पुरुषांसाठी १५ घरगुती व्यवसाय | 15 Home Business Ideas For Men In Marathi

Lockdown नंतर घरगुती व्यवसायाचं महत्व लोकांच्या लक्षात आलं आहे. आज या पोस्ट मध्ये मी पुरुषांसाठी १५ घरगुती व्यवसाय सांगणार आहे. यातील अनेक व्यवसाय तुम्ही शून्य भांडवलात सुरु करू शकता आणि हे व्यवसाय पुरुषांबरोबरच महिला देखील करू शकता. 

Home Business Ideas for men in marathi

पुरुषांसाठी १५ घरगुती व्यवसाय ( Home Business Ideas For Men In Marathi )

1.  Blogging

ब्लॉगिंग हा पुरुषांसाठी एक अत्यंत सोपा घरगुती व्यवसाय आहे. Blogging सुरु करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची मोठी Investment करण्याची गरज नाही. तुम्ही स्वतःचा स्मार्टफोन आणि इंटरनेट Connection वापरून घरबसल्या ब्लॉगिंग सुरु करू शकता.

तुम्ही Blogger वर Free मध्ये स्वतःचा Blog सुरु करू शकता किंवा WordPress वापरून एकदम Professional Blog बनवू शकता.

2. YouTube Channel

तुम्ही घरबसल्या स्वतःच YouTube Channel सुरु करू शकता आणि त्यावर Videos Upload करून चांगले पैसे कमावू शकता. अनेक पुरुष YouTube चॅनेल च्या माध्यमातून दर महिन्याला लाखो रुपये कमावत आहे.

Blogging प्रमाणेच YouTube चॅनेल हा देखील पुरुषांसाठी एक सोपा घरगुती व्यवसाय आहे. फक्त एका स्मार्टफोन आणि इंटरनेट चा वापर करून तुम्ही हा Online Business सुरु करू शकता.

YouTube चॅनेल कसं सुरु करायचं आणि Grow करायचं याचे अनेक Tutorials तुम्हाला YouTube वर मिळून जातील. 

3. Video Editing

आजच्या काळात लोक Internet खूप जास्त Videos बघतात. तुम्ही देखील YouTube, Instagram आणि Facebook या ठिकाणी Videos बघत असाल.

अनेक लोक YouTube वर असे Videos अपलोड करून त्यातून पैसे कमावता. परंतु हे Videos बनवताना अनेक कामे करावी लागतात जसे कि Reasearch, Script Writing, Video Shooting, Video Editing. एवढे सगळे कामे एकटा व्यक्ती करू लागला तर त्याच्यावर कामाचा खूप ताण येतो. 

एक पाच मिनिटाचा Video बनवण्यासाठी अनेक तास लागतात आणि म्हणूनच जर तुम्ही या लोकांना योग्य Price मध्ये Video Edit करून दिले तर त्यातून तुम्ही अतिशय चांगले पैसे कमावू शकता. 

कामे मिळवण्यासाठी तुम्ही या YouTubers शी Contact करू शकता. कोणताही पुरुष घरबसल्या हा व्यवसाय करू शकतो. 

4. Content Writing

या आधी मी तुम्हाला Blogging नावाची Business Idea सांगितली. आता अनेक लोक Blogging करत आहे आणि त्यातून चांगले पैसे देखील कमावत आहे. व्यवसाय मोठा झाल्यावर Article लिहण्यासाठी blogger हा इतर लोकांना कामावर ठेवत असतो. 

जर तुम्हाला चांगले Articles लिहता येत असतील तर तुम्ही अशा Blogger शी Contact करून Content Writing ची कमाई मिळवू शकता.  मग तुम्ही या मोठ्या Blogs साठी Article लिहून Article नुसार किंवा Words नुसार पैसे Charge करू शकता.

5. Amazon Seller

घरबसल्या Amazon वर वेगवेगळ्या Products ची विक्री करणे हा देखील पुरुषांसाठी एक चांगला घरगुती व्यवसाय आहे. Amazon जगातील सगळ्यात मोठी Shopping वेबसाईट आहे.

भारतामध्ये करोडो लोक Amazon वरून वेगवेगळे Products खरेदी करतात आणि हे Products अमेझॉन चे स्वतःचे नसतात तर छोटो मोठे व्यावसायिकच Amazon वरून हे Product विकत असतात. 

कोणताही व्यक्ती Amazon वर Seller म्हणून अकाउंट उघडू शकतो आणि ऑनलाईन Products विकून पैसे कमावू शकतो. 

6. खानावळ

मोठमोठ्या शहरांमध्ये लोक खानावळीच्या धंद्यातून खूप पैसे कमावत आहे. शहरांमध्ये अनेक लोक दुसऱ्या शहरांमधून किंवा खेडेगावांमधून आलेले असतात.

शिक्षणासाठी तसेच कामधंद्यासाठी त्यांना या मोठ्या शहरांमध्ये यावे लागते आणि या ठिकाणी त्यांना खानावळ किंवा मेस चा खूप फायदा होतो. 

तुम्ही देखील तुमच्या घरातून एकादी खानावळ किंवा जेवणाची मेस सुरु करू शकता. जेवण बनवण्यासाठी तुम्ही घरातील महिलांची मदत घेऊ शकता किंवा स्वतः एखादा Cooking चा कोर्स करू शकता.

7. Work As A Freelancer

आजकाल कंपन्या पर्मनंट employees कामावर ठेवण्यापेक्षा Freelancer कडून काम करून घेतात. Freelancer म्हणजे हे अशे लोक असतात जे स्वतंत्रपणे वेगवेगळ्या कंपन्यांची कामे घेतात आणि प्रोजेक्ट नुसार किंवा तासानुसार पैसे charge करतात. 

Upwork.com, Fiverr.com अशा अनेक वेबसाईट आहे ज्यावर तुम्हाला कामे मिळतील. त्याचबरोबर काही Facebook Group देखील आहे ज्यावर तुम्हाला कामे मिळतील. 

8. Social Media Manager

जवळपास प्रत्येक व्यक्ती Social Media चा वापर करतो.

जे मोठमोठे लोक असतात जसे कि Politicians, Businessmans, Blogger, YouTuber आणि Celebrities या लोकांसाठी Social Media वरील Presence खूप महत्वाचा असतो परंतु प्रत्येक व्यक्ती Social Media वापरण्यात Expert नसतो. 

तुम्ही या लोकांची Social Media Account Manage करू शकता आणि त्यासाठी ठराविक पैसे Charge करू शकता. 

9. Digital Marketing Agency

कोणत्याही व्यवसायासाठी मार्केटिंग अतिशय गरजेची असते परंतु प्रत्येकाला मार्केटिंग करता येत नाही आणि म्हणूनच इथं तुमच्यासाठी संधी निर्माण होते. 

तुम्ही डिजिटल मार्केटिंग कशी करायची ते ऑनलाईन Free मध्ये शिकू शकता आणि स्वतःची Digital Marketing Agency सुरु करू शकता.

इथं तुम्ही इतरांच्या व्यवसायाची, प्रॉडक्ट्स ची तसेच Organization ची मार्केटिंग करून देऊ शकता आणि चांगले पैसे कमाऊ शकता.

10. Website & App Developer

आजकाल प्रत्येक व्यावसायिकाला त्याच्या Business साठी Website किंवा App बनवायचं असत. तुम्ही Website कशी बनवायची ते ऑनलाइन Free मध्ये शिकू शकता आणि स्वतःचा घरबसल्या व्यवसाय सुरु करू शकता. 

तुम्ही वेबसाइट नुसार पैसे charge करू शकता. २००० रुपयांपासून १ लाख रुपयांपर्यंत तुम्ही charge करू शकता. फेसबुक Group आणि YouTube च्या माध्यमातून तुम्ही कस्टमर मिळवू शकता.

11. Tuition Classes

ट्युशन क्लासेस सुरु करणे हा पुरुषांसाठी एक अत्यंत उत्कृष्ट घरगुती व्यवसाय आहे. ट्युशन सेंटर सुरु करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाही. 

तुम्ही तुमच्या घरातच मोकळ्या वेळेत शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवू शकता आणि चांगले पैसे कमावू शकता. तुम्ही त्यांना गणि, विज्ञान, इंग्लिश असे अनेक विषय शिकवू शकता. 

तुम्ही कॉलेज च्या विद्यार्थ्यांना देखील अनेक विषय शिकवू शकता जसे कि Math, Physics, Chemistry, Biology, Accounting, आणि Taxation. 

12. Create & Sell Online Courses

आजकाल लोक वेगवेगळे ऑनलाइन कोर्सेस बनवून ते विकत आहे आणि त्यातून ते करोडो रुपये कमावत आहे. तुम्ही देखील इंटरनेट वर वेगवेगळ्या कोर्सेस च्या जाहिराती बघितल्याचं असतील.

तुम्ही जवळपास Topic वरील Online Courses बनवू शकता जसे कि मार्केटिंग, Acadamic Education, Fitness, Public Speaking, Blogging. 

आजकाल Online कोर्सेस बनवणे खूप सोपे आहे. तुम्ही तुमचा स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरून तुमचे Online व्हिडिओ कोर्सेस बनवू शकता आणि विकू शकता.

13. Yoga Classes

तुम्ही स्वतःचे घरगुती योगा क्लासेस सुरु करू शकता आणि तुमच्या शहरातील लोकांना योगा शिकवून चांगले पैसे कमावू शकता. 

हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला स्वतःला योगासने शिकावी लागतील त्यासाठी तुम्ही एखादा योगा चा कोर्से करू शकता.

तुम्हाला इथ नुसती योगसनेच शिकायची नाही तर त्या प्रत्येक योगासनांमागचं Science आणि त्यांची फायदे देखील व्यवस्थित समजून घ्यायचे आहे जेणेकरून जेव्हा तुम्ही स्वतःचा क्लास सुरु कराल तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होईल.

14. Self-Publish Books

तुम्ही घरबसल्या स्वतःच पुस्तक पब्लिश करू शकता. तुम्हाला ज्या विषयच ज्ञान असेल किंवा ज्याबद्दल तुम्हाला अनुभव असेल अश्या कोणत्याही विषयावर तुम्ही एक पुस्तक लिहू शकता आणि ते Self-publish करू शकता. 

आजकाल Book पब्लिश करणे हि अत्यंत सोपी गोष्ट आहे तुम्ही Amazon Kindle वर Free मध्ये स्वतःच पुस्तक पब्लिश करू शकता. 

15. Selling Shirts From Home

तुम्ही घरबसल्या पुरुषांचे शर्ट विक्री च काम करू शकता. तुम्ही एखाद्या Wholesaler कडून Wholesale ने शर्ट विकत आणू शकता आणि तुमच्या घरातूनच त्यांची विक्री करू शकता. 

सुरत, मुंबई, पुणे, बँगलोर या ठिकाणी तुम्हाला अतिशय स्वस्तात शर्ट मिळतील त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या जवळपासच्या मोठ्या शहरांमध्ये देखील होलसेल ने शर्ट मिळतील. 

शर्ट विकण्यासाठी तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांपासून सुरुवात करू शकता आणि मग Facebook चा देखील वापर करू शकता. सुरुवातीला अतिशय स्वस्तात तुम्हाला हे शर्ट विकायचे आहे त्याचबरोबर तुम्ही वेगवेगळे डिस्काउंट देखील इथं देऊ शकता. 

Conclusion – 

जस मी आधी सांगितलं कि पुरुषांबरोबरच महिला देखील हे व्यवसाय सुरु करू शकता आणि चांगले पैसे यातून कमावू शकता. अश्याच नवनवीन Business Ideas आणि त्यांची Detail मध्ये माहिती जाणून घेण्यासाठी खाली तुमचा Email टाकून Submit करा.

Loading
< < मराठी Home Page वर जाण्यासाठी
< < मुख्य Home Page वर जा जाण्यासाठी ( Big Mastery.com)

हे देखील वाचा

Swapnil Shinde

Big Mastery चे Founder आणि CEO. स्वप्निल शिंदे हे Ecommerce, Business Education, Content Creation, Hosting अशा अनेक व्यवसायांमध्ये कार्यरत आहे.

Leave a Reply