चहाचा व्यवसाय कसा सुरु करायचा? | Tea Shop Business Plan In Marathi

कोणताही व्यवसाय हा छोटा नसतो किंवा मोठाही नसतो. व्यवसाय करणाऱ्यावर हे अवलंबून असत कि तो त्या व्यवसायाला कुठंपर्यंत घेऊन जातो. चहा चा व्यवसाय हा देखील एक असाच व्यवसाय आहे.

अनेक लोकांना असं वाटत कि चहाचा स्टॉल हा काय फालतू व्यवसाय आहे पण अनेक लोक चहाच्या व्यवसायातून करोडो रुपये कमावत आहे.

या पोस्ट मध्ये मी तुम्हाला चहाच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती देणार आहे. हि पोस्ट पूर्ण वाचल्यावर तुम्ही सहज स्वतःचे चहाचे दुकान किंवा चहाचा स्टॉल सुरु करू शकाल.  Tea Shop Information In Marathi

tea shop stall business in marathi
Contents hide

चहाच्या व्यवसायामध्ये काय संधी आहे ? ( Tea Business Opportunity In Marathi )

  • भारतामध्ये चहा हे सर्वात प्रसिद्ध पेय आहे. जवळपास प्रत्येक व्यक्ती चहा पितो. 
  • भारतात लोकांच्या दिवसाची सुरुवात सकाळच्या चहाने होते. 
  • भारताची लोकसंख्या अधिक असल्याने तुम्हाला भरपूर ग्राहक मिळतील. 
  • चहाचा व्यवसाय तुम्ही अत्यंत कमी गुंतवणुकीत सुरु करू शकता. 
  • हा व्यवसाय सुरु करण अत्यंत सोपं आहे. एखादा अडाणी माणूस देखील हा व्यवसाय सहज करू शकतो.

चहाचा स्टॉल किंवा दुकान कसे सुरु करावे ? ( Step By Step )

चहाचा व्यवसाय सुरु करण्यासाठी मी खाली  काही स्टेप सांगितल्या आहे त्या स्टेप तुम्हाला Follow करायच्या आहे.

चहाचे दुकान सुरु करण्यासाठी मार्केट रिसर्च कसा करावा ? ( Market Reseach For Tea Business In Marathi )

चहाचा व्यवसाय सुरु करण्याआधी तुम्हाला तुम्हाला शहरात मार्केट रिसर्च करायचा आहे मार्केट रिसर्च मध्ये तुम्हाला खालील काही गोष्टी करायच्या आहे. 

  • तुमच्या भागात इतर किती चहाचे दुकानं आहे त्यांची माहिती काढायची आहे.
  • इतर चहाची दुकान कोणत्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणाचा त्यांना नेमका काय फायदा होत आहे ? 
  • जी दुकान चांगली चालतात किंवा तुमच्या भागात प्रसिद्ध आहे त्या दुकानाचे निरीक्षण करा. तिथं रोजचे किती कस्टमर येतात त्याची नोंद घ्या.
  • जे चहाच दुकान चांगलं चालत त्या दुकानाचा मालक कस्टमर सोबत कसा बोलतो आणि वागतो हे बघा.
  • हे दुकान त्यांची जाहिरात किंवा मार्केटिंग कशी करतात ? 
  • त्या दुकानातील कस्टमर जेव्हा चहा पिऊन बाहेर येतील तेव्हा त्यांना काही प्रश्न विचारा जसे कि चहा कसा वाटला?, या दुकानात नेहमी येता का ?, दुकानात किंवा चहा मध्ये काय सुधारणा करायची आवश्यकता आहे ?
  • तुमच्या शहरातील वर्दळीच्या ठिकाणाची एक लिस्ट बनवा जसे कि शाळा, दवाखाना, रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, 
  • कोणत्या भागात वर्दळ आहे पण चहाचे दुकान नाही त्यांची एक यादी बनवा. 

चहाच्या व्यवसायासाठी आवश्यक स्किल ( Skills Required For Tea Stall Business In Marathi )

कोणताही व्यवसाय करण्यासाठी तुमच्या कडे काही Skills असणे अत्यंत गरजेचं असत. चहाचा व्यवसाय करण्यासाठी देखील तुमच्याकडे खाली दिलेली काही Skills असली पाहिजे.

चांगला चहा बनवण्याचं स्किल –  तुमचं चहाच दुकान चांगलं चालावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला चांगला चहा बनवता बनवता आला पाहिजे.  दुकान सुरु करण्यापूर्वीच तुम्ही चांगला चहा बनवण्याची प्रॅक्टिस करा. यूट्यूब वर देखील तुम्हाला सगळं शिकायला भेटलं. 

Communication Skill – तुमच्या दुकानात अनेक प्रकारचे ग्राहक येतील आणि तुम्ही त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बोलणं अत्यंत गरजेचं आहे. 

मार्केटिंग चं स्किल – चहाच्या व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला मार्केटिंग करता येणे अत्यंत गरजेचे आहे. मार्केटिंग शिवाय कोणत्याही व्यवसाय मध्ये यश मिळवून आहे अत्यंत कठीण आहे.

चहा च्या दुकानासाठी योग्य ठिकाणाची निवड कशी करावी ? ( Location For Tea Business In Marathi )

या व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी तुमच्या दुकानाचे ठिकाण खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमच्या शहरातील वर्दळीच्या ठिकाणी तुमचं चहाच दुकान सुरू करू शकता जसे की – 

  • शाळा किंवा कॉलेज
  • दवाखाना
  • रेल्वे स्टेशन
  • बस स्टॅन्ड
  • इंडस्ट्रियल एरिया
  • मार्केट
  • शहरातील मुख्य रोड 

तसेच या आधी मी मार्केट रिसर्च च्या सेक्शन मध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या भागांमध्ये वर्दळ तर आहे पण चहाची फार काहीं दुकान नाही अशा भागात तुम्ही तुमचं चहाचं दुकान सुरू करू शकता.

चहाच्या दुकानासाठी आवश्यक असलेले लाइसेंस आणि रजिस्ट्रेशन ( License & Registration For Tea Business In Marathi )

कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही लायसन्स आणि रजिस्ट्रेशन ची आवश्यकता असते. चहाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही लायसन्स आणि रजिस्ट्रेशन ची गरज पडेल.

Shop Act License – प्रत्येक राज्यात व्यवसाय सुरु करण्यासाठी काही लायसन्सची आवश्यकता असते महाराष्ट्रामध्ये कोणतेही प्रकारचे दुकान सुरू करण्यासाठी तुम्हाला शॉप ॲक्ट लायसन्स ची आवश्यकता असते.

FSSAI Registration – कोणताही खाद्यपदार्थांशी संबंधित व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला फूड लायसन्स ची आवश्यकता भासते आणि चहा हे एक खाद्यपदार्थच आहे.

MSME Registration – तुम्ही तुमच्या व्यवसायाचं MSME रजिस्ट्रेशन देखील करू शकता ज्याला उद्योग आधार किंवा उद्यम रजिस्ट्रेशन असं देखिल म्हणतात.

GST Registration – जर तुमचा वार्षिक टर्नओव्हर चाळीस लाखांपेक्षा जास्त होत असेल तर तुम्हाला GST रजिस्ट्रेशन करावे लागेल.

तुम्ही कोणत्या राज्यात व्यवसाय करत आहात त्यानुसार तुम्हाला अजून काही लायसन्सची आवश्यकता भासू शकते.

चहा च्या दुकानाचं नाव काय ठेवावं ? ( Name of Your Tea Shop In Marathi )

चहाच्या दुकानासाठी एका चांगल्या नावाची निवड करण देखील अत्यंत गरजेचं असतं. अनेक व्यवसाय हे फक्त त्याच्या वेगळ्या नावामुळेच प्रसिद्ध होतात आणि करोडो रुपये कमावतात.

Unique नाव ठेवा – अनेक लोक त्यांच्या दुकानाचे विचित्र नाव ठेवतात आणि हे लोक जाणून बुजून करतात ही त्यांची मार्केटिंग करण्याची स्ट्रॅटेजी असते. दुकानाचा जर एखादा कॉमन नाव असेल तर लोकांच्या दुकानाकडे लक्ष जात नाही परंतु जर एखाद्या दुकानाचं नाव काहीतरी विचित्र असेल तर सगळ्यांचे लक्ष त्या नावाकडे जातं आणि दुकान प्रसिद्ध होतं. For example – Chai Sutta Bar, MBA chaiwala, कडकं. 

बिजनेस ची माहिती देणार नाव ठेऊ शकता– तुम्ही तुमच्या बिझनेस ची माहिती देणारा नाव देखील तुमच्या दुकानासाठी वापरू शकता जसे की गोट्या चहा, दादांचा चहा. या नावांमध्ये शेवटी चहा हा शब्द आहे.

वेगवेगळ्या प्रकारच्या चहाची विक्री ( Types of Tea In Marathi )

अनेक लोकांना नॉर्मल चहा आवडत नाही किंवा चालत नाही आणि म्हणूनच masala असा लोकांसाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची चहा तुमच्या दुकानांमध्ये देऊ शकता जसे की-

  • ग्रीन टी 
  • ब्लॅक टी
  • चॉकलेट टी
  • मसाला चाय

चहाच्या दुकानासाठी आवश्यक असलेल्या इतर वस्तू आणि उपकरण ( Things Required To Start A Tea Stall )

चहा दुकान सुरू करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही वस्तूंची आणि उपकरणांची देखील आवश्यकता असेल. 

  • कप
  • किटली
  • Gas किंवा Stove
  • गाळणी
  • भांड
  • पातीले
  • बसण्यासाठी खुर्च्या

चहाच्या दुकानासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता ? ( Employees For Tea Business In Marathi )

सुरुवातीला तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता नाही परंतु जसजसा तुमचा व्यवसाय वाढायला लागेल तुमच्याकडे येणाऱ्या कस्टमरची संख्या वाढेल त्यावेळेस तुम्हाला कर्मचारी कामावर ठेवावे लागतील.

कर्मचाऱ्यांना देखील प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाची आवश्यकता असते. ग्राहकांसोबत कसं बोलायचं?, चहा कसा द्यायचा?, एखादी सिच्युएशन कशी हँडल करायची ? अशा अनेक गोष्टी तुम्हाला कर्मचाऱ्यांना शिकवाव्या लागतील.

चहाच्या व्यवसायासाठी आवश्यक कच्चा माल ( Raw Material For Tea Business In Marathi )

चहा बनवण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या काही पदार्थांची गरज भासेल.

  • चहा पावडर
  • दूध
  • साखर किंवा गूळ
  • गवती चहा
  • चहाचा मसाला
  • आलं
  • पाणी

चहाच दुकान सुरु करण्यासाठी किती भांडवल लागेल ? ( Investment Needed For Tea Business In Marathi )

चहाचे दुकान सुरू करण्यासाठी तुम्हाला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याची आवश्यकता नाही तुम्ही अतिशय कमी गुंतवणूकी मध्ये हा व्यवसाय सुरू करू शकता.

इन्व्हेस्टमेंट किती करायची हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असते तुम्ही कमीत कमी 10,000 रुपयांमध्ये देखील हा व्यवसाय सुरू करू शकता.

चहाचा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही भाड्याने दुकान घेऊ शकता परंतु जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही एखादा स्टॉल लावून देखील तुमचा व्यवसाय सुरू करू शकता अशा पद्धतीने तुम्ही अगदी कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुमचा चहाचा व्यवसाय सुरू करू शकाल.

चहाच्या दुकानाची मार्केटिंग कशी करावी ? ( Marketing Ideas For Tea Business In Marathi )

कोणत्याही व्यवसाय मध्ये मार्केटिंग शिवाय यश मिळत आहे अत्यंत कठीण आहे आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या चहाच्या व्यवसायाची मार्केटिंग करणे अत्यंत गरजेचे आहे. मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही काही पुढील पद्धतींचा वापर करू शकता.

फ्री मध्ये चहा देणे – आजकाल जगात काहीही फ्री मध्ये मिळत नाही आणि जर तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना फ्री मध्ये चहा दिला तर तुमच्या दुकानावर लोकांची तुफान गर्दी जमेल आणि तुमचे दुकान शहरांमध्ये प्रसिद्ध होईल.  

फेसबुक वर जाहिरात करणे – तुम्ही फेसबुक वर जाहिरात करून तुमच्या शहरांमधील लोकांपर्यंत अगदी सहज पोहोचू शकता. अत्यंत कमी पैशांमध्ये तुम्ही फेसबुक वर मार्केटिंग करू शकता.

लोकल फेसबुक ग्रुप मध्ये जाहिरात करणे – प्रत्येक शहराचे शहराच्या नावाने फेसबुकवर ग्रुप असतात त्या ग्रुपमध्ये फक्त त्या शहरातील लोकच असतात. तुम्ही त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि त्या ग्रुपमध्ये देखील तुमच्या व्यवसायाची जाहिरात करू शकता.

Social Media चा वापर करणे – तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून देखील तुमच्या व्यवसायाची जाहिरात करू शकता तुम्ही youtube वर एखादा यूट्यूब चैनल बनवू शकता आणि त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बनवून तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग करू शकता. व्यवसाय मोठा करण्यासाठी तुम्हाला सोशल मीडियाचा खूप उपयोग होईल.

गोरिल्ला मार्केटिंग – तुम्ही तुमच्या दुकानाचा आकार चहाच्या कपासारखा किंवा किटली सारखा बनवू शकता जेणेकरून असं विचित्र दुकान पाहून लोक त्याकडे आकर्षित होतील किंवा तुम्ही तुमच्या दुकानाबाहेर एक मोठा कप ठेवू शकता आणि एवढा मोठा चहाचा कप पाहून लोक निश्चितच तुमच्या दुकानांमध्ये येतील.

चहाची विक्री किंमत आणि नफा ( Selling Price & Profit In Tea Business In Marathi )

विक्री किंमत – तुम्ही १० रुपयांपर्यंत तुमच्या चहाची विक्री किंमत ठेऊ शकता. तुम्ही जर मार्केटिंग करण्यात पटाईत असाल तर तुम्ही साधा चहा देखील ५० रुपये १०० रुपये किमतीने विकू शकता. वेगवेगळ्या प्रकारचा चहा तुम्ही वेगवेगळ्या किमतीला विकू शकता. 

तुमचे स्पर्धक कोणत्या किमतीला चहा विकत आहे त्याचा देखील तुम्ही विचार करणे गरजेचे आहे. तुम्ही जर तुमच्या चहाची ब्रॅण्डिंग केली तर तुम्ही इतरांपेक्षा जास्त किमतीला चहा विकू शकता. 

नफा – चहाच्या व्यवसायातून तुम्ही दर महिन्याला ३०,००० रुपयांपासून १ करोड रुपयांपर्यंत देखील कमाई करू शकता.

चहाचे जे मोठमोठे ब्रँड आहे त्यांचं Business model हे थोडं वेगळं आहे. हे लोक चहाबरोबर इतरही अनेक पदार्थ विकतात म्हणजे तुम्ही चहा बरोबर नाश्ता देखील तुमच्या दुकानात विकू शकता. 

चहाचा व्यवसाय मोठा कसा करायचा ? ( How To Scale Tea Business In Marathi )

चहाचा व्यवसाय मोठा करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे इतरांना Franchise देणे.

तुम्ही स्वतः देखील वेगवेगळ्या शहरांमध्ये तुमच्या चहाच्या दुकानाच्या शाखा उघडू शकता परंतु त्यासाठी तुम्हाला जास्त टाइम आणि पैसा लागेल. तुम्ही दोन्ही पैकी कोणत्याही पद्धतीचा वापर करू शकता. 

तुम्ही एक मोठा जागतिक चहाचा ब्रँड बनवू शकता आणि फक्त भारतातच नाही तर दुसऱ्या देशांमध्ये देखील Franchise देऊ शकता. 

चहाच्या व्यवसायासाठी काही महत्वाच्या टिप्स

  • आजकाल अनेक लोक या व्यवसायामध्ये उतरत आहे त्यामुळे स्पर्धेला मात देण्यासाठी तुम्ही थोडा वेगळ्यापद्धतीने व्यवसाय केला पाहिजे. 
  • तुमच्या चहाची क्वालिटी आणि टेस्ट एकसारखी राहिली पाहिजे.
  • व्यवसायात चांगलं यश मिळण्यासाठी टाईम लागतो त्यामुळे तुमच्या अंगात संयम असणे गरजेचे आहे.
  • दुकानाची तसेच इतर वस्तूंची स्वतःता राखणे अत्यंत गरजेचे आहे. 

Conclusion

चहाचा व्यवसाय अतिशय सोपा आहे आणि तुम्ही अत्यंत कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरु करू शकता. कोणताही व्यवसाय सुरु करण्याआधी एक चांगला बिजनेस प्लॅन बनवणे अत्यंत गरजेचं आहे.

अशाच नवनवीन Business Ideas जाणून घेण्यासाठी खाली तुमचा Email Submit करा.

Loading

हे देखील वाचा

< < मराठी Home Page वर जाण्यासाठी
< < मुख्य Home Page वर जा जाण्यासाठी ( Big Mastery.com)

Swapnil Shinde

Big Mastery चे Founder आणि CEO. स्वप्निल शिंदे हे Ecommerce, Business Education, Content Creation, Hosting अशा अनेक व्यवसायांमध्ये कार्यरत आहे.

Leave a Reply