१५+ विक्री व्यवसायांची यादी | Products Selling Business Ideas In Marathi

या पोस्ट मध्ये मी तुम्हाला काही विक्री व्यवसाय सांगणार आहे जे तुम्ही अत्यंत कमी गुंतवणुकीमध्ये सुरु करू शकता. प्रत्येक Business Idea बरोबरच त्या Business Idea ची काही महत्वाची माहिती देखील तुम्हाला या ठिकाणी मिळेल. 

vikri vyavsay marathi

१५ + विक्री व्यवसायांची यादी

1. भाजीपाला विक्री व्यवसाय

प्रत्येक घरामध्ये जेवणासाठी भाज्यांचा वापर केला जातो. भाज्या हि एक आवश्यक गोष्ट आहे. तुम्ही वेगवेगळ्या पालेभाज्या तसेच फळभाज्या विक्री करण्याचा व्यवसाय सुरु करू शकता. हा विक्री व्यवसाय तुम्ही अत्यंत कमी गुंतवणुकीमध्ये सुरु करू शकता. तुम्ही शेतकऱ्यांकडून स्वस्तात जास्त भाज्या विकत घेऊ शकता आणि त्या मार्केट च्या रेट ने तुमच्या शहरात विकू शकता. 

2. फळ विक्री व्यवसाय

भाज्यांप्रमाणेच फळे देखील लोक रोज खातात. फळांची विक्री करून लोक अतिशय चांगले पैसे कमावतात. तुम्ही शेतकऱ्यांकडून स्वस्तात जास्त फळं विकत घेऊ शकता आणि तुमच्या शहरामध्ये त्यांची विक्री करू शकता.

तुम्ही वेगवेगळ्या भागात फिरून देखील हा व्यवसाय करू शकता कारण हा एक फिरता व्यवसाय देखील आहे. 

3. दूध विक्री व्यवसाय

तुम्ही घरोघरी जाऊन किंवा एखादे दुकान लावून किंवा रस्त्याच्या कडेला उभे राहून दूध विक्री चा व्यवसाय सुरु करू शकता. आजकाल दुधाचे भाव खूप वाढले आहे आणि तुम्ही या व्यवसायातून चांगले पैसे कमावू शकता. 

जर तुमचा स्वतःचा गोठा नसेल तर तुम्ही खेड्यातील शेतकऱ्यांकडून जास्त Quantity मध्ये स्वस्तात दूध विकत घेऊ शकता आणि शहरामध्ये त्याची विक्री करू शकता. 

4. जमीन खरेदी-विक्री व्यवसाय

तुम्ही जमीन खरेदी विक्री चा व्यवसाय करू शकता. इथे तुम्हाला प्रत्यक्षात जमीन विकत घेण्याची देखील गरज नाही तर तुम्ही एक मध्यस्ती म्हणून काम करू शकता.

ज्याला जमीन विकायची आहे आणि ज्याला खरेदी करायची आहे त्या दोघांची भेट घडवून देऊन आणि व्यवहार पूर्ण करून देऊन तुम्ही चांगले कमिशन कमावू शकता. 

5. घर खरेदी विक्री व्यवसाय

जमिनी प्रमाणेच तुम्ही घरांची आणि फ्लॅट ची  विक्री करण्याचे काम करू शकता. तुम्ही एक कमिशन एजन्ट म्हणून काम करू शकता. आजकाल लोकांना चांगले घर एका चांगल्या भागात मिळत नाही आणि इथेच तुम्ही त्यांची मदत करू शकता.

हि एक Zero Investment Business Idea आहे. तुम्ही एक मध्यस्थ म्हणून काम करू शकता आणि चांगले कमिशन कमावू शकता.

6. जुन्या गाड्यांची विक्री करण्याचा व्यवसाय

गाडी हि एक गरजेची वस्तू झालेली आहे आणि प्रत्येकाची इच्छा असते कि स्वतःची एक गाडी असावी परंतु आजकाल नवीन गाड्यांच्या किमती खूप वाढलेल्या आहे.

प्रत्येकाला नवीन गाडी विकत घेणं परवडत नाही आणि म्हणूनच लोक जुन्या गाड्या विकत घेतात. 

तुम्ही जुन्या गाड्यांची विक्री करण्याचे काम करू शकता. तुम्हाला गाड्या विकत घेण्याची देखील गरज नाही तुम्ही फक्त मध्यस्ती म्हणून काम करून चांगले पैसे कमावू शकता. 

7. मोबाईल आणि त्याची Accessories विकण्याचा व्यवसाय

आजकाल प्रत्येकाकडे स्वतःचा Mobile असतो. तुम्ही मोबाईल आणि त्याच्या इतर Accessories विक्री करण्याचा व्यवसाय करू शकता. Mobile च मार्केट खूप मोठं आहे यातून तुम्ही अतिशय चांगले पैसे कमावू शकता. 

8. धान्य खरेदी विक्री व्यवसाय

तुम्ही गहू, बाजरी,ज्वारी, तांदूळ असे धान्य विक्री करण्याचा व्यवसाय करू शकता. तुम्ही शेतकऱ्यांकडून Bulk मध्ये धान्य खरेदी करू शकता आणि एक दुकान लावून शहरामध्ये त्यांची विक्री करू शकता.

9. किराणा सामान विक्री चा व्यवसाय

तुम्ही किराणा सामान विक्री करण्याचा व्यवसाय सुरु करू शकता. किराणा सामान हे प्रत्येक घरातील आवश्यक असे सामान असते आणि अनेक लोक या विक्री व्यवसायातून चांगले पैसे कमावत आहे.

तुम्ही एकदा किराणा दुकान सुरु करू शकता आणि चांगले प्रॉफिट मार्जिन कमावू शकता. 

10. मासे विक्री चा व्यवसाय

लोक मोठ्या प्रमाणावर मासे खातात आणि आजकाल मास्यांच्या किमती देखील भरपूर असतात. 

तुम्ही मासे विक्री करण्याचा व्यवसाय सुरु करू शकता आणि चांगले पैसे यातून कमावू शकता. तुम्ही Bulk मध्ये स्वस्तात मासे खरेदी करू शकता आणि शहरांमध्ये त्यांची विक्री करू शकता. 

11. अंडी विक्री करण्याचा व्यवसाय

लोक रोज अंडी खातात आणि जगभरात मोठ्या प्रमाणावर अंडी खाल्ली जातात.

तुमच्याकडे जर स्वतःचे पोल्ट्री फार्म नसेल तर तुम्ही पोल्ट्री फार्म मधून स्वस्तात अंडी खरेदी करू शकता आणि त्यांची मार्केट रेट ने विक्री करून चांगले पैसे कमावू शकता.

12. महिलांची ज्वेलरी विकण्याचा व्यवसाय

भारतामध्ये पूर्वीपासूनच महिला मोठ्या प्रमाणावर दागिने वापरतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरी भारतीय मार्केट मध्ये प्रसिद्ध आहे. आजकाल महिला फॅशन ज्वेलरी ( Artificial Jewellery ) वापरणे पसंद करतात कारण ती स्वस्त असते. 

तुम्ही हि फॅशन ज्वेलरी विकण्याचा व्यवसाय सुरु करू शकता. 

13. कपडे विकण्याचा व्यवसाय

कपडे विकण्याचा व्यवसाय देखील एक प्रसिद्ध व्यवसाय आहे जो तुम्ही अत्यंत कमी गुंतवणुकीत सुरु करू शकता. कपड्याचा व्यवसाय कसा सुरु करायचा ? यावर मी Detail मध्ये पोस्ट लिहली आहे जी तुम्ही वाचू शकता.

कपड्याच्या व्यवसायामध्ये अतिशय चांगले प्रॉफिट मार्जिन असते आणि म्हणूनच यातून चांगली कमाई देखील होते. 

कपड्याचा व्यवसाय कसा सुरु करायचा ?

14. फुलांची विक्री करण्याचा व्यवसाय

भारतामध्ये अनेक वेगवेगळे सण साजरे केले जातात. भारतीय सणांमध्ये फुलांना खूप महत्व असते आणि फुलाची विक्री करून लोक अतिशय चांगले पैसे देखील कमावतात.

फुलांबरोबरच फुलांचे हार देखील लोक मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात आणि तुम्ही त्यांची देखील विक्री करू शकता. 

15. कुल्फी आणि आईस्क्रिम विक्री चा व्यवसाय

तुम्ही कुल्फी तसेच आईस्क्रीम विक्री करण्याचा व्यवसाय करू शकता. तुम्ही होलसेल रेट मध्ये या कुल्फी तसेच आईस्क्रिम खरेदी करू शकता किंवा तुम्ही हे कस बनवायचं ते देखील शिकू शकता.

आईस्क्रीम विकून तुम्ही चांगले पैसे कमावू शकता

16. इतर किरकोळ विक्री चा व्यवसाय 

अनेक किरकोळ विक्री व्यवसाय आहे जे तुम्ही करू शकता. तुम्हाला फक्त ते प्रॉडक्ट होलसेल ने विकत घ्यायचे असतात आणि मार्केट मध्ये रिटेल रेट ने विकायचे असतात. तुम्ही इथं चांगलं प्रॉफिट मार्जिन कमावू शकता. 

17. पुस्तक विक्री व्यवसाय

पुस्तक आणि स्टेशनरी विक्री करण्याचा व्यवसाय देखील अतिशय चांगला आहे. शिक्षण डिजिटल होत आहे परंतु सर्व गोष्टी या ऑनलाईन शिकवता येत नाही आणि हा मोठा बदल असा लगेच होणार नाही.

जोपर्यंत हा बदल होत नाही तोपर्यंत तुम्ही या व्यवसायातून चांगले पैसे कमावून घेऊ शकता. 

निष्कर्ष :-

हे सर्व विक्री व्यवसाय तुम्ही अत्यंत कमी गुंतवणुकीत सुरु करू शकता. अशाच नवनवीन Business Ideas मराठी मध्ये जाणून घेण्यासाठी खाली तुमचा Email Id नक्की submit करा

Loading

हे देखील वाचा

< < मराठी Home Page वर जाण्यासाठी
< < मुख्य Home Page वर जा जाण्यासाठी ( Big Mastery.com)

Swapnil Shinde

Big Mastery चे Founder आणि CEO. स्वप्निल शिंदे हे Ecommerce, Business Education, Content Creation, Hosting अशा अनेक व्यवसायांमध्ये कार्यरत आहे.

Leave a Reply