१७+ हॉटेल बिजनेस आयडिया मराठीत | 17+ Hotel Business Ideas In Marathi

जर तुम्ही हॉटेल शी संबंधित व्यवसाय सुरु करायचा असेल तर हि पोस्ट तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे. या पोस्ट मध्ये मी तुम्हाला १९ हॉटेल बिजनेस आयडिया मराठी मध्ये सांगणार आहे.

Hotel Business Ideas In Marathi
Contents show

List of 17+ Hotel Business Ideas In Marathi

1. कॅन्टीन सुरू करा  ( Start A Canteen )

कॅन्टीन सुरू करणे हि एक प्रसिद्ध आणि उत्तम Hotel Business Idea आहे. तुम्ही अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये स्वतःच कॅन्टीन सुरु करू शकता. तुम्ही एखाद्या School किंवा College मध्ये देखील कॅन्टीन सुरु करू शकता. 

2. फूड ट्रक सुरु करा ( Start A Food Truck )

Food Truck बिजनेस हा देखील एक उत्तम हॉटेल बिजनेस आहे. फूड ट्रक चा फायदा असा आहे कीं तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाणून तुमचा व्यवसाय करू शकता आणि इथं तुम्हाला भरपूर Experiment करता येतील. 

3.खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरु करा (  Start A Food Stall )

तुमची इन्व्हेस्टमेंट करण्याची क्षमता जर खूपच कमी असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी एकदम उत्कृष्ट आहे. तुम्ही वर्दळीच्या ठिकाणी एखादा खाद्यपदार्थाचा स्टॉल सुरू करू शकता.

हवं तर तुम्ही एखादी Food Cart किंवा हातगाडी चा देखील वापर करू शकता. 

4. ऑनलाईन हॉटेल सुरु करणे (  Online Hotel )

तुम्ही घरातून देखील तुमचा खाद्यपदार्थांचा बिजनेस सुरु करू शकता. तुम्ही Zomato, Swiggy सारख्या Food Delivery App वर तुमचा Business रजिस्टर करू शकता आणि घरबसल्या पैसे कमावू शकता.

तुम्ही स्वतःची Website देखील बनवू शकता आणि Social Media चा वापर करून देखील ऑर्डर मिळवू शकता. 

5. कृषी पर्यटन हॉटेल ( Agro Tourism Hotel )

कृषी पर्यटन व्यवसायाचा वापर करून देखील तुम्ही हॉटेल बिजनेस करू शकता कारण कृषी पर्यटनासाठी आलेल्या लोकांना राहण्यासाठी रूम आणि जेवणाची आवश्यकता असते.

तुमच्याकडे जर थोडी जमीन असेल किंवा जर तुम्ही गावाकडे राहत असाल तरी देखील हा व्यवसाय तुम्ही करू शकता.

6. रिसॉर्ट सुरु करा ( Resort Hotels )

तुम्ही जर मोठी Investment करू शकता असाल तर तुम्ही एखादं मोठं रिसॉर्ट सुरु करू शकता. लोक समुद्रकिनारी एखाद्या रिसॉर्ट वर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जातात. रिसॉर्ट हे थोडंफार हॉटेल सारखं असत परंतु त्या ठिकाणी Enjoy करण्यासाठी इतरही अनेक गोष्टी असतात.

7. बस स्टॅन्ड हॉटेल (  Bus Stand Hotels )

तुम्ही बस स्टॅन्ड च्या जवळपास किंवा बस स्टॅन्ड मध्ये देखील तुमचं कॅन्टीन किंवा हॉटेल सुरु करू शकता. बस स्टॅन्ड मध्ये हॉटेल सुरु करण्यासाठी तुम्हाला परवानगी घ्यावी लागते. अनेक प्रवासी लांबून येतात-जातात त्यामुळे या ठिकाणी हॉटेल चांगले चालतात. 

8. रेल्वे स्टेशन हॉटेल ( Railway Hotels )

तुम्ही रेल्वे स्टेशन च्या आसपास किंवा रेल्वे स्टेशन मध्ये देखील तुमचा एखादा खाण्याच्या स्टॉल किंवा हॉटेल सुरु करू शकता. हजारो- लाखो प्रवासी रोज प्रवास करतात आणि या ठिकाणी देखील तुम्हाला भरपूर कस्टमर मिळतील. 

9. एअरपोर्ट हॉटेल ( Airport Hotels )

तुम्ही एअरपोर्ट च्या आसपास देखील तुमचं हॉटेल सुरु करू शकता. जिथं तुम्ही राहण्याची आणि जेवण, नाश्त्याची व्यवस्था करू शकता.

10. हॉटेल साफसफाई चा व्यवसाय ( Hotel Cleaning Service )

हॉटेल सुरु करण्यासोबतच हॉटेल शी संबंधित अनेक व्यवसाय आहे जे तुम्ही करू शकता जसे कि हॉटेल च्या साफ सफाई चा व्यवसाय.

विचार करा कीं भारतात एकूण किती हॉटेल आहे म्हणजे यावरून तुम्हाला अंदाज येईल कि तुम्हाला किती कस्टमर मिळू शकता. 

हा एक बिनभांडवली व्यवसाय आहे आणि म्हणूनच कोणताही व्यक्ती हा व्यवसाय करू शकतो.

11. मोठ्या हॉटेल कंपनी सोबत व्यवसाय करणे ( Work With Big Hotel Brands )

तुम्ही मोठ्या हॉटेल ब्रँड सोबत देखील काम करू शकता जसे की तुम्ही Oyo, Yatra, MakeMyTrip अशा हॉटेल बुकिंग website सोबत तुमचं हॉटेल जोडू शकता. इथून तुम्हाला ऑनलाईन भरपूर कस्टमर मिळतील.

12. नाविन्यपूर्ण हॉटेल सुरू करणे ( Start A Unique Hotel Business )

तुम्ही युट्युब तसेच इंटरनेट अनेक विचित्र हॉटेल बघितले असतील. लोक असे हॉटेल मुद्दाम सुरु करतात जेणेकरून लोक त्याकडे आकर्षित होतात. हि त्यांची मार्केटिंग करण्याची एक Strategy असते. तुम्ही देखील असं एखाद हॉटेल सुरु करू शकता. 

13. मोठ्या हॉटेल ब्रँड ची फ्रेंचायसी घेणे ( Take a Hotel Franchise )

तुम्ही एखादी हॉटेल ची फ्रेंचायसी घेऊ शकता आणि चांगले पैसे कमावू शकता. अनेक प्रसिद्ध Food Franchise आहे ज्या घेऊन तुम्ही त्यांच्या Customer Base चा फायदा घेऊ शकता. 

14. खानावळ 

तुम्ही एखादी खानावळ सुरु करू शकता कारण शहरांमध्ये लोक शिक्षणासाठी तसेच कामा साठी बाहेरून येतात आणि त्यांना या सेवेचा खूप फायदा होतो. अनेक लोक या व्यवसायातून दर महिन्याला लाखो रुपये कमावतात. 

15. टिफिन सर्विस ( Tiffin Service )

टिफिन सर्व्हिस ची देखील मार्केट मध्ये खूप मागणी आहे. खानावळी प्रमाणेच तुम्ही टिफिन सर्विस देखील सुरु करू शकता. तुम्ही हे दोन्ही व्यवसाय सोबत देखील करू शकता. मोठमोठ्या शहरांमध्ये तुम्ही या व्यवसायातून प्रचंड पैसा कमवू शकता. 

16. रूम आणि जेवणाची सोय (  Room & Food Business )

तुम्ही एखादे असे हॉटेल सुरु करू शकता जिथं राहण्याची आणि जेवणाची सोय असेल. Tourist place च्या ठिकाणी तसेच मोठ्या शहरांमध्ये या सर्विसेस ची खूप मागणी असते. 

17. फिल्म थिएटर जवळ फूड स्टॉल लावणे ( Food Stall At Movie Theater )

तुम्ही फिल्म थिएटर जवळ किंवा फिल्म थिएटर मध्ये देखील तुमचा खाण्याचा स्टॉल सुरु करू शकता. फिल्म च्या Interval मध्ये लोक मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ खरेदी करतात.

18. चहा आणि नाश्ता कॉर्नर सुरु करणे ( Tea & Breakfast Corner )

चहा हे एक असे पेय आहे जे पूर्ण देशात प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच तुम्ही चहा आणि नाश्ता कॉर्नर सुरु करू शकता आणि चांगले पैसे कमावू शकता. 

निष्कर्ष –

माणसाला जिवंत राहण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते आणि म्हणूनच खाद्यपदार्थांचे व्यवसाय हे असे असतात ज्यांना कायम मागणी असते. हॉटेल व्यवसायातून तुम्ही करोडो रुपये कमावू शकता.

अशाच नवनवीन Business Ideas मराठी मध्ये जाणून घेण्यासाठी खाली तुमचा Email Id नक्की Submit करा

Loading

हे देखील वाचा

< < मराठी Home Page वर जाण्यासाठी
< < मुख्य Home Page वर जा जाण्यासाठी ( Big Mastery.com)

Swapnil Shinde

Big Mastery चे Founder आणि CEO. स्वप्निल शिंदे हे Ecommerce, Business Education, Content Creation, Hosting अशा अनेक व्यवसायांमध्ये कार्यरत आहे.

Leave a Reply