दिवाळीसाठी ९ बिजनेस आयडिया | 9 Diwali Business Ideas In Marathi

दिवाळीच्या काळात जर तुम्ही काही व्यवसाय केलेत तर तुम्ही पूर्ण वर्षभराची कामे एका महिन्यात करू शकता. 

या Post मध्ये मी तुम्हाला काही Diwali Business Ideas सांगणार आहे. अतिशय कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही हे व्यवसाय दिवाळीच्या काळात करू शकता आणि चांगला पैसे कामू शकता.

दिवाळीसाठी ९ व्यवसायाची यादी ( List of Diwali Business Ideas In Marathi )

१. Healthy फराळ आणि मिठाई चा व्यवसाय

फराळ आणि मिठाई शिवाय दिवाळी साजरी केली जाऊ शकत नाही. तुम्ही Healthy आणि घरगुती फराळ किंवा मिठाई बनवून देण्याचा व्यवसाय करू शकता. तुम्ही तुमच्या फराळाला Health आणि फिटनेस चा Touch देऊ शकता.  जसे कि तिळाचे लाडू, Dry fruits चे लाडू, गव्हाचे भाजलेले शंकरपाळे.

तुम्ही YouTube वर तसेच Google वर Healthy फराळाच्या Recipes कशा बनवायच्या ते बघू शकता.

दिवाळीमध्ये फराळ खाण्याची इच्छा सगळ्यांनाच असते परंतु सगळ्यांनाच बनवता येत नाही त्याचा बरोबर आजच्या काळात घरातील महिला आणि पुरुष हे दोघेही नोकरी करतात त्यामुळे फराळ बनवायला त्यांना Time मिळत नाही आणि इथंच तुमच्यासाठी संधी निर्माण होते.

तुम्ही लोकांकडून Direclty फराळाच्या Orders घेऊ शकता आणि त्यांच्या गरजेनुसार फराळ आणि मिठाई बनवून देऊ शकता किंवा तुम्ही आधीच फराळ बनवून ठेऊ शकता आणि अर्धा किलो, एक किलो किंवा दोन किलो चे पॅकेट बनवून ठेऊ शकता. 

दिवाळीच फराळ हे लोक ३००, ४००, ४५०, ५०० तसेच १००० रुपये Per Kg ने विकत घेता आणि तुम्ही तर Healthy फराळ बनवून देणार आहेत त्यामुळे तुम्ही अजून जास्त पैसे charge करू शकता. 

त्या व्यवसायातून तुम्ही अतिशय चांगले पैसे कमाऊ शकता. तुमच्या हाताला किती चव आहे यानुसार तुम्ही पैशे charge करू शकता. 

सर्वसामान्य फराळ तर अनेक जण बनवून देतात परंतु तुम्ही जर healthy फराळ बनवून दिल तर तुमच्या व्यवसायात नावीन्य निर्माण होईल आणि अनेक Health Concious लोक तुमच्याकडून असे healthy फराळ बनवून घेतील. तुम्ही तुमच्या व्यवसायाची Marketing देखील “ Healthy फराळ ” अशी करू शकता. 

व्यवसायामध्ये नावीन्य निर्माण करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या आकाराचं फराळ बनवू शकता.

२. आकाशकंदील विकण्याचा व्यवसाय

दिवाळीच्या काळात लोक आकाशकंदील विकून खूप जास्त पैशे कमावतात. तुम्ही आकाश कंदील विकण्याचा व्यवसाय सुरु करू शकता. 

एखाद्या Wholesaler कडून तुम्ही आकाश कंदील विकत घेऊ शकता आणि एखादा स्टॉल लावून किंवा तुमच्या दुकानात तुम्ही आकाश कंदील विकू शकता.

दिवाळीच्या काळात आकाशकंदील प्रचंड महाग मिळतात.  १०० रुपयापासून २००० रुपयांपर्यंतचे आकाशकंदील देखील लोक खरेदी करतात. तुम्ही कोणत्या ठिकाणी आकाशकंदील विकत आहेत त्यानुसार तुम्ही स्वस्त किंवा महाग आकाशकंदील विक्रीसाठी ठेऊ शकता.

३. पणत्या चा व्यवसाय

दिवाळी हा दिव्याचा, पणत्यांचा सण आहे.  दिवाळीच्या नावातच दिवा आहे. पणत्या आणि दिव्यनशिवाय दिवाळी साजरी केली जाऊ शकत नाही.

तुम्ही पणत्या विकण्याचा व्यवसाय या काळात करू शकता. वेगवेगळ्या आकाराच्या आकर्षक मातीच्या पणत्या तुम्ही विकून चांगले पैशे या काळात कमाऊ शकता. 

व्यवसायात नावीन्य निर्माण करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या आकाराच्या मातीच्या Eco- Friendly पणत्या विकू शकता. 

हा व्यवसाय तुम्ही अतिशय कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये सुरु करू शकता. 

४. सजावटीचे सामान विकण्याचा व्यवसाय

दिवाळीच्या काळात लोकांना त्यांचे घर, अंगण सजवण्याची प्रचंड हौस असते त्यामुळे दिवाळी च्या काळात लोक सजावटीचे सामान मोठ्याप्रमाणावर खरेदी करतात. 

तुम्ही रांगोळी, लायटिंग, तोरण  तसेच इतर घर सजावटीचे साहित्य विकू शकता. त्यासाठी तुम्ही एखादा स्टॉल लावू शकता किंवा जर तुमचं एखाद दुकान असेल तर तिथे देखील तुम्ही या गोष्टी विकू शकता.

अतिशय कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही हा व्यवसाय करू शकता. 

५. फुलं आणि पूजेच्या रेडिमेड साहित्याचा व्यवसाय

आपल्या भारतामध्ये सणांच्या काळात फुलांना खूप महत्व आहे. या काळात फुलांचे व्यापारी खूप पैसा कमावतात. या काळात फुलाचे भाव देखील खूप अधिक असतात. तुम्ही वेगवेगळ्या फुलाचा तसेच फुलाचे हार विकण्याचा व्यवसाय करू शकता. 

त्याचबरोबर पूजेचे रेडिमेड साहित्य तुम्ही लोकांना विकू शकता. अशा प्रकारच्या व्यवसाय या काळात खूप चालतो. पूजेचे सर्व साहित्य लोकांना एकाच जागी मिळते त्यामुळे लोकांना देखील त्याचा फायदा होतो.

त्याचबरोबर देवी लक्ष्मीच्या वेगवेळ्या आकर्षक मूर्ती तसेच Photo देखील लोक या काळामध्ये खरेदी करतात. तुम्ही या सर्व गोष्टी तुमच्या स्टॉल मध्ये किंवा दुकानांमध्ये ठेऊ शकता. 

६. कपड्यांचा व्यवसाय

दिवाळीच्या काळात लोक मोठ्या प्रमाणावर कपडे खरेदी करतात. तुम्ही लहान मुलांचे, स्रियांचे किंवा पुरुषांचे कपडे या काळात विकू शकता. 

तुम्ही दिवाळीच्या आधीच गुजरातमधील सुरत मधून किंवा तुमच्या आसपासच्या एखाद्या Wholesaler कडून माल विकत घेऊन ठेऊ शकता आणि दिवाळीच्या काळात एखादा स्टॉल लावून तुम्ही कपडे विकू शकता. 

तुम्हाला सगळ्याच प्रकारचे कपडे विकायचे नाहीये तुम्ही फक्त महिलांच्या साड्या किंवा फक्त ड्रेस किंवा फक्त पुरुषांचे शर्ट किंवा जीन्स विकू शकता. 

कपड्याच्या व्यवसायातून तुम्ही दिवाळीच्या काळात चांगले पैसे कमाऊ शकता. 

७. महिलांचे दागिने आणि इतर ऍक्सेसरीज

दिवाळीच्या काळात महिला मोठ्या प्रमाणावर वस्तूंची खरेदी करता. तुम्ही महिलांची Artificial ज्वेलरी तसेच इतर Accessories या काळात विकू शकता. तुम्ही घरोघरी प्रत्येक कॉलनी मध्ये जाऊन देखील अशा वस्तूंची विक्री करू शकता.

महिलांच्या Accessories चा व्यवसाय तसा वर्षभर चालतो परंतु या काळात या वस्तूंची जरा जास्तच मागणी असते. 

तुम्ही या काळात फुलांचे गजरे देखील विकू शकता. महिलांकडून गजऱ्यांना या काळात मोठ्या प्रमाणावर मागणी असते.

८. दिवाळी घरे साफसफाई चा व्यवसाय

दिवाळीच्या काळात लोक त्यांच्या घराची साफसफाई करतात. तुम्ही दिवाळीच्या काळात लोकांची घरे साफ करून देण्याचा व्यवसाय सुरु करू शकता. आजकाल घरातील महिला आणि पुरुष दोघेही जॉब करतात त्यामुळे त्यांना त्यांच्या घरांची साफसफाई करायचा वेळ मिळत नाही आणि इथेच तुमच्यासाठी संधी निर्माण होते. 

House cleaning हा एक वर्षभर चालणार व्यवसाय आहे आणि दिवाळीच्या काळात House Cleaning च्या Service ला भारतामध्ये प्रचंड मागणी असते. 

तुम्ही जर थोडीशी माहिती काढली तर तुमच्या लक्षात येईल कि एका Two Bhk Flat ची Basic Cleaning चे लोक २५०० ते ३००० charge करतात तर Deep Cleaning करण्याचे ४००० ते ४५०० रुपये charge करतात. 

तुम्ही जर योग्य दारात लोकांची घरे साफ करून दिलीत तर तुम्हाला भरपूर customer मिळतील. 

दिवाळीच्या काळात घरे साफसफाई च्या व्यवसायातून तुम्ही भरपूर पैसे कमाऊ शकता.

९. भेटवस्तू चा व्यवसाय

दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा सण आहे या काळात लोक एकमेकांना भेटवस्तू देतात. तुम्ही unique भेटवस्तू विकण्याचा व्यवसाय सुरु करू शकता. 

दिवाळीनंतर भाऊबीज देखील असते आणि या भाऊबीजेला देखील भाऊ त्याच्या बहिणीला भेटवस्तू देतो त्यामुळे दिवाळी बरोबरच दिवाळीला नंतर येणारे सणांमधून देखील तुम्ही चांगली कमाई करू शकता. 

आजकाल लोक एकमेकांना Dry Fruits चे Decorative Pack भेटवस्तू म्हणून देतात तुम्ही याचा देखील व्यवसाय करू शकता. 

Conclusion

दिवाळीच्या काळात तुम्ही वर सांगितलेले व्यवसाय करू शकता परंतु दिवाळी व्यवसाय करायचा मग एक दिवस आधी व्यवसाय सुरु करून चालत नाही तुम्ही दोन – तीन महिने आधीच त्याची तयारी करावी लागते. 

वेगवेगळे seasonal व्यवसाय करून तुम्ही अतिशय चांगले पैसे कमाऊ शकता. 

Post कशी वाटली ते comment मध्ये नक्की सांगा. 

अशाच नवनवीन Post नियमितपणे मिळवण्यासाठी खाली तुमचा Email Id Submit करू शकता.

Loading

हे देखील वाचा

Swapnil Shinde

Big Mastery चे Founder आणि CEO. स्वप्निल शिंदे हे Ecommerce, Business Education, Content Creation, Hosting अशा अनेक व्यवसायांमध्ये कार्यरत आहे.

Leave a Reply