे आणि त्यांना तुमच्या या व्यवसायाबद्दल सांगायचं आहे आणि त्यांना तुमच्या या कृषी पर्यटन केंद्राला भेट द्यायचं निमंत्रण द्यायचं आहे. या लोकांकडून तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैशे Charge करायचे नाहीये. 

सुरुवातीला या सर्व लोकांना Free मध्ये तुमच्या या कृषी पर्यटन केंद्राचा अनुभव द्यायचा आहे. फक्त काळजी एका गोष्टीची घ्यायची आहे कि तुम्ही ज्या लोकांना हा अनुभव Free मध्ये देणार आहेत ते सर्व लोक हे शहरातील असले पाहिजे आणि  त्यांना ग्रामीण जीवनाचं आकर्षण असले पाहिजे.  या=उगाचच बळजबरीने लोकांना बोलवायचं नाही. 

आता ज्या वेळेस हे लोक तुमच्या कृषी पर्यटन केंद्रात वेगवेगळे अनुभव घेत असतील, वेगवेगळ्या Activities करत असतील, enjoy करत असतील त्यावेळेस तुम्हाला त्या सर्वांचे Videos Shoot करायचे, तुमच्या mobile नेच. 

कमीत कमी १५ ते वीस चांगले videos तुम्हाला बनवायचे आहे. म्हणजे तुमच्या कृषी पर्यटन केंद्र किती आकर्षक आहे, लोक तिथे किती enjoy करत आहे, कशा पद्धतीने नवनवीन अनुभव घेत आहे, Activities करत आहे  या सर्व गोष्टी लोकांना तुमच्या त्या video च्या माध्यमातून दिसल्या पाहिजे.

त्यांनतर तुम्हाला Youtube channel बनवायचं आहे त्याच बरोबर एक Facebook page आणि Instagram account देखील बनवायचं आहे. आणि या तीनही Social Media Platform वर तुम्हाला तुमचे videos upload करायचे आहे.

त्याच बरोबर तुम्हाला मोठं मोठे Facebook Group join करायचे आहे आणि तिथेही तुम्हाला तुमच्या कृषी पर्यटन केंद्राची मार्केटिंग करायची आहे. वेगवेगळे Videos आणि Images आणि Information तुम्हाला तिथे पोस्ट करायची आहे. 

तुम्हाला Social Media वर अतिशय Active व्हायचं आहे आणि सर्व ठिकाणी तुमच्या कृषी पर्यटन केंद्राची Marketing करायची आहे. 

तुमचे videos हे फक्त भारतातील लोकच नाही तर पूर्ण जगभरातील लोक बघू शकतील. आणि त्यांना जर तुमचे videos आवडले तर तुम्हाला Foreign मधले कस्टमर देखील मिळतील. आणि मग जर Foreigners नि तुमच्या कृषी पर्यटन केंद्राला भेट दिली कि मग तुम्हाला त्यांचे देखील Videos बनवायचे आहे कि कशा पद्धतीने Foreigners तुमच्या केंद्रामध्ये वेगवेगळ्या Activities करत आहे वेगवेगळे Experience घेत आहे. Enjoy करत आहे. 

आणि त्या Videos चा देखील तुम्हाला मार्केटिंग साठी वापर करायचा आहे. 

त्याच बरोबर तुम्ही Tripadviser सारख्या ज्या website आहे त्या website वर तुमचा business लिस्ट करू शकता. कारण ज्यावेळेस कोणाला कुठं फिरायला जायचं असत त्यावेळेस लोक अशा प्रकारच्या website जाऊन search करतात आणि ते search करत असताना जर तुमचं कृषी पर्यटन केंद्र त्यांच्या समोर आलं, तुमचे वेगवेगळे videos त्यांनी बघितले तर या मार्गने तुम्ही विचार पण करू शकत नाही एवढे कस्टमर तुम्हाला मिळतील आणि या पद्धतीने तुम्हाला Foreign चे खूप सारे कस्टमर मिळतील.

कारण आजच्या काळात सर्व गोष्टी या Online झालेल्या आहे जेव्हा कोणाला कुठं फिरायला जायचं असत त्यावेळी सर्वात पहिले लोक online search करतात. 

जसे कि Best places to visit in maharashtra किंवा best places to visit near pune, best places to visit near sarata

या Trip advisor सारख्या अनेक website आहे आणि तुम्ही Google वर search केलं तर तुम्हाला सहज त्या website सापडतील. 

या Website वर तुम्ही Advertise देखील करू शकता, म्हणजे कोणी जर असं search केलं कि best places to visit near pune तर तिथे अनेक वेगवेगळे Places दिसतील, एका खाली एक, म्हणजे जर जवळ पास काही किल्ले असतील तर ते दिसतील, काही मंदिर असतील तर ते दिसतील कारण त्या भागात काय फक्त तुमचाच Agro tourism सेंटर नाहीये तर इतरहि अनेक ठिकाण असतील. पण जर तुम्ही त्या website वर advertise केली तर तुमचं Agro tourism सेंटर हे सगळ्यात पहिले, सगळ्यात वरती दिसलं. एकदा का अशा website वर तुमच्या Agro tourism center ला चांगले Reviews आले तर तुम्हाला या Website च्या माध्यमातून भरपूर Customer मिळतील.

त्याच बरोबर तुम्ही जे Travel Agent आहेत यांच्यासोबत tie up करू शकता. फक्त भारतातीलच नाही तर america , England या देशातील Travel Agent सोबत सुद्धा तुम्ही Tie up करू शकता कि जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या देशातून देखील भरपूर Customer मिळतील. 

Agro Tourism Center ची marketing करण्याचे अनेक मार्ग आहे आणि ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील त्याच बरोबर agro toursim center सुरु करण्यासाठी तुम्हाला Registration कुठं करावं लागत, त्यासाठी कोणाकडून परवानगी घ्यावी लागते, कोणकोणते License लागतात, कोणकोणते कागदपत्र लागतात, जमीन किती लागते  अशी सर्व माहिती जर तुम्हाला हवी असेल तर त्यावर मी Detail मध्ये आमच्या bigmastery.com  या Website वर एक Post publish केली आहे. त्या पोस्ट ची लिंक तुम्हाला या Video च्या Description मध्ये मिळून जाईल. 

Agri-Tourism व्यवसायातून तुम्ही किती पैशे कमाऊ शकता ? ( How Much Money Can You Make From Agritourism Business ? )

तुमची कमाई हि तुम्हाला दर महिन्याला किती Customer मिळतात त्याचबरोबर तुमचे जे वेगवेगळे Packages आहे त्यांच्या काय Prices आहे यावर depend आहे. 

For Example तुमच्या कड महिन्याला १०० Customer जरी आले आणि त्यातील ५० Customer ने तुमचा One Day Tour चा basic प्लॅन , २५००/ person चा प्लॅन घेतला आणि ५० कस्टमर ने ५०००/person चा Overnight Plan घेतला 

2500 x 50 = 125000

5000 x 50 = 250000 

या दोन्हीची Total होते ३७५०००  यातील १७५००० हा तुमचा खर्च धरला तरी २००००० हा तुमचा महिन्याचा Profit राहतो. आणि हे मी तुम्हाला कमीत कमी सांगतो आहे. कारण जर तुम्हाला Foreign चे कस्टमर मिळाले तर तुम्ही त्यांच्याकडून डॉलर मध्ये charge करू शकता आणि तुम्ही १० ते १५ लाख रुपये महिना देखील कमाऊ शकता.

पण आता इथं असं समजू नका कि तुम्ही हा व्यवसाय सुरु केला आणि एका महिन्यात तुमच्याकड १०० लोकं येतील तर असं होणार नाही 

हे मी सांगतोय ते २-३ वर्षानंतरच 

नवीन Business सुरु केल्यावर सुरुवातीला महिन्याला फक्त १ – २ लोक येतील काही महिन्यात कोणीच येणार नाही. पण जेव्हा हळूहळू तुमचे Customer इतरांना तुमचं कृषी पर्यटन केंद्र Recommend करायला लागतील, त्याच बरोबर Social media वरील video लोकांपर्यंत पोहोचेल, Tripadvisor.com सारख्या website वर तुमचे Reviews वाढतील. तुमचे Travel Agent Partners वाढतील तेव्हा तुम्हचा Business हा Grow व्हायला लागेल.

What is an agritourism business ?

कृषी पर्यटन म्हणजे शहरातील पर्यटकांना बोलावून तुमची शेती, गावाकडील जीवन आणि संस्कृती याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना देणे जसे कि गावाकडचे लोक कसे राहतात, कोणत्या प्रकारचे पदार्थ खातात, गावाकडे शेती कशी केली जाते, त्या स्थानिक क्षेत्रात कोणकोणती पिके घेतली जातात, त्या क्षेत्रात असलेल्या भाज्यांची आणि फळांची माहिती देणे, बैलगाडी ची सवारी, हुर्डापार्टी, शेणाच्या गौऱ्या बनवणे, चुलीवर जेवण बनवणे अशा प्रकारचे अनेक नवनवीन अनुभव तुम्ही या शहरी लोकांना देऊ शकता आणि त्या बदल्यात त्यांच्या काढून काही पैसे charge करू शकता.

Is agri-tourism business profitable ?

Yes, Agri Tourism Business is profitable. There are many farmers, who are making good money from this business.

Swapnil Shinde

Big Mastery चे Founder आणि CEO. स्वप्निल शिंदे हे Ecommerce, Education, Content Creation, Hosting अशा अनेक व्यवसायांमध्ये कार्यरत आहे. स्वप्निल शिंदे यांनी अनेक अडचणींवर मात करून स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे.

Leave a Reply