भारतामध्ये किराणा स्टोअर चा बिजनेस अतिशय प्रसिद्ध आहे. किराणा व्यवसाय भारतामध्ये अतिशय चांगला चालतो आणि अनेक लोक या व्यवसायातून दर महिन्याला लाखों रुपये कमावत आहे.
तुम्ही देखील तुमच्या भागात एक किराणा दुकान सुरु करू शकता आणि त्यातून चांगले पैसे कमावू शकता.
अनेकांना किराणा व्यवसाय सुरु करण्यासाठी मार्गदर्शन हवं आहे आणि म्हणूनच या पोस्ट मध्ये मी तुम्हाला किराणा व्यवसायाची संपूर्ण माहिती मराठी भाषेत देणार आहे ( Kirana store information in marathi ). किराणा स्टोअर चा संपूर्ण बिजनेस प्लॅन या पोस्टमध्ये दिलेला आहे ( Kirana store business plan in marathi ).
तर चला सूरु करू या –
किराणा स्टोअर च्या व्यवसायामध्ये काय संधी आहे ? ( Opportunity In Grocery Business In Marathi)
किराणा स्टोअर च्या व्यवसायामध्ये खूप मोठी संधी आहे आणि त्याची अनेक कारणे आहे जसे कि –
- किराणा सामान हे प्रत्येक घरासाठी अत्यावश्यक असते. लोकांचे जगणे हे या किराणा सामानावर अवलंबून असते.
- भारताची लोकसंख्या अधिक आहे त्यामुळे किराणा सामानाची डिमांड देखील खूप जास्त आहे आणि भविष्यात ती अजूनच वाढणार आहे.
- तुम्ही अत्यंत कमी Investment मध्ये किराणा दुकान सुरु करू शकता.
- हा व्यवसाय अतिशय सोपा आहे आणि म्हणूनच कोणताही व्यक्ती हा व्यवसाय करू शकतो फक्त तुम्हाला लिहता, वाचता आणि हिशोब करता आला पाहिजे
किराणा व्यवसायाचे प्रकार ( Types Of Grocery Business In Marathi )
- छोटे किराणा दुकान
- सुपरमार्केट
- ऑनलाइन किरणा दुकान
भारतात जास्तकरून हे तीन प्रकारचे किराणा व्यवसाय पाहायला मिळतात आणि तीनही प्रकारच्या व्यवसायांचे काही फायदे आणि तोटे आहे या पोस्टमध्ये आपण एक छोटं किराणा दुकान कसं सुरू करायचं ते बघणार आहोत.
किराणा स्टोअर व्यवसाय काय आहे आणि कसा सुरु करायचा? (How To Start Kirana Store In Marathi )
किराणा स्टोअर च्या व्यवसायामध्ये तुम्हाला होलसेल मध्ये किराणामाल विकत घ्यायचा असतो आणि तुमच मर्जिन त्यात Add करून तो मार्केट मध्ये रिटेल रेट ने कस्टमरला विकायचा असतो.
तुम्ही तुमच्या आसपास अनेक किराण्याची दुकान बघितली असतील
हा व्यवसाय काय आहे हे तर तुमच्या लक्षात आलं असेल आता तो कसा सुरू करायचा हे आपण बघू.
किराणा स्टोअर सुरू करण्यासाठी तुम्हाला खालील काही स्टेप फॉलो करायच्या आहे.
मार्केट रिसर्च कसा करावा? ( How To Do Market Research For Kirana Store Business In Marathi )
कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी तुम्ही मार्केट रिसर्च करणे अत्यंत गरजेचं असतं आणि किराणा दुकान सुरू करण्यापूर्वी देखील तुम्ही तुमच्या भागामध्ये किंवा जिथे तुम्हाला किराणा दुकान सुरू करायचा आहे तिथं मार्केट रिसर्च करावा.
मार्केट रिसर्च मध्ये तुम्हाला खालील गोष्टींची माहिती काढायची आहे.
Competition Research For Kirana Store Business
- कोणत्या भागात स्पर्धा आणि किराण्याची दुकानं कमी आहे अशा भागांची एक यादी तयार करा.
- तुम्ही ज्या भागात तुमचं दुकान सुरू करणार आहात तिथं इतर किती किराण्याची दुकान आहेत?, तिथं स्पर्धा किती आहे?
- ज्यांची किराण्याची दुकान चांगली चालतात ते असं काय करतात की ज्यामुळे त्यांची दुकान चालतात.
- त्यांच्या काय Strength आहे आणि काय Weakness आहे ते शोधा.
- त्याचबरोबर हे किराणा दुकानदार त्यांच्या व्यवसायाची मार्केटिंग आणि जाहिरात कशी करतात त्याचं निरीक्षण करा.
- ज्यांची दुकान चांगली चालत नाही त्यांच नेमकं काय चुकत आहे त्याचं देखील निरीक्षण करा.
Customer Research For Kirana Store Business In Marathi
- तुम्ही ज्या भागात किरणाच दुकान सुरू करणार आहात त्या भागातील लोकांचं उत्पन्न किती आहे?
- तिथं कमी उत्पन्न असलेले लोक राहतात की जास्त उत्पन्न असलेले लोक राहतात याची माहिती काढा.
- त्या भागातील लोक कोणते प्रॉडक्ट आणि वस्तू वापरतात याची माहिती काढा.
- त्यांचं वय, आवडीनिवडी, गरजा लक्षात घ्या. वयानुसार देखील व्यक्तीच्या गरजा बदलतात.
- प्रत्येक भागातील संस्कृती नुसार तेथील लोकांचं खानपान आणि राहणीमान हे वेगळं असतं त्यामुळे त्याचा देखील थोडा अभ्यास करा.
- हव तर एखादा छोटासा सर्वे करा आणि त्या भागातील लोकांना काही प्रश्न विचारून त्यांच्याकडून माहिती गोळा करा.
व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेले स्किल ( Skills Required To Start Kirana Store In Marathi)
एक वेळेस शालेय शिक्षण कमी असलं तरी चालतं परंतु तुमच्या अंगामध्ये काही स्किल असणं अत्यंत गरजेचे आहे आणि किराणा दुकान सुरू करण्यासाठी देखील तुमच्या अंगात काही स्किल असले पाहिजे.
Communication Skill For Kirana Business
तुम्हाला जर जास्तीत जास्त कस्टमर मिळवायचे आणि टिकवायचे असतील तर तुम्हाला चांगलं बोलता येणे अत्यंत गरजेचे आहे. कस्टमर सोबत बोलताना तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य असलं पाहिजे.
Marketing Skill For Kirana Business
तुम्हाला तुमच्या किराणा दुकानाची मार्केटिंग करावी लागेल त्यासाठी तुमच्याकडे मार्केटिंग करण्याचं स्किल असलं पाहिजे.
Sales Skill For Kirana Business –
तुम्हाला तुमच्या दुकानात वेगवेगळे प्रॉडक्ट विकायचे असतात त्यामुळे तुमच्याकडे विक्री करण्याची कला असली पहिजे.
Stock Management Skill For Kirana Store
किराणा दुकानात तुम्हाला वेगवेगळे प्रॉडक्ट आणि त्यांचा स्टॉक मॅनेज करावा लागतो त्यामुळे हे skill देखील तुमच्याकडे असलं पाहिजे.
किराणा दुकानाचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही एखाद्या किराणा दुकानात काही दिवस काम देखील करू शकता त्याचबरोबर तुम्ही इंटरनेटवरून या सर्व गोष्टी शिकू शकता. या आमच्या वेबसाईटवर देखील या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला मिळेल.
व्यवसायासाठी योग्य ठिकाणाची निवड कशी करावी? ( How To Find Best Location For Kirana Store Business In Marathi)
किराणा दुकानाचे यश हे मोठ्या प्रमाणावर त्या दुकानाच्या लोकेशनवर अवलंबून असतं आणि म्हणूनच व्यवसाय सुरू करण्याची घाई न करता आधी एक चांगलं ठिकाण तुम्ही निवडणे गरजेचे आहे.
आता इथे आपल्याला आपण आधी केलेल्या मार्केट रिसर्चच फायदा होतो.
- तुमच्या शहरातील एखाद्या वर्दळीच्या ठिकाणी किंवा Residential भागात तुम्ही किराण्याचे दुकान सुरू करू शकता.
- तुम्ही तुमचं किराण्याचं दुकान जास्त लोकसंख्या किंवा लोकवस्ती असलेल्या भागातच सुरू करावं.
- ज्या भागात किराण्याची दुकान अत्यंत कमी आहे किंवा अजिबात नाही अशा ठिकाणी तुम्ही तुमचं किरण्याचा दुकान सुरू करू शकता.
- मोठ्या शहरांच्या आसपास असा भाग असतो जिथे मोठमोठ्या अपार्टमेंट आणि घर असतात परंतु जास्त दुकान नसतात अशा ठिकाणी देखील तुम्ही तुमचं दुकान सुरू करू शकता.
अशा ठिकाणी दुकान सुरू करणे टाळावं ज्या ठिकाणी आधीपासूनच अनेक किराण्याची दुकानं आहे.
किराण्याच्या व्यवसायासाठी दुकानाची आवश्यकता ( Shop Required Sto Start Kirana Store In Marathi )
किराण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही भाड्याने दुकान घेऊ शकता किंवा जर तुमचं घर चांगल्या ठिकाणी असेल तर तुम्ही तुमच्या घरातून देखील हा व्यवसाय सुरू करू शकता.
घराच्या पुढच्या भागात तुम्ही तुमचं दुकान तयार करू शकता.
व्यवसायासाठी आवश्यक असलेले लाइसेंस आणि रजिस्ट्रेशन ( License & Registration Required to Start Kirana Store In Marathi )
किराणा दुकान सुरू करण्यासाठी तुम्हाला काही लायसन्स आणि रजिस्ट्रेशनची आवश्यकता असते. जर तुमच्याकडे आवश्यक असलेली लायसन्स नसतील तर तुम्हाला अनेक प्रॉब्लेम चा सामना करावा लागेल.
Shop Act License
प्रत्येक राज्यांमध्ये दुकान सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे लायसन्स असतात आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दुकान सुरू करायचं असेल तर तुमच्याकडे शॉप ॲक्ट लायसन्स असलं पाहिजे. हे लायसन्स तुम्हाला कुठेही काढून मिळेल.
MSME Registration
तुम्ही उद्योग आधार किंवा उद्यम रजिस्ट्रेशन देखील करू शकता याला MSME रजिस्ट्रेशन असं देखिल म्हणतात.
GST Registration
जर तुमचा एका वर्षाचा टर्नओव्हर 40 लाखांपेक्षा जास्त होत असेल तर तुम्हाला जीएसटी रजिस्ट्रेशन कराव लागेल.
FSSAI Food License
किराणा सामानातील बहुतेक पदार्थ हे खाद्यपदार्थ असतात आणि म्हणूनच तुम्हाला फूड लायसन्स काढाव लागेल.
- Unique Name – तुम्ही तुमच्या किराणा दुकानासाठी एखाद युनिक नाव निवडू शकता कारण कॉमन नावांकडे लोकांचं लक्ष जात नाही परंतु जर एखादा विचित्र अफलातून नाव असेल तर लोकांचं त्याकडे लक्ष जातं आणि ते नाव ते दुकान लोकांच्या कायम लक्षात राहत.
- व्यवसायाची माहिती देणारं नाव – तुम्ही किराणा व्यवसाय करत आहात म्हणुन मग त्या व्यवसायाची माहिती देणारं नाव देखील तूम्ही ठेवू शकता जसे की रामचरण स्टोअर्स, साई सुपर मार्केट.
होलसेल ने किराणा माल कुठून आणि किती किमतीला आणायचा? ( Wholesale Supplier For Kirana Store In Marathi)
किराणा दुकान सुरु करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी होलसेल ने माल खरेदी करावा लागेल. वेगवेगळ्या मालासाठी आणि प्रॉडक्ट साठी तुम्हाला वेगवेगळ्या Distributor आणि Dealer कडून माल घ्यावा लागतो.
जसे कि हल्दीराम च्या प्रॉडक्ट चे डिस्ट्रिब्युटर वेगळे असतात तर साबणाचे डिस्ट्रिब्युटर वेगळे असतात. प्रत्येक कंपनी चे वेगवेगळे डिस्ट्रिब्युटर असतात. त्यांच्या किमती ठरलेल्या असतात
आजकाल मार्केट मध्ये असे देखील होलसेलर असतात ज्यांच्याकडे तुम्हाला सगळे प्रॉडक्ट मिळतील परंतु त्यांच्याकडे रेट थोडेसे जास्त असतात.
आता या लोकांशी संपर्क कसा करायचा ?
तुम्ही Google वर सर्च करू शकता तिथे तुम्हाला सगळ्यांचे contact details मिळतील.
प्रत्येक शहरात वेगवेगळे Wholesaler, Distributor आणि Dealer असतात आणि त्यांचे contact details मिळवण्यासाठी तुम्हाला Google वर खालील प्रकारे सर्च करायचे आहे.
किराणा Wholesaler कसे शोधायचे?
- Kirana wholesaler near me
- Grocery wholesaler near me
- Kirana wholesaler in Pune ( Pune च्या जागी तुमच्या शहराचे, तालुक्याचे नाव टाका )
वेगवेगळ्या कंपन्यांचे Distributor आणि Dealer कसे शोधायचे?
- Haldiram distributor/dealer near me
- Balaji Distributor/dealer near me
- Haldiram distributor/dealer in Pune ( Pune च्या जागी तुमच्या शहराचे, तालुक्याचे नाव टाका )
Note:
- Haldiram च्या जागी वेगवेगळ्या कंपनी आणि त्यांच्या प्रॉडक्ट चे नाव टाका.
- तुम्हाला एका प्रॉडक्ट चा distributor सापडला कि त्याच्याकडून तुम्ही इतर होलसेलर ची देखील माहिती मिळवूं शकता.
तुम्ही जर जास्त Quantity मध्ये माल खरेदी करू शकत असाल तर तुम्ही Direct कंपनी कडून किराणा माल खरेदी करू शकता. तिथे तुम्हाला सगळ्यात स्वस्त किमतीत माल मिळेल.
किराणा स्टोअर साठी फुर्निचर आणि इतर उपकरणे ( Furniture & Other Equipments For Kirana Store In Marathi )
तुम्हाला तुमच्या किराणा स्टोअर साठी थोडेफार फर्निचर आणि इतर साहित्य देखील खरेदी करावे लागेल जसे
त्यांची नावे आणि किमती खालीलप्रमाणे
Items | Price/ Piece |
---|---|
किराणा शॉप काउंटर | ५,००० |
किराणा ठेवण्यासाठी रॅक | ४,५०० |
डिस्प्ले रॅक | ५,००० |
फ्रिज | १५,००० ते २०,००० |
या वस्तू तुम्ही ऑनलाइन Amazon, Flipkart, Indiamart अशा website वरून देखील खरेदी करू शकता किंवा ऑफलाईन दुकानांमधून देखील खरेदी करू शकता.
किराणा शॉप साठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता ( Employees Needed For Kirana Store In Marathi )
नवीन दुकान सुरु केल्यावर तुम्हाला सुरुवातीला कर्मचारी ठेवण्याची आवश्यकता नाही परंतु कस्टमर वाढल्यावर तुम्ही कर्मचारी ठेऊ शकता. कर्मचाऱ्यांना तुम्ही तुमच्या Area आणि कामानुसार पगार देऊ शकता For Ex – ६,००० ते १५,००० महिना पेमेंट तुम्ही त्यांना देऊ शकता.
कर्मचाऱ्यांना देखील तुम्ही वेळोवेळी प्रशिक्षण दिले पाहिजे जेणेकरून ते देखील चांगलं काम करू शकतील.
किराणा व्यवसाय सुरु करण्यासाठी किती भांडवल लागेल ? ( Investment Needed to Start A Kirana Store In Marathi )
किराणा दुकानासाठी किती भांडवल लागेल हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असते. जर तुम्हाला एक छोटं किराण्याच्या दुकान सुरु करायचं असेल तर दुकानातील फर्निचर आणि इतर साहित्यासाठी ८०,००० ते १,५०,००० पर्यंत खर्च येतो आणि किराणा माल हा तुम्ही ३ ते ४ लाखांचा खरेदी करू शकता.
परंतु फक्त एवढ्यातच काम होत नाही दुकान सुरु केल्यावर त्याच दर महिन्याचं भाडं, लाईट बिल असे इतर खर्च देखील तुम्ही हिशोबात धरावे.
सर्व मिळून एकूण ४ ते ५ लाखात तुम्ही एक छोटं किराणा स्टोअर सुरु करू शकता.
तुमच्याकडे जर इतकं भांडवल नसेल तर तुम्ही अजून छोट किराणा दुकान सुरु करू शकता म्हणजे तुम्ही ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत देखील दुकान सुरु करू शकता.
किराणा दुकान सुरु करताना एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या कि तुमचं किराणा दुकान छोटं असलं तरी चालेल परंतु ते भरलेलं दिसलं पाहिजे. जर लोकांना तुमचं दुकान मोकळं दिसलं तर ते तुमच्या दुकानात येणारच नाही.
ग्राहकांची मानसिक स्तिती अशी असते कि जर त्यांना मोकळं दुकान दिसलं तर त्यांना असं वाटत कि या दुकानात आपल्याला हवी असलेली वस्तू मिळणार नाही.
किराणा स्टोअर व्यवसायाची मार्केटिंग कशी करावी ? ( Marketing Ideas For Kirana Store In Marathi )
कोणत्याही व्यवसायातून जास्तीत जास्त प्रॉफिट कमावण्यासाठी जास्तीत जास्त कस्टमर मिळाले पाहिजे आणि त्यासाठी मार्केटिंग करावी लागते. किराणा दुकानाची मार्केटिंग तुम्ही खालील पद्धतीने करू शकता.
डिस्काउंट ऑफर लोकांना खूप आवडतात –
- वेगवेगळ्या डिस्काउंट ऑफर देणे हि किराणा दुकानासाठी एक अतिशय चांगली मार्केटिंग आयडिया आहे.
- भारतातील लोकांचे उत्पन्न हे तुलनेने कमी आहे त्यामुळे लोक डिस्काउंट कडे खूप आकर्षित होतात.
- भारतात अनेक सणसमारंभ असतात त्यामुळे तुम्ही फेस्टिवल डिस्काउंट ऑफर देऊ शकता.
दुकानाच्या बाहेर दुकानात विकल्या जाणाऱ्या वस्तूंचा बोर्ड लावणे –
अनेक वेळेस किराणा दुकानात आपल्याला हवी असलेली वस्तू मिळत नाही त्यामुळे लोक कधी कधी दुकानांबाहेरची पाटी पाहूनच निघून जातात त्यामुळे तुम्ही तुमच्या किराणा दुकानात विकल्या जाणाऱ्या वस्तूंचा ठळकपणे बोर्ड लावा.
दुकानाच्या नावाचे एकदम आकर्षक बनवा आणि त्यात लाईट वगैरे लावा कारण अनेक लोक दुकानाच्या नावाचे बोर्ड बघून दुकानाची पात्रता ठरवतात. तुमच्या दुकानाच्या नावाचे बोर्ड हे स्पष्ट, मोठे आणि आकर्षक असले पाहिजे.
कस्टमरला अपमान झालेला अजिबात आवडत नाही –
अनेक दुकानदार कस्टमर सोबत नीट बोलत नाही त्यामुळे अनेक कस्टमर त्या दुकानात परत येत नाही. तुमचं दुकान कितीही चांगलं असेल पण जर तुमची बोलण्याची पद्धत नीट नसेल तर ग्राहकाला अपमान झाल्यासारखे वाटते आणि तो दुकानात परत येत नाही.
- कस्टमर सोबत बोलताना चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा.
- कस्टमर सोबत बोलताना आदरपूर्वक बोला.
- तुम्हाला कस्टमर काळजी आहे हे दाखवा.
- कस्टमर दुकानात आल्यावर त्याला ताटकळत उभ करू नका, त्याला लगेच काय हवं ते विचारा
Free मध्ये मिळणाऱ्या वस्तू लोकांना खूप आवडतात –
लोकांनी जर ठराविक किमतीचा किराणा तुमच्या दुकानातून विकत घेतला तर त्याला तुम्ही काही Free प्रॉडक्ट देऊ शकता. लोकांना Free मध्ये मिळालेल्या वस्तू खूप आवडतात आणि यामुळे लोक तुमच्या दुकानातून खुश होऊन जातील.
तुम्ही त्या free प्रॉडक्ट ला एखाद्या Gift पॅक करायच्या कागदात पॅक करून देऊ शकता.
Gift सोबत एखाद सुविचार किंवा Quote लिहलेल कार्ड देऊ शकता ज्यांने लोकांना चांगलं वाटेल.
किराणा होम डिलिवरी सर्विस –
तुम्ही ज्यावेळेस किराणा दुकान सुरु कराल तेव्हा तुम्हाला देखील स्पर्धकांचा सामना करावा लागेल आणि म्हणूनच Competition वर मात करण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी Competitive Advantage असाल पाहिजे.
तुम्ही तुमच्या ग्राहकांना Home Delivery ची सर्विस देऊ शकता. आजकाल लोक आळशी झालेले आहे त्यांना सर्व गोष्टी घरपोहोच हव्या असतात आणि म्हणूच तुम्ही जर लोकांना Home delivery ची सर्विस दिली तर खूप लोक तुमच्या दुकानाकडे आकर्षित होतील.
Mouth Publicity –
माऊथ पब्लिसिटी हि एक अशी गोष्ट आहे जी तुमचा व्यवसाय खूप मोठा करू शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या Existing कस्टमर ला चांगली सर्विस द्यावी लागेल आणि जर त्यांना तुमच दुकान आवडलं तर ते इतर लोकांना देखील तुमचं दुकान Recommend करतात.
दुकानाची जाहिरात कशी करावी? ( Advertising Ideas For Kirana Store In Marathi )
दुकानाची जाहिरात करण्यासाठी तुम्ही खालील माध्यमांचा वापर करू शकता –
फेसबुक वर जाहिरात –
तुम्ही फेसबुक वर तुमच्या शहरामध्ये तुमच्या किराणा दुकानाची जाहिरात करू शकता. फेसबुक वर अतिशय कमी खर्चात तुम्ही जाहिरात करू शकता आणि तुमच्या कस्टमर पर्यंत पोहचू शकता. आजकाल लोक मोठ्या प्रमाणावर Facebook चा वापर करतात त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला भरपूर कस्टमर मिळतील.
Google My Business –
तुम्ही Google My Business वर तुमचा बिजनेस लिस्ट करू शकता म्हणजे जेव्हा कोणीही Google वर kirana store near me किंवा kirana store in Your city name अशा प्रकारचे शब्द सर्च करेल तेव्हा तुमच दुकान आणि त्याची माहिती त्या व्यक्तीला दिसेल.
Pamphlet & Newspaper Ads –
तुम्ही न्यूजपेपर ला जाहिरात देखील देऊ शकता किंवा आसपास पॅम्प्लेट देखील वाटू शकता. हि एक जुनी पद्धत आहे परंतु तिचा देखील थोडाफार फायदा तुम्हाला नक्कीच होईल.
Holding –
तुम्ही वर्दळीच्या ठिकाणी तुमच्या किराणा शॉप च एखाद बॅनर किंवा होल्डिंग लावू शकता. Holding बघून देखील अनेक नवीन ग्राहक तुम्हाला मिळतील.
किराणा दुकान मालाची यादी आणि प्रॉफिट मार्जिन ( Grocery Products List & Profit Margin In Marathi)
Products | प्रॉफिट मार्जिन (%) |
---|---|
दाळ, तांदूळ, धान्य, आटा, तेल, साखर | १५ % ते २०% |
सर्व प्रकारचे मसाले | २५% ते ३० % |
बेकरी प्रॉडक्ट | २०% ते ३०% |
प्रसिद्ध ब्रँड चे प्रॉडक्ट | ५% ते १५% |
अन्य पैक्ड प्रॉडक्ट | १५% ते ३० % |
पानी | ३०% ते ५० % |
Notes :
- किराणा व्यवसायात एकूण जवळपास १०% ते १५ % प्रॉफिट मार्गिन तुम्हाला मिळत.
- ब्रँड प्रॉडक्ट मध्ये प्रॉफिट मार्जिन कमी असते परंतु ते विकायला सोपे असतात
- Local प्रॉडक्ट मध्ये प्रॉफिट मार्जिन जास्त असते.
- दोन्हींचे योग्य Combination तुम्ही ठेवा
किराणा व्यवसायातून तुम्ही किती प्रॉफिट कमावू शकता ( How Much You Can Earn From A Kirana Store Business in marathi )
किराणा व्यवसायात प्रॉफिट मार्जिन थोडं कमी असत परंतु किराणा प्रॉडक्ट ची विक्री खूप जास्त होते कारण या सर्व वस्तू या गरजेच्या असतात.
या व्यवसायात तुम्ही जास्त प्रॉफिट मार्गिन कमावण्यापेक्षा जास्तीत जास्त विक्री करण्यावर लक्ष देणे गरजेचे असते.
तुम्ही जर लोकांना चांगला रेट आणि Quality दिली तर तुम्ही आयुष्यभरासाठी कस्टमर जोडू शकता.
तुम्ही जर रोज १० हजाराचा माल विकला तर १ ते २ हजार रुपये तुमचा प्रॉफिट असतो.
म्हणजे तुम्ही आरामात ३० ते ५० हजार रुपये महिना या व्यवसायातून कमावू शकता.
किराणा दुकानाचा प्रॉफिट कसा वाढवायचा ( How to Increase Kirana Business Profit In Marathi )
किराणा दुकानाचा प्रॉफिट वाढवण्यासाठी तुम्ही किराणा सामानाबरोबरच इतर जास्त प्रॉफिट मार्जिनचे प्रॉडक्ट देखील विकू शकता जसे की ब्युटी प्रॉडक्ट, Amul चे प्रॉडक्ट, आणि इतर गृह उपयोगी प्रॉडक्ट.
तुम्ही आजकाल बघत असाल की दुकानाच्या बाहेर लिहिलेलं असतं की ‘किराणा अँड जनरल स्टोअर’ ते यासाठीच म्हणूनच तुम्ही इतर जनरल प्रॉडक्ट देखील तुमच्या किराणा दुकानात विकू शकता.
किराण्याच्या व्यवसाय मोठा कसा करायचा ? ( How to Grow Kirana Store In Marathi )
Start A Supermarket –
किराणा व्यवसाय मोठा करण्यासाठी तुम्ही भविष्यात एखाद सुपरमार्केट सुरु करू शकता आणि किराण्याबरोबरच इतरही अनेक प्रॉडक्ट विकू शकता. या ठिकाणी लोक स्वतः त्यांच्या पद्धतीने ट्रॉली च्या किंवा बास्केट च्या मदतीने तुमच्या सुपरमार्केट मधील सामान खरेदी करतील. या ठिकाणी तुमची कमाई देखील खूप जास्त होईल.
Give Franchise –
तुम्ही तुमच्या किराणा दुकानाचा किंवा सुपरमार्केट चा एक ब्रँड बनवू शकता आणि मग इतर लोकांना Franchise देऊ शकता. पूर्ण देशात तुमच्या किराणा ब्रँड च्या शाखा निर्माण होतील आणि त्यातून तुमची करोडो रुपयांची कमाई होईल.
Online Kirana Store –
तुम्ही Online एखाद Ecommerce Store बनवू शकता आणि त्याच्या माध्यमातून पूर्ण देशात किराणा विकण्याचं काम सुरु करू शकता. भारतात अशा प्रकारचे अनेक Online Kirana Stores आहे.
Start a Chain of multiple stores –
तुम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये स्वतः चे वेगवेगळे किराणा दुकानं सुरु करू शकता आणि एक किराणा दुकानाची चैन तयार करू शकता.
किराणा व्यवसायासाठी काही महत्वाच्या टिप्स ( Important tips for Kirana Store Business In Marathi)
- सुरुवातीला कमी Quantity आणि जास्त Variety ठेवा. कारण जर ग्राहकाला हवं असलेला प्रॉडक्ट तुमच्या दुकानात त्याला भेटला नाही तर तो दुसऱ्या दुकानात जातो आणि तुमच्या दुकानात परत येत नाही.
- तुमच्या दुकानात ऑनलाइन पेमेंट करायचा पर्याय उपलब्ध असावा कारण आजकाल लोक Online, Digital Payment करणे पसंद करतात.Amazon Pay, Google Pay, Phone Pay, UPI, PayTm अशा प्रकारचे Options तुम्ही लोकांना देऊ शकता.
- तुम्ही काळानुसार व्यवसायात बदल केला पाहिजे जसे कि ऑनलाइन ऑर्डर घेणे आणि घरपोहोच डिलिवरी करणे. Online माध्यमांचा व्यवसायासाठी वापर करणे.
- नवीन तंत्रज्ञानाचा आणि सॉफ्टवेअर चा वापर करून अनेक कामं सोपी करा.
- दुकानातील वस्तू लोकांना सहज दिसतील अशा पद्धतीने त्या ठेवा.
- दुकानाची वेळ निच्छित करा. तुमच्या भागातील लोकांच्या गरजेनुसार दुकानाची वेळ निच्छित करा.
- प्रत्येक ग्राहकाशी चांगली ओळख करून घ्या. त्यांच्या आवडीनिवडी आणि गरजेनुसार दुकानातील माल भरा.
- दुकानात गरजेपेक्षा जास्त माल भरू नका नाहीतर नुकसान होईल तसेच दुकानातील सामान खराब होणार नाही अशा पद्धतीने ते ठेवा.
- तुमचं दुकान हे साफ आणि स्वच्छ ठेवा.
- कस्टमर ला एखादा प्रॉडक्ट खराब निघाला तर तो बदलून द्या कारण तुम्हाला फक्त एक प्रॉडक्ट ची विक्री करायची नाही तर एक Life Time कस्टमर मिळवायचा आहे.
निष्कर्ष ( Conclusion )
वरील पद्धतींचा वापर करून तुम्ही तुमचा किराणा स्टोअर चा बिजनेस सुरु करू शकता अशाच नवनवीन बिजनेस आयडिया जाणून घेण्यासाठी खाली तुमचा Email सबमिट करा.