5 Zero Investment Business Ideas In Marathi 2021 | Small Scale Business Ideas Without Investment In Marathi

अनेक लोक म्हणतात कि आम्हाला स्वतःचा Business चालू करायचा आहे पण आमच्याकडे भांडवल नाही, आमच्याकडे पैसे नाही. तुमच्या याच अडचणीतून तुम्हाला सोडवण्यासाठी आज या Video त मी तुम्हाला 3 Zero Investment  Business Idea सांगणार आहे.

What is Zero Investment Business Ideas Mean ?

पुढं जाण्याआधी Zero Investment म्हणजे नेमकं काय हे आपण लक्षात घेऊ. अनेक जण या गोष्टीचा शब्दशः अर्थ घेतात.

या जगात Zero Investment असं काहीही नसतं. Business करण्यासाठी तुम्ही तुम्हचा Time देता ती हि एक प्रकारची Investment आहे, तुम्ही मेहनत करता ती हि एक प्रकारची investment.

Zero Investment म्हणजे जे Business सुरु करण्यासाठी तुम्हाला फार काही पॆसे खर्च करण्याची गरज नाहीये म्हणजे ज्या गोष्टी तुमच्याकडे आधीपासूनच आहे त्याच गोष्टींचा वापर करून तुम्ही Business सुरु करू शकता.

Zero Investment Business Ideas List In Marathi

1. YouTube Channel

जगभरात २३० करोड पेक्षा जास्त लोक YouTube वापरतात . भारतात देखील करोडो लोक नियमितपणे YouTube वर Videos बघतात. तुम्ही देखील नक्कीच YouTube वर Videos बघत असाल.

Youtube च्या यशामागे Youtube पेक्षाही Youtube वरील Creators चा मोठा हात आहे. Youtube वरील Youtubers शिवाय आणि Youtube चॅनेल शिवाय Youtube एकही रुपया कमाऊ शकत नाही. 

तुम्ही स्वतःच YouTube चॅनेल बनवू शकता आणि लाखो रुपये कमाऊ शकता. Youtube चॅनेल सुरु करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे खर्च करण्याची गरज नाही.

तुमच्याकडे फक्त जर स्मार्टफोन आणि त्यात internet connection असेल तर तुम्ही हा Business सुरु करू शकता.

तुम्ही जवळपास कोणत्याही Topic वर YouTube Channel बनवू शकता फक्त त्या टॉपिक मध्ये इतरांनाही देखील इंटरेस्ट असला पाहिजे उदाहरण द्यायचं झालं तर – Comedy, Music, dance, entertainment, Online coaching, Yoga, Vlogging , health , fitness , Educational अनेक topic आहे.

Topic ची आणि चॅनेल Ideas ची अजिबात कमी नाही. तुम्हाला ज्या  टॉपिक  मध्ये  इंटरेस्ट आहे, ज्याचं तुम्हाला knowledge आहे , ज्यामध्ये तुम्हाला Experience आहे अशा कोणत्याही Topic वर तुम्ही YouTube चॅनेल सुरु करू शकता. महिलांसाठी देखील हा एक उत्तम घरगुती व्यवसाय आहे.

YouTube वरून तुम्ही YouTube Monetization, Advertising, Affiliate marketing अशा अनेक मार्गांनी पैसे कमाऊ शकता.

2. Teaching

तुम्ही Teaching करू शकता. तुम्हीं शैक्षणिक, शाळा college च्या अभ्यासक्रमाचे classs घेऊ शकता. जसे कि  science , math , english , physics , chemistry , biology, mathematics , accounts , taxation असे  अनेक विषय आहे जे तुम्ही शिकवू शकता. 

तुम्हाला जर हे विषय अवघड वाटत असतील तर तुम्ही लहान मुलांचे classes  घेऊ शकता. 

Teaching  business  सुरु करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे खर्च करण्याची गरज नाही. तुम्ही अगदी शून्य रुपयांमध्ये मध्ये हा Business  सुरु करू शकता. तुम्ही तुमच्या घरातूनच या Business ची सुरुवात करू शकता.

हा व्यवसाय  Ladies साठी देखील अतिशय उत्तम आहे 

तुम्ही Yoga शिकवू शकता, तुम्ही hobby classes घेऊ शकता जसे कि dancing, singing, drawing. तुम्ही Skilled based classes घेऊ शकता जसे कि English speaking, personality development, communication skills. 

तुम्ही लोकांना Online  देखील शिकवू शकता. तुम्ही तुमचे Online Courses बनवून ते Online विकू शकता. ते कस करायचं यावर Detail मध्ये videos  आम्ही बनवणार आहे आणि ते सर्व तुम्हाला या YouTube  चॅनेल वर मिळून जातील. 

3. खानावळ

तुम्ही स्वतः ची खानावळ सुरु करू शकता. जिवंत राहण्यासाठी प्रत्येकाला अन्नाची गरज असते. जग कितीही पुढं गेलं तरी अन्न- पाण्याशिवाय जिवंत राहणे शक्य नाही.

हा एक असा व्यवसाय आहे जो तुम्ही अगदी शून्य रुपयांमध्ये, Zero Investment मध्ये सुरु करू शकता. प्रत्येकाच्या घरात एक kitchen असत. जेवण बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्या घरात आधीपासूनच असतात.

त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची Investment करण्याची गरज नाही.तुम्ही तुमच्या घरातूनच हा business सुरु करू शकता. 

तुम्ही जे रोज खातात ते पदार्थ तुम्हाला लोकांना खाऊ घालायचे आहे. शहरांमध्ये अनेक लोक खानावळीच्या, मेस च्या  business मधून दर महिन्याला लाखों रुपये कमावत आहे.

अनेक लोक नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी शहरामध्ये येतात आणि शहरामध्ये ते त्यांच्या घरापासून लांब असल्याने त्यांना घरगुती जेवणाची नेहमीच गरज भासत असते. 

महिलांसाठी देखील हा एक उत्तम घरगुती व्यवसाय आहे.

तुमच्या  कडे  जर भांडवल कमी असेल किंवा अजिबातच नसेल तर तुम्ही स्वतःची खानावळ किंवा मेस सुरु करू शकता. या business मध्ये प्रचंड संधी आहे. तुम्हीही या संधीचा फायदा घेऊ शकता आणि स्वतःचा Business सुरु करू शकता.

4. Marketing Agency

कोणत्याही Business मध्ये successful होण्यासाठी मार्केटिंग सर्वात महत्वाची असते परंतु प्रत्येकाला मार्केटिंग जमत नाही त्यामुळे त्यांचा व्यवसाय चालत नाही. 

तुम्ही स्वतःही Marketing agency सुरु करू शकता आणि इतर व्यवसायाची Advertising आणि marketing करून देऊ शकता. 

तुम्ही Online आणि Offline अशा दोन्हीही पद्धतीने इतर व्यवसायांची Marketing करून देऊ शकता. 

हा business तुम्ही अगदी शून्य रुपयात सुरु करू शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची Investment करण्याची  गरज नाही. 

हा business  करण्यासाठी तुम्हाला स्वतःला Marketing करता येन गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही मार्केटिंग कशी करायची हे तुम्हाला शिकावं लागेल. त्यासाठी तुम्ही google  वरील वेगवेगळे Article वाचू शकता, Youtube वरील videos बघू शकता. या आमच्या Youtube चॅनेल वर देखील तुम्हला मार्केटिंग बद्दल सर्व काही शिकायला मिळेल. 

तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने मार्केटिंग आणि advertising करता आली तर नक्कीच तुम्हाला भरपूर कस्टमर मिळतील.

5. House Cleaning Services

प्रत्येकाला वाटत कि त्याच घर हे स्वच्छ असावं. परंतु आजकाल लोकांना त्यांच घर स्वच्छ ठेवायला वेळ मिळत नाही. 

तुम्ही House  Cleaning  Business सुरु करू शकता. तुम्ही लोकांची घरे स्वच्छ करून देऊ शकता.

अनेक लोक Successfully हा business करत आहे आणि लाखो रुपये या Business मधून कमावत आहे. आता फक्त तुम्हाला काम करण्याची लाज वाटता कामा नये. 

हा business सुरु करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे खर्च करण्याची गरज नाही. घर साफ करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्या घरातच असतात. त्यांचाच वापर करून तुम्ही तुमचा business सुरु करू शकता. 

सुरुवातीला तुम्ही स्वतः एकटे घर स्वच्छ करायचे काम हाती घेऊ शकता आणि हळू हळू तुम्ही तुमच्या हाताखाली मानस देखील ठेऊ शकता. 

तुम्ही जर थोडासा Research केला तर तुमच्या लक्षात येईल कि एक २ bhk Flat ची Basic Cleaning करायचे लोक 2500 ते ३००० रुपये charge करता आणि Deep  cleaning चे 4000 ते 4500 रुपये घेतात. 

तुम्ही सुरुवातीला थोडेसे कमी पैसे charge करू शकता समजा तुम्ही एका Customer कडून फक्त १५०० रुपये charge केले आणि तुम्हाला महिन्याला ५० customer मिळाले तर १५०० गुणिले ५० = ७५००० रुपये.

त्यातून तुमच्या हाताखालच्या लोकांचा पगार आणि इतर खर्च आपण २५००० हजार धरला तरी तुमचा महिन्याचा Profit  ५०००० रुपये राहतो. 

आणि इथं अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला दर महिन्याला ५० customer गोळा करण्याची गरज नाही कारण तुम्हाला एकदा ५० कस्टमर मिळाले आणि जर तुम्ही त्यांना चांगली Service दिली तर तुम्हाला repeat customer मिळत राहतील. तेच customer दर महिन्याला तुमच्याकडून Service घेतील. हळू हळू तुमचे नंबर ऑफ customer देखील वाढतील आणि तुमचा business देखील वाढेल.

Conclusion :

अशा प्रकारे या काही शून्य रुपयात सुरु होणाऱ्या Business Idea आहे ज्यांचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता आणि तुमचा स्वतःचा Business सुरु करू शकता.

आता या Zero Investment Business Idea किंवा शून्य रुपयांत सुरु होणाऱ्या Business Idea बद्दल एक महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे : –

भलेही तुम्ही हे Business शून्य रुपयात सुरु करू शकाल परंतु तुम्हाला Advertising करावी लागेल, marketing करावी लागेल, तुम्हाला लोकांना भेटावं लागेल, तुम्हाला फिरावं लागेल , त्यामुळे तुम्हाला थोडाफार खर्च हा करावाच लागणार आहे.

आणि जर तुमच्या कडे पाच-दहा हजार रुपये हि नसतील तर एक पाच- सहा महिने कुठं तरी Job करू शकता. जास्त नाही एक ५ हजार रुपये महिन्याने, पाच सहा महिन्यात तुमच्याकडे २५-३० हजार रुपये जमतील. आणि मग तुम्ही स्वतःच business सुरु करू शकता. 

अशाप्रकारे थोडास विचार पूर्वक जर  Business केला तर नक्कीच तुमचा देखील Business उभा राहील.

Frequently Asked Questions: –

How can I start a business with zero investment?

If you want to start a business with zero investment then you have to think about how you start that business at the smallest level

What is the best business without investment?

So many businesses are best in their own categories like youtube channels, coaching classes, blogging, house cleaning, and much more. Read our complete post to get more business ideas without investment

हे देखील वाचा

Swapnil Shinde

Big Mastery चे Founder आणि CEO. स्वप्निल शिंदे हे Ecommerce, Education, Content Creation, Hosting अशा अनेक व्यवसायांमध्ये कार्यरत आहे. स्वप्निल शिंदे यांनी अनेक अडचणींवर मात करून स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे.

Leave a Reply