27 फिरते व्यवसाय यादी मराठी

मला माहित आहे कि तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे परंतु भांडवल नसल्याने तुम्हाला ते जमत नाहीये  परंतु आज या पोस्ट मध्ये मी तुम्हाला 27 फिरते व्यवसाय सांगणार आहे जे तुम्ही अतिशय कमी गुंतवणुकीत सुरु करू शकाल.

firate vyavsay marathi
Contents show

27 फिरते व्यवसाय यादी ( मराठी )

हे 27 फिरते व्यवसाय करणारे अनेक लोक तुम्ही तुमच्या आसपास बघितले असतील. कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो  तुम्ही तो व्यवसाय कशा पद्धतीने नवीन आयडिया वापरून वेगळ्या पद्धतीने करता यावर सगळं अवलंबून असत. 

1. फिरते नाश्ता सेंटर 

तुम्ही अतिशय कमी गुंतवणुकीत फिरते नाश्ता सेंटर सुरु करू शकता. तुम्ही एखादी हातगाडी विकत घेऊ शकता आणि तुमच्या व्यवसाय सुरु करू शकता. 

किंवा तुम्ही तुमच्या Two-Wheelar च्या मागे एक सेटअप बनवून घेऊ शकता आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरून तुमचे पदार्थ विकू शकता. 

सुरुवातीला खूप जास्त पदार्थ विकू नका तर तुम्ही फक्त ३ ते ४ पदार्थ विकले पाहिजे जेणेकरून कमीत कमी साहित्य तुम्हाला सोबत ठेवावे लागेल. 

2. चप्पल आणि बूट विकणे, शिवणे, दुरुस्त करणे

आपल्याकडील लोक एवढे श्रीमंत नाही कि चप्पल तुटल्यावर लगेच फेकून देऊ शकतील. चप्पल तुटल्यावर ती दुरुस्त करावी लागते आणि तुम्ही ते काम वेगवेगळ्या कॉलनी मध्ये फिरून करू शकता. 

त्याचबरोबर तुम्ही स्वस्तातल्या चपला देखील तुमच्या सोबत विक्री साठी ठेऊ शकता. 

3. कुल्फी आणि आईस्क्रिम विकणे

तुम्ही कुल्फी आणि आईस्क्रिम विकणारे लोक बघितले असतील. तुम्ही देखील अतिशय कमी गुंतवणुकी हा व्यवसाय सुरु करू शकता. 

तुम्ही सायकल किंवा Two-Wheelar वापरून देखील हा व्यवसाय करू शकता. 

4. घरोघरी जाऊन दूध विक्री

घरोघरी जाऊन दूध विक्री करणे हा देखील एक प्रसिद्ध फिरता व्यवसाय आहे. तुमच्याकडे जर गाई किंवा म्हशी असतील किंवा नसतील तरी देखील तुम्ही हा व्यवसाय करू शकता. 

गाई-म्हशी असतील तर तुम्ही सहज तुमच्या सायकल किंवा Two-Wheelar वर दूध विक्री करू शकता आणि जर तुमच्या कडे गाई-म्हशी नसतील तर तुम्ही खेड्यामधील एखाद्या शेतकऱ्याकडून दूध घेऊ शकता आणि ते शहरामध्ये फिरून विकू शकता. 

5. घरोघरी फिरून भाजीपाला आणि फळे

आजकाल लोकांना सगळ्या गोष्टी आयत्या आणि घरपोहोच हव्या असतात. तुम्ही घरोघरी फिरून भाजीपाला आणि फळे विकण्याचा व्यवसाय सुरु करू शकता.

भाजीपाला आणि फळे हि एक अशी गोष्ट आहे जी सगळ्यांना लागते आणि म्हणूनच याची कायम डिमांड असते.

तुम्ही शेतकऱ्यांकडून भाजीपाला आणि फळे खरेदी करू शकता आणि ते शहरामध्ये विकू शकता. 

6. भंगार गोळा करणे

भंगार वस्तूंचा व्यवसाय हा आपल्याला एक भंगार व्यवसाय वाटतो परंतु तसे नाही. तुम्ही जर शहरांमध्ये भंगार गोळा करण्याचा व्यवसाय सुरु केला तर तुम्ही यातून चांगले पैसे कमावू शकता

कारण शहरांमध्ये लोकसंख्या जास्त असते आणि भंगार पण जास्त निर्माण होते त्याचबरोबर शहरांमध्ये कारखाने आणि उद्योग-धंदे पण जास्त असतात आणि म्हणूनच त्यातून देखील खूप waste निर्माण होते. 

7. केसावर भांडे विकण्याचा व्यवसाय

तुम्ही केसावर भांडे विकणारे अनेक लोक बघितले असतील. तुम्हाला असं वाटत असेल कि केसाचं हे लोक नेमकं काय करतात तर तुमच्या माहितीसाठी सांगतो केसांना मार्केट मध्ये खूप डिमांड आहे. 

हे केस ४००० रुपये ते ६००० रुपये किलो च्या भावाने विकले जातात. तुम्ही केसांवर भांडे देऊ शकता किंवा केसांच्या बदल्यात लोकांना पैसे देखील देऊ शकता.

या केसांचा वापर Hair Wig बनवण्यासाठी केला जातो. 

8. अमेझॉन आणि फ्लिपकार्ट चे प्रॉडक्ट डिलिव्हर करणे

अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरून करोडो लोक प्रॉडक्ट खरेदी करतात आणि हे प्रॉडक्ट कोणाला तरी तुमच्या घरापर्यंत deliver करावे लागतात. 

तुम्ही amazon चे प्रॉडक्ट Deliver करायचे काम करू शकता आणि चांगले पैसे कमावू शकता. 

9. इतर कंपन्यांची Delivery ची कामे करणे

अमेझॉन आणि फ्लिपकार्ट प्रमाणेच इतरही अनेक Ecommerce आणि Delivery च्या कंपन्या आहे. तुम्ही या कंपन्यांसोबत देखील काम करू शकता. 

Myntra, Meesho, IndiaMART, Ajio, Nykaa, Zomato, Swiggy अशा अनेक कंपन्या आहे ज्यांच्यासोबत तुम्ही Delivery Boy म्हणून काम करू शकता. 

10. महिलांचे Products आणि Accessories विकणे

तुम्ही घरोघरी आणि वेगवेगळ्या कॉलनी मध्ये फिरून महिलांचे Products आणि Accessories विकण्याचा व्यवसाय सुरु करू शकता. 

तुम्ही Artificial Jewellery, बांगड्या, Ear Rings, Hair Clips असे अनेक महिलांचे Products आणि Accessories विकू शकता. 

11. किचनमधील भांडी, कप आणि इतर वस्तू विकणे

तुम्ही किचन मधील भांडी जसे कि वाट्या, चमचे, डब्बे असे अनेक भांडे फिरून विकू शकता. त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगाच्या कप आणि बश्या देखील विकू शकता. 

हा व्यवसाय तुम्ही अत्यंत कमी गुंतवणुकीत सुरु करू शकता. 

12. चादर, बेडशीट, ब्लॅन्केट विकणे

चादर, बेडशीट आणि  ब्लॅन्केट या अशा गोष्टी आहे ज्या प्रत्येक घरात लागतात. 

तुम्ही एखाद्या होलसेलर कडून स्वस्तात या गोष्टी विकत घेऊ शकता आणि शहरांमध्ये तसेच खेड्यांमध्ये देखील फिरून या गोष्टी विकू शकता.

या व्यवसायातून तुम्ही अतिशय चांगले पैसे कमावू शकता. 

13. किराणा सामान Deliver करण्याचा व्यवसाय

प्रत्येक घरात किराणा सामान हे गरजेचे असते. या वस्तू अत्यावश्यक वस्तूंमध्ये मोडतात. तुम्ही लोकांना घरपोहोच किराणा सामान देण्याचे काम करू शकता. 

इथं तुम्ही फक्त delivery करूनच नाही तर तुम्ही होलसेल ने हे प्रॉडक्ट विकत घेऊन ते कस्टमर ला रिटेल मध्ये विकू शकता म्हणजे तुम्ही इथं चांगलं प्रॉफिट मार्जिन कमावू शकता. 

14. संडास, बाथरूम साफ करण्याची कामे करणे

तुम्ही घरोघरी फिरून संडास – बाथरूम सफाईची कामे देखील करू शकता. हे काम तुम्हाला ऐकायला थोडं खराब वाटेल परंतु हे काम करण्यासाठी तुम्ही भरपूर पैसे charge करू शकता. 

महिन्यातून एका घराचे ४ वेळा संडास- बाथरूम साफ करण्यासाठी लोक कमीतकमी १५०० ते २००० रुपये चार्ज करतात. तुम्ही तासा नुसार देखील पैसे चार्ज करू शकता.

15. घरोघरी फिरून Eco -Friendly पेस्टकंट्रोल चे काम करणे

तुम्ही घरोघरी फिरून पेस्टकंट्रोल चे काम करू शकता. अनेक घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किडे- माकोडे तयार होत असतात आणि त्यांना मारणं हे खूप कठीण काम असत. 

तुम्ही पेस्टकंट्रोल चा business सुरु करू शकता. हे काम कस करायचं ते तुम्ही शिकून घेऊ शकता. 

16. Food Truck सुरु करणे

तुम्ही Food Truck सुरु करू शकता आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरून तुमचे खाद्यपदार्थ विकू शकता. Food Truck हा अतिशय प्रसिद्ध बिजनेस आहे आणि यातुन तुम्ही अतिशय चांगले पैसे कमावू शकता.

तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरून कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या वेळेत तुम्हाला चांगले कस्टमर मिळतात हे पाहून त्या ठिकाणी त्या वेळेत तुम्ही तुमची Food Truck उभी करू शकता 

17. रेडिमेड कपड्यांची विक्री करणे

रेडिमेड कपडे विकण्याचा व्यवसाय देखील अत्यंत चांगला आहे आणि यात Profit Margin देखील खूप चांगलं मिळत. 

एखाद्या होलसेलर करून स्वस्तात कपडे विकत घेऊ शकता आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरून ते विकू शकता. तुम्हाला सर्व प्रकारचे कपडे विकायची गरज नाही तुम्ही फक्त T-shirt किंवा Shirt किंवा साड्या असे ठराविक प्रकारचे कपडे विकू शकता

18. चहा विकणे

भारतामधील जवळपास सगळे लोक चहा पितात. चहा विकून लोक करोडपती झाले आहे. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरून चहा विकायचा व्यवसाय सुरु करू शकता. 

तुम्ही स्वतः बरोबर आधीच चहा बनवून घेऊ शकता आणि तुमच्या Two-wheelar किंवा सायकल वर फिरून विकू शकता. 

19. घर आणि दुकाने साफ करण्याचे काम 

घरे आणि दुकाने साफ करून देखील तुम्ही चांगले पैसे कमावू शकता. House Cleaning च्या Business मधून लोक लाखो रुपये कमावत आहे. 

प्रत्येकाला त्याच घर स्वच्छ असावं असं वाटत पण प्रत्येकाकडे घर साफ करायला वेळ नसतो तसेच आजकाल लोकांना सगळ्या गोष्टी आयत्या आणि आरामशीर लागतात त्यामुळे लोक इतरांकडून घरे आणि दुकाने साफ करून घेतात.

20. Transport Business 

वेगवेगळे प्रॉडक्ट एका शहरातून दुसऱ्या शहरात पोहोचवण्यात काम तुम्ही करू शकता. Trasportation हि एक अत्यंत गरजेची सेवा आहे आणि तिची गरज जवळपास सगळ्यांनाच असते. 

अनेक लोक Transportation Service देऊन अतिशय चांगले पैसे कमावत आहे. 

21. शेंगदाणे, फुटाणे विक्री चे काम

एखादी छोटीसी हातगाडी वापरून तुम्ही शेंगदाणे, फुटाणे विक्री चा व्यवसाय सृऊ करू शकता. भारतात हे एक अत्यंत प्रसिद्ध snack आहे. शेंगदाणे फुटाणे विकून तुम्ही चांगले पैसे कमावू शकता. 

शेंगदाणे फुटाणे कसे भाजायचे आणि तयार करायचे हे तुम्ही शिकून घेऊ शकता. तुम्ही एखाद्या सायकल चा किंवा Two-Wheelar  चा वापर करून देखील हा धंदा करू शकता. 

22. घर शोभेच्या वस्तू 

तुम्ही घर शोभेच्या वस्तू विकण्याचा व्यवसाय करू शकता. लोकांना त्यांच्या घराची सजावट करण्याची खूप आवड असते आणि म्हणूनच तुम्ही बघितलं असेल कि लोकांच्या घरात वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू ठेवलेल्या असतात. 

तुम्ही होलसेलर कडून स्वस्तात या वस्तू खरेदी करू शकता आणि हातगाडी किंवा तुमची मोटार सायकल वापरून त्यांची विक्री करू शकता.

23. पॉपकॉर्न विकण्याच्या व्यवसाय

पॉपकॉर्न हे एक प्रसिद्ध Snack हे जे भारतातच नाही तर पूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणात खाल्लं जात. तुम्ही फिरून पॉपकॉर्न विकण्याचा व्यवसाय करू शकता.

तुम्हाला एक पॉपकॉर्न बनवायचं मशीन घ्यावं लागलं आणि पॉपकॉर्न कसे बनवायचे हे देखील शिकावं लागेल जे तुम्ही सहज शिकू शकता. 

24. बिस्कीट, खारी, टोस्ट विकणे

तुम्ही घरोघरी फिरून बिस्कीट, खारी, टोस्ट विकण्याचा व्यवसाय सुरु करू शकता. तुम्ही होलसेल मध्ये या गोष्टी विकत घेऊ शकता आणि हातगाडी वर फिरून विकू शकता. 

तुम्ही वेगळेपण निर्माण करण्यासाठी गव्हाचे आणि बिना मैद्याचे प्रॉडक्ट देखील विकू शकता. ते पदार्थ कसे बनवायचे ते देखील तुम्ही शिकू शकता. 

25. फिरते जूस सेंटर

तुम्ही वेगवेगळ्या फळांचं आणि भाज्यांच जूस बनवून ते विकू शकता. तुम्ही एक फिरते जूस सेंटर सुरु करू शकता. 

आजकाल लोक स्वतःच्या Health च्या बाबतीत अतिशय जागृत होत आहे आणि जूस हे तुमच्या Health साठी अतिशय उत्तम असते. 

26. Mini Travel Company

तुम्ही स्वतःची Mini Travel Company सुरु करू शकता. हा एक अतिशय प्रसिद्ध फिरता व्यवसाय आहे. 

तुम्ही एखादी गाडी विकत घेऊ शकता आणि हा व्यवसाय सुरु करू शकता. 

27. टॅक्सी आणि ऑटो-रिक्षा सर्व्हिस

टॅक्सी आणि ऑटो-रिक्षा सर्व्हिस हि अत्यंत गरजेची service आहे. तुम्ही एखादी टॅक्सी किंवा ऑटो-रिक्षा विकत घेऊ शकता आणि हा व्यवसाय सुरु करू शकता. 

प्रत्येक शहरामध्ये हजारो- लाखो लोक दररोज प्रवास करतात आणि त्यांना या सर्विस ची गरज असते. या व्यवसायातून तुम्ही अतिशय चांगले पैसे कमावू शकता.

Conclusion

हे सर्व फिरते व्यवसाय तुम्ही अत्यंत कमी गुंतवणुकीत सुरु करू शकता आणि चांगले पैसे यातून कमावू शकता.

अश्याच नवनवीन Business Ideas आणि त्यांची Detail मध्ये माहिती जाणून घेण्यासाठी खाली तुमचा Email टाकून Submit करा.

Loading

< < मराठी Home Page वर जाण्यासाठी
< < मुख्य Home Page वर जा जाण्यासाठी ( Big Mastery.com)

हे देखील वाचा

Swapnil Shinde

Big Mastery चे Founder आणि CEO. स्वप्निल शिंदे हे Ecommerce, Business Education, Content Creation, Hosting अशा अनेक व्यवसायांमध्ये कार्यरत आहे.

Leave a Reply